Paragkan
| |
| Friday, February 14, 2003 - 5:26 pm: |
| 
|
ckassic ... ashaky .. !!!!!!
|
Ajitk
| |
| Saturday, January 29, 2005 - 12:15 pm: |
| 
|
Rutu - apratim kavita ahe " haluch yeshil..." kharech hup sundar ahe kavita
|
नमस्कार मित्रानो आज खूप खूप दिवसानी इथे आलेय.. खूप खूप छान काहीतरी सोबत घेउन तुम्हाला आवडेल असे वाटतेय करु का मग सुरुवात??
|
माणसान्सारखे सम्बन्धही मरतात कधी कधी अचानक ह्रुदय बन्द पडून पण माणसान्पेक्षा त्यान्च्या मरण्याच दु:ख अधिक असत कारण माणस मरताना घेउन जातात सोबत स्वत:चच रक्त मास खळखळत चैतन्य पण सम्बन्धान्मध्ये ओतलेल असत आपण आपलच ह्रुदय आपलच रक्त आपल चैतन्य म्हणून सम्बन्ध मरत असतान मरत असतो आपणच! जळत असतो भणभणत्या चितेत जळत असत आपल्या अस्तित्वावरच आपल प्रेम कडाकड मोडत असतो आपलाच आत्मविश्वास आणि मग उरते चिमुटभर राख आजवर चिरन्तन वाटलेल्या नात्याची फक्त.... तिच विसर्जन करण्यासाठी उरत नाही एकही सजल पवित्र नदी रखरखीत वाळ्वन्टात माणसान्सारखेच सम्बन्धही मरतात
|
एल्गार मैलामैलांवरुन आलेला तुझा एक शब्द.. आणि मग इतके कसे ढासळले प्राणांतिक निश्चयानं उभारलेले तट..! कशा धडाधड कोसळल्या अभेध्य वाटणार्या चौक्या अन बुरजावर बसवलेला कडेकोट पहारा कसा असा झाला शिथील? आणि विस्मय असा, की ते ढासळणं सुध्दा हवंहवंसं मग खरं काय होत? किल्ला तर मजबूत होता मोर्चेबांधणी अचूक होती पहारेकरीही शर्थीचे होते पण- तो क्षणच होता चुकार नि मुळात फितुरच होता मुख्य किल्लेदार
|
घाई करू नकोस पांढरे निशाण उभारण्याची घाई करू नकोस मूठभर ह्रुदया.. प्रयत्न कर तगण्याचा तरण्याचा अवकाश भोवंडून टाकणार्या या प्रलयंकारी वादळाचाही एक अन्त आहे काळाच्या त्या निर्णायक बिंदुपर्यन्त लढत रहा तुझ्या नाजुक अस्तित्वानिशी!! वादळे यासाठीच वापरायची असतात आपण काय आहोत, हे तपासण्यासाठी नव्हे, काय होऊ शकतो, हे आजमावण्यासाठी
|
पण तू मी होते मनस्वी पण तू जरा समजावून तर पहायचंस! ठेच लागून पडले तर उठणारच होते स्वत: पण तू जरा आधाराला बाहू पुढे करुन तर पहायचेस!! अनेक आशाळभूत अपेक्षांना अव्हेरलं मी अहंकारानं पण तू जरा स्वत:ला त्यांच्यापेक्षा वेगळं मानून तर पहाय्चंस! पण तू, असं काही केलं नाहीस.. एखाद्या अजिंक्य शिखराकडं पहावं तसा पहात राहिलास माझ्याकडे.. अन मी राहिले अशीच अत्रुप्त आसावलेली तुझ्या आक्रमणाच्या अभिलाषेने....
|
१. तहानलेल्या क्षितिजानं ओंजळभर पाणी मागितले तेव्हा समुद्र ओशाळला आजवर त्याला फक्त समर्पण स्वीकारण्याचीच सवय होती २. अनवाणी चालतना तुझ्याकडे मगितली सावली त्यासाठी तुला मावळून जावं लागेल हे कसं कळलं नाही??
|
अरे त्यान्चे नाव सन्जीवनी बोकील आहे रे,असे कसे चुकीचे दिले आहे सुरुवातीच्या यादीत?ते दुरुस्त करायला हवे. रुतु तू का लक्श घालत नाहीस?
|
काही नवीन कविता द्या ना रे अजून त्यान्च्या
|
सन्जीवनीताईन्ची माये ग माये कविता मिळेल का कोणाक्डे सगळी?
|