Hkumar
| |
| Saturday, February 02, 2008 - 10:03 am: |
| 
|
'हाती ज्यांच्या शून्य होते' हे अरुण शेवते संपादित पुस्तक वाचत आहे. अब्दुल कलाम, शेक्सपीअर, सुशीलकुमार शिंदे, निळू फुले, ग्रेटा गार्बो, काही हिंदी गीत व संगीतकार अशांवर परिचयपर लेख आहेत. यांनी खरोखर शून्यातून विश्व उभे केले.
|
Dakshina
| |
| Monday, February 04, 2008 - 6:26 am: |
| 
|
मागच्या आठवड्यात तेहमिना दुर्रानी यांचं 'ब्लास्फ़ेमी' वाचलं धर्माच्या नावाखाली चालणारे गैरप्रकार उघडकीस आणण्याचा प्रयत्न करणार्या, खुद्द एका धर्मगुरुच्या पत्नीची ही कथा. संपुर्णं कादंबरीत रांझा भेट (ती ही फ़क्त चिट्ठीच्या स्वरूपात) सोडली तर काहीही सुखावह नाही. प्रत्येक पानावर मनाला चटका लावणारी एकतरी घटना; ती ही रक्तरंजित. प्रत्येकवेळी वाचताना मी स्वतला त्या ठिकाणी ठेवून पाहीलं पण मला ते जमलं नाही. आपण कल्पनाही करू शकणार नाही अशा प्रकारचा त्रास नायिका भोगते. त्यातूनही, आपल्या अन्यायाला वाचा फ़ोडता यावी म्हणून केलेले प्रयत्न, त्यांना आलेलं अपयश पचवूनही जिवंत रहाण्याची खंबिरता... पुस्तक अतिशय डिस्टर्बिंग आहे पण धर्माच्या नावाखाली समाजात काय काय प्रकार चालतात हे जाणून घ्यायचं असेल तर जरूर वाचा.
|
Mbhure
| |
| Wednesday, February 27, 2008 - 6:27 pm: |
| 
|
दोन महिन्यापुर्वी Ishamel Beah यांचे A Long Way Gone: Memoirs of Boy Soldier हे पुस्तक वाचले. एकदा नक्की वाचण्यासारखे आहे. बाराव्या वर्षी लेखक स्वतः Sieraa Leon च्या यादवीमध्ये ओढला गेला; त्याबद्दलचे त्याचे अनुभव आहेत. पुस्तकाचा बराचसा भाग हा त्या rebels पासुन लेखक स्वतःला कसा दूर ठेऊ पाहात होता त्याब्द्दल आहे. वयाचा विचार करता ते वाचतना भयंकर वाटते. तरी लेखकाने त्याच्या सैनिकी आयुष्याबद्दल जास्त Details दिले असते तर पुस्तक आणखी छान वाटले असते. पुस्तक अगदी साध्या सरळ भाषेत असले तरी ते interesting झाले आहे. लेखक आता Unicef तर्फे Child Soldiers बद्दल काम करतो.
|
Dakshina
| |
| Friday, February 29, 2008 - 9:36 am: |
| 
|
सध्या, मी शोभा डे चं 'सिलेक्टिव्ह मेमरी' वाचतेय. पुस्तकाचं नाव चुकूनच 'सिलेक्टिव्ह मेमरी' ठेवलंय, अन्यथा 'पर्दाफ़ाश' असं नाव जास्त सार्थ ठरलं असतं.
|
नंदिनी selective memory हे मुद्दाम ठेवलेले नाव आहे कारण जे हवे तेच आठवणीत ठेवायचे सोयिस्कर पणे आठ्वायचे वा विस्मृतीत न्यायचे अशा स्मृतीस selective memory म्हणतात. टिपिकल शोभा डे चे बिन्दास पुस्तक आहे-
|
अहो रविभाई, दक्षिणाची नंदिनी कुठे करुन टाकलीत?
|
oops!!! oops sorry वयोमानपरत्वे------
|
Dakshina
| |
| Monday, March 03, 2008 - 11:12 am: |
| 
|
पुस्तकाच्या नावाचा आशयार्थ तर माहीती आहे. पण तिने मोजून मापून सर्वांच्या कटीवस्त्राला हात घातलाय.... अगदी कोणालाही सोडलं नाहीए. संजीव कुमार पासून, किरण बेदी, ऐश्वर्या काजोल पर्यंत... म्हणून म्हणलं की हे पुस्तक म्हणजे (सर्वांचा(चित्रपटसृष्टीतल्या)) पर्दाफ़ाश आहे. ज्यांची हवीत त्यांची नावं मात्रं गाळलेली आहेत, सोयीस्करपणे. आणि बाकीच्यांवर सूड उगवल्या सारखं नखशिखान्त ओरखडे उठवलेत. पुस्तक बरंय तसं. शोभा डे च्या मॉडेलिंगच्या दिवसांपर्यंत वाचायला इंटरेस्ट वाटतो. पण पुढे इतरांच्या पुढे पुढे करण्याच्या सवयी लिहीता लिहीता ते स्वतः स्वतःची शेखी किती मिरवतेय हे तिच्या लक्षात आलेलं दिसत नाही. पुस्तकाची सुरवात ठिक आहे, पण एन्ड अजूनही निट करता आला असता...
|
Who moved my cheeze पुस्तक कस आहे
|
Subhash_1
| |
| Thursday, March 27, 2008 - 7:20 am: |
| 
|
hi ghya pustakachi llink www.thinkfreedocs.com/tools/download.php?mode=down&dsn=843998 PPT form madhye hi link http://www.scribd.com/doc/24826/who-moved-my-cheese
|
आभारि आहे सुभास PDF chi link dilayabaddal
|
Ladtushar
| |
| Thursday, April 10, 2008 - 5:42 am: |
| 
|
खुप छान पुस्तक आहे आभारी आहे पी. डी. एफ. बद्दल.
|
Bee
| |
| Thursday, April 10, 2008 - 4:29 pm: |
| 
|
कुणी चीपर बाय डझन वाचलय का? मी त्याचे परिक्षण वाचले आहे. Time Management वरती खरचं इतकं उत्तम पुस्तक आहे का हे?
|
Itsme
| |
| Friday, April 11, 2008 - 5:16 am: |
| 
|
खरच उत्तम पुस्तक आहे ते ... वाच एकदा तरी
|
Dakshina
| |
| Friday, April 11, 2008 - 8:28 am: |
| 
|
चिपर बाय दि डझन पूस्तक मस्त आहे. टाईम मॅनेजमेंट वर असं नाही, तर त्या पूस्तकातून बरंच काही शिकता येइल असं आहे. उदा. उत्तम पालकत्व, जबाबदारी, multitasking, यूनिटी, आस्था. जमल्यास चिपर बाय दि डझन च्या सीडीज पण मिळतात त्या पहा... जास्ती मजा येईल.
|
चिपर बाय दि डझन हा तर इंग्रजी सिनेमा आहे ना ? त्याचा काही संबध आहे का या पुस्तकाशी ? 
|
सिनेमाचा पुस्तकाशी काही संबंध नाही. चीपर बाय दी डझनचा मंगला गोडबोलेंनी मस्त अनुवाद केलाय मराठीत. पण मूळ ईंग्रजीत वाचायला पण मजा येते. त्यातली चित्र पण खूप छान आहेत!
|
Anjali28
| |
| Friday, April 11, 2008 - 2:55 pm: |
| 
|
मृ, मंगला निगुडकरांनी अनुवाद केला आहे "चीपर बाय डझन"चा, मंगला गोडबोलेंनी नाही..
|
थ्रेबलिग वाल्या गिलब्रेथच्या मुलीने लिहिलेले पुस्तक ना चीपर बाय द डझन?
|
अंजली, चुकलंच माझं. थँक्यु थँक्यु!
|