|
Shrini
| |
| Friday, November 10, 2006 - 7:41 am: |
| 
|
bahutek haa lekh fakta chhaapil aavruti madhye aahe... jamale tar mi ithe taakin to.
|
Manya2804
| |
| Friday, November 10, 2006 - 10:06 am: |
| 
|
श्रिनी, मी आत्ताच 'समर्थाचिया सेवका' ह्या पुस्तकाची नवी आवृत्ती वाचली. त्यात आप्पा ड्रॅकुलांच्या तावडीत सापडतो आणि समर्थ त्याची सुटका करतात अशी गोष्ट आहे. चांगली १६० पानांची कादंबरीच आहे ती, तू म्हणतोस तशी दिर्घ कथा नाही....
|
Manya2804
| |
| Friday, November 10, 2006 - 10:21 am: |
| 
|
आणखी एका पुस्तकात ('रत्नपंचक' असं काहीसं नाव आहे) धारपांच्या पाच गाजलेल्या दिर्घकथा आहेत १. तळघरातील पिंजर्यातलं ते (जयदेव कथा) २. सूड (भगत कथा) ३. ??? (पंत कथा. कथेचं नाव आठवत नाही. पण एक मुलगी आपल्या प्रियकरवर सूड घ्यायला पंतांकडाचं एक पुस्तक चोरुन कबड नावाचं भूत जागवते... अशी काहिशी गोष्ट आहे.) ४. यो अस्मान द्वेष्टी (समर्थ कथा) ५. ही गोष्टच मला आठवत नाही आहे. काही खास नाही आहे... यातली 'यो अस्मान द्वेष्टी' तर एकदम बेष्ट...
|
Shrini
| |
| Friday, November 10, 2006 - 12:58 pm: |
| 
|
Manya, 'samarthachiya sevaka' yaa naavaachyaa 2 goshti Dharapaani lihilyaa aahet. pahili aahe ti 'anolakhi disha' yaa katha sangrahaat aahe, 'chandramani' yaa khalanaayakaachi... aani dusari aahe ti tu mhanatos ti kadambari.
|
Asami
| |
| Friday, November 10, 2006 - 5:13 pm: |
| 
|
समर्थांच्या चाहत्यांनी त्यांच्या पुस्तकांची एक library बनवली पाहिजे. बरीचशी पुस्तके out of print आहेत किंवा library च्या रद्दीच्या गठठ्यामधे दिसतात. shrini what say ??
|
यो अस्मान द्वेष्टी वाचल्याचे मला नक्की आठवते, पण कथा काय होती ते जाम नाही आठवत. श्रिनी, मन्या, काय होते त्या कथेत ?
|
Shrini
| |
| Monday, November 13, 2006 - 4:55 am: |
| 
|
Asami, I agree... Punyaat aalaas ki yaavar ekadaa savistar charcha karu! 
|
Shrini
| |
| Monday, November 13, 2006 - 4:58 am: |
| 
|
CC, 'yo asman devshti' chi ruparekha ashi aahe... 'Anantrav' naavache ek gruhastha ekaa company madhe G.M. asataat, tyaanchyaavr 'Sherabha' haa ek shaktishali mantrik kaahi kaaranaane tyaachyaa aghori shakticha prayog karato, aani mag hi 'case' Samarthaan kade yete... pudhe lihit naahi.. jyaani hi goshta vaachaleli naahi tyaanchaa rasabhang vhyaayalaa nako.
|
Bkashish
| |
| Tuesday, November 14, 2006 - 12:49 pm: |
| 
|
इथे आहे तो लेख- आशिष http://www.loksatta.com/daily/20061110/opd01.htm
|
नारायण धारपांच्या चाहत्याना एक खुशखबर धारपांची कित्येक जुनी पुस्तकं दिलीप प्रकशनातर्फे पुन्हा प्रकाशित होत आहेत. कालच मला मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात 'अनोळखी दिशा' हे पुस्तक सापडलं (२००७ ची आवृत्ती). त्यात दार उघड ना आई, पाठमोरा, शंकरची मावशी, सदूचे दोस्त, बशीभर दूध, हिरवे फाटक, चल रानात जाऊ साजणा, खिडकी, उंबरठा इत्यादी गोष्टी आहेत. 'बशीभर दूध' ही गोष्ट तर 'सर्वोत्कृष्ट मराठी गुढकथा' (संपादक राम कोलारकर) मधे पण आली आहे.
|
Mi_anu
| |
| Thursday, May 31, 2007 - 5:53 am: |
| 
|
धारपांची एक कादंबरी, ज्यात बाहुल्या माणसांना झपाटतात आणि बिहारीलाल बाहुलीवाला नावाचे एक पात्र असते, या कादंबरीचे नाव कोणाला माहित आहे का? आणि विमानात जळलेले मृतदेह त्या जागी आलेल्या सर्वांना मारत असतात ती कादंबरी कोणती?
|
Shrini
| |
| Wednesday, June 13, 2007 - 5:29 am: |
| 
|
बिहारीलाल बाहुलीवाला ? ही धारपांची गोष्ट मी वाचलेली नाही... आता शोधली पाहीजे. त्या दुसर्या विमान अपघाताच्या कादंबरीचे नाव 'सैतान' आहे. कथेचे नायक : 'भगत'.
|
कालच धारपांच '४४० चंदनवाडी' वाचून संपवलं. काही खास वाटलं नाही.
|
Mi_anu
| |
| Monday, July 30, 2007 - 3:47 am: |
| 
|
धारपांचं 'अनोळखी दिशा' इथले परीक्षण वाचून वाचलं. चांगलं आहे. 'अंधारातली उर्वशी' वाचलं. ठीक आहे. आता परवा 'स्वाहा' नावाचं पुस्तक वाचलं. मुखपृष्ठ भयंकर. आणि एकंदर कथा पण वेगात जाते. कधीकधी 'भूत' ची आणि 'इव्हिल डेड' ची आठवण येते. साम्य नाही, पण घाबरवण्याच्या पातळीमुळे.
|
Mi_anu
| |
| Thursday, September 06, 2007 - 9:48 am: |
| 
|
मला 'चल रानात सजणा!' कथा आवडली. बहुधा अनोळखी दिशा मध्येच आहे.
|
Bsk
| |
| Saturday, October 06, 2007 - 7:10 am: |
| 
|
'नेनचिम' कुणी वाचलीय का? फारच वेगळी आहे.. अजून वाचत आहे, त्यामुळे पुस्तक कसं वाटलं ते नंतर लिहीन.. पण कदाचित परत वाचवे लागेल.. विश्वाची उत्पत्ती वगैरे गोष्टी पटकन शिरत नाहीयेत..(नारायण धारपांना किती माहीती होती? ते नक्की काय शिकले होते? बरीच वेग-वेगळ्या विषयांवरची पुस्तकं आहेत त्यांची!)
|
Mi_anu
| |
| Friday, December 07, 2007 - 8:01 am: |
| 
|
धारपांची संक्रमण नावाची कादंबरी वाचली. चांगली आहे. पण ते 'मनातला तिरस्कार एकवटून फेकला' वगैरे जरा जास्त झालंय असं वाटून गेलं. शिवाय मुखपृष्ठ पाहून ज्या अपेक्षा निर्माण होतात त्या वाचल्यावर पूर्ण होत नाहीत असेही वाटले.
|
Shrini
| |
| Friday, December 07, 2007 - 9:52 am: |
| 
|
त्यांचे 'चंद्रदास आणि इतर विलक्षण माणसे' पण चांगले आहे. त्यातल्या विषम क्रमांकांच्या कथा मस्त! धारपांनी अलिकडेच 'महावीर आर्य' नावाची व्यक्तिरेखा निर्माण केली आहे. त्याच्या कथा पण सहीच. काही नव्याने प्रकाशित झालेली त्यांची इतर पुस्तके म्हणजे अनोळखी दिशा १ व २, रत्नपंचक, ग्रहण... सगळ्या मुख्यतः जुन्याच गोष्टी आहेत. 'चेटकीण' पण एक मस्त पुस्तक आहे. ५ तारे!
|
Shrini
| |
| Friday, December 07, 2007 - 10:04 am: |
| 
|
नेनचिम मला आवडलेल्या पुस्तकांपैकी एक आहे. धारपांनी पुषक्ळ आणि उत्तम विज्ञानकथा लिहिल्या आहेत... बहुमनी, पारंब्यांचे जग, फायकसची अखेर, कंताचा मनोरा, आणि झाडे बोलू लागली, जिद्द, मृत्यूच्या सीमेवर, चक्रावळ, चक्रधर, अवकाशात तरंगणारा डोळा, ऐसी रत्ने मेळवीन, दुहेरी धार, ही काही ठळक आठवणारी नावे...
|
Manya2804
| |
| Thursday, December 27, 2007 - 11:28 am: |
| 
|
कालच धारपांच 'कुलवृत्त्तांत' वाचलं. टिपीकल धारप कथा. एका साध्या सरळमार्गी माणसाच्या आयुष्यात घडलेले काही विलक्षण प्रसंग आणि त्यातून जागृत झालेले विषेश सामर्थ्य असाच काहिसा प्रकार आहे. एकदा वाचण्ययोग्य पुस्तक आहे. श्रीनी, मला इथे मुंबईत कुठेच 'समर्थांचे प्रयाण' आणि 'समर्थांचे पुनरागमन' ही पुस्तके मिळत नाही आहेत. काही मदत करू शकशील का?
|
|
|