|
Farend
| |
| Wednesday, September 13, 2006 - 12:23 am: |
| 
|
कालच 'लव्हाळी' वाचून संपविले. 'खोत' आणि 'रथचक्र' पेक्षा एकदम वेगळे आहे. मला फार आवडले, एकदम हलके फुलके लिखाण आहे. काही काही वाक्ये तर छान विनोदी आहेत. जरूर वाचा.
|
आसुद, मुर्डी, दापोली, दाभोळ, गिरगाव यांना जिवंत करणारा साहित्यिक संपला
|
Zakasrao
| |
| Tuesday, March 27, 2007 - 5:49 am: |
| 
|
एक अफ़ाट लेखन करणारा लेखक गेला. त्याना माझी आदरांजली जायच्या आधी ४ ते ५ दिवस त्यानी काहितरी प्रकाशित केल अस वाचल्याच स्मरत. कोणाला नक्कि माहीत आहे का?
|
आभाळाची हाक हे लो. टिळकांवर पुस्तक ते जायच्या आधी फक्त २ दिवस प्रकाशित झाले. विंदांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन पुण्यामधे झाले. ही कांदंबरी आहे की नॉन्-फिक्शन हे नक्की माहिती नाही. डोंबिवली मध्ये मजेस्टिक श्री नांच्या पुस्तकांचा स्टॉल लावणार आहे बहुतेक.
|
Zakasrao
| |
| Wednesday, March 28, 2007 - 6:45 am: |
| 
|
धन्यवाद शंतनु. तु मिरज चा आहेस का? मी कोल्हापुर.
|
होय झकासराव मी मिरजेचा आहे. श्री ना गेल्यावर एक उदासी आली. कितीतरी दिवस आणि रात्री श्री नांच्या पुस्तकांनी आणि व्यक्तिंनी भरलेली आहेत. बापु, राधा, नरसू-दादा-नाना खोत, ताई, जुम्मन, ओड्डल, बजापा, जावईबापु, जुलाली, तो आणि त्याची आई, विंदा आणि महादेव, एल्गार, लव्हाळी, तुंबाड.. कितीतरी.. श्रीना न वाचता दापोली, दाभोळ, मुर्डी, हर्णे, आंजर्ले, कर्दे, आसुद, व्याघ्रेश्वर, फणसाच्या लाकडाचे देउळ हे बघणे अशक्यच..
|
|
|