Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 05, 2006

Hitguj » Health » आयुर्वेद » ह्यावर उपाय काय? » Archive through March 05, 2006 « Previous Next »

Moodi
Sunday, February 05, 2006 - 10:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिऊ तुला मात्र या बाबतीत डॉक्टरांचा / फिजीओथेरेपीस्टचा सल्ला घ्यावा लागेल. कारण प्लॅस्टर नुकतेच काढले असल्याने तसा पाय अजुन पूर्ण आधीच्या स्थितीत आल्याशिवाय कुठलाही व्यायाम त्रासदायक ठरेल. तू आधी ज्या डॉक्टरांनी तुझ्यावर उपचार केले त्यांचा सल्ला घे. त्यांनी सांगीतल्याशिवाय एकदम व्यायामास सुरुवात करु नकोस.

पोट आता जरी सुटले असले तरी नंतर पाय पूर्ण बरा झाला की हलक्या आसनांच्या मदतीने कमी होईल.

थंडीचे मात्र जप, पायाला पूर्ण गरम कपड्यांचे आवरण राहू दे.


Chioo
Monday, February 06, 2006 - 11:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Moodi, thanks गं. :-) मी वर चुकून काल म्हटले. २ तारखेला काढले आहे प्लास्टर. मी doctor ना विचारले तर ते म्हणाले की काही व्यायामाची गरज नाही. रोज चाल म्हणाले. खरं मला चालताना स्नायू अवघडल्यामुळे दुखते आहे. स्नायू मोकळे होण्यासाठी मी खोबरेल तेलाने मसाज करते आणि गरम पाण्याने शेकते. याच्या जोडीला आणखी काय करता येईल? मसाज कोणत्या तेलाने केल्यास चान्गला?

Moodi
Monday, February 06, 2006 - 11:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिऊ १ मोठे चमचा खोबरेल तेलात एक अर्धा छोटा चमचा तीळाचे तेल टाक. खोबरेल तेलाने थंडीत त्वचा कोरडी पडते. तीळाचे उष्ण असते त्यामुळे ते डायरेक्ट लावु नये.
अन हो या दोन्ही तेलात ज्युनीपर तेलाचे २ ते २ थेंब टाकुन ते चांगले मिक्स करुन लाव. मसाज हलक्या हाताने कर. अन काहीतरी आधाराला ठेवुन मगच चालायचा सराव कर. चालण्याने स्नायू मोकळे होतील. मधुन मधुन बसायचे थोडा वेळ.

ज्युनीपर तेल तुला मार्केटमध्ये aromatherepy च्या सेक्शनमध्ये मिळेल. मात्र तेल गरम करु नकोस.


Moodi
Monday, February 06, 2006 - 2:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिऊ तुला आधी सांगीतलेले ज्युनीपर तेल juniper oil अंगाला डायरेक्ट लावू नकोस. ते तीळ अन खोबर्‍याच्या तेलात मिक्स करुन लाव.

Nalini
Monday, February 06, 2006 - 2:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुडी, धन्यवाद.
मी पोहायला जाण्यापुर्वी तसेच नंतरही कोमट पाण्याने शॉवर घेते. तसेच मी पोहायला सुरुवात करण्यापुर्वी worm up पण करते. मी अशक्त नाही आणि माझे काम हे दिवसभर खुर्चीवर बसुन असते. मला पोटरीत जेव्हा cramp येतो तेव्हा अगदी असह्य होते. एक मांसल गोळा पायातुन वर सरकतोय असे वाटते. पाच एक मिनिट तर काहीच सुचत नाही.


Lalu
Monday, February 06, 2006 - 3:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नलिनी, cramps हे calcium च्या कमतरतेमुळे पण येतात. pregnancy मधे जे पायात गोळे येतात त्याचे एक कारण हे आहे. Mg ची कमतरता हे तू सान्गितलेले दुसरे कारण पण बरोबर आहे.

Chioo
Monday, February 06, 2006 - 4:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Moodi मी बघते ज्युनिपर तेल इथे मिळते का. तिळाचे नक्की मिळेल. :-) तुला खूप खूप thanks. :-)

Nalini
Tuesday, February 07, 2006 - 11:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालु, धन्यवाद.
आजच जावुन केळी, किवी, सफरचंद, स्ट्रॉबेरी, पिच हि फळे घेउन आलेय. आता नियमित १ - २ फळे खाईन.


Dineshvs
Tuesday, February 07, 2006 - 5:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नलिनी, बसायची खुर्ची आरामदायी असणे पण गरजेचे आहे. पाठीच्या खालच्या भागाला नीट आधार मिळाला पाहिजे, पाय अधांतरी रहायला नकोत.

Bhagya
Wednesday, February 08, 2006 - 12:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नलिनी, मला जास्त माहिति नाही, पण लालू म्हणते ते बरोबर आहे. कारण मला calcium ची कमतरता होती तेव्हा हा त्रास झाला होता. तु multivitamins घ्यायला सुरुवात कर आणि आहारत पण calcium आणि magnesium असलेले पदार्थ नियमित घे.
मूडी आणि दिनेश अजून सांगतीलच.


Suniti_in
Thursday, February 09, 2006 - 6:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुडी तु खोकल्यावर काही उपाय सांगितले होते. कुठे वाचले ते सापडत नाहिये बघ. दूध्-हळद घेत आहेत हे पण फरक नाही. कोरडा खोकला आहे.

Moodi
Thursday, February 09, 2006 - 7:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुनिती या पानावर आहेत ते. मात्र लवंग, गुळवेल अन गुळ या पैकी काही जास्त घेऊ नकोस. गुळवेल तर तुला मिळणार नाही अन मिळाली तरी घेऊ नकोस. फक्त हळद गुळ किंवा मध अन ज्येष्ठमध एकत्र घे. गुळ जास्त खाऊ नकोस.

/hitguj/messages/34/103065.html?1139178490 .
उद्या मेल करते ग.

Suniti_in
Friday, February 10, 2006 - 7:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thks मुडी. ज्येष्ठमध,गुळवेल नाहीये. बाकी उपाय वापरते.

Ashwini
Friday, February 17, 2006 - 5:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी, तू इतकी सगळी उत्तरं इतकी भरभर देतेस हे खरच कौतुकास्पद आहे. पण काय होतं कधी कधी अनवधानाने चूका होऊ शकतात. ते जर लोकांनी तसच follow केलं तर उलटा परीणाम होण्याची शक्यता असते. रागावणार नाहीस अशी आशा आहे.

वरती गुळवेलीपासून दूर राहावे असा उल्लेख दोन तिन वेळा आला आहे. गुळवेल ही उष्ण वीर्याची औषधी आहे परंतु ती पित्तकर नाही. उलट ती पित्तावरचं एक फार मोठं औषध आहे. अतिशय सौम्य गुणधर्माची गुळवेल ही तिन्ही दोषांवर काम करणारी आणि अमृतासारखी गुणकारी असते म्हणून तिला अमृता म्हणतात. ती थोडी जास्त घेतल्याने अपाय होत नाही.

आणि दोन ठिकाणी ज्येष्ठमधाचा काढा करून घेण्याचा उल्लेख आला आहे. ज्येष्ठमधाचा काढा एकदम घेतल्यास उलटी होण्यासाठी उपयोग होतो. परंतु थोडा थोडा खूप काळ आणि लिटरच्या प्रमाणात घेत राहील्यास त्रास होऊ शकतो. त्याने पोट फुगून श्वास लागण्याची शक्यता असते.
मात्र ज्येष्ठमध रक्तदाब वाढवतो असे तू म्हणाली आहेस ते तू कुठे वाचलस? ते योग्य वाटत नाही. ज्येष्ठमध रक्तपित्त, क्षय इ. विकारात उपयोगी पडते ते रक्तदाब वाढवेल हे थोडेसे चुकीचे वाटते.

असो. मला हे clear करणं आवश्यक वाटलं. I hope you would not mind.

वरती कुणीतरी Cramps बद्दल विचारले आहे. जिथे cramps येत असतील तिथे नारायण तेल, तिळाचे तेल लावून रोज मसाज करणे. त्यावर शेकणे.
आल्याचा रस चोळल्यानेही फायदा होईल.
पोटात घेण्यासाठी, महारास्नादी काढा, महायोगराज गुग्गुळ, सागरगोटा भाजून त्याची पूड करावी व त्यात तूप, मीठ घालून घ्यावे.



Neelu_n
Friday, February 17, 2006 - 7:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अतिशय आणि वारवार तहान लागणे आणि अंग अतिशय खाजणे याचा पित्ताशी काही संबंध आहे का? गेल्या आठवड्यापासुन मला याचा त्रास होतोय. गेल्या आठवड्यात ताप आलेला आणि सोबतीला खोकला पण चालु आहे. आता ताप गेलाय, खोकला कमी प्रमाणात आहे पण ही वरील लक्षणे कमी होत नाहीत. विशेष्त या अंग खाजण्यामुळे मी फार वैतागुन गेली आहे.
आश्विनी, मूडी यावर काही तात्काळ इलाज आहे का?



Moodi
Friday, February 17, 2006 - 9:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आश्विनी अग यात राग कसला, उलट तुझ्यासारख्या अनुभवी तज्ञ मार्गदर्शकाची आवश्यकता इथे पाहिजेच.

इथे जेव्हा सुनितीने खोकला अन सर्दीवर औषध विचारले तेव्हा ती प्रेग्नंट असल्याने मला तिला गुळवेल सुचवताना भिती वाटली, कारण ती किंचीत उष्ण असल्याने प्रेग्नंट बायकांना सांगावी की नाही याचीच मला शंका होती. वास्तवीक पिंपळी सुद्धा चांगली कफ अन खोकल्यावर पण ती सुद्धा थोडी उष्ण आहे, त्यामुळे मी सुनितीला सांगीतले की ज्येष्ठमध किंवा हळद अन गुळ एकत्र करुन घे. मात्र तिने नंतर सांगीतले की खोकला तिच्या नवर्‍याला झाला होता, तिला नाही.

ज्येष्ठमधाचा हा गुणधर्म म्हणजे रक्तदाबाविषयी, माझे पुण्यातील ज्योतिष्यी मार्गदर्शक श्री. व्ही. के फडके यांनी सांगीतला होता. त्यांना सतत ज्येष्ठमध चघळायची सवय होती, पण त्यांना रक्तदाबाचा त्रास नसताना देखील तो वाढायला लागला, अन त्रास सुरु झाला, तेव्हा त्यांनी त्यांच्या आयुर्वेदीक डॉक्टरांना या विषयी सांगीतले, तेव्हा त्या डॉक्टरांनी त्यांना तो बंद करण्यास सांगीतले. दुर्दैवाने श्री. फडके या दिवाळीनंतर की आधीच गेले, मला त्यांना भेटायचे होते पण भेट होऊच शकली नाही. त्यांनी हा अनुभव त्यांच्या पुस्तकात देखील लिहीला आहे.

मात्र तू ज्येष्ठमधाविषयी बाकी जे सांगीतले आहेस ते मी लक्षात ठेवेन.

पिंपळीविषयी मी वाचलय की ती दुधातुन घेतली तर चालते. ते बरोबर आहे का?


Moodi
Friday, February 17, 2006 - 9:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नीलु याविषयी आश्विनी तुला सांगु शकेल, पण तुझी प्रकृती मुळ पित्तकर आहे का? अन ताप कमी झाल्यावर किंवा त्या दरम्यान तहान जास्त लागतेच. सध्या उकळवुन गार केले पाणी घेत जा.

आश्विनी औषध सांगेलच पण सध्या पित्तकर पदार्थ उदाहरणार्थ शेंगदाणे खाऊ नकोस. दाण्यामुळे तुला आधी कधी त्रास झाला होता का ते आठव, कारण माझी पण पित्त प्रकृती असल्याने मला उपास सहन होत नाही अन शेंगदाणे किंवा काजू खाल्ले की अंगावर पित्त उठते, अन मग ते खुप खाजते, मग मी आमसुलाचे सार घेते. ते घेऊन बघ, त्याने अपाय नाही होणार. मात्र ताप कमी झाल्याने पचनाला हलके असे पदार्थच खा. साबुदाण्याची, रव्याची खीर, भाताची पेज चालेल. साधी पोळी, भाजी, मुगाचे वरण भात, खिचडी घे.


Neelu_n
Friday, February 17, 2006 - 12:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी.. हो ग माझी प्रकृती थोडीफर पित्तकरच आहे. पण एरव्ही कधी त्याचा कधी एवढा त्रास नाही जाणवला... लहानपणी व्ह्यायचा खुप.. आमच्याकडे नेहमी उकळवलेलेच पाणी असते. आमसुले अंगाला चोळुन पाहीली दोन दिवस, त्याने म्हणे खाज थांबते. पण काही उपयोग नाही. आमसुलाचे सार नाही पिले आता ते करुन बघीन आता. तुझ्या सल्ल्याबद्दल धन्यवाद.:-)





Prasadmokashi
Wednesday, February 22, 2006 - 9:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Myasthenia Gravis या आजारावर काही आयुर्वेदीक उपचार पद्धती आहे का ?

Neelu_n
Thursday, February 23, 2006 - 1:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग आश्विनी तु राहीलीस कुठे?

Ashwini
Friday, February 24, 2006 - 5:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नीलू,
तू भारतात असशील तर, हळद आणि कडूनिंब वाटून अंगाला लाव. कडूनिबाची पानं वाटून हळदीबरोबर पोटातही घे. करंजाचं तेल लावल्याने पण फायदा होईल. मोहाच्या सालीचा एक अष्टमांश काढा करून घेतलास तरी उपयोग होईल. मंजिष्ठादी काढा ( लघुमंजिष्टादी की महामंजिष्टादी मला नक्की आठवत नाहीये पण ज्याच्यात वावडींग, दारूहळद, कडूनिंब इ. औषधे आहेत तो ) घेतलास तरी खूप फरक पडेल.

मूडी, गुळवेल सत्व pregnancy मध्ये चालतं. पिंपळी दुधातून घेतली तर चालते. तरीसुद्धा ती अतिशय कमी प्रमाणात घ्यावी कारण ती प्रचंड उष्ण असते.


Nalini
Friday, February 24, 2006 - 10:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनी माझी मेल मिळालि का तुला? मायबोलिवरुन पाठवलिय.

Neelu_n
Friday, February 24, 2006 - 12:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद आश्विनी. मी मुम्बैत रहते. सध्या मी खदिरारीष्ट घेत होते, पण आता महामंजिष्टादी आणेन. पण हे पित्तामुळे होते का हे तु नाहि सांगितले? आणि मग हा काढा पित्तावर पण आहे का?

Avdhut
Monday, February 27, 2006 - 9:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मुलाची भाषा properly develop होत नाहीय. त्याचे diagnosis येथे US ) मधे PDD/mild-Autism असे आहे. भाषावृद्धी साठी काही Ayurvedic उपाय आहेत?

Manaswii
Monday, March 06, 2006 - 3:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनी,
gall stones वर surgery शिवाय काहि उपाय आहे का??बार्ली वाॅटर घ्यावे असे वाचले. ते कितपत बरोबर आहे?? आणि सध्या फ़िशरचा सुद्धा त्रास होत आहे. तर बार्ली वाॅटर चालेल का? पेशटचे वय २६ आहे, just for your info .
बाकिच्यांचेहि माहितीची मदत होइल.
thanks..


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators