Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
आरोग्य जपताना ...

Hitguj » Living Abroad » General issues » आरोग्य जपताना « Previous Next »

Lalu
Wednesday, March 22, 2006 - 5:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'देश तसा वेष' असं म्हणतात. पण हे फक्त वेषापुरतं मर्यादित नाही. परदेशात रहायला आल्यानन्तर तिथल्या हवामान, परिस्थितीनुसार आहार, राहणीमान, दिनक्रम, सवयी यात काही ना काही बदल होतो. तर काही गोष्टी आपण बदलत नाही. यातले कोणते बदल आवश्यक आहेत, एकमेकाला पूरक आहेत ज्यामुळे आपण परदेशातही आपले आरोग्य चांगले ठेवू शकू?

काही वर्षापूर्वी TV वर एशियन ( मला वाटते भारतीयच ) तरुण मुलांशी याबद्दल थोडक्यात मतं घेण्यात आली होती. आता डिटेल्स आठवत नाहीत पण या मुलांनी इथे आल्यावर त्यांचे वजन कसे वाढले, शुगर वाढली, कधी नव्हते ते problem सुरु झाले यावर माहिती दिली होती.

IT बूम मधे किंवा त्या आधी, नन्तर आलेली पिढीही आता तिशीत, चाळीशीत पोचते आहे.आरोग्याबाबत विचार करायला हरकत नाही. ( मी घाबरवत नाही हां. ) याबद्दल तुमची मते, अनुभव, ऐकलेले, वाचलेले काही असेल तर इथे लिहावे.

इथल्या वैद्यकीय सोयींची उपलब्धता, त्यांचा कसा फायदा करुन घेता येईल याचीही माहिती आली तरी चालेल. तब्येतीच्या तक्रारी कुठेही येवू शकतात पण खास करुन परदेशात रहाणार्‍यानी तिथे आरोग्य जपण्यासाठी काय करावे यावर माहिती लिहावी.


Milindaa
Wednesday, March 22, 2006 - 5:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तर काही गोष्टी आपण बदलत नाहीत. <<< हे असलं मराठी ? तू लालू असणं शक्य नाही.. खरं सांग, कोण आहेस तू ?

नियमितपणा हा सर्वात महत्वाचा आहे असं मला वाटतं. व्यायाम काय, किंवा योग्य आहार काय, नियमितपणा नसेल तर काही उपयोग नाही.

आता नियमितपणा कसा आचरणात आणायचा यावर कोणीतरी सल्ले द्या..


Lalu
Wednesday, March 22, 2006 - 5:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गॅप पडल्यामुळे रे, मधे मी नव्हते ना इथे. तुझं बरोबर आहे नियमीतपणा पाहिजे.

मला असं म्हणायचं आहे की 'योग्य' म्हणजे काय. काही गोष्टी सगळ्या ठिकाणी योग्य असतीलच असं नाही. मी अजून उदाहरणं लिहीन.


Lalu
Wednesday, March 22, 2006 - 9:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या विषयावरचे २ स्टडीज् मला सापडले त्याची लिन्क देत आहे

http://www.news.uiuc.edu/news/06/0209immigrants.html

http://www.statcan.ca/english/research/82-618-MIE/82-618-MIE2005002.htm

पहिली लिन्क ही immigrants च्या आहारातील बदलावर ( and not for the better) आहे.

दुसर्‍या लिन्क मधे कॅनडा मधला सर्वे आहे. त्यातल्या conclusion मधला हा काही भाग.
Immigrants generally arrive with better health than the Canadian-born. However, as time passes, this “healthy immigrant effect” tends to diminish, as their health status converges with that of the host population. Some medical problems may arise as immigrants age, as well as when they are integrated and adopt behaviours that have negative health impacts. Other health problems may be due to the stress of immigration itself, which involves finding suitable employment and establishing a new social support network.

अशा प्रकारची काही स्वतःच्या, दुसर्‍याच्या अनुभवातून मिळालेली, वाचलेली, पाहिलेली माहिती इथे लिहावी असं अपेक्षित आहे.

एक उदाहरण म्हणजे मला सुरवातीला वाटायचं की इथे लोक लन्च ला एक सॅंडविच किंवा salad नाहीतर सूप असं खाऊन कसं राहू शकतात पण इथल्या रुटीन ची सवय झाल्यावर तेच बरोबर आहे हे लक्षात आलं. ( भारतात नेतात तसा डबा खाल्ला तर जडत्व येतं आणि दुपारी झोप येते ~D)

Milindaa
Wednesday, March 22, 2006 - 10:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला हे फारसं पटलं नाही. या लोकांना उठल्यानंतर प्रचंड मोठा नाश्ता करायची सवय असते ( हल्ली ही सवय अस्तंगत होते आहे हा भाग वेगळा ) , त्यामुळे खूप जेवण जात नाही आणि त्यामुळे परत संध्याकाळी लवकरच जेवणे होतात.

भारतात असा डबा खाऊन जडत्व येत नव्हतं का ? नव्हतं... याचं कारण आपण घरातून निघताना खूप खात नसू...

याचा अर्थ हे बरोबर आहे असे मला म्हणायचे नाही, पण हा बदल करणे आवश्यक असते असे मला वाटत नाही. मी कितीतरी वर्षे डबा नेतो आहे. in fact तो डबा बघून मलाच इथले लोक म्हणतात, तू एवढसं खाऊन कसा राहतोस ते कळत नाही :-)


Lalu
Wednesday, March 22, 2006 - 10:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी खरं तर वरच्याच पोस्ट मधे ते नाश्त्याचं लिहिणार होते. :-) हे लोक जेवण केल्यासारखा नाश्ता करतात. पण रात्रीच्या जेवणानन्तरचे पहिलेच खाणे, त्याची शरीराला गरज पण असते तेव्हा हेवी नाश्ता करणे योग्य आहे. तेव्हा गरज असल्याने त्याचे पचनही होते. मग लाईट लन्च आणि रात्रीचे जेवण लवकर म्हणजे झोपायच्या बरेच आधी होते, हे पण योग्यच आहे. भारतात उशीरा जेवून झोपतात त्यामुळं नाश्याची गरज वाटत नाही असं असणं शक्य आहे का? पण नाश्ता टाळू नये हे कुठेही राहिलं तरी खरं आहे.

पुन्हा भारतात दमणूकही जास्त होते, चालणे होते. याही गोष्टींचा परिणाम असेल. ( तुझं ठीक आहे बाबा, माझं वय लक्षात घे की! ~d)


Sashal
Thursday, March 23, 2006 - 5:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता युरोपातलं मला माहित नाही किंवा इकडे NY सारख्या ठिकाणचंही माहित नाही .. पण मुंबईत तरी व्यायाम हा आपोआप होतो त्यासाठी वेगळा वेळ किंवा efforts घ्यावे लागत नाहित .. माझा स्वतःचा हा अनुभव आहे की जेव्हापासून मी local ने प्रवास करणं सोडलं, regularly चालणं सोडलं तेव्हापासून weight gain, lethargy हे असले भलते सलते रोग व्हायला लागले आहेत .. कदाचित हा माझा गैरसमज असेल पण मुंबईत होते तोपर्यंत मला कधीच माझ्या diet ची काळजी करावी लागली नाही आणि आरोग्याची सुध्दा .. पण इकडे US मध्ये आल्यापासून इकडच्या lifestyle मुळे प्रचंड फ़रक पडलाय .. कदाचित सतत गाडीचा वापार, सगळीकडे सगळ्या तर्‍हेच्या सूखसोयी यामुळे रोजचा किमान व्यायाम सुध्दा इकडे होत नाही .. तेव्हा व्यायाम आणी आहारातला बदल नक्कीच केला पहिजे ..

दिवसातला आहार हा उतरत्या क्रमाने असायला हवा हे मला श.भर टक्के पटते ..


Asami
Thursday, March 23, 2006 - 3:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी कुठे तरी वाचलेले कि दगदग किंवा daily routine आणी व्यायाम ह्या गोष्टि वेगळ्या आहेत. Typically, you would not feel tired or overworked after exercise, while these are common syndrome of day-to-day chores. Pl do not confuse them with each other.

Storvi
Thursday, March 23, 2006 - 4:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असामी I don't think they are talking about stress अरे तिथे रोजच्या कामाला सुद्धा चलण गरजेच असतं अस त्यांचं म्हणणं असावं. मलाही तसच वाटतं म्हणजे. मी सुद्धा साधी भाजी वगैरे अणायची तर चालतच जायची समोर्च्या चौका पर्यंत. इथे तस होत नाही. दिवसातुन अनेक वेळा जिने वर खाली व्हायचे या ना त्या कारणावरुन ते इथे होत नाही. करण दगदग माझ्या मते इथे जास्ती असते. म्हणजे जेंव्हा सगळ्या सुख सोयी उपलब्ध असतात तेंव्हा आपण जाअस्ती कामं कराय्चा प्रयत्न करतो. पण दगदग does not equate to exercise मी वाचला आहे infact की ज्यांचं आयुष्य stressful असतं त्यांचं वजन कमी होण्याचे chances कमी असतात.

Asami
Thursday, March 23, 2006 - 6:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिल्पा मी कुठे stress बद्दल बोललोय सशल day to day routine बद्दल बोलत अहे असे मला तीच्या local प्रवास्सच्या उल्लेखावरून वाटतेय. नुसते चाळने हि exercise नव्हे. it is part of it, but it not complete package

Lalu
Friday, March 24, 2006 - 3:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असामी, मान्य आहे. पण साशल चा मुद्दा मला वाटतं असा आहे की त्या प्रकारच्या रुटीन मुळे कॅलरीज बर्न होउन वजन आटोक्यात रहायला त्याचा उपयोग होतो. बाकी व्यायामाने मिळतात ते सगळे फायदे मिळणार नाहीत हे बरोबर आहे.

CPR येतं का कुणाला? इथे हायस्कूल मधे मुलाना शिकवतातच. त्यासाठी एक किटही मिळते.
http://www.americanheart.org/presenter.jhtml?identifier=3033740

सीमा, तुझं पोस्ट का डिलीट केलंस, मी नीट वाचलं पण नव्हतं अजून.


Seema_
Friday, March 24, 2006 - 4:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालु , नंतर व्यायाम bb सापडला . त्यावर जास्त योग्य वाटेल म्हणुण तिकडे टाकण्यासाठी delete केल .

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators