|
Bee
| |
| Wednesday, September 20, 2006 - 2:09 am: |
| 
|
सास, ही सगळी लक्षणे प्र म्हणते तशी spondilytis ची आहे. मी तुला घाबरून देत नाही पण खरच काळजी घे. मी योगा शिकवितो म्हणून तुला एकच अगदी ठामपणे सांगतो की योगाच्या पोटावर झोपून करावयाची जवळपास सगळी आसने तू नक्की कर. खास करुन भुजंगासन. आणि एक अगदी लक्षात ठेव. शक्य असेल तेवढे पाठीत खाली वाकून नकोस. बरेच जण पाय समोर सरळ करुन पाठ खाली वाकवण्याचा व्यायाम करात. त्यानी spondilytis बळकावतो. कारण प्रत्येक मणक्यातील gap जास्त वाढल्यामुळे हा आजार होतो. जर खाली वाकलीस तर gap आणखी वाढते. म्हणून खाली वाकण्याच्या क्रिया एकदम बंद कर. झाडताना देखील खूप खाली वाकू नकोस. पाट्यावरचे वाटण बंद कर. हात वर करुन मागे वाक ते बरे राहील. पोटावर झोपून नाग जसा फ़णा काढतो तशी हळूच मान वर ने आणि छताकडे एकटक बघ. ह्याला भुजंगासन म्हणतात. ते तुला कुणीही बेसिक योगा येणारा व्यक्ती शिकवू शकेन. माझ्या बहिणीला देखील अगदी mild spondilytis detect झाला आहे. तिला मी भुजंगासन शिकविले तर ती म्हणाली छान आराम पडतो हे आसन करुन बघितले की. तिचे सर्व symtoms तुझ्याचसारखे आहे. तू अगदी त्वरीत X-ray काढ. तिने Doctor कडे जावून बरेच उपचार घेतले पण खरे सांगायचे तर त्याचा तिला काहीही फ़ायदा झाला नाही. ह्यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे व्यायाम. तोही असातसा नसून पाठिच्या कण्याला दिला जाणारा व्यायाम. तुला जर योगाच्या असाअनांची नावे हवी असतील तर मला सांग. मी तुला सगळी माहिती नीट कळवीन आणि तू कुठे राहतेस तेही सांग. मी तुला योग्य ती योगशाळाही सुचवीन. पण खरच सतर्क रहा. कारण पाठीच्या कण्यावरच आपले चालणे फ़िरणे काम करणे अवलंबून असते.
|
Narayanp
| |
| Tuesday, October 03, 2006 - 4:27 pm: |
| 
|
मीसीका हिरड्या सुजण्याचा वर एक सोपा उपाय, एका चमचा त मोहरि चे तेल घवून त्यात थोडे मीठ टाकुन हलके गरम करुन ना मालीश कर
|
Sas
| |
| Wednesday, October 04, 2006 - 5:48 pm: |
| 
|
BEE खुप खुप आभार मला आसनांचि नाव व इतर माहिति हवि आहे. तुम्हि दिलेलि माहिति खुप आवश्यक आहे; मला इतर माहिति हि द्या; Please. मी x-ray काढ्ले पण इथल्या Dr. काहि निट सांगितल नाहि आता Blood Test करणार आहे .
|
Sas
| |
| Wednesday, October 04, 2006 - 5:53 pm: |
| 
|
चक्कर येणे , डोक गरगर करणे, डोळ्या समोर अंधारि येणे, मळमळणे ह्या सर्वांना काय म्हणतात in English????? Pls give English words for all above. Thanks
|
Fulpakhru
| |
| Wednesday, October 04, 2006 - 8:09 pm: |
| 
|
सास, चक्कर येणे = feeling dizzy मळमळणे = feel like vomiting डोळ्यासमोर अन्धेरी येणे = everything gets blurred out in front of eyes बहुतेक. डोके गरगर करणे माहित नाही.
|
Supermom
| |
| Wednesday, October 04, 2006 - 8:40 pm: |
| 
|
डोके गरगरणे म्हणजे vertigo असावे बहुतेक.
|
Swa_26
| |
| Monday, October 09, 2006 - 8:50 am: |
| 
|
मान अवघडण्यावर काही उपाय आहे का? कि ते आपोआपच बरे होईल? माहीतगारांनी मार्गदर्शन करावे.
|
मानेचे व्यायाम करावे थोडे... मान इकडे तिकडे फ़िरवणे.. मान गोल फ़िरवणे, भुजन्गासन इत्यादी
|
Bee
| |
| Wednesday, November 08, 2006 - 3:18 am: |
| 
|
योगामधे योगमुद्रा आहेत. त्यात मानेसाठी ३ प्रकार आहेत आणि खांद्यांसाठी २ प्रकार आहेत. योगमुद्रा नियमित केली की मानदुखी सांधेदुखीचा आजार एकदम दूर होतो. ह्या पाठोपाठ ब्रह्ममुद्रा आहेत. त्या केल्यामुळे चटकन मनःशांती लाभते. पचनसंस्थेचे कार्य सुधारते. हे सर्व योगा शिकवतात तिथे जावून शिकून घ्यावे.
|
Disha013
| |
| Thursday, November 09, 2006 - 7:16 pm: |
| 
|
प्लीज प्लीज,मदत करा, माझ्या मैत्रीणीचा मुलगा ८ महिन्यांचा आहे त्याला खालचे २ दात आले आहेत.. पण वरचे समोरचे २ दात येण्याऐवजी वरचेच बाजुचेच दात येताना दिसताहेत.... असे होते का? दात क्रमानेच यायला हवेत ना? dentisT कडे जावे काय?
|
दिशा, आधी खालचे दात च येणे योग्य असते... आणी असे काही नाही की खालचे समोरचे दात आले कि वरचेच समोरचे दात येतात... क्रमाने यावेत असे काही नसते... म्हणुन काळजी करण्याचे कारण नाही... पण खालचे आधी यावेत असे लिहले आहे...
|
Swa_26
| |
| Friday, November 10, 2006 - 9:14 am: |
| 
|
Thanks all of you माझा दुसरा एक प्रश्न असा आहे, की सध्याच्या धकाधकीच्या आणि व्यस्त जीवनात stamina वाढविण्यासाठी काय करता येईल?
|
Disha013
| |
| Friday, November 10, 2006 - 4:36 pm: |
| 
|
thanks मनकवडा, सांगते तिला.ती आहे तेल्गु.माझ्या मुलांचेही असे झाले न्हवते,त्यामुळे मलाही कल्पना न्हवती. आणे खालचेच दात अधी आलेले. ते वरचे दात बाहेर आल्यावर कसे दिसतील याकल्पनेनेच घाबरली बिचारी....
|
स्टौमिना वाढविण्यासाठि, च्यवनप्राश खावा, योग्य वेळि योग्य गोष्टि करणे, जसे झोप,जेवण, व्यायाम, योगासने इत्यादी... रोज जमत असेल तर पन्चाम्रुत घ्यावे... मध + दुध घेणे
|
दिशा, just asking for curiosity तुझी ती तेलगु मैत्रीण, non-veg जास्त खायचि का... generally n during pregnacy also
|
Miseeka
| |
| Wednesday, November 15, 2006 - 4:13 pm: |
| 
|
insect stings/bee sting झाले तर काय उपाय करयचे? please help me as early as possible
|
Avv
| |
| Wednesday, November 15, 2006 - 5:28 pm: |
| 
|
homeopaty madhye aushadh aahe. lagech phayada hoto. potaat ghenyasathi tasech malam pan detat.
|
Nalini
| |
| Wednesday, November 15, 2006 - 6:34 pm: |
| 
|
माझ्या माहितीत जर मधमाशी चावली तर त्या जागेवर काळी माती ओली करुन(चिखल लावला) लावली तर काटा आपोआप निघुन जातो. सुज ही कमी होते. कुठलीही काळी माती चालते पण बर्याचजणांना खास करुन तुळशीतल्या कुंडीतला चिखल लावताना पाहिलाय मी.
|
Disha013
| |
| Wednesday, November 15, 2006 - 10:14 pm: |
| 
|
मनकवडा,अरे ती non-veg खाते,पण वीकली एकदा वगैरे....प्रेग्नंसीत पण..... आणी फ़क्त चिकन खाते. no fish or मटण. हा,पण अन्डे मात्र रोज खाते
|
हो तुळशीची माती लावल्याने सुज आणि आग कमी होते..
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|