Graceful
| |
| Wednesday, February 01, 2006 - 5:16 am: |
| 
|
तू वोगी मरता पळतया तुका जिवाक जपता हांव खंय लिपता दोले उलैता -- तु उगाचच मरतो/मरतेस --तुला बघतो --जिवाला जपते पण मि कुठे दडते? --डोळे बोलतात Kshipra अजुन Konkani कविता असल्यास पोस्ट कर ना, please
|
Kshipra
| |
| Thursday, February 02, 2006 - 5:15 am: |
| 
|
graceful, thanks malaa vaaTata hota kee 'paLatayaa' haa shabda chukalaa kee kaay.. aaNi gaaNyaacha tyaachaa uchaara 'poLatayaa' asaa aahe. tyaamule ajunacha confusion hota hote. paLatayaa mhaNaje baghaNe...lol....aso. malaa shaantabaaiMchee evadheecha kokaNi kavitaa maahit aahe. 
|
माजो लवताय डावा डोळा जाई जुईचो गजरो माळता रतन अबोली केसान फुलता काय शकून... शकून गो सांगताय माका... माझे कानार भवर भवता माझे गालाक बाई भिडता सगळ्या अंगार शिरशिर येता माजे पदर वार्यावर उडता मनचो बकुल गो परमळता काय शकून... शकून गो सांगताय माका... माझे डोळ्यात सपनाच्या वाटेर कोन बाई येता न् जाता माझे ओठार माझेच गाणे कोन बाई येऊन गाता माजोच बोल बाई हुलयता काय शकून... शकून गो सांगताय माका... -शांता शेळके चू.भू.द्या.घ्या.
|
गो माजे बाय तू माका जाय तुजे ओंठार येवंदी व्हय व्हय व्हय , in which audio cassette will i get to hear this song?
|
Mitwa
| |
| Friday, February 03, 2006 - 6:52 pm: |
| 
|
श्रीधर फडके आणि पद्मजा फ़ेणाणी यांच्या: हे गगना ह्या २००४ मध्ये प्रसिध्द ज़ालेल्या ध्वनीमुद्रिकेत हे गाणे आहे. श्रीधर फडकेंनी अतिशय सुंदर चाल व संगीत दिले आहे.
|
i have heard it livein one of Shridhar Phadke's programme but didn't know about the cassette..thanks!
|
Manchali
| |
| Wednesday, May 24, 2006 - 6:35 am: |
| 
|
'भले बुरे जे घदून गेले विसरून जाऊ सारे क्शन्भर जरा विसावु या वलनावर ....' हे सम्पुर्न गाने कुथे अहे?
|
Giriraj
| |
| Wednesday, June 07, 2006 - 7:06 am: |
| 
|
क्षिप्रा,ते 'पळतया' नसून 'पळयतां' असे आहे! आणि कोंकणीत 'ळ' चा उच्चार केला जातो मुंबईकडच्या कोळीगीतांत 'ळ' चा उच्चार नसला तरी! त्यामुळे 'दोले' असे न म्हणता ते 'दॉळे' असे म्हणतात! आणि दाद द्यायला हवी शांताबाईंना या कोंकणी आणि दर्यागीतांबद्दल.. मुळात मंचरकर असलेल्या शांताबाईचा या सगळ्यांशी तसा संबंध नव्हताच!
|
Giriraj
| |
| Wednesday, June 07, 2006 - 7:17 am: |
| 
|
बापू करंदीकरांनी आमंत्रण दिलेला कार्यक्रम कालच अनुभवला!शांताबाईंच्या विविध भावछटा असलेल्या प्रतिभेचा पुनःप्रत्यय आला! त्यतच म्हटलेले हे सुंदर नाट्यगीत..... या कार्यक्रमात अजित परब यांनी गायले. मुळात 'हे बंध रेशमाचे' या नाटकातील गीत पं.जितेंद्र अभिषेकी यांनी गायले आहे!संगितही अर्थातच त्यांचेच आहे! काटा रुते कुणाला,आक्रंदतात कोणी मज फूल ही रुतावे हा दैवयोग आहे सांगू कशी कुणाला कळ आतल्या जीवाची चिर-दाह वेदनेचा मज शाप हाच आहे काही करू पहातो रुजतो अनर्थ तेथे माझे अबोलणेही विपरीत होत आहे हा स्नेह वंचना की काहीच आकळेना? आयुष्य ओघळोनी मी रिक्त-हस्त आहे
|
Giriraj
| |
| Monday, June 12, 2006 - 5:44 pm: |
| 
|
ऋतू हिरवा, ऋतू बरवा पाचूचा वनी रुजवा युगविरही हृदयावर, सरसरतो मधूशिरवा भिजूनी उन्हे चमचमती, क्षण दिपती क्षण लपती नितळ निळया अवकाशी, मधुगंधी तरल हवा मनभावन हा श्रावण, प्रियसाजण हा श्रावण भिजवी तन, भिजवी मन हा श्रावण थरथरत्या अधरावर, प्रणयी संकेत नवा नभी उमटे इंद्रधनू, मदनाचे चाप जणू गगनाशी धरणीचा, जूळवितसे सहज दुवा
|
Itsme
| |
| Tuesday, June 13, 2006 - 5:30 am: |
| 
|
Giri, ratrich parayan keles ki kay ? ... me aaj sakalich kele ...
|
Giriraj
| |
| Tuesday, July 11, 2006 - 11:30 am: |
| 
|
जाईन विचारीत रानफुला भेटेल तिथे गं, सजण मला भग्न शिवालय परिसर निर्जन पळस तरुंचे दाट पुढे बन तरुवेली करीतील गर्द झुला उंच पुकारील, मोर काननी निळया ढगांतून भरेल पाणी लहरेल विजेची सोनसळा वाहत येईल पूर अनावर बुडतील वाटा आणि जुने घर जाईल बुडून हा प्राण खुळा
|
जय शारदे वागीश्वरी विधिकन्यके विद्याधरी ज्योत्सनेपरि कांती तुझी मुख रम्य शारद चन्द्रमा उजळे तुझ्या हास्यातुनी चारी युगांची पौर्णिमा तुझिया कृपेचे चांदणे नित वर्षू दे आमुच्या शिरी विणेवरी फिरता तुझी चतुरा कलावय अंगुली संगीत जन्मा ये नवे जडता मतिची भंगली उन्मेष कल्पतरुवरी बहरुन आल्या मंजिरी स्पर्शामुळे तव देवते साकारती रुचिराकृति शास्त्रे तुल वश सर्वहि विद्या कला वा संस्कृती लावण्य काही आगळे भरले दिसे विश्वांतरी
|
दीननाथा दया सागरा रूप डोळा तुझे पाहू दे जीव पायी तुझ्या वाहू दे दूर नेतात वाटा अशा पावलांना कळे ना दिशा श्रेय हाती खरे येऊ दे जीव पायी तुझ्या वाहू दे सागराच्या तुझा थेंब मी चंद्रमा तू तुझे बिंब मी मूळ रूपी मला राहू दे जीव पायी तुझ्या वाहू दे भाव काही नवा जागला सूर आतून हा लागला गीत अंती तुला गाऊ दे जीव पायी तुझ्या वाहू दे
|
Iravati
| |
| Sunday, July 22, 2007 - 10:25 am: |
| 
|
तसे तर शब्द जिवाभावाचे सखेसोबती श्वासोच्छ्वासाइतके मला निकटचे क्षणोक्षणी शब्दांच्या आधारानेच सोसत आले आजवर प्रत्येक आनंद, आघात, आयुष्यातली अधिक उणी अजूनही जेव्हा मन भरुन येते अनिवार करावे वाटते स्वत:ला शब्दांपाशी मोकळे वाटते, त्यांनाच जावे सर्वस्वाने शरण तेच जाणून घेतील आतले उत्कट उमाळे तरीही शब्द हाताळताना असते सदैव साशंक त्यांच्या सुक्ष्म नसा, भोवती धगधगणारा जाळ, काळीज चिरीत जाणा-या त्यांच्या धारदार कडा ज्या अवचित करतात विद्ध, रक्तबंबाळ मी तर कधीचीच शब्दांची. ते कधी होतील माझे? त्यांच्याशिवाय कुठे उतरू हृदयावरचे अदृश्य ओझे?
|
Iravati
| |
| Sunday, July 22, 2007 - 10:26 am: |
| 
|
न पटणारी अनेक सत्ये स्वत:ला समजूतीने पटवून मनाचे किती बहर तिने घेतले आहेत आपल्यात मिटवून आता निर्विकार डोळ्यांनी ती निरखू शकते आसमन्त अनेक मनोभंग पेलतानाही नसतो खेद, नसते खंत हवेमधून सरकतात ऋतू उडतात पाखरे आभाळातून हिरव्या निळ्या सावल्यांमध्ये रंगीबेरंगी होते ऊन पडतात किती प्रतिबिंब ढवळत राहते आतले पाणी समजुतदार उसासा टाकून ती गुणगुणू लागते गाणी!
|
Iravati
| |
| Sunday, July 22, 2007 - 10:26 am: |
| 
|
शेवटची ओळ लिहीली आणि तो दूर झाला आपल्या कवितेपासून बराचसा थकलेला पण सुटकेचे समाधानही अनुभवणारा प्रसूतीनंतरच्या ओल्या बाळंतीणीसारखा जरा प्रसन्न, जरा शांत नाही खंत, नाही भ्रांत.... आणि ती कविता नवजात एकाकी, असहाय, पोरकी आधाराचे बोट सुटलेल्या अजाण पोरासारखी भांबावलेली, भयभीत, अनुभवणारी एका उत्कट नात्याची परिणती विपरीत ती आहे आता पडलेली कागदाच्या उजाड माळावर आपल्या अस्तिवाचा अर्थ शोधत तो मैलोगणती दूर, वेगळ्या विश्वात संपूर्ण, संतुष्ट, आत्मरत!
|
Iravati
| |
| Sunday, July 22, 2007 - 10:28 am: |
| 
|
मेघ मेघ दाटले कोठून नकळे मनभर आल्या धारा उत्कट ओल्या आठवणींचा झरे अनावर पारा खोल हृदयातळि साठून होते काहीसे सुकलेले खळखळणा-या ओघातुन ते खिदळत खेळत आले क्षितिजावरच्या निळ्या टेकड्या बालमैत्रीणी झाल्या हात धुक्याचे पुढे पसरूनी मिठीत मिटाया आल्या अवतीभवती भरून राहीला जुना अनामीक वास चमचमणा-या तिमिरालाही फुटले अद्भूत भास दहा दिशांतून वोळून आले गतजन्माचे पाणी लहरींवरती उमटत गेली अशब्द सुंदर गाणी दिन जे गेले, त्यांचे झाले गहनगूढ आभाळ बगळे होऊन झुलू लागली शुभ्र क्षणांची माळ
|
Iravati
| |
| Sunday, July 22, 2007 - 10:29 am: |
| 
|
मैत्रीचे मी कोनेकोपरे धुंडाळून पाहिले घट्ट नाती पुन्हा पुन्हा चाचपतच राहिले मनात मने गुंफताना भरून आला जीव वाटले आता दुराव्याची ओलांडली मी शीव प्रत्येक भेटीत पण पुन्हा नवा परिचय पुन्हा पुन्हा संदिग्धता आणि नवे भय गहनगूढ अंधारवाटा पाताळविहिरी खोल क्वचित कुठे तळाशी चुळकाभर ओल स्पर्शातून जाणवणारे काही स्पर्शातीत सूर तेच तरी सुद्धा उमगत नाही गीत रेशीमगाठी काचणा-या, चरत जाणारे व्रण निकराच्या अंतीम क्षणी निमूट होणारे मन
|