Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
वासंती मुझुमदार ...

Hitguj » Language and Literature » पद्य » वासंती मुझुमदार « Previous Next »

Kshipra
Monday, September 26, 2005 - 3:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

vanavaasa BaÜgatanaa

vanavaasa BaÜgatanaa
jaL ]dMD BaoTlao
kXaI nha} iktI nha}
pL iqajaUna qaaMbalao

vanavaasa BaÜgatanaa
Asao naacalao mayaUr
tumhI BaoTala mhNaUna
kolaa Xakuna %yaavar

iktI saaMgaU hÜ EaIhrI
vaaT iktI maI paihlaI
dIz QaaDuna tumhaMsaI
KalaI dohulaI zovalaI


saholaa ro


XaovaTcyaa dÜna AÜLIlaIla Aqa- AaiNa ‘dohulaI’ ha Xabd kovaL Ap`itma ²²


Karadkar
Tuesday, September 27, 2005 - 4:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

vaasaMtI maujaumadaraMcao nadIkazI vaacalaoya ka kuNaIÆ %yaa kraDcyaa AaiNa %yaa knyaa XaaLot iXaixaka hÜ%yaa. XaaLocyaa sauvaNa-mahÜ%savaalaa %yaanaa BaoTlaolao AaiNa %yaaMcyaaXaI baÜlalaolao Aazvato.

Iravati
Thursday, June 01, 2006 - 6:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



आपण असतो
कुणी
कुणाकुणाचे.
तसा पाऊसही....

पाऊस
कधी जिवलग
कधी सखा
कधी स्नेही
कधी दूरचा
कधी अगदी आतला
अनाम.... नात्यातला.

कधी तोच असतो
अनावर आवेग
कधी तोच असतो
अचेतनाचा रंग

आणि अनेकदा
विशुद्ध पाऊसदेखील....





किती वर्षें झाली,
स्मरत नाही.
पाऊस कोसळत होता,
एवढं खरं.

झड थांबण्याची वाट बघत
तुला उभा पाहिला
आणि अपु-या छत्रीतून
घेऊन आले,
तेव्हा
तुला कोरडा राखण्याच्या नादात
मी मात्र पुरती भिजून गेले



आपली ओळख झाली
आणि लगेचच एक दिवस
अचानक म्हणालास,
" तुला भेटलं की,
कसं पावसात भिजल्यासारखं....
पहिल्या पावसात
भिजल्यासारखं वाटतं."

मी आपली बघतच राहिले



नंतर
कोसळणा-या पावसावर ना
तुझी
सही होती....



काही सजवून सांगण्यापेक्षा ना,
कधी कधी हे सरधोपट रस्ते
खरे वाटतात
मध्यरात्रीच्या अनपेक्षित पावसाप्रमाणे
आश्वासक
क्वचित सोपेही

आत्ताही
पाऊस कोसळतान मला
तुला सांगायचं आहे
खरा हो,
पुरता खरा हो....



आपण कुणीच नाही
एकमेकांचे
नसतोही.

मग
थेंबाथेंबाने निथळणारा
पाऊस घेऊन येणारं
हे काय आहे?

थेंब उतरतात एकाग्र
आणि एकदम
सबंध झाडच उभं राहतं
पावसाचं



आपण परस्परांचे धनी
नसताना
पावसावर मात्र अधिकार
दोघांचाही.

मग
डोळ्यांतला वळीव
तुला नको कां असतो?

एकाच वाटेवरुन चलतान
पावलं मागंपुढं होणारच ना?

पावसाचे थेंब पायांवर येतात
तेवढेच आपले.... खरे.



झिमझिमले
की हसायचास
कह्यात घेणारं....

कौलारावर पाऊस वाजला
की सुसाट येऊन....

तू छान बोलतोस
असं म्हटल्यापासून
बोलायचंच सोडलंस तू....
म्हणजे 'छान' बोलायचं.

असं ऐकलं होतं की,
पाऊस भिजवताना भिजवतो
सकळ संपूर्ण.



असा आग्रही नको होऊ.
आणि स्वार्थीही.
दोन्हीमधली कुरतडवाट
चालतान
कापून घेशील अनेकदा.
तुझ्या जखमांनी भिजून गेले
तरी तुझ्यातला पाऊस
मला भेटणार नाही,
हे मल समजलंय....
ते तुला माहीत नसेल ना....


१०

कॉफी घेत असताना
तुला काय झालं होतं?

"आज समुद्र नितळ
नाही." म्हणालास.
पाऊस किती भरुन आला होता.

राखी आभाळाच्या सावल्या
पाण्यातही राखी रंगानंच
मिसळतात,
हे जसे काही
तुला माहीतच नाही....


११

बसमध्ये
तुझी अवजड पुस्तकं
मांडीवर वागवताना
माझे पाय दुखून आले,
इतकंच सांगितलं तर
घर येईपर्यंत नुसता
पाऊसच पाऊस....

अशानं कधी
पाय दुखायचे थांबतात का?

१२

मी घर सजवत होते
तेव्हा तुझा पत्ताच नाही

सजवलं
आणि पहिल्या पावसात
कुठूनसा आलास
ओळखीचं पीस घेऊन.

कुठं लावायचं ते....

या घराच्या भिंतीना
चूक नाही न मारता येत....


१३

"....माझं म्हणावं
असं तुझं
काय आहे माझ्यात? "
असं कोडं
नाही घालायचं पुन्हा.
किती वेळा उत्तर सांगू
पाऊस....
पाऊस....
पाऊस....






Iravati
Thursday, June 01, 2006 - 6:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

' सनेही ' या पावसावरच्या कवितावलीमधून....

Iravati
Saturday, June 03, 2006 - 2:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



ज्याच्या त्याच्या पावसावर
ज्याचं त्याचं नाव असतं.
तुझ्या माझ्या पावसावर
आपलं एकच नाव
असेल का?




असते तुझ्या असण्यालाच
लय
समुद्राच्या येण्याजाण्याची
असतो नाद
अनाहत
पावसाचा
आणि रंग ना,
शेतामातीत बघता बघता
सरसरणा-या
सरड्याचा




किरमिजी होत चाललेल्या
ढगांना
काळसर किनार मिळत चालली
की समजावंच
तू येतो आहेस
द्वाही फिरवत
प्रियकर पावसाची



आणि ना,
त्या दिवसानंतर
त्यानं दिली विखरुन
माझ्यावरती
समुद्राची मंद्र गाज

मग
आपलं रौद्र रुप
हलकेच घेतलं आवरून....

तेव्हा जीवच रमेना
परक्या झलेल्या थेंबांमधून




समुद्राची अनिमिष गाज
झळाळत्या आभाळावर
विखरून
मी शांत झाले आहे.

पाऊस आला किंवा
न आला,
तरी आता आभाळ
राहीलच झळाळतं
आणि
माझ्या शांततेचा आवाज
पखरून राहील चहूंकडे

तेव्हा वाटेलही कदाचित
आत्ता
विझती पाऊसधार तरी
हवी होती
निदान....




तू आहेस
रानफूल.

तू नितांत कोवळा वारा.
लडिवाळ लहरी पाऊस तू

ऋतुमंत वेळेला
सहाही ऋतूंचे वाण देणाराही
तूच....

आत सांग
वादळी पावसात
तूही वादळ हो म्हटलं,
तर चुकलं काय?



बोलावलंस
म्हणुन आले....

तुझ्या फुलांनी बहरलेल्या शहरात
लाल केशरी गेंदांची
सगळ्याभर फाल्गुनी.
न डोळे निवायला उसंत....

इतक्या दिवसांनंतर
इथं आलास
तेव्हा माझ्या नगरात
नुसता शिरवाच शिरवा....

माझे डोळे निवलेले
तुझे मात्र विझलेले....



पाऊस जसा आला
तसा त्याला
रिता रिता होऊ द्यावा
रिता रिता
जाऊ द्यावा

मग....
मग काही नाही....



Kshipra
Sunday, June 04, 2006 - 6:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ira, nehameepramaaNe dhanyavaad.. ..

Iravati
Wednesday, June 07, 2006 - 3:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



आपले उदयास्त
गोठवतो आहे तो
वनचर मायावी पाऊस

तेवढ्यात....
चुपचाप
भिजून येऊ या ना
एकदाच....



अगदी खरंच,
उद्या येईल ना पाऊस.
कशाला इतकी वाट बघतोस?

असा अविश्वासाने नको पाहू.

तुझी तगमग वाढलेली पाहिली ना,
तेव्हाच मी घलून ठेवलंय
पावसाचं उमलं.



पंचागातला पाऊस
पाळत नाही
आपला शब्द्;
मनातला निवळपणाच
मग पाऊस होऊन
येतो उमडून.

पण
पर्यायापाशी पोचलं
कुठल्याही
तरी एक अटळच
तुला उणा केला
ऋतुमानातून
तर
काही नाहीच की मग....



खरंच,
आधीच सांगितलं होतं मी पावसाला
" असा झिणझिणत येऊ नकोस "
म्हणून.
अशानं माझी कानशीलं
तापतात ना.
आणि
होत राहते
उलथापालथ
आतून आतून....

पण तू असलास की
बरं असतं
उलथापालथीवर
होते की आपोआप
निर्विकार झाकपाक....




रिमझिम
झडी
बौछार....
ही तुझीच अलौकीक रुपं
म्हणूनच मला सगळी अती प्रिय.

कधी अनपेक्षितपणे रुप पालटून
आलास ना
सनेही होऊन,
सोहन होऊन,
ललितसुंदर होऊन,
तर कधी
भैरव होऊन, भीम होऊन,
कधी तर जोगिया होऊन,
अगदी फक्कड होऊनदेखील....

तरी तू प्रियच.
सर्वकाल प्रियच.
प्रियाणां प्रियदर्शी....



चल ना लवकर,
उशीर होईल.
आता काय उरलंय
आवरायचं?

दावणीची गाय आज परतली नाहीये;
दारंही वा-यानं आपोआप उघडलीत....

मात्र घाईत नको विसरू
तुझं निरंजन हसू

निर्जीव काजव्यांचे
एकदम दिवे लागावेत
तशी, तेवढीच त्याची
संगत
आपण पावसातून
अस्ताला जात असताना....



आता कितीतरी वर्षं उलटली, नाही?
रंगारंगांचे ताणेबाणे भरत
मी आपली विणीतच बसले आहे
पाऊस....

म्हणशील,
" अजून कसा नाही पुरा होत? "

अरे,
होईलच की पुरा
तुझ्या मर्मातली
एक विजेची जरीतार दिलीस की.
तेवढीच तर
विणायची राहिली आहे....



Iravati
Thursday, June 08, 2006 - 1:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



तुझी मुद्रा
माझी नसते
तेव्हा तुझे तळपाय
माझ्या हातांत असतात

हलके हलके पायांचे तळवे
होत जातात रुखेरुखे
आणि
मुद्रेवर मात्र
तरारून येतात
पाऊसमणी....

कसं ना हे




तुला तिरप्या रेषांचे प्रेम,
मला आवडतात सरळ रेषा.
हे एखादं प्रतीक वगैरे म्हणून
नाही सांगत.

त्या दिवशी
तिरपा पाऊस कोसळत होता
तेव्हा कसा भरून आला होतास
आणि सरळ थेंब टपटपायला लागले
तर एकदम उदास झालास....

पाऊस आपला असल्यावर
प्रत्येक थेंबाशी
नातं जोडायला नको का




सुकुमार,
घरंदाज,
गर्भरेशमी....
विशेषणंच विशेषणं....

सांगता सांगता
एकीकडे
स्वता:लाच नकळत
मी निचरून जाणार तर नाही ना
खानदानी पावसाच्या लळ्यातून....



" साधा पाऊस
पाऊस रंगवता येत नाही ? "

मी म्हटलं,
" तुला कुणी सांगितलं
पाऊस साधा असतो म्हणून ? "

तर ना,
तो एकाएकी बोलेनासा झाला
आणि
हलका पण आश्वासक
स्पर्श करून गेला

कळलाच नाही
पावसाचा
आणि अबोल होत जाण्याचा
संबंध....



तुम्ही आवडता
हे कसं सांगायचं
कोणत्या भाषेत
कोणत्या लिपीत

एकदा आले
गाणं घेऊन....

मग 'मन' नावाचा
सगळा आसमंतच
तुमच्या नावे केला....

नाहीच उमजलं काही
कुठल्या लिपीतलं तुम्हाला.
म्हणून तर आताशा
पाऊसकाळात
भेटायला येते



पावसाने आपणहून यावं
असं खरं तर काय केलंय आपण
काही करू शकतो का तरी
आपण आपले त्याच्या येण्याचे साक्षी....
याहून काहीच नाही हाती

पण एखाददिवशी
अगदी एकटक पाहत राहिल्यावर
आपोआप
उघडतं क्षितिज
आणि भोवतालच्या वृक्षांच्या
फांद्या
जळधारांच्या असतात कितीकदा....



थेंबांची कात जाईल
घरंगळून
आणि दिसेल बघ आत
रांगोळी
श्वासांतून निसटलेल्या
रंगीत कवडशांची....

पावसापलीकडे
पलिकडच्या पलीकडे
थांबलेला
महाप्राण
प्रसरत राहील त्यातून....




दूरात
पाऊस वाजू लागला
असह्य
की
निनाद आघातावाचूनचे....
वाढत जातात दिशा
उंच उंच
आभाळ विस्तारते आकाशाहून,
अगणित ध्वनींची मुक्त नृत्य
अधांतरी....

वाहू लागतात दिशा तेव्हा
सैरभैर होतो
प्राणातला काळवीट्;
हरवून बसतो मेघांच्या कल्लोळात्;
वाट पाहत
निमूट थेंब टिपत राहतो....



Meenu
Friday, June 09, 2006 - 9:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इरावती धन्यवाद .... खुपच सुंदर आहे हे

Iravati
Thursday, June 22, 2006 - 2:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



शाईनं हात चिताडला
तेव्हा मी
रंगांची कविता लिहिली

कवितेत
उतरलेली
पावसाची लय्;
सरुन गेलेलं भय
रंगांचं....

तेव्हा
वीजच आली
आणि क्~एनव्हासवर
वितरुन राहिली
जिथं तिथं....

त्या वेळी ना,
तू गेला होतास
अडगळीच्या खोलीत
जुना पाऊस शोधायला




पावसाशी ओळख होण्यासाठी
त्याच्याशी बोलावे लागतातच
सात शब्द्;
मैत्री करण्यासाठी
चालावंच लागतं त्याच्या समवेत
सात पावलं.

आणि
अखंड भिजलं पावसात
तर काय होतं?

पानापानांतून टुकटुकणा-या
भिजोल्यांची चहकमहक
चढत जाते मस्तकात....



आर्ष भाषेत उलगडणारे
आपणांमधले
अनादी संवाद.
ऋचांमागून ऋचा
ऋचांमागून ऋचा....

परवा परवा ना,
खिडकीमधून दिसणा-या
झाडावर
पाऊस होता डवरलेला;
आणि
चिमण्यांच्या बोलांची झगमग
पावसावर मखर झाली असताना
मधेच झळकली
आपल्या तेव्हाच्या ऋचांची वीज....

अशी काय मुद्रा करतोस?
खरंच
पाहिली मी तिला....




पाउस....
असा प्रियसखा
त्याला कधीही
'जा' म्हणता येतं;
त्याच्याशी कट्टी घेता येते....

पण तो बोलभांड
झाला की
आभाळ फाटतं रे!




जन्मांच्या
ऐलपैल
उभे आपण

आपणांमधून प्रवाहत आहेत
अक्षरं
अनिवार....

ऋतुसारणीतून निखळून निघालेल्या
वर्षाकाळासारखी
तुझी पावलं
ओलसर, पण अधांतरी....

पाहतो आहेस ना?

निघता निघता
अधिकच जख्ख झालाय
वर्षाकाळ

खरं असलं ना हे,
तरी
भरून देतोय तो
आपल्या
ऐलपैल श्वासांमधून
हवीहवीशी ताजगी
आणि
बहरण्याचे नवे नवे अंदाज....



कुंचल्याचे रुंद पट्टे
निळे निळे
मोठमोठी लाल कोरडी फुलं
मधे
पिवळ्या गुलाबी
पाडाच्या कै-या भरदार
अधूनमधून
आजूबाजूला राखी रेषांचा
चुकतामाकता पाऊस....
हे डिझाइन काय साडीचं झालं
पाऊस नसताना आणलेल्या....

जरासा पाऊस भेटला
तर तू आणशीलही
आणखी काहीबाही
आणखीनच असंबद्ध....




तेव्हा ना,
जखमांच्या अनेक खुणा
घेऊन आला होता तुम्ही....
आठवतं?

नंतरचं आठवतं?
मुलायम दुकूल
घातलं मी
तुमच्यावर
आणि मी मोकळी झाले
अगदी त्या दिवशीच्या पावसासारखी




माझे धुवांधार प्रश्न
नकोसे झाले असतील....

उत्तरं जवळ असूनही
देत नसशील....

उत्तरं सुचली नसतील
कदाचित....

तुझ्या मनात असणारच मात्र
काय म्हणायचं ते
अविरत पावसासारखं

कदाचित
असेल ते संदिग्ध....
अरुपही

ते तसंच
धाडून दे ना!




माझ्या अलंकारांकडे
केवळ माझंच लक्ष

आज काय बिंदी....
उद्या काय, तोडे....
परवा काय....
मग न राहवून म्हटलं,
" आता कोणता अलंकार?"
तर
शांतपणे म्हणालास
"सज ना, तुझा लाडका
सनेही पाऊस घेऊन...."

तुच इतका
स्तब्ध स्तब्ध
असताना
मी कुठून रे आणू त्याला
सजण्यासाठी?

तो सनेही काय तुझ्याहून वेगळा?


१०

कधी होतोस
मुलाहून मूल
तेव्हा
कळ उठते खोलवर
तुझ्या काळजीने

असा वेडावाकडा
नको बरसू....
मग धांदल होते ना
तुला भरवताना
चिऊचा....काऊचा....





Iravati
Thursday, October 05, 2006 - 9:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काळ्या ढगांच्या रेशीमसावलीतून

काळ्या ढगांच्या रेशीमसावलीतून चंद्राची उमलतात असंख्य फुले
रत्रीच्या झोक्यावर चित्रेची साकी मुक्यामुक्यानेच सारखी झुले.

झुलत झुलत कुठून कसे जवळ येतात रंगीत पक्षी,
वेतसीचे उंच हात कोरीत असतात नवलनक्षी.

कौल कौल झकत असते निळे डोळे जपून लपून
चांदण्याची मेंदी लेऊन झुलते भिजून शारद धून

झुलत झुलत रंगीत पक्षी लावून जातात कणस्वर,
दूर दूर राहिलेले आभाळातले इवले घर....

वेतसीचे उंच हात.... रेशीमसावलीचा जुना लळा....
खोल खोल कळत असतात चांदण्याच्या तीव्र कळा


Iravati
Thursday, October 05, 2006 - 9:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अन्वय

दिशांतून येण-या स्वच्छंद प्रकाशात
आपले प्रारब्ध निरखून घ्यावे
नभातून पेटणा-या ग्रहांच्या वर्दळीत
आपले भविष्य लोटून द्यावे

कुठल्याही फुलासाठी
पान नसते गळत
पानांनधून प्रकाश
आपोआप झरत

हातांतले आकाश सांडत जाताना
आपली माती शोधीत जावे
जीवाच्या गतीचे आतले संदेह
आपले आपणच फेडून द्यावे

जीवाच्या गतीचे अबोध अन्वय
आपले आपणच लावून घ्यावे


Iravati
Thursday, October 05, 2006 - 9:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


हसू हिरवं फुटतं

वेळीअवेळी येतेस
जुईसारखी भरल्या
आणि तुझ्या हसण्याच्या
सांडतात लक्ष कळ्या

पोरी, अशी हसताना
दिसतेस सोनपरी
झिम्मा स्वातीचा डोळ्यांत
कळी फुलते अधूरी

हसू नकोस, वेडाबाई,
डोळा पाणी तरारतं
आणि काळ्या वावराला
हसू हिरवं फुटतं


Iravati
Thursday, October 05, 2006 - 9:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उभी कोसळेल वास्तू

कधी कधी काचतात
धागे गौर खांद्यावर,
नकोनकोसे वाटतं
अभ्र सुन्न माथ्यावर.

नाते जुळून गेलेले
' नको नको ' शी परंतू
नको ना रे हाक घालू
उभी कोसळेल वास्तू




Iravati
Thursday, October 05, 2006 - 10:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गळामोकळी आकाश्-अवेळ

करुण पहाट
गळामोकळी आकाश्-अवेळ
कौलार शार न्हाले ओले,
हुंगायची गंधवेळ.

कौलारांचे खुले श्वास....
खोल श्वास,
चांदण्याचा फिकुट मिना;
निरंग मात्र झुलतो आहे
निसुग पदराचा शेव सुना.


Paragkan
Thursday, October 05, 2006 - 9:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हिरवं हसू ...... अहाहा .... केवळ!

Iravati
Saturday, October 07, 2006 - 1:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शुक्ल रात्रीला
कमळफुलांनी मला पाहिले,
त्याच क्षणाला पानांवरती थेंब चमकले
मण्यांसारखे
परागचुंबित आसुसलेले
कमळांवरले रंग बिलोरी त्यांत उतरले.

शुक्ल रात्रीला पुन्हा एकदा
पुन्हा.... परंतु
कमळमिठीतच जीव गुंतला.
कमळे मिटली
स्वप्नांसम जी
थेंब उडाले पक्ष्यांपरि अन
कलथुन आले
आभाळ खाली.


Iravati
Saturday, October 07, 2006 - 1:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओळखीला जन्मखूण

पेटलेला जन्मदिवा
त्याची जळलेली कोर
अभ्रे चलली विझून
कडा झरती धुंवार.

कौलारांचे शिल्प काळे
मंदगर्भ प्रकाशात,
अलवार होई वारा
नीजपंखी पावलात

पापणीच्या कोप-याला
पिवळा प्रकाशक्षण
आणि थोडे आत खोल
ओळखीला जन्मखूण


Iravati
Saturday, October 07, 2006 - 1:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'सहेला रे' या कवितासंग्रहामधून

Iravati
Saturday, October 07, 2006 - 6:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भिजण्यासाठी नव्या उन्हात

मिळाले तर घेऊन ये
रानफूल
माझ्यासाठी,
पून्हा एकदा
हसले तेव्हा
वळून पाहिले नाही पाठी

मिळाला तर घेऊन ये
माझ्यासाठी
नागकेवडा
कसे सांगू,
तेजमणी
कधीहून झालाय वेडा.

आता नको थांबू कुठे,
थेट ये
मझ्या मनात
कधीहून थांबले आहे
भिजण्यासाठी
नव्या उन्हात.


Iravati
Saturday, October 07, 2006 - 7:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या डोळ्याची भावली

ऊन्ह-पावसाचा चाले
अव्याहत लपंडाव,
धुळीतल्या सोंगट्याचा
जाय उधळून डाव.

येई रंगात भोंडला
वळचणीच्या पागोळ्यांचा,
तालावर गाणे गाई
ससा चांदोबावरचा.

ससा चांदोबावरचा
जाय शोधायला ऊन्ह,
माझ्या डोळ्याची भावली
होई लहान लहान




Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators