|
Moodi
| |
| Monday, January 16, 2006 - 3:17 pm: |
| 
|
प्राजक्ता waxing किंवा bleaching जर नीट झाले नसेल तर चेहेर्यावर काळ्या तीळासारखे डाग पडतात. म्हणुन waxing झाल्यावर लगेच astringent लावावे. ते किटाणु नाशक आहे. तसे नाही केले तर त्या उघडलेल्या छिद्रात मळ जाऊन साठतो, जो फेस वॉशने सुद्धा निघत नाही. त्याला clinsing milk च वापरावे लागते. घरीच ब्लीच करायचे असेल तर दुधात किंवा पाण्यात उगाळलेली आंबेहळद किंवा साधी हळद + टॉमेटोचा रस १ चमचा + चंदन पावडर एकत्र लावावी. संत्रा रसाने अन पपई गराने हे डाग कमी व्हायला मदत होवुन चेहेरा छान ब्लीच होतो. मात्र साधारण महिनाभर तरी करावे लागते. नाहीतर ब्युटीपार्लर मध्ये हे होते लवकर पण महाग पडते. कच्च्या बटाट्याचा रस पण चांगला. बटाटे भाजीकरता कापल्यावर ते पाण्यात ठेवले की ते पाणी फेकुन देऊ नये. बटाटे काढुन घेतल्यावर ते थोडा वेळ तसेच ठेवावे. पाण्यात खाली जो त्याचा साका साठलेला असतो तो वाळवावा अन फ्रिझमध्ये ठेवुन हवा तेव्हा त्यात टॉमेटो रस घालुन चेहेर्याला लावावा अन सुकला की धुवावा. ताजा लावल्यास छान.
|
Moodi
| |
| Monday, January 16, 2006 - 3:32 pm: |
| 
|
डोळ्याखालचे काळे. खरे तर माझा पण हाच खटाटोप चालू आहे. उपचार सलग घेतले की हे प्रकार कमी होतात पण मग आपण परत दुर्लक्ष केले की चालू. जागरण, अपुरी झोप, काळजी, मानसीक तणाव, aneamia पोट साफ नसणे इत्यादी अनेक कारणानी हे काळे उद्भवते. डोळ्याचा थकवा दूर करायला निवांत वेळेत दुधाच्या, गुलाबपाण्यात बुडवलेल्या कापसाच्या घड्या ठेवाव्यात. कोणत्याही प्रकारचा मेक अप पापणीच्या आत लावू नये. मस्कारा पूर्ण पणे धुवुन टाकावा. त्याकरता रीमुव्हर सुद्धा असते. बटाट्याचा किंवा काकडीचा रस नियमीत लावावा. डोळ्याखालची बाजू अतिशय नाजूक असल्याने त्या जागी काही लावताना करंगळीच्या शेजारचे अनामिका हे बोट वापरावे कारण सर्व बोटांमध्ये हे ह्याचा दाब कमी असतो. ती जागा जोरात चोळु नये. बदामाचे तेल किंवा दुधात बदाम उगाळुन त्या जागेवर लावावा. मला याने फायदा झालाय म्हणुन मी हे सांगत आहे. बदामाने चेहेरा जसा उजळुन मऊ होतो तसाच डोळ्याखालच्या त्वचेवरही याचा फायदा होतो, पण हे महिनाभर लावावे लागते, कारण ती सर्कल्स जर खुपच डार्क असतील तर वेळ लागणरच. टॉमेटोचा रस पण फायदेशीर आहे. computer च्या पडद्यावर भरपुर उजेड असावा. डोळ्यावर ताण बसता कामा नये.
|
मूडी, तु दीलेले घरगुति उपाय एकदम छान आहेत. मला delivery नन्तर बरेच stretch marks आले आहेत...ते कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय सान्गु शकशील का?
|
Moodi
| |
| Tuesday, January 17, 2006 - 10:15 am: |
| 
|
डे ड्रिमर सध्या तू आहेस US मध्ये त्यामुळे तुला काही पावडरी मिळणे कठिण जाईल. या करता पपई, कोरफड, गुलाब अशा वनस्पतींची पावडर लागते पण ती तुला तिकडे मिळायची शक्यता कमी. मात्र Indian Stores मध्ये Ayur ची गुलाब, तुळस वगैरे पावडर अन मुलतानी माती मिळु शकेल. जर या पावडरी मिळाल्या तर याची चिमुटभर हळदीबरोबर कोरफड म्हणजे aloe-vera jel + दुधा मध्ये मिसळुन पेस्ट करायची यात लवेंडर अन बदाम तेलाचे २ थेंब टाकुन ती पेस्ट त्या डागांवर लावायची अन सुकले की धुवुन टाकायचे. पपईचा गर टॉमेटोच्या रसात किंवा दुधात मिक्स करुन लावावे अन सुकले की धुवावे. खरे तर प्रेग्नन्सीतच याची काळजी घ्यायची असते. आंघोळी आधी कोमट तेलाने मालीश करुन मग आंघोळ करावी. चेहेर्यावर पण जे गडद डाग रहातात किंवा येतात, त्यासाठी कोरफड जेल किंवा काकडीच्या रसात दुध मिसळुन लावावे. किंवा घरी सहाण असेल तर त्यावर दुधात बदाम उगळुन त्यात हळद घालुन मग चेहेर्याला लावुन सुकले की की चोळुन मळ काढल्यासारखे काढुन मग धुवावे. फार जोरात चोळू नये, हलक्या हाताने दाब देत चोळावे. याने चेहेर्याला ब्लीचिंग होते.
|
Moodi
| |
| Tuesday, January 17, 2006 - 10:26 am: |
| 
|
डे ड्रिमर तुला तिथे aromatherepy ची तेले नक्कीच मिळतील. 50 gm तीळाच्या तेलात १० mili litre म्हणजे 10 ml व्हीटजर्म किंवा जोजोबा oil अन १० थेंब लवेंडर oil टाकुन ते हलवुन दिवसातुन २ वेळा त्याने हलक्या हाताने मालीश कर. ह्या तेलाना essential oil अशी म्हणतात.
|
Thank you so much moodi, आजच सगळे oils घेउन येते
|
Suniti_in
| |
| Tuesday, January 17, 2006 - 7:27 pm: |
| 
|
मुडी कोको बटर फ़ोर्म्युल्याचा काही फरक पडतो का स्ट्रेच मार्क वर?
|
Moodi
| |
| Tuesday, January 17, 2006 - 9:30 pm: |
| 
|
सुनिती कोको बटर विषयी एवढी माहिती नाही मला, पण आधीपासुनच काळजी घेतलेली बरी असते. पण कोको बटर थंडीत चांगला परिणाम देते. त्वचा मऊ होते, खाजही कमी होते. पण मला त्याचा वास आवडत नाही, मी एक hand cream आणले होते त्यात ते होते.
|
Aarti
| |
| Wednesday, January 18, 2006 - 4:40 am: |
| 
|
Hi ... mi maayboli che navi sadasya ahe.. Ithe khup chan chan tips miltat.. Mala pan aak help havi ahe... Lahan pani mala aai sangaiche ke nak ulte pusu nakos.. i mean nakachya shendya pasun kapala kade.. aai chya restrictions ni mi thamble hote.. pan 1 varsha pasun,aai jawal naslya mule mi parat chalu kele nak ulte pusiala..
ani ata nakavar aadvi line aali ahe ani naka chaya sides pan kalya zalya ahet.. Maza feb madhe indiat jaicha plan ahe.. koni mala please sangu shakel ke me ti resh kashe ghalvou.. nahi tar aai ghari ghenar nahi.. he he he 
|
Moodi
| |
| Wednesday, January 18, 2006 - 11:08 am: |
| 
|
तुझी समस्या एवढी गंभीर नाही, कारण त्या " मीठाचा " तुला नक्कीच उपयोग होईल. हे हे हे. BTW हा बीबी काही मनोरंजनाकरता उघडलेला नाही.
|
Megha16
| |
| Wednesday, January 18, 2006 - 2:24 pm: |
| 
|
सुनीती कोको बटर च्या क्रीम खुप फरक पडतो,पण मुडीच म्हण पण बरोबर आहे त्याला वास चांगला येत नाही. पण फायदा मात्र चांगला च होतो.माझी मैत्रीण वापरते कोको बटर क्रीम. मेघा
|
moodi,majhya cheheryavar achanak khup pimples alet..udya khup mothi party la jaychay..kahi patkan lagu hotil ase upay ahet ka?jaayfal powder ani neem donhi lavle hote niyamit..tarihi parinam farsa nahi
|
Moodi
| |
| Friday, January 20, 2006 - 2:53 pm: |
| 
|
रेणू पिंपल्स एकदम जात नसतात, त्याला वेळ लागतोच. तुझे पोट नीट साफ होते का? तू पाणी भरपूर पितेस का? ब्रेड, पिझा, बर्गर असे मैद्याचे पदार्थ सारखे खात असशील तर ते कमी कर. ते हाताने किंवा नखाने फोडु नकोस. त्यापेक्षा चेहेर्यावर फाऊंडेशन अन कन्सीलरचा वापर करुन योग्य मेक अप कर. संत्र्याचा रस पण रोज लाव त्याने चेहेर्याचा तेलकटपणा कमी होईल. जायफळ अन नीम पाण्यात किंवा संत्रा रसात घालुन पेस्ट करुन लाव. पार्टीसाठी best luck . 
|
potacha kahich problem nahiye..paNi piNa jara kami hota..paN aahar mi malati karwarkar style follow karte..palebhajya,koshimbiri bharpur,kadadhanya ,fala dahi-dudh,agdi roj vyavasthit asta..oily skin ahe...shivay kahi takke anuvanshik pan ahe..aai la hote pimples..aso..prayatna karat rahin,
|
Mita
| |
| Monday, January 23, 2006 - 3:26 am: |
| 
|
upperlips ला waxing कि threading चांगले?? मी अजुन काहिच केले नाही. आणखी thick,dark ग्रोथ होइल अशी भीती वाटते. laser/electrolysis चा कोणाचा काहि अनुभव आहे का?
|
Anush
| |
| Thursday, January 26, 2006 - 3:52 am: |
| 
|
Malahi he samjun ghyayala avadel, Upperlips ani chin varachi lav ha problem sadhya general zalay...Waxing, Trading, Electrolysis barobarach kuni kahi Ayurvedik upay suchavu shakel ka....Masoor dalichya pithane Farak padato ase aikale ahe..Kunala yabaddal kahi mahiti ahe ka?
|
Veenah
| |
| Thursday, January 26, 2006 - 10:26 am: |
| 
|
मुडी किती अप्रतिम आणि अमूल्य माहिती देत असतेस ग नेहमी! तू दिलेल्या links पण छान असतात अगदी! एवढी माहिती गोळा करुन त्याचा सखोल अभ्यास करुन परत इथे लिहायला वेळ तरी कसा आणि कधी काढतेस तू? खरच, तुझी ज्योतिष्शास्त्र, पाककला, साहित्य, विनोद इ. इ. विषयांची आवड पाहून तुझ कौतूक करावे तेवढे थोडेच बघ! 
|
मूडी,मला जायफ़ळ आणी नीम चा लेप लाऊन पिंपल्स वाढले आहेत.स्कीन मधली घाण बाहेर पडून क्लींसीन्ग होत आहे,असं आहे का.. असं होणं नोर्मल आहे का?
|
Moodi
| |
| Saturday, January 28, 2006 - 9:57 pm: |
| 
|
रेणु नीम अन जायफळ पावडर जर पाण्यात पेस्ट करून लावली असेल तर स्कीन कोरडी व्हायला मदत होते. काही दिवस कुठलेही क्रीम वापरू नकोस. सध्या थंडी खुप आहे त्यामुळे ती पावडर दुधात चालली असती. ते पिंपल्स हाताने किंवा नखाने जर फोडायचा प्रयत्न केला असेल तर दुसर्या ठिकाणी पण त्याच्यातला द्रव लागण्याचा शक्यता असते. चेहेर्याला सध्या संत्रे अन टॉमेटो याच एकत्र रस लाव अन सुकले की मग धुवुन टाक. संत्रे खाण्यात पण ठेव, त्याने रक्त शुद्ध होवुन पिंपल्सचा त्रास पण कमी होतो. सध्या केक्स, चॉकलेट्स वगैरे खाऊ नकोस. अन मुख्य म्हणजे जर केसात कोंडा असेल तर आधी तो कमी कर त्याने पण केस चेहेर्यावर येऊन काही वेळा तो कोंडा गळला की असा त्रास होतो. चेहेर्यावर अगदी हलकी वाफ घे अन नंतर चेहेरा साध्या कोमटसर पाण्याने धु. पुदिन्याच्या पानांचा लेप सुद्धा चालतो चेहेर्यावर, फक्त एकदा थोडा लावुन टेस्ट कर. त्रास झाला तर लावू नकोस. जर मेक अप मधील क्रीम अन फाउंडेशन साधारण कंपनीचे असेल किंवा सारखे बदलले तर त्यानी पण हा त्रास होऊ शकतो. त्या फुटणार्या पिंपल्सवर कापुस हलकेच दाबुन ती घाण काढ अन मग चेहेरा धुत जा. अन हातही स्वच्छ धुवुन टाक साबणाने.
|
मूडी..मी नीम आणी जायफ़ळ लिंबाच्या रसात कालवून लावते.केसात कोंडा नाही आहे.मेक अप पण नाही करत,कुठ्लं ही क्रीम पण नाही वापरत.मी थंडी च्या ठिकाणी नाही आहे.आहार व्यवस्थीत पाळते,केक,चोकोलेट इत्यादी अजिबात खात नाही,..म्हणूनच प्रश्णं पडतो..कसे इतके वाढतात..
|
Moodi
| |
| Sunday, January 29, 2006 - 10:50 pm: |
| 
|
रेणु आपले शरीर काही वेळेस अतीरीक्त तेल बाहेर टाकायचा प्रयत्न करते. जर काही कारणानी चेहेर्यावरच्या अती सुक्ष्म छिद्रातुन तेल बाहेर यायला वाट मिळाली नाही तर ते तिथे साठुन त्याचे मुरुमांमध्ये म्हणजे पिंपल्स मध्ये रूपांतर होते. मुळात तेलकट त्वचा असेल तर हा त्रास जास्त होतोच. हे तेल बाहेर पडायला वाव मिळावा म्हणुन चेहेरा आधी क्लीअरसील किंवा clean and clear च्या किंवा न्युट्रोजीनाच्या clinsing milk ने साफ कर. मग थोड्या गार पाण्याने चेहेरा धुवुन पुसुन मग हा नीम पावडरीचा लेप लाव. जायफळ सध्या लावु नकोस. अन हा लेप संत्राच्या किंवा टॉमेटोच्या रसात लाव अन लिंबाचे २ ते ३ थेंब त्यात टाक. अन दररोज न लावता १ दिवसा आड लाव. चेहेर्याला मोकळी हवा मिळु दे. मेडीकेटेड साबण वापरून बघ.
|
Savani
| |
| Wednesday, February 08, 2006 - 1:48 pm: |
| 
|
मला रोज घरी सन्ध्याकाळी आल्यानन्तर चेहरा कसा स्वच्छ करावा याबद्दल माहिती मिळेल का? म्हन्जे cleansing करुन नन्तर toner लावणे etc
|
Moodi
| |
| Wednesday, February 08, 2006 - 2:03 pm: |
| 
|
सावनी आधी तुझी त्वचा तेलकट आहे की कोरडी हे सांग.
|
Savani
| |
| Wednesday, February 08, 2006 - 2:10 pm: |
| 
|
मूडी माझी त्वचा तेलकट नाही आणि कोरडी ही नाही. पण normal सुद्धा नाही. म्हन्जे तेलकट पणा कडे झुकणारी आहे. hope i am not confusing you
|
Moodi
| |
| Wednesday, February 08, 2006 - 2:20 pm: |
| 
|
सावनी मग दररोज cleansing करण्याची गरज नाही. नॉर्मल अन सौम्य असा फेसवॉश वापरु आधी साधारण कोमट पाण्याने चेहेरा धुवायचा. सध्या थंडीमुळे कोमट अन मग उन्हाळ्यात गार पाणी घ्यायचे. मग हलकेच टिपुन त्यावर त्वचा दमट असतानाच मॉइश्चरायझर लावायचे. चेहेरा जास्त कोरडा करायचा नाही. मॉइश्चर चालत नसेल तर ऑइलफ्री क्रीम लाव. मार्केटमध्ये असे प्रॉडक्टस आहेत. कंपनी मात्र दर्जेदार हवी. न्युट्रोजीना, clean and clear , लोरीयल, पॉंडस किंवा ओले चे प्रॉडक्ट्स बघ. जर मेक अप रोज करत असशील, म्हणजे फाऊंडेशन वगैरे तर cleansing milk कापसावर घेऊन चेहेर्याला खालुन वर अशी मालीश करुन मग तो पुसुन धुवायचा. मग टोनर लावायचे.
|
Savani
| |
| Wednesday, February 08, 2006 - 2:40 pm: |
| 
|
thanks मूडी. लगेच रीप्लाय दिलास.
|
Moodi
| |
| Thursday, February 09, 2006 - 11:18 am: |
| 
|
ही एक मस्त लिंक. http://www.loksatta.com/daily/20060209/viva04.htm . वाचा बर आजच. 
|
Mumbai12
| |
| Thursday, February 09, 2006 - 5:18 pm: |
| 
|
Hello Moodiतुम्ही खरच खूप उपयुक्त माहिती देत आहात. वरचा लोकसत्ता मधला लेखही खरंच वाचण्यासारखा आहे. Upperlips करण्याबद्दल कहि महिती देऊ शकता का? मी bleach करते ह्यावर चांगला उपाय काय तुम्ही सांगु शकाल का?
|
Nirnay
| |
| Thursday, February 09, 2006 - 6:38 pm: |
| 
|
Moodiमला थोडी महिति हवी होति stretchmark न येण्यासाठी. तु वर लिहिल आहेस कि प्रेग्नन्सि मधेच काळजी घ्यावी लागते ति कशी Please डिटेल मधे सान्गणार का?
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|