Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 11, 2006

Hitguj » Health » केसांचे आरोग्य » Archive through August 11, 2006 « Previous Next »

Maudee
Monday, May 22, 2006 - 9:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी,
हे जे सगळ शिकाकाई रीठा वगैरे आहे....
या सगळ्या वस्तुंच प्रमाण काय घ्यायचे??
म्हणजे जर शिकाकाई पावशेर असेल तर बाकीच्या वस्तु किती घ्यायच्या.....

यात वापर्‍अण्यात येणार्या सगळ्या वस्तुंचेच प्रमाण कोणी देऊ शकेल का???


Bee
Monday, May 22, 2006 - 11:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Maudee- मी फ़क्त शिकाकई एक किलो घेतली बाकी सगळे पावशेर विकत घेतले होते. पण माझा अंदाज असा आहे की ही पावडर प्रमाण न घेता जरी केली तरी त्याचे काही अपाय नाहीत. भाजणीच्या पिठाला जसे आपण प्रमाणबद्ध साहित्य घेतो तितका काटेकोरपणा इथे नाही बाळगायचा माउदी.. आजवर मला कल्पना नव्हती की आमच्या भारतातच केसांवर इतके छान पदार्थ उपलब्ध आहेत.

Supermom
Tuesday, May 23, 2006 - 4:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरती एका पोस्ट मधे कढीलिंब व तिळाचे तेल मिसळून लावल्याने केस काळे रहातात असे वाचलेय. पण हे तेल उकळायचे की नुसतीच पाने टाकायची त्यात? की काही दिवस मुरू द्यायची?
नीट कृती सांगेल का कोणी मला?


Moodi
Tuesday, May 23, 2006 - 4:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sm ही कढीपत्त्याची पाने खोबर्‍याचे तेल अन तीळाचे तेल एकत्र करुन त्यात टाक अन ते उकळवुन घे, मिळाल्यास आवळा किंवा आवळ्याची सुकी पावडर टाक. तीळाचे तेल खोबर्‍याच्या तेलापेक्षा कमी असले तरी चालेल. कारण ते उष्ण असते. ती पाने काळी पडुन चुरचुरीत झाली पाहिजे. मग गॅस बंद कर, तेल गार झाले की बाटलीत भरुन ठेवायचे. खोबरे तेलापेक्षा वाटिका हेअर ऑइल आण अन त्यात हे बाकीचे मिसळुन गरम कर. ते फार चांगले आहे.

आवळा जर फ्रोझन मिळाला तरी चांगले पण त्याचा किस किंवा तुकडे करुन त्या तेलात घालुन उकळव.


Anilbhai
Tuesday, May 23, 2006 - 5:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कढीपत्ता की कडुलिंब? की दोन्ही एकच.
बरोबर सांगा बघु. नाहीतर ह्या फ़ोडणीने काळ्याचे पांढरे व्हायचे
:-)

Moodi
Tuesday, May 23, 2006 - 5:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाई, आपला खाण्यातील कढीपत्ता सांगीतला मी, कडूलिंब नव्हे.
दोन्ही गुणकारी असले तरी फरक आहेच की हो, आमची गंमत करताय का?


Anilbhai
Tuesday, May 23, 2006 - 5:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही ग. supermom ने वरती कडुलिंबा बद्दल विचारलय म्हणुन म्हंटल.

Zee
Tuesday, May 23, 2006 - 6:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी असे वाचले आहे कुठेतरी, एका साउथ इन्डियन वेब साइट वर की जर कढी लिम्बाची पाने खाल्ली तर केस काळे राहातात.. जेवणात नेहेमीच कढी लिम्बाची पाने असावीत...

Moodi
Tuesday, May 23, 2006 - 7:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाई सॉरी अहो गडबडीत ते वाचलच नाही. पण sm च सांगेल ती कढीलिंब का म्हणाली ते.

झी बरोबर आहे.


Supermom
Tuesday, May 23, 2006 - 7:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनिलभाई,मी कढीलिंब लिहिलेय हो, कडूलिंब नाही.

मूडी,धन्यवाद ग. माझे आणखीही काही प्रश्न आहेत.


तिळाचे तेल व खोबर्‍याचे तेल एकास दोन या प्रमाणात घेऊ का मग?
अन कढीलिंब सुकवून टाकू का ताजाच?
अन आवळ्याची पावडर आहे घरी.किती टाकू?
सगळ्याचेच अंदाजे प्रमाण दिलेस तर बरे होईल.
आजच तेल बनवायचा विचार आहे. नवर्‍याचे केस काळे होतात का बघतेय.

तो म्हणतो माझ्यामुळेच त्याचे केस पांढरे व्हायला सुरुवात झालीय.


Moodi
Tuesday, May 23, 2006 - 8:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

का ग sm नवर्‍याचे डोके पिकवत नाहीस रोज उठुन, चला भारतात परत म्हणुन.

अग समजा खोबर्‍याचे तेल १ वाटी / कपभर असेल तर तीळाचे २ मोठे चमचा घाल. म्हणजे हे उदाहरण आहे. तुला पाहिजे तेवढ्या तेलाचे कर. आवळ्याची पावडर पण साधारण २ चमचे पुरेल. तेल गार झाल्यावर गाळुन घ्यायचे. कढीपत्ता ताजाच टाक, सुकवत बसु नकोस.
वाटिका मिळाले तर आणच.


Zee
Tuesday, May 23, 2006 - 9:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मायबोली वरिल मैत्रिणीपैकी कोणी हेयर कलर वापरत का? कोणाला काही माहिती असल्यास लिहा ना. मी एकदाही केलेला नाही पण विचार आहे. मी असे ऐकले होते की जर का केस एकदा कलर केले तर नेहेमीच करावे लगतात आणी लवकर white देखिल होतात.

Supermom
Wednesday, May 24, 2006 - 8:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी किती धन्यवाद देऊ ग तुला?
आधी नुसत्या तिळाच्याच तेलाचे करणार होते पण ते गरम असते म्हटल्यावर विचार बदलला.
हो,आहेत तेही केस नको गळायला नवर्‍याचे.
मायबोलीवर यायचीच बंदी व्हायची मला नाहीतर.

आज इंडियन स्टोअर्स मधे वाटिका मिळते का ते बघेन.


Chandrika
Wednesday, May 24, 2006 - 8:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hair condition karanyasathi 1 tsp. methi powder, 1 tsp. amla powder dahyat mix karun apply kara. (approx. 1/4-1/2 cup of dahi) Cover with a shower cap & wash with any mild herbal shampoo after an hour or so. You may repeat this every week or 2-3 times a month.
Some people also apply mayonnaise but I am not sure.. Doesn't it have salt in it? I thought salt is not good for the hair.

Just heard about Cynthia Sylvia stout shampoo. It seems it is very good. Beer has been added to shampoo. Quite expensive too. Kunitari vaparale asalyas tynacha anubhav share kara please.

Moodi
Friday, May 26, 2006 - 9:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झी हा लेख बघ. यात बाकी गोष्टींबरोबर तुझ्या कलरींगविषयीच्या प्रश्नाचे पण उत्तर आहे.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1507749.cms

Mruda
Sunday, July 02, 2006 - 6:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


मी खूप वर्षं शिकेकई वापरते आहे.... हे सर्व सहित्य एकत्र दळुन आणावे आणि हवाबंद ठेवावे.
प्रमाण
शिकेकाई १ कि.
आवळकाठी ३०० ग्राम.
रीठा ३०० ग्रम.
ज्येष्ठमध= २५० ग्राम.
वाळा २५० ग्राम.

ह्याने कोंडा असल्यास पूर्णंपणे जातो आणि केस छान होतात. साधारण shoulder एवढ्या केसानां ४ T.S. घेऊन उकळवून वापरावे. (वाटल्यास जास्ती कमी घ्यावे. No harm ) अगदी shampoo चा effect येतो असा माझा अनुभव आहे.



Mruda
Sunday, July 02, 2006 - 7:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

P.S. उकळल्यावर गाळून घेणेही आवश्यक आहे. धुतांना केसात पावडर रहाणार नाही ही पण काळजी घ्यावी. सूचना कदाचित बाळबोध वाटतील पण आवश्यक वाटल्या म्हणुन...

R_joshi
Friday, July 14, 2006 - 9:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझे केस आतापासूनच पिकायला लागले आहेत.यावर कोणि सहज सोपा उपाय सांगेल का?

Ami79
Friday, August 11, 2006 - 6:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी त्वचा तेलकट आहे. केस व्यवस्थित आहेत. मला शांपू ऐवजी शिकेकाइ, रीठा वगैरे मिश्रण वापरायचे आहे. माझा असा अनुभव आहे कि त्याचा जास्त फेस येत नहि आनि केसात तेल राहुन जाते. तेल पुर्णपणे जाण्यासाठी काय मिसळावे?

Aandee
Friday, August 11, 2006 - 8:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिकेकाई बीया सकट वापरावी आणि तेलकट पणा घालवण्यासाठी त्यात थोड बेसन मिसळ तर उपयोग होतो. किवा नुसत बेसनाच पाणी घेउन केस धुतले तरे चलतात केस धुण्यासाठी पाणी जास्त वापराव लागत पण केस छान होतात

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators