|
Mrunmayi
| |
| Monday, March 06, 2006 - 10:56 am: |
| 
|
dry skin साठी काही उपाय सांगाल का ?
|
Moodi
| |
| Monday, March 06, 2006 - 10:59 am: |
| 
|
मृण्मयी इथे बघ जरा. /hitguj/messages/103387/102064.html?1137010555 .
|
Prem869
| |
| Monday, March 06, 2006 - 11:23 am: |
| 
|
माझ्या मित्रासाठि कुणी वजन वाढविण्याचा खात्रीलायक उपाय सांगेल का? तो पुर्ण शाकाहारी आहे. तो कंम्पुटर ओपरेटर आहे व त्याची उंची ५' ७ व वजन फ़क्त्त ४३.५ किलो आहे. त्याने अनेक एलोपेथीचे अनेक उपाय केले परन्तु कहिहि फ़रक पडल नाहि तात्पुरता पडला पण जैसे थे.) तरीही लवकरात लवकर उपाय कळवावे ही विनंती.
|
Milindaa
| |
| Monday, March 06, 2006 - 11:35 am: |
| 
|
केळी खाणे
|
बिअर, एकंदरीतच दारू पिणे आणि भरपूर चकणा खाणे गंभीर दृष्टिकोन ठेवावयाचा झाल्यास, रोज तास दोन तास व्यायाम कर म्हणाव भरपूर. म्हणजे भूक वाढेल आणि अंगी पण लागेल खाल्लेले. स्वानुभव आहे. कोणता ते तुम्ही ठरवा.
|
Jayavi
| |
| Tuesday, March 07, 2006 - 7:45 am: |
| 
|
कमाल आहे........वजन वाढवायला उपाय ? इथे आम्हाला वेगळाच प्रश्न पडतो..... हवा खाल्ली तरी वाढतं वजन अरे छान क्रीम घालून दुध घ्यावं, रोज गोडाधोडाचं जेवावं, अधुन मधुन वेफ़र्स खावेत, चॉकलेट तर आहेतच. शिवाय आईसक्रीमचे ३-४ स्कूप तर न चुकता खावेतच, सॅलडमधे भरपूर मेयॉनीज घालावं..........बघ ७ दिवसात वजन वाढतं की नाही......... हाय काय अन नाय काय
|
Bee
| |
| Tuesday, March 07, 2006 - 10:25 am: |
| 
|
वजन कमी असेल तर घाबरायचे कारण नाही पण एकाएकी कमी झाले असेल तर त्वरीत त्याला चांगल्या doctor कडे न्या. वजन कमी होणे तेही तरूण वयात ही चांगली गोष्ट नाही. मी जेंव्हा २४ वर्षांचा होतो त्यावेळी माझेही वजन कमी होते, फ़क्त ४७ किलो आणि उंची पाच साडेसात. आता उंची तिच आहे आणि वजन मात्र साठ झाले आहे. मीही कट्टर शाकाहारी आहे. आपल्या काळज्या दूर झाल्यात की प्रकृतीवर चांगला परिणाम होतो. व्यायाम हा हळुहळु सुरू करायचा. सकाळी संध्याकाळी मोकळ्या हवेत फ़िरायला लागणे ही पहिली पायरी. भूक लागण्यासाठी सर्वात छान उपाय म्हणजे वाळलेल्या खारका भाजून खाणे, किंवा तशाही खाल्यात तरी चालतात. आजारी व्यक्तीला आपण दूध खारका खायला देतो ते ह्या कारणासाठी की भूक लागायला हवी. बाकी दारू पिण्याचे उपाय तर चुकुनही सुचवू नका कुणाला. ही दारू खूप वाईट गोष्ट आहे.
|
Bee
| |
| Tuesday, March 07, 2006 - 10:32 am: |
| 
|
अजून एक उपाय.. खरे तर हा उपाय नाही. पण आजकाल मुलांना हे सांगावे लांगते की बाबांनो रोजचे भाजीपोळीचे जेवण तरी नीट घेत जा. तर सांगायचे हे की तुम्ही आपला वरण भात भाजी पोळी कोशिंबीर फ़लहार इतका आहार नियमित करता ना.. एखाद दिवस ठिक आहे पोटमारा किंवा बाहेरच अचकल बचकल खाणे पण रोज रोज ती सवय करुन घेऊ नका. शरीरासाठी घरचाच स्वैपाक चांगला मानला जातो. जर तुम्ही बाहेर राहत असाल कुणी देखरेख करायला नसेल तर ही खायची प्यायची हेळसांड भरुन कशी काढायची ह्यासाठी मी थोडे प्रयत्न केले होते. जसे की फ़ळ काय कुठेही विकत मिळतात. ते रोज खायचे. दहीपण विकत मिळते. Tomato जेवताना कुस्करुन खाता येतो. पाणी भरपूर प्यावे. अधुन मधुन dry fruits खावे. सुट्टीच्या दिवशी घरीच बेत करावा. आपापल्या ऐपतीनुसार करुन पहावे, अनुभव येता येता आपण जगायला शिकतो आणि स्वावलंबी होतो.
|
Moodi
| |
| Tuesday, March 07, 2006 - 10:35 am: |
| 
|
दोन्ही वेळेस व्यवस्थीत जेवणे, शक्यतो पोळी जास्त खावी. सकाळी दुध अन केळे अन खारका किंवा साजूक तुपात भिजवलेला खजूर खाणे. आता या दिवसात आंबे भरपूर, तेव्हा आंब्याच्या रसात साजुक तुप अन चिमुटभर काळी मिरे पुड घालुन मनसोक्त 2-3 वाट्या खाणे. दुध सकाळ अन रात्र दोन्ही वेळा चालेल. चिकू, द्राक्षे अशी सर्व फळे खावीत.
|
Maanus
| |
| Tuesday, March 07, 2006 - 3:10 pm: |
| 
|
शक्यतो पोळी जास्त खावी>>> U.S. साठी. पोळ्या बनवायला वेळ नसेल आणि patel मधल्या विकतच्या पोळ्या चांगल्या नसतील तर mexican wheat tortilla मिळतो shop right मधे. तो खावा.
|
Moodi
| |
| Tuesday, March 07, 2006 - 3:22 pm: |
| 
|
हो रे माणुस त्यात मस्तपैकी साल्सा किंवा उकडलेली अंडी नाहीतर एखादी भाजी टॉमेटो सॉस घालुन खावी.
|
i remember trader joes madhe pan asha wheat polya milaychya.
|
Mrunmayi
| |
| Wednesday, March 08, 2006 - 2:06 pm: |
| 
|
अग मूडी, तु सुचवलेले उपाय वारंवार करायला लागतात. मी साय लावणे, पाणी पिणे वगेरे करतच आहे पण long term काही उपाय आहे का ?
|
Moodi
| |
| Wednesday, March 08, 2006 - 2:12 pm: |
| 
|
मृण्मयी तू नॉन व्हेज जर खात असशील तर अंडी अन मासे खा, विशेषतः सॉलमन अन बांगडा जास्त चांगले त्वचेला. पाणी भरपुर म्हणजे ६ ग्लास तरी दिवसाला त्यामुळे त्वचेत आद्रता टिकते. अन अंघोळ झाली की लगेच ओलसर त्वचेवर ऑइली लोशन किंवा मॉइश्चरायझर लाव, म्हणजे ते नीट मुरेल अन मग सुकले की बाहेर जायचे असेल तरच पावडर लाव, नाहीतर लावु नकोस. दिवसातुन २ चेहेरा धुवुन ते लोशन व क्रीम वगैरे लाव. फळे पण भरपूर खा. थंडीत तीळाचे लाडु, चटणी वगैरे चांगली.
|
Mrunmayi
| |
| Wednesday, March 08, 2006 - 2:25 pm: |
| 
|
ok. धन्यवाद मूडी. हे फ़ळे ईत्यादी खाणे हे चांगले सांगितलेस..
|
Supermom
| |
| Wednesday, March 08, 2006 - 2:46 pm: |
| 
|
माझ्या मुलीसाठी वजन वाढवायचा उपाय सांगेल का कोणी? ती साडेचार वर्षाची आहे पण एकदमच बारीक.सगळ्या मेडिकल टेस्ट झाल्या.सारे नॉर्मल आहे.भरपूर खेळते.खाणे पूर्वी फ़ार कमी होते आता थोडे सुधारलेय पण वजन वाढतच नाही. काही विशेष खाणे जे तिला देता येईल वजन वाढण्यासाठी?
|
Madhura
| |
| Wednesday, March 08, 2006 - 6:07 pm: |
| 
|
supermom, माझी मैत्रीण तिच्या मुलीला कणकेची खीर देत असे तिचे वजन वाढवण्यासाठी.कणीक तुपात भाजून घ्यायची अणि त्यात दुध साखर घालुन घट्टसर खीर बनवाय्ची snack time / breakfast साठी द्यायची. तिच्या मुलिचे वजन बरेच वाढले होते या उपायाने.
|
Moodi
| |
| Wednesday, March 08, 2006 - 6:17 pm: |
| 
|
कणिक अन रवा, शिंगाड्याचे पीठ, राजगीरा पीठ आलटुन पालटुन वापरता येईल अन त्यात खजूर, खारीक अन अंजीर सोडुन इतर ड्रायफ्रूट्स घालता येतील. अंजीर अगदी खीर बाऊलमध्ये काढल्यावर घालावेत, म्हणजे ते जर आंबट असतील तर खीर फाटेल म्हणुन शेवटी घालावेत. उकडलेले अंडे आहेच. नाहीतर रात्री बदाम अन खारीक भिजवुन ते सकाळी दुधात वाटुन त्याची खीर पचेल तशी प्यायला दे, जास्त देवु नकोस. थोडी देवुन बघ आधी.
|
Ashwini
| |
| Thursday, March 09, 2006 - 4:50 am: |
| 
|
नलिनी, चिंगुताई, मनस्वी, तुम्हाला ईमेल केली आहे. अवधूत, दोन्ही जेवणानंतर शंखपुष्पी आसव २ चमचे + २ चमचे पाणी. सकाळी उठल्यावर व संध्याकाळी, अक्कलकारा चूर्ण, पिंपळाच्या पानांचे चूर्ण, वेखंड पूड आणि वेलदोड्याची पूड एकत्र करून मध + ब्राम्ही घृत यात मिसळून दे. अक्कलकारा अगदी किंचीत आणि फक्त पहीला महीनाभर दे. बाकीची औषधे सहा महीने देऊन मला काय परीणाम झाला ते कळव. लसूण, तूप, बडीशेप हे त्याच्या खाण्यात असू दे. प्रेम, वजन वाढण्यासाठी रोज सकाळी फणसाचे ५ गरे खावेत. सध्या सीझन पण आहे. एरवी फणसपोळ्या खाल्ल्या तरी उपयोग होईल. तसेच सकाळी उठल्या उठल्या १ चमचा च्यवनप्राश घेउन त्यावर अर्ध्या तासाने १ कप दुध घ्यायचे. मधे इतर काही खायचे, प्यायचे नाही. केळी, टरबूज, आंबा ही सर्व फळे शक्ती वाढविणारी आहेत. supermom , लेकीला खसखशीची खीर करून दे. त्यात खारीक, बदाम, चारोळ्या, साखर आणि खारका घाल. तिला च्यवनप्राश पण चालेल ग, फक्त अर्धा चमचा दे.
|
Mita
| |
| Thursday, March 09, 2006 - 5:42 am: |
| 
|
thanks अश्विनी. ती भारतात आहे. तीला कळवले तुझे उत्तर. मुंब ई मधे कोणी वैद्य तुला माहिती आहेत का??
|
Prem869
| |
| Thursday, March 09, 2006 - 9:49 am: |
| 
|
मीलिंदा, सव्यसची, जयावि, बी, मूडी, माणुस, म्रुण्मयी, सुपरमोम आणि अश्विनी सर्वांचे मनापासुन आभार. आपण सर्वांनी सांगितलेले उपाय मी माझ्या मित्राला जरूर जरूर कळविण व काहिहि फ़रक जानवला तर पुन्हा जरूर भेट देईन. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद.
|
Supermom
| |
| Thursday, March 09, 2006 - 12:40 pm: |
| 
|
माझे आभार? ते कशाला रे बाबा?मी तर काहीच सांगितले नाहीय. अश्विनी,मूडी,मधुरा,अगदी मनापासून आभार. आजच इंडियन स्टोअर्स मधे पळते.
|
प्रेम, सर्वात महत्वाचे म्हणजे तुझ्या मित्राला भर्पुर व्यायाम करायला सांग आणि healthy diet वर सगळ्यानी सांगीतल्याप्रमाने सान्ग पन व्यायमाशिवाय आयुष्य बेकार!!!
|
Supermom
| |
| Thursday, March 09, 2006 - 2:40 pm: |
| 
|
अश्विनी, मूडी, बरेच दिवसापासून तब्येतीचे लिहिन म्हणत होते. माझ्या लक्षणांची लिस्ट बरीच मोठी आहे. मला काही सांगाल का? मला गेले दोन महिन्यांपासून चक्कर व मळमळ,पोटात दुखणे,छातीत जळजळ व दुखणे हे त्रास होत आहेत. सर्व तपासण्या झाल्या. डायबेटीस नाही,लिव्हर व किडनी नॉर्मल. हिमोग्लोबीन नॉर्मल. ई सी जी नॉर्मल,चेस्ट एक्स रे नॉर्मल,चेस्ट चा कट स्कन नॉर्मल.एच पायलोरी टेस्ट नॉर्मल. फ़क्त गॉल स्टोन्स सोडले तर काहीही निघाले नाही.पण ते सुद्धा चार पाचच आहेत असे डॉक्टर चे म्हणणे आहे. तसेच पित्ताशयावर सूज वगैरे काहीही नाही. अल्ट्रासाऊंड पण झाले. चक्करेचे कारण डॉक्टर च्या लक्षात न आल्यामुळे आता मला न्युरॉलॉजिस्ट कडे पाठवणार आहे. फ़क्त चार पाच स्टोन्स नी येवढा त्रास होऊ शकतो का?बाकी तक्रारी असिडिटीच्या गोळ्यांनी बर्याच ठीक आहेत पण चक्कर येणे मधून मधून असतेच. काही घरगुती औषध पण चक्कर येण्यावर आहे का? कारण तुम्ही काही औषधे सांगितली तर भारतातून ती आणायला वेळ लागेल.
|
Moodi
| |
| Thursday, March 09, 2006 - 2:53 pm: |
| 
|
तुला आश्विनीच सांगु शकेल पण न्युरॉलॉजिस्ट कडे जायला हरकत नाही, कारण काही आजार हे थायरॉईडशी अन मेंदुशी पण संबंधीत असु शकतात. मात्र छातीत जळजळणे, पोटात अगदी वर जठराकडे जेवण झाल्यावर दुखणे, मळमळणे हे अल्सरसारखे किंवा पित्ताचे असु शकतात. मला २ वर्षापुर्वी खुपच त्रास झाला इथे, मग शेवटी ही अल्सर संबंधीत टेस्ट पण केली, डॉ. नी गोळ्या दिल्या झेंटॅकच्या, आता बरे आहे. मात्र आश्विनी काय म्हणतेय बघ.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|