Bee
| |
| Wednesday, December 14, 2005 - 10:37 am: |
| 
|
इरा, सारंग धन्यवाद! सारंग मी वर जी कविता लिहि म्हणून विनंती केली आहे त्याची दखल घेतली नाहीस ना ...
|
Sarang23
| |
| Wednesday, December 14, 2005 - 10:59 am: |
| 
|
क्षमस्व मे. अरे त्यासाठी तुला सोमवारपर्यंत थांबाव लागेल. कारण तो कविता संग्रह पुण्याला आहे. आल्यावर नक्की टाकतो...
|
Saprem Dya Nirop To Ek Vruddha Mali Gela Pikun Aahe Nidrist Shantkay Aata Padun Aahe Goomphun Shej Tyachi Haluwar Pakalyani Ha Vel Mogaryachaa Pani Mitun Aahe Angavari Kalyanchi Pasaroon Shaal Gela Saara Gulaab Aata Rokhun Shwaas Aahe JaeeJuee Basoon Konyaat Door Kothe Asphoot Geet Mand Hurhur Boltahe Vanvelu Vaajtahe Ekantkirr Aisa Malich Ki Akheri Nishwaas Taktahe Vaajun Megh Jaato Ghan-Nilasa Virun Sarvatra To Bharun Gambhir Naad Aahe Bole Akherache To:Aalo Ithe Rikaama "Saprem Dya Nirop, Baharoon Jaat Aahe" -Aarti Prabhu Kavya Sangrah- Nakshatranche Dene
|
Tu Tevha Tashi Tu Tevha Ashi Tu Baharanchya Bahunchi Tu Ail Radha Tu Pail Sandhya Chaaphekali Premachi Tu kahi Paane Tu Kahi Daane Tu Anolakhi Phulanchi Tu Navi Juni Tu Kadhi Kuni, Khaarichya Aga Dolyanchi Tu Hirvi Kachchi Tu Pokt Sachchi Tu Khatti Miththi Othhanchi Tu Kuni Pakshi: Pisanvar Nakshi Kavitechya Eeshwarachi
|
सप्रेम द्या निरोप तो एक वृद्ध माळी गेला पिकून आहे निद्रीस्त शांतकाय आता पडून आहे गुंफून शेज त्याची हळूवार पाकळ्यांनी हा वेल मोगय्राचा पानी मिटून आहे अंगावरी कळ्यांची पसरून शाल गेला सारा गुलाब आता रोखून श्वास आहे जाईजुई बसून कोन्यांत दूर कोठे अस्फुट गीत मंद हूरहूर बोलताहे वनवेळू वाजताहे एकांतकिर्र ऐसा माळीच की अखेरी निश्वास टाकताहे वाजून मेघ जातो घननीळसा विरून सर्वत्र तो भरून गंभीर नाद आहे बोले अखेरचे तो: आलो ईथे रिकामा "सप्रेम द्या निरोप, बहरून जात आहे" -आरती प्रभू काव्यसंग्रह- नक्षत्रांचे देणे
|
Giriraj
| |
| Monday, June 26, 2006 - 6:21 am: |
| 
|
माळ हिरव्या माळापुढे निळा गिरि गिरवित काळी वळणे काही छप्पर झाले लाल अधिकच धूर दरीतून चढतच नाही पुसून गेले गगन खोलवर काठावरति ढग थोडासा थोडासा पण तीच हेळणा पिवळा झाला फ़क्त कवडसा हिरव्या माळापुढे निळा गिरि मावत नाही इतुका फ़िक्कट अबरळ्त चाललि पुढेच टिटवी माळ ओसरे मागे चौपट
|
Kedar_j
| |
| Monday, October 23, 2006 - 10:07 am: |
| 
|
Me kedar Aarti prabhunchya char oli post karat aahe. purna kavita mahit aslyas post karavi. USANI MILALI SHARIRE AMHALA VIKRIS JODYA ETUKI TAYAR CHINTA NA TRAGA RANDE PRAMANE NIYAMIT GHETO SANADI PAGAR.
|
Bee
| |
| Monday, October 23, 2006 - 10:46 am: |
| 
|
mala nahi zepali hi 4Lee Kedar. tula arth lagala ka?
|
Sarang23
| |
| Tuesday, November 07, 2006 - 11:21 am: |
| 
|
ही एक अतिशय सुंदर कविता आहे. कचेरीतल्या माणसाची व्यथा सांगणारी... बी तुला पुर्ण मिळाली तर वाच म्हणजे नक्की अर्थ कळेल... अतिशय सहज साधी सोपी आहे ही कविता... मला वेळ झाला की नक्की पोस्ट करतो...
|
कचेरीमधील माणसाची व्यथा व्यक्त करणारी अजुन एक कविता म्हणजे वाट. मी ती आधी एकदा पोस्ट केली होती. इथे वाचा ह्त्त्प्://व्व्व.माय्बोलिॅओम्हित्गुज्मेस्सगेस०३३८५९३३४३्त्म्ल?११३४५५७९७२ श्री ना पेंडसेंनी त्यांच्या एक मित्र (नाव नकी नाही) या पुस्तकामधे आरती प्रभूंबद्दल च्या आठवणी छान दिल्या आहेत. मिळाले तर जरुर वाचा
|
Sarang23
| |
| Thursday, November 09, 2006 - 7:28 am: |
| 
|
हो बरोबर हीच ती... वाट नावाची बी ही घे लिंक
|
Bee
| |
| Thursday, November 09, 2006 - 7:47 am: |
| 
|
सारंग, वाट तर मिळाली वर बेडेकरनेही तिची लिंक दिली. मला वरील कवितेची, पुर्ण कडवी हवी आहेत.
|
Sarang23
| |
| Thursday, November 09, 2006 - 9:24 am: |
| 
|
बी, तुला ते पेज स्कॅन करून मेल करू का?
|
Bee
| |
| Thursday, November 09, 2006 - 9:51 am: |
| 
|
धन्यवाद सारंग. मी 'दिवेलागण' नाहीतरी विकत घेणाराच आहे तेंव्हा ही कविता मिळेलच.
|
Naadamay
| |
| Wednesday, February 14, 2007 - 4:59 am: |
| 
|
कोणी "दोन हे आहेत पेले आपुले नाही जणू" ही कविता द्याल का?
|
Bee
| |
| Wednesday, June 13, 2007 - 9:55 am: |
| 
|
'माझ्या कवितेच्या वाटेला जाऊ नका' अशी काहीशी आरती प्रभुंची कविता आहे. कुणाला आठवते का?
|
बी, उद्या शोधतो आणि टाकतो ही कविता.. मस्त आहे एकदम..
|
कविता या माझ्या अजाण कवितेचा अपमान कां करतां बाबांनो कां? प्रेम हवंय का या कवितेचं? मग तें मागून मिळणार आहे का तुम्हांला? खूप कांही द्यावं लागेल त्यासाठी. काय काय द्याल? आत्म्याची बाग फुलवतां येईल तुम्हांला? पण त्यासाठी तुम्हांला तुमचा आत्मा तुमच्याच तळहातावर एखाद्या स्वातीच्या थेंबासारखा घ्यावा लागेल, पण त्यासाठी तुमचे हात तुम्हांला चांदण्याहून पारदर्शक करावे लागतील. कराल? माझ्या कवितेपासून मीही, तिच्याजवळ असून, दूर असतों. भीत भीत स्पर्श करतों तेव्हा तिचे डोळे पाणावल्यासारखे चमकतात. डहुळून जातात त्यांतले रानचिमणे विभ्रम. ती एका पोक्त कलेने प्रौढ होते. या कवितेच्या मुलायम केसांवरून सरकून जातात श्यामघनांतले मंद संधिप्रकाश. वाटतं की ती आताच उभीच्या उभी निसटून जाणार आहे दोन आर्त स्वरांच्या मधल्याच रिकाम्या स्वर्गांत. स्पर्श करतांना अजूनहि मी तेवढा शुद्ध नाही एखाद्या बुद्धाच्या जिवणीवरील उदासीन हास्यासारखा या माझ्या अजाण कवितेच्या वाटेला जाउं नका कारण ती ज्या वाटा चालते आहे त्या आहेत तिच्या स्वत:च्या नागमोडी स्वभावांतून स्फुरलेल्या. मोडून पडाल! तिच्या नावाचा जप करायचा असेल तर त्यासाठी तुम्हांला तुमच्या कण्याच्या मणक्यांचे रुद्राक्षमणी ओवून जपमाळ करावी लागेल आणि श्वासनि:श्वासांचा करावा लागेल कमंडलू; पसरावें लागेल संज्ञेचें व्याघ्रचर्म. आहे तयारी? ज्या आपल्या वाटा हुडकीत आल्या वाटेने; तिला पाहायचे डोळे प्रथम मिळवा, मगच पाहा तिच्याकडे डोकें वर उचलून. ती भोगतेय जें जें कांही त्यांतल्या तिळमात्रही वेदना तुम्हांला सोसायच्या नाहीत. मी स्वत: पाहातोंय स्वत:च्याच कवितेला एखाद्या पेटलेल्या दिव्याप्रमाणे दूर ठेवून.
|
Bee
| |
| Tuesday, June 26, 2007 - 1:41 am: |
| 
|
बेडेकर, आठवणीने तू ही कविता लिहिलीस त्याबद्दल आभार..
|
Deepakul
| |
| Monday, October 08, 2007 - 11:41 am: |
| 
|
'तेव्हा मीच माज़ा करेन हेवा'. ही कवीता कुणाला माहित आहे का?
|
samaichyaa shubhra kaLyaa hI kavitaa ani ticha arta kuthe miLela?
|
Admin
| |
| Friday, July 18, 2008 - 11:32 am: |
| 
|
हा विभाग इथे हलवला आहे /node/2701
|