|
bar jhaal.n aaThaval naav .. .. .. . .. . .. .. .. .. ..
|
श्यामले, बरोब्बर मीच विसरलो होतो नाव. लोप्स, yahoo वर नसतेस का?
|
Bani
| |
| Tuesday, July 04, 2006 - 10:00 pm: |
| 
|
सर्वात सुंदर म्हणजे दिर्घश्वसन आहे नाकाने १ ते ३ आकड्यापर्यंत श्वास घ्यायचा व सोडताना ६ आकड्यापर्यं सोडायचा हा श्वसन प्रकार कोणीही करू शकते. विशेषत्: लेडीज ना तर पेशन्स टिकवण्यासाठी हा खुपच छान उपाय आहे. मी इन्डिया मधे असताना मला याचा खुपच फ़ायदा झाला कारण मी रोज पासपोर्ट च्या कामासाठी बरेच किलोमिटर फिरत होते २ व्हिलर वर फिरल्या मुळे हेक्टीक थकल्यासारखे वाटायचे पण दिर्घश्वसनाचा आणि योगा क्लासचा खुपच फायदा झाला.
|
Bee
| |
| Saturday, September 09, 2006 - 3:39 am: |
| 
|
समर्या, मी रोज ही क्रिया करत नाही. वमन केल्यामुळे पोटातील पित्त बाहेर पडते. नाही तर पित्त खवळले की आपला ताबा सुटतो. वमनाचा आणखी दुसरा उद्देश आहे पोट आतून धुवुन काढणे. म्हणजे रात्री जर खूप अरबट चरबट जेवन तुम्ही घेतले असेल तर वमन केल्यामुळे पोट आतून धुतल्या जाते आणि आतील पिशवीला कसलेच विकार होत नाहीत. म्हणून नियमित वमन करावे त्यामुळे पुढे वृद्धपणात देखील आपण पथ्यहीन जेवण घेऊ शकतो. तुमचे बरोबर आहे, नविन काहीही खाल्ले की मी हमखास वमन करतो. मग मला कळते की मी केलेला मेनू कुठे चुकला. जसे मला आता कळले की इतक्या कांद्यांचा किस पोटात जाणे बरोबर नाही. अजून मला लक्षात आले की १) कढीपट्याची पाने कधीच खाऊ नका. ती वरतून काढून टाका. २) कोथीम्बीरीचे देठ हे देखील digest होत नाही. ३) सुकलेल्या भाक्या खाऊ नका. जसे काही वेळा हिरव्या भाज्यांची पाने पिवळी होतात तरी ती चिरताना भाजीत येतात. अशी पाने मुळीच digest/crushed होत नाही पोटात आत गेल्यानंतर. ४) Tomato चे वरचे साल देखील काढून टाका. बर्याचदा उकळलेल्या Tomato चे साल भाज्यांवर वरती तरंगते ते काढून टाका. ५) शिळी कणिक, जर ती मऊ नसेल आणि आतमध्ये गाठी झाल्या असतील तर ती खाऊ नका. निदान गाठी तरी काढून टाका. बर्याचदा कणिक fridge मध्ये कडक कि.व्ना कोरडी पडल्यामुळे तिची elasticity नष्ट होते. मग पोळी वातळ होते आणि पोटाला ती जड जाते. ६)काळे जळलेले अन्न, पोळीवरचा काळा पापूद्रा मुळीच खाऊ नका. तो काढून टाका. सर्वात बेस्ट म्हणजे भरपूर कोंडा fibre असलेले पदार्थ खावेत. संत्रीमध्ये सर्वात जास्त fibre असते असा माझा अंदाज आहे.
|
Bee
| |
| Wednesday, September 13, 2006 - 11:13 am: |
| 
|
परवा रविवारी नविन तुकडीला आमच्या गुरुंनी वमन शिकविले. तेंव्हा त्यांनी एक उदाहरण दिले की त्यांच्या मित्राला त्यांनी जेंव्हा वमन कसे झाले विचारले तेंव्हा त्यांचा मित्र उत्तरला The world look bright! तेंव्हा पोटात साचलेलं पित्त किंवा नासलेलं अन्न तसेच तिथे राहू देण्यापेक्षा ते पोटातून बाहेर काढून तात्पुरती वाटणारी शिसारी सहन केलेली कधीही बरी असे मला वाटते. तुम्ही सर्वजण इतकी किळस बाळगत आहात म्हणून मला इथे येऊन लिहावेसे वाटले. तुमच्यापैकी कुणीतरी प्रवृत्त होईल अशी आशा करुन. बाकी चाललेल्या विनोदाला माझा काही रागलोभ नाही. चला कुणाला तरी 'वमन' माहिती झाले काय असते ते. तेही नसे थोडके. शेवटी आमचा उद्देश हाच आहे की हठयोगा नष्ट होता कामा नये. इतके औषधपाणी केल्यापेक्षा शिस्तिने जर योगा केला तर कितीतरी शांती लाभेल जीवाला. प्राणीमात्र विषिष्ठ प्रकारचे गवत खावून आपोआप उलटी करतात. तुम्ही जर कुत्रे मांजरी ह्यांचे आजारपणात निरिक्षण केले तर तुम्हाला कळेल की ते गवत खावून उलटी करतात. आपल्याला आजारपणात ओकारी का होते कारण शरीरातील पित्ताचे प्रमाण शरीर सहन करू शकत नाही म्हणून. ती ओकारी आम्बट असते म्हणजेच पित्त असते. लहान बाळाची ओकारी वेगळी. तेंव्हा मोठ्यांना ओकारी होणे चांगले. एकदाची जळमट बाहेर पडते. वर मी हठयोगा म्हंटले आहे. संकृतमध्ये ह म्हणजे सुर्य आणि ठ म्हणजे चंद्र असा त्याचा अर्थ होतो. योगामध्ये डावी नाकपुडी म्हणजे सुर्य आणि उजवी म्हणजे सुर्य.
|
Ashwini
| |
| Wednesday, September 13, 2006 - 4:22 pm: |
| 
|
बी, वमन हा अतिशय प्रभावी उपचार आहे आणि तो योग्य रित्या केला तर कित्येक वेळा विकाराचा समूळ नाश करतो. परंतु, यातली ' योग्य रित्या ' ही अतिशय आवश्यक गोष्ट आहे. शास्त्रीय पद्धतीने वमनोपचार घेण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी आवश्यक आहे. आणि वमन ही एकट्याने करण्याची क्रिया नव्हे. ती तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली, सगळी पूर्वकर्म आणि पश्चात्कर्म पार पाडूनच केली पाहीजे. तू करतोस ते सद्योवमन. त्यालाही शास्त्राधार आहे. परंतु ते तात्कालिक असले पाहीजे. म्हणजेच जेंव्हा दोषांचा उत्क्लेष आपोआप झाला असेल आणि तीव्रता खूप असेल तर करणे फायद्याचे आहे. सहज गंमत म्हणून किंवा कोणते अन्न पचले ते पाहायला करणे योग्य नव्हे. अकाली आणि पूर्वकर्म न केलेल्या वमनाचे side-effects होतात ते वेगळेच. तुला नविन ज्ञान घ्यायला आवडते आणि तू त्याचा वापर पण करतोस ही कौतुकाची गोष्ट आहे. पण संपूर्ण माहितीशिवाय कुठलीही गोष्ट केली तर ती आरोग्याला घातक ठरू शकते.
|
Sayba
| |
| Wednesday, September 13, 2006 - 5:27 pm: |
| 
|
पूर्वकर्म आणि पश्चात्कर्म ह्यावर अधिक महिती देणार का?. तसेच side-effects पण सांगाल का?.
|
Bee
| |
| Thursday, September 14, 2006 - 4:34 am: |
| 
|
अश्विनी, मी जे करतो त्याला जलधौती म्हणतात. मी हे माझ्या योगाच्या गुरुंकडून शिकलो आहे. कुणालाच मी योगा theroitically follow करा असे सांगत नाही. चुकीची पद्धत अंगी बाणली तर त्याचे विपरीत परिणाम होतात हे एकदम खरे आहे म्हणूनच योगा निष्णात गुरुंकडूनच शिकावा असे त्रिवार सांगणे असते.
|
Meggi
| |
| Thursday, September 14, 2006 - 12:22 pm: |
| 
|
मी लिहितेय ते आहारशास्त्र BB वर योग्य आहे, पण इथे उल्लेख आलय म्हणुन सांगते. कढिपत्ता जरुर खावा, हृदयविकारावर उपयोगी असतो. केस पण काळे रहातात. पचत नसेल तर चटनीमध्ये बारीक करुन वगैरे टाकावा.
|
Shyamli
| |
| Sunday, October 01, 2006 - 6:36 pm: |
| 
|
निराश अबस्था टाळण्या करता मोठ्याने प्रणवोच्चार करुन पाहिला आहे का? फायदा होतो हा अनुभव >>>> भ्रमा किंवा इतर कोणि जाणकार.... ह्याबद्दल पण बोला जरा आणि मेडिटेशन बद्दल कुणिच काहि लिहिलं नाहिये.... जरा सविस्तर येउ दे प्लीज...
|
बरोबर आहे श्यामली. in fact प्रणवोच्चार रोज करायला काहीच हरकत नाही! निराशावस्थेत खर तर तुम्ही मोठ्याने देवाचं स्तोत्र म्हटलत किवा गाण म्हटलत तरी फायदा होईल. कारण मन हे त्या क्रियेवर केंद्रीत होत. प्रणवोच्चारा खेरीज सोहम मंत्राचा देखिल फायदा होतो!
|
Shyamli
| |
| Wednesday, October 11, 2006 - 8:34 am: |
| 
|
अरे पण नीट काय ते सांग ना आणि मेडीटेशन च काही बोललाच नाहीस की
|
श्यामली, तु सगळे archives वाचून काढ. तुला माहिती मिळून जाईल. अत्यन्त उत्कृष्ठ आहे. आणि प्राणायाम, औंकार आणि सात्विक अन्न ठेव.. मग बघ कुठेच्या कुठे पळून जाते नैराश्य
|
Kaviash
| |
| Friday, October 20, 2006 - 2:42 pm: |
| 
|
तुम्हाला योगा आणि प्राणायमाची माहिती खालील वेब साइट वर पण मिळू शकते. http://divyayoga.com प्राणायमा साठी http://divyayoga.com/pranayam.htm
|
Bee
| |
| Tuesday, November 14, 2006 - 11:24 am: |
| 
|
तुमच्यापैकी सर्वांनाच cholesterol बद्दल माहिती असेल. आपल्या शरिराचा liver हा भाग हे cholesterol वाढवण्याचे काम करतो. योगामधे काही आसने तर काही श्वसनाच्या क्रिया अशा आहेत ज्यामुळे कित्येक high cholesterol व्यक्तींना त्याचा फ़ायदा झाला आहे. मी ज्या आश्रमात योगा शिकवितो तिथे कित्येक जण आपले अनुभव share करायला येतात आणि त्यांचे अनुभव ऐकून बरेच जण योगासाठी प्रेरीत होतात. योगामधे खालील आसन आहेत ज्यामुळे cholesterol कमी होते - १) अग्निसार - अग्निसारचे बरेच फ़ायदे आहेत. त्यापैकी एक cholesterol कमी होणे हा होय. २) पवनमुक्तासन ३) मत्स्यासन ४) सुर्यनमस्कार श्वसनक्रिया - १) श्वसक्रियेमधे, लोक विलोम प्राणायमाचे पहाटे फ़क्त ५ आवर्तन जरी केलेत तरी पुरे आहे. ध्यानाबद्दल मी उद्या लिहिन. प्रामाणिकपणे मला जे माहिती आहे तेवढेच लिहिन.
|
धन्यवाद बी, नक्की लिही, बी अजुन १, त्या अश्रमाचा address मिळु शकेल का... अजुन १ म्हणजे, इकडे रामदेव बाबान्ची CD मिळते, ति पाहुन किन्वा चन्गले योगा चे पुस्तक वाचुन आसने केली तर चालते का...
|
वजन आणि जाडी कमी करण्यासाठी योगा करायचा आहे त्याबद्दल माहिति कोनी देइल का डोंबिवली मधे योगा वर्ग कोठे आहेत
|
मनकवडा, योगविद्या ही अनुभवि गुरुच्या मार्गदर्शनाखाली प्राप्त कराबी. बघुन तुम्ही आसन करु शकता, पण posture बरोबर आहे का किंवा अंतिम स्थितीमधे गेल्यावर श्वासाची क्रिया या सर्व गोष्टीकडे शिक्षक नीट पाहु शकतो! बी पण सहमत असेल याच्याशी! निल्या, डोंबिवलीमधे वर्ग आहेत, शोधावे लागतील तुला! मला वाटतं पांडुरंग वाडी मधे आहेत. मत्स्येन्द्रसन देखिल उपयुक्त आहे cholestral कमी करण्या करता! हलासन हे आणखी एक थोडेसे कठीण पण उपयुक्त आसन आहे!
|
Mrsbarve
| |
| Monday, December 18, 2006 - 2:06 am: |
| 
|
namaste , far changali mahiti ithe milate aahe.carpel tunnel warati upayukt tharu shakatil ashi yogasane aahet kay?
|
नमस्कार, आपण योग विद्या निकेतन, नवी मुंबई येथे संपर्क करुन त्यांचा सल्ला घ्या
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|