Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 01, 2006

Hitguj » Health » केसांचे आरोग्य » Archive through February 01, 2006 « Previous Next »

Moodi
Tuesday, January 03, 2006 - 12:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या विभागात आपण केसांच्या तक्रारीवर इलाज अन केसांसाठीची विवीध तेले या विषयावर माहिती घेणार आहोत. तरी सर्व समदुक्खी प्राण्यानी हे गोड मानुन घ्यावे.

Moodi
Tuesday, January 03, 2006 - 12:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केसाना आपला खजिना मानुन नियमीत म्हणजे किमान २ तरी धुवा.

केसांवर सारखा ब्रश फिरवल्याने ते तुटतात त्यामुळे दिवसातुन ३ दाच केस विंचरा.

चित्त प्रसन्न ठेवा, अती काळजी अन चिंता यामुळे ही केस गळतात.

जेवणात दही किंवा ताक तसेच एकदा दुध असे रोज असावे.

ताजी फळे, भाज्या, कोशिंबिरी अन कमीत कमी ८ ग्लास पाणी प्यावे.

उन्हाळ्यात केसांमध्ये ताक किंवा फेटलेले दही लावुन १५ मिनिटानी कोमट ते थंड अश्या पाण्याने केस धुवावे.

केसात आकडे, पिना रात्रभर राहू देऊ नये.

केस धुण्याच्या आदल्या रात्री खोबरे तेल + तीळाचे तेल गरम करुन करुन ते कोमटसर असताना केसांच्या मुळाशी बोटानी दाब देत चोळावे. रात्रभर ठेवुन दुसर्‍या दिवशी कोमट पाण्याने धुवावे. त्या आधी जमल्यास टर्कीश टॉवेल पाण्यात भिजवुन पिळुन तो केस गुंडाळतील या पद्धतीने डोक्याला बांधावा, म्हणजे त्याची वाफ केसात मुरुन कोंडा वगैरे प्रकार कमी होतील अन केसांच्या मुळाची छिद्रे मोकळी होतील.

केस जास्त गळत असल्यास बदाम वा ऑलिव्ह तेल कोमट करुन केसाना मालीश करावी. खोबरेल तेलापेक्षा ते लाभदायक आहे.

कोरड्या वार्‍यामुळे केस कोरडे होवुन तुटतात अन केसाना टोकाला २ टोके फुततात तेव्हा ऑलिव्ह वा बदाम उन्हाळ्यातही वापरावे.

नहाण्यासाठी अतिशय कढत वा अती गार पाणी वापरु नये, कोमट ते गार असे वापरावे.

केस धुण्यापुर्वी आवळ्याचा रस वा पावडर लिंबाच्या रसात कालवुन मग त्वचेला मालीश करा. याने केस गळायचे थांबुन ते काळे होतात अन वाढ पण छान होते.

केस धुण्यासाठी शांपु वापरताना बोटांच्या टोकानी, नखाने नव्हे मालीश करुन केस धुवावे. केस पुर्ण गुंडाळुन त्याचा बुचडा करुन केस शांपु करु नका.

केस धुण्यापुर्वी गुंता अवश्य काढा.


Moodi
Tuesday, January 03, 2006 - 1:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारतातल्यांसाठी तर हे शक्य आहे.

ओल्या खोबर्‍याचा तुकडा जास्वंदीच्या फुलाबरोबर वाटुन हे मिश्रण केसांच्या मुळाशी थोदा वेळ लावुन मग केस धुवावे.

१०० gm रीठे, १५० gm शिकेकाई अन आवळ्याचे तुकडे लोखंडी कढईत पाण्यात २४ तास भिजवुन मग ते सर्व त्याच पाण्यात कुस्करुन उकळुन न गाळता त्याच पाण्याने नहावे.

१ लिंबाचा रस अन २ चमचे आवळा गर रात्री कढईत भिजवुन सकाळी केसाना लावुन मग नहावे. केस काळे अन चमक्दार होतात. लिंबु अर्धे पण चालेल.

शिकेकाई, लिंबाची वा संत्र्याची साल, आवळकाठी हे एकत्र उकळवुन त्यात लिंबा एवढा गुळ घालुन त्या पाण्याने केस धुवावे. पाण कोमट होउ द्यावे. गुळाने कोंडा पण जातो अन केस गळणे थांबते.

मेथी बिया भिजत घालुन त्याना मोड आणुन लिंबाच्या रसात आवळ्याबरोबर वाटुन ते खोबरे तेलात मिक्स करावे अन नियमीत केसाना लावावे.

मेथीने केस दाट अन काळे होतात.

रोज रात्री केस झोपण्या आधी उलटे करुन विंचरावे रक्ताभिसरण चांगले होवुन गळायचे थांबतात.

वरचे वर अती तामसी आहार, लोणचे, वेफर्स, अती मीठ, अपचन, चायनीज आहार, वात प्रकृती असलेल्यानी न शिजवता भाज्या अन शेंगदाणे तसेच कडधान्ये खाल्ल्याने पण केसांचे विकार होतात.

गरोदर बायकानी आहारात दुध अन घरचे साजुक तुप रोज घेतलेच पाहिजे. अती उष्ण पदार्थ उदाहरणार्थ मांसाहार, लोणची, पापड, खुप प्रमाणात सुकामेवा, चॉकलेट, कोल्ड्रिन्क्स हे टाळावे.


Moodi
Tuesday, January 03, 2006 - 1:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोंड्यासाठी त्रिफळा चुर्ण + जास्वंद चुर्ण + वावडींग एकत्र केसांच्या मुळाशी चोळुन लावुन मग थोड्या वेळाने नहावे.

काळे तीळ, आवळा, जटामांसी एकत्र चुर्ण करुन कोरफड गरात घोटुन केसाना लावुन मग नहावे, केस गळणे थांबते.

केसांसाठी आहारात मटणा ऐवजी मासे ठेवावेत.

कोरफड जेल अन जास्वंद जेल केसाना आधी लावुन ठेवुन मग नहावे. ज्याना सर्दीचा त्रास आहे त्यानी या जेलमध्ये २ थेंब निलगिरी तेल टाकुन मग लावावे.


Parijat30
Thursday, January 05, 2006 - 5:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुडी, खरच खुपच छान महिती देतेस गं तु.
तुझ्याजवळ काही पोटली बाबा की किंवा आजीबाईचा बटवा वगैरे आहे का? आणि पुन्हा तुला पाककृतींपासुन ज्योतिष्य आणि आयुर्वेदाचिही बरीच सखोल माहिती आहे.
तुसी ग्रेट हो.


Arunima
Thursday, January 05, 2006 - 6:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडि जास्वदिची पान हि खुप चांगली असतात न केसांसाठि.

Shyamli
Thursday, January 05, 2006 - 6:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुडी मी अगदी आजच केसान्साठी प्रश्न विचारणार होते
पण आधिच सगळि ऊत्तर मिळालि
धन्यवाSSSSSSSSद


Moodi
Thursday, January 05, 2006 - 7:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो ग अरुणिमा उर्फ निवेदीता जास्वंदीची पाने सुद्धा शिकेकाई बरोबर उकळुन त्याने नहाता येते.
तुझी मुलगी खुप गोड आहे ग.

आता संक्रांत येतेय, काळे गावठी तीळ मिळाल्यास ते ठेवा, ते सुद्धा वाटुन केसाना लावतात अन ते चावुन खावे सकाळी चमचाभर, त्याने दात अन हिरड्याना फायदा होतो. पॉलीशचे तीळ वापरु नका.

श्यामली अजुन माहिती देईनच.
पारीजात तुम्ही सगळे शेअर करा तुमच्याही जवळची माहिती.


Megha16
Friday, January 06, 2006 - 9:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय मुडी
केंसा साठी छान माहीती दिलीस.
तिळाच्या तेलाने नक्की काय होत?
आणी कोंड्या साठी आणखी एक उपाय मी स्वत्: करते मेथी ची पाने आणी लिंबाचा रस दोन्ही एकत्र वाटुन गाळुन त्याचे दोन भाग करायचे.एक भाग घ्याचा आणी केस धुन्याआधी अर्धा तास केंसांना लावुन ठेवायचा आणी मग केस धुवायचे शॉम्पु लावुन झाला की परत उरलेले भागाने केस धुवायचे पण नंतर शॉम्पु लावायचा नाही.
याने कोंडा नक्की कमी होतो १००%. माझा स्वत्:चा अनुभव आहे


Moodi
Friday, January 06, 2006 - 10:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेघा १०० % बरोबर. मेथीच्या पानाने कोंडा तर जातोच पण केसही दाट अन काळे रहातात.

तीळाचे तेल केसाना मऊ,रेशमी बनवते, अन काळे ठेवते. काळे तीळ केसाना वाटुन लावुन मग नाहले तरी चालते.


Me_mastani
Saturday, January 07, 2006 - 2:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Tilache tel lavanya aadhi siddha karave ase mhanatat nahitar te ushna padate kahi jannana. Mhanaje nemake kaay?

Bee
Saturday, January 07, 2006 - 6:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी, काळे जुने तिळ ना? आणि ते वाटून लावायचे म्हणजे आधी तिन चार तास भिजत घालायचे नि मग मिक्सर मधून बारीक काढून लावायचे नि पाच सहा तास ठेवायचे? बरोबर ना माझे?

आणि मेथीच्या बियांचे पण असेच करायचे? बरोबर ना माझे?

आणि जुने तिळ नवे तिळ कसे काय ओळखायचेत?


Arunima
Saturday, January 07, 2006 - 5:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks मूडि. केसांना चमक येण्यासाठि अंड्याच्या पांढर्या भागात एक पिकलेल केळ कुस्करुन घालायच. ते केसाना लावुन २०-२५ मिनिटांनी धुवुन टाकायच. फक्त ज्यांच्यात खुप पेशन्स आहेत त्यांनीच हा प्रयोग करावा.

Prajaktad
Monday, January 09, 2006 - 4:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अंड केसाला लावले कि केस छान होतात पण फ़ार वास येतो केसाला म्हणुन अंडे दह्यात फ़ेटुन लावावे किवा अंडे फ़ेटताना त्यात एक चमचा मेंदि घालावी.
केस गळण्यावर एक चांगला उपाय..
कोरफ़डीचे एक मध्यम आकाराचे पान घ्यावे सुरिने वरचि साल दोन्हि कडानि सोडवत बाजुला काढावी((पुर्ण काढुन टाकु नये).यात अर्धि वाटि मेथि दाणे पेरावे.साल परत लावुन एका towel मधुन गुंडाळुन उबदार जागि ठेवावि.याल २ दिवसात मोड येतिल..
चमच्याने सगळा गर आणि मेथि दाणे काढुन घ्यावे.
हा गर mixer मधुन एकजिव करुन घ्यावा.
एका लोखंडि कढईत अर्धा लिटर खोबरेल तेल घ्यावे,त्यात ह गर mix करुन मंद आचेवर ठेवावे.तड्तडन्याचा आवाज पुर्ण थांबला कि झाले तेल तयार,वासासाठी माका
वैगेरे घालता येईल
हे तेल आठ्वड्यातुन दोनदा चांगले चोळुन केसाला लावावे.केस गळण्याचे थांबतात.


Anuli
Monday, January 09, 2006 - 4:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

prajakta chan upay dila ahes. megha, mala tula vicharayche hote ki majhyakade methi kahi farshi milat nahi mag pananeivaji methiche dane vaprun kahi karta yeil ka?

Nalini
Wednesday, January 11, 2006 - 12:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुडी, मेघा, प्राजक्ता खुपच छान माहिती दिली तुम्ही.
केस ओले असताना विंचरु नये. तसेच केस फार जोरात ओढुनही विंचरु नये, केसाना दोन टोके फुटतात.
गुंता काढताना टोकापासुन काढायला सुरुवात करावी, लवकर निघतो आणि केस कमी ओढले जातात.


Megha16
Wednesday, January 11, 2006 - 3:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय अनुली
अग मेथीचे दाणे वापरले तरी चालतील ते भिजवुन मोड आणुन मग बारीक वाटुनघे
ते वाटल्यावर फार चिकट होत,म्हणुन मग वाटल्यावर त्यात पाणी मिक्स कर बरया पैकी पातळ कर आणी मग गाळुन घे मग लाव
मेघा


Anuli
Wednesday, January 11, 2006 - 5:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks megha. sadhya jara sadri jhali nahitar lagech kela asta upaay. pan limbacha ras jara nako vatato na sardila.

Bee
Thursday, January 12, 2006 - 3:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी एके ठीकाणी असे वाचले की रात्रीच्या वेळी केस मोकळे सोडून कमरेत वाकून मान खाली करावी आणि नंतर विरळ दात असलेल्या फ़णी किंवा कंगव्यानी केस विंचरावे अशानी रक्ताभिसरण चांगले होते डोक्याचे.

केसांसाठी सगळ्यात उत्तम पण शिकेकाई आहे ना.. परत रिठा, नागरमोथा, कापडचुरा की कायसे


Moodi
Thursday, January 12, 2006 - 3:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी एकदम बरोबर सांगीतलेस.
शिकेकाई, रीठा, आवळा पुड,नागरमोथा, बावची, सुगंधकाचला किंवा कचोरा, संत्र्याचे किंवा लिंबाचे वाळलेले साल असे सर्व एकत्र दळुन ते उकळुन कोमट गार झाले की त्याने नहावे.



Me_mastani
Thursday, January 12, 2006 - 5:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Please mazya prashnache uttar dyal ka-Tilache tel lavanya aadhi siddha karave ase mhanatat nahitar te ushna padate kahi jannana. Mhanaje nemake kaay?


Moodi
Thursday, January 12, 2006 - 5:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तीळाच्या तेलात काही औषधी द्रव्ये टाकुन ते उकळुन घ्यावे लागते, पण ती औषधी द्रव्ये कोणती ते मात्र मला माहित नाही. माहिती मिळाल्यास जरुर सांगेन.
मात्र हे तेल खोबर्याच्या तेलात मिक्स करुन लावल्याने उष्ण म्हणजे गरम पडत नाही.


Meggi
Sunday, January 22, 2006 - 2:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केसांना फ़ाटे फ़ुटू नये म्हणुन काय करावे?

Moodi
Monday, January 23, 2006 - 9:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेगी केसाना फाटे फुटु नये म्हणुन ते दर ४ महिन्यानी खालुन एका रेषेत साधारण बोटभर कापुन घ्यावेत.
केसांच्या आरोग्यासाठी नुसते तेलच नाही तर खाण्यात दुध, दही, फळे, पालेभाज्या, मासे वगैरे तसेच भरपुर पाणी पण प्यायला लागते.
दुसरे म्हणजे अती तीव्र शांपु, वारंवार कंडिशनरचा वापर, कोरडे गार वार्‍यात मोकळे सोडलेले केस अन तेल अजीबात न लावणे या मुळे केसांची अशी अवस्था होते.
केसाना आधी कोमट तेलाना मसाज करुन रात्रभर ते तेल केसात राहूदे, सकाळी ते खुप सौम्य अशा शांपुने धुवुन टाक. कंडिशनर केसांच्या टोकाला लाव, मुळाना नको. मग वाळले की ते कापुन घे.

आठवड्यातुन २ दा तेलाचा मसाज करुन मग नहा. शक्य असेल तर नहाण्या आधी टर्कीश टॉवेल सोसवेल अश्या गरम पाण्यात पिळुन मग तो डोक्याला गुंडाळ. असे ३ ते ४ वेळा करायचे अन मग नहायचे म्हणजे केसाना वाफ मिळुन त्यांच्या मुळापर्यंत तेल पोहचुन ते जिरते अन मग असे त्रास कमी होतात.


Moodi
Monday, January 23, 2006 - 10:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तेल तयार करणे.

साहित्य : अर्धा ते पाऊण लिटर खोबर्‍याचे तेल, १२५ gm म्हणजे आतपाव तीळाचे तेल, पावशेर आवळे.

कृती : आवळ्याचा किस करावा. खोबरे अन तीळाचे तेल एका कढईत किंवा जाड बुडाच्या भांड्यात एकत्र करुन मंद आंचेवर ग़रम करायला ठेवावे. त्यात आवळ्याचा किस टाकावा. अन ते शिजू द्यावे. नंतर आंच थोडी मोठी म्हणजे मिडियम ठेवावी. तो किस त्यात मुरायला लागल्यावर तेल तडतडत राहील. मधुन हलवावे. तो किस पुर्ण मुरुन कुरकुरीत होईपर्यंत तेल तापले पाहिजे. आता आंच परत मंद करावी.
जर आंच मध्यम ठेवायची असेल तर मधुन मधुन हलवावे अन लक्ष राहू द्यावे. आवळा कीस कुरकुरीत होवुन काळसर तपकिरी झाला अन तडतडणे थांबले की उतरवुन थंड झाले की दुसर्‍या भांड्यात किंवा बाटलीत तोंडावर फडके ठेवुन गाळुन घ्यावे. नंतर ते फडके घट्ट पिळुन घ्यावे म्हणजे उरलेले तेल पण निघुन येईल.

या तेलात आपण माक्याच्या वनस्पतीचा, ब्राम्हीचा ताजा रस मिसळुन शकतो. ते खुपच चांगले. तुळशीबागेकडुन बेलबाग चौक म्हणजे श्री दगडु शेट गणपतीच्या मंदिराकडे जाताना कॉर्नरवरच काही बायका ताजा माका विकतात. जर तो नाही मिळाला तर ब्राम्ही अन माक्याची पावडर आवळ्याबरोबर घालुन ती उकळावी.


Anush
Tuesday, January 24, 2006 - 8:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Kes khup galat asatil ani white pan hot asatil tar Kay upay ahe? Konatyahi Hair dye mule Dolyana tras hou shakato ka? Kuthale specific tel vaparale tar changala parinam hoil?

Suniti_in
Tuesday, January 24, 2006 - 7:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केस खूप गळत असतील तर गळण्याचे कारण आधी शोधून काढणे महत्वाचे आहे. हार्मोनल कारण असेल तर आपोआप नीट होते.
अनिमिया, अंगात जास्त उष्णता, आहारातल्या चुका(मुडीने वर दिलेले आहेच), काही औषधांचा दुष्परिणाम, केसांत कोंडा, कुठल्या शाम्पू व तेलाची alergy , ही कारणे लक्षात घेणे महत्वाचे असते.
जास्वद फुलांची पावडर, कचूर सुगधी, ब्राम्ही, कुलिंजन, जटामांसी पावडरींचे मिश्रण कोरफड चिकात मिसळून केसांच्या मुळाशी लावून २० मिनिटांनी धुवावे. आठवड्यातून २ दा करावे.

तेलकट केस्-
तेलकट केस किंवा घामामुळे चिकट वाटणारे केस शाम्पू किंवा साबणाने धुतल्यामुळे डोक्याच्या त्वचेवरील आम्लयुक्त सरक्षक आवरण Acid mantle नष्ट होते व केसांत खाजवणे व कोंडा तक्रारी होतात. अशांनी पाव वाटी मुलतानी मातीत अर्धा लिंबू पिळून पाण्यात पेस्ट करून केसांना सर्वत्र लावावी. १५-२० मिनिटांनी चोळून धुवावे.
रुक्ष केस्-
शक्यतो अशांनी केसांसाठी शाम्पू व साबण वापरू नये. मुडीने दिल्याप्र्माणे शिकेकाई, रिठा, आवळा, सत्र साल, मुलतानी माती यांचे मिश्रण वापरावे. जास्वद जेल दिवसाआड लावावे.

खाजवणारा कोंडा बुरुशी प्रादुर्भावाने पापुद्रे पडणारा कोंडा-रुक्ष त्वचेमुळे सभवतो. खाज असेल तर १-२ आठवडे Anti- drandruff शाम्पू अर्धा कप पाण्यात १-२ चमचे मिसळून केस धुण्यासाठी वापरावा. मधून मधून केस धुण्यापूर्वी केसांना दही लावावे. उत्तम म्हणजे कोरफड चिकात संत्रसाल, रिठा, त्रिफळा, मुलतानी, नागरमोथा मिसळून केसांच्या मुळाशी लावून २० मि. धुवावे.


Suniti_in
Tuesday, January 24, 2006 - 7:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाकी केस पांढरे होणे यावर मुडीच सांगेल. डाय मात्र टाळावेच. त्याएवजी मेहेंदी मधे चहाच पाणी- दही- जास्वद इ. मिसळून लोखडी भांड्यात ५-६ तास भिजवावे. केवळ एक तास डोक्याला लावून केस कोमट पाण्याने स्वच्छ धुवावे. शेवटी १ तांब्या कोमट, १-१ तांब्या कमी कोमट पाणी घेत धुवावे.

Mita
Tuesday, January 24, 2006 - 9:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुनीती पण मेंदीने पांढरे केस लाल होतात. काळे होत नाहित. आणि ते कसेतरीच दिसते.
तुझा चांगला अनुभव आहे का मेंदिचा??
मलाहि मेंदि लावणेच बरे वाटते पण ते लाललाल केस आवडत नाहित म्हणुन तुला विचारते आहे. राग मानु नकोस.


Suniti_in
Tuesday, January 24, 2006 - 10:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिता डाय ला पर्याय म्हणून बरी आहे बघ. आणि राग कसला ग? मात्र लोखंडी तव्यात मी भिजवायचे तेव्हा मेहेंदीचा लाल रग बराच कमी होत होता. हा मात्र अनुभव आहे बघ. इकडे मात्र माझ्याकडे एकही लोखंडी भांड नाहीये. तेव्हा हिना ची काळी मेहेंदी मिक्स करून पाहिली. त्याने काळा रंग येतो खरा. पण ती भिजवली तेव्हा वरती तेलासारखा हिरवट तवग आला होता. त्यामुळे त्यात डाय वगैरे काही मिक्स असेल हा विचार करून आणली नाही बघ परत.
मुडी तुला माहित असेल तर सांग मेहेंदीचा लाल रंग कसा कमी करता येईल ते.


Megha16
Tuesday, January 31, 2006 - 2:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेंहदी लावल्या नंतर केस लालसर होतात.ते टाळण्यासठी म्हणुन मेंहदी नेहमी लोखडी भांड्यातच भिजवावी.भिजवताना त्यात चहापत्तीच पाणी,लिंबु,आवळा पावडर,हे टाकुन रात्रभर भिजवावी. सकाळी लावायच्या आधी त्यात दही मिक्स करुन मेंहदी डोक्याला लावावी. हव असेल तर अंड ही घालु शकतो अंड्याने केसांना चमक येते, आणी केस मोकळे सुळसुळीत होतात.
मेंहदी डोक्याला लावल्या नंतर,ती उघडी न ठेवता,त्यावर पॉलीथीन ची पिशवी लावावी,यामुळे केस कोरडे होत नाहीत


Moodi
Wednesday, February 01, 2006 - 9:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेंदी लावण्यासाठी २ दिवस आधी केसांना रात्री कोमट तेलाचा मसाज करुन ते तेल रात्रभर केसात पूर्ण मुरु द्यावे. दुसर्‍या दिवशी सकाळी चांगल्या सौम्य शांपुने केस धुवुन टाकावे. कोमट पाणी वापरावे, अती गार, अती गरम पाण्याने केसाना २ टोके फुटतात, ते लवकर पांढरे ही होतात.
अन मग ते केस पुर्ण कोरडे झाले / सुकले की मग त्याच्या दुसर्‍या दिवशी सकाळी मेंदी लावावी. अन २ तासानी कोमट पाण्याचाच वापर करुन केस दुवावी. केसातुन मेंदी पुर्ण गेली पाहिजे.

मेंदी दर्जेदार असावी, नाहीतर डोक्याला खाज येऊन दुसरेच त्रास उद्भवु शकतात.

पित्त प्रकृती, वरचेवर सायनसचा अन सर्दीचा त्रास, अती कोल्ड्रिन्क्स घेणे, अती पापड किंवा मीठाचा खाण्यात समावेश असणे याने केस लवकर पांढरे होतात.


Jayavi
Wednesday, February 01, 2006 - 4:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ए, मला मेंदीचा खूप चांगला अनुभव आहे. माझे केस लाल न दिसता brownish दिसतात. मी रात्री लोखंडाच्या कढईत मेंदी, दही, coffee powder , लिंबाचा रस, थंडी असेल तर लवंगीची पावडर घालून भिजवुन ठेवते आणि दुसर्‍या दिवशी मेंदी लावायच्या आधी त्यात अंडं घालुन केसांना लावते. २.३० तासांनी फ़क्त पाण्याने धुते. मग त्या रात्री तेलाने मसाज करुन झोपायचं म्हणजे तेल चांगलं मुरतं. दुसर्‍या दिवशी शॅम्पूने धुते. मस्त दिसतात केस !! .

मूडी, यात काही problem नाही ना गं ? कारण मला केसांच्या वाढीमुळे दर २० दिवसांनी लावावी लागते.


Moodi
Wednesday, February 01, 2006 - 4:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जया मेंदीचा मला जास्त अनुभव नाही पण थंडीत लवंग पावडर वापरण्या ऐवजी १ ते २ तेंब निलगिरी टाकुन मग लाव. अन आवळा पावडर पण टाक.
अन उन्हाळ्यात आहेच ताक, दही वगैरे. त्रिफळा पावडर पण चांगली या मिश्रणात जर आवळा पावडर नाही मिळाली तर.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators