Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 12, 2008

Hitguj » Language and Literature » भाषा » शब्दार्थ » Archive through March 12, 2008 « Previous Next »

Aashi
Wednesday, February 27, 2008 - 5:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

का? उलट असण्याची शक्यता पण आहेच की!

Maitreyee
Wednesday, February 27, 2008 - 6:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Wait begger= वेठ बिगार..? मला तरी हे काय पटले नाही, वेठीला धरणे असा वाक्प्रचार जुनाच आहे की. बिगर हा शब्द सुद्ध आहे, "विना" या अर्थाने. बिगर मोबदला राबण्यासाठी वेठीला धरणे अशा अर्थाने वेठ बिगर असे मला वाटत होते.

Bee
Thursday, February 28, 2008 - 3:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मैत्रेयी, वेठीला धरणे बहुतेक wait there or wait dear ह्यावरून आलेले असावे :-)

Maanus
Friday, February 29, 2008 - 3:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज कळालेले दोन नविन शब्द

contenders: The contestant you hope to defeat.
alleged: Declared but not proved.

आज आमच्या ईथे bad shirt day contest आहे, तर दुसर्‍या office मधल्या एकाने message पाठवला. can we see pictures of the contenders?


Tanyabedekar
Friday, February 29, 2008 - 4:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साखरफुटाणे हे साखरेचे कातेदार छोटे छोटे दाणे असतात आणि ते साधारण फुटाण्याच्या आकाराचे (म्हणजे काटे सोडून द्या हं) म्हणुन त्याला साखरफुटाणे म्हणत असावेत.

सांगली-मिरजेकडे सुद्धा गुढिपाडव्याच्या साखरेच्या माळेला गाठींची माळ म्हणतात (म्हणजे असे मला स्मरते आहे).. त्या साखरेच्या तुकड्याला साखरेची गाठ असेही म्हणतात..


Zakasrao
Friday, February 29, 2008 - 4:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हणजे असे मला स्मरते आहे>>>>>
टण्या तुला गाव सोडून किती वर्षे झालीत रे??? :-)
अरे अजुअन्ही कोल्हापुरात देखिल गाठींची माळच म्हणतात.
आणि तुकड्याला साखरेची गाठ. :-)
साखर फ़ुटाणे म्हणुन तु जे सांगितल आहेस ते वाचुन संक्रंतीला वाटप होते ते कमर्शियल तिळगुळ म्हणजेच ते का असा मला प्रश्न पडलाय.
मी साखरफ़ुटाणे हा शब्द पहिल्यांदाच ऐकलाय. कोणी फ़ोटो टाकेल का?
BTW
ते वेठविगार पटल नाही.


Bee
Friday, February 29, 2008 - 4:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कशाच्या तुकड्याला साखरेची गाठ म्हणतात झकासराव? आमच्याकडे फ़क्त माळ मिळते. तुकडा वगैरे नाही मिळत.

तन्मय, तो तर काटेरी हलवा झाला. देवळात जो प्रसाद वाटतात त्याला मी साखरफ़ुटाने म्हणत आहे.

बालपणी ही एक प्रथाच होती सर्व लहान मुलांच्या गळ्यात ही साखरमाळ घालून ही मुले त्यातली एक एक गाठ संपवून टाकत. शेवटी फ़क्त धागा रहायचा. दिवसभर अंगाला मग मुंग्या चावत. माझ्या गळ्यात नाभी पर्यंत लोंबणारी माळ असायची आणि मला अजूनही गाठी खायला आवडते.


Shankasoor
Friday, February 29, 2008 - 5:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साखर फुटाणे आणि commercial तिळ्गुळ ह्यात थोडासा फरक आहे.
commercial तिळ्गुळ म्हणजेच हलवा..
साखर फुटाणे हे हलव्यापेक्षा थोडे आकाराने मोठे असतात.
हलव्याच्या मध्यभागी एक तिळाचा दाणा असतो , साखरफुटाण्याच्या मध्यभागी तो नसतो.

चू. भू. द्या. घ्या.


Zakasrao
Friday, February 29, 2008 - 5:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी अरे ती माळ तुकड्यांचीच असते ना?? :-)
त्या तुकड्याला म्हणतात गाठ.
शंकासुर ह्यानी जे लिहिलय ते वाचुन अजुन गोंधळ.
आता मात्र नक्कीच मी साखरफ़ुटाणे खाल्ली नाहीत हे मला कळाल.


Bsk
Saturday, March 01, 2008 - 6:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मते शंकासुरांनी लिहीलेले बरोबर आहे. हलव्यापेक्ष दिसायला मोठे..

Psg
Saturday, March 01, 2008 - 6:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय सांगतोस झक्स? अजून साखरफुटाणे खाल्ले नाहीस? कोणत्याही देवळात गेलात की प्रसाद म्हणून जे हातावर टेकवतात ते 'साखरफुटाणे'. फक्त साखरेचे असतात ते.

संक्रांतीच्या वेळी देतो हो 'हलवा'. त्यात मधे तीळ असतो एक, जो सा.फु. मधे नसतो.

आता पाडव्याला मिळतील 'गाठी'. सगळीकडे त्याला साखरेच्या गाठीच म्हणतात बरंका :-) या गाठींचे individual साचे असतात. आता ८ गाठी आणि एक पदक अशी 'माळ' करायची असेल तर ते साचे माळेच्या आकारात मांडतात. त्या सर्व साच्यातून जाईल असा एक धागा मधे घालतात आणि प्रत्येक साच्यात त्या धाग्यावर साखरेचा पाक ओततात. पाक गोठला की गाठी तयार! :-) त्या साच्यामुळे गाठींना एक टीपीकल गोल आकार येतो. मधे असतं ते 'पदक'. त्याला दोन्ही बाजूला 'शिंगा'सारखा आकार असतो :-) आता आठवलं का सगळ्यांना? :-)

लहान मुलांचे अत्यंत आवडते खाद्य पदार्थ आहेत हे तीन्ही. माझा मुलगा देवळात केवळ मोठी घंटा वाजवायला मिळते आणि हातावर साखरफुटाणे मिळतात म्हणून येतो :-)


Bee
Tuesday, March 04, 2008 - 7:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुतारफ़ेणी ह्या जिन्नसाच्या नावाबद्दल काही माहिती मिळेल का?

Zakki
Tuesday, March 04, 2008 - 12:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या गाठी दुसर्‍याच्या मुलांना द्याव्यात.

मग त्यांचे अख्ख घर चिकट्ट करून सोडतील. कपडे, कपाटे, गाद्या, टी व्ही जिथे जिथे हत पोचेल ते चिकट्ट! मग करू देत त्यांना साफ.




Hkumar
Friday, March 07, 2008 - 2:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'शहाजणे' चा अर्थ?
(.... आणि आता आपल्या देशात टीव्ही येणार, म्हणून श. वाजू लागली आहेत. -व्यं. माडगूळकरांच्या १९७१ मधील लेखनातून)


Tanyabedekar
Friday, March 07, 2008 - 3:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकास अरे साखरफुटाणे नाही खाल्लेस होय कधी.. कायच्या काही.. आपल्याकडे तर प्रत्येक देवळात मिळतात की.. कोल्हपूर सोडून किती वर्ष झाली तुला :-)

बर, तुझ्या प्रश्णाचे उत्तर.. गाव म्हणजे मिरज सोडून उणी-पुरी ५-६ वर्षे झाली.. पण तो गाठ शब्द नक्की वापरत होतो का नाही ते आठवत नव्हते.. मग रात्री बाबांना फोन करुन नक्की केलं...

सुतारफेणी ह्या जिन्नसाच्या नावाबद्दल माहिती नाही.. पण जिन्नस माहिती आहे.. फार चविष्ट :-) हैद्राबादमध्ये मस्त मिळते सुतारफेणी.. हिचे मुळ नाव सत्तार फेणी वगैरे असावे कदाचित.. का कोण जाणे मला हा जिन्नस मुळचा मुसलमानी वाटतो.. असे ऐकिवात आहे के जिलबी देखील मुसलमानांकडून आपल्याकडे आली..


Zakasrao
Saturday, March 08, 2008 - 4:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे हो की.
मी पाहिलच नाही इकडे परत.
देवळात मिळतात ते होय.
मग ठिक आहे मी खाल्ले आहेत.
मला ते आणि संक्रांतीला वाटतो ते दोन्ही एकच वाटत होते. :-)
टण्या अरे मी पुण्यातच आहे रे. :-)
त्यामुळे अजुनही साखरफ़ुटाणे खायला मिळतात :-)


Hkumar
Tuesday, March 11, 2008 - 8:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपण स्नेहसंमेलनात 'फ़िश पाॅन्ड्स' म्हणतो त्याचा नक्की अर्थ काय? fish pond चा dictionary तील अर्थ a pond containing fish एवढा सरळ आहे.

Bee
Wednesday, March 12, 2008 - 4:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कपबशी ला विदर्भात शिंगलबशी असेही म्हणतात. ह्यातील शिंगल शब्द कपासाठी वापरलेला मला फ़ार आवडला. बहुतेक तो सिंगल असावा. इतर भागात आहे का हा शब्द.. शिंगल?

Bee
Wednesday, March 12, 2008 - 4:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुमार, fish pond हा मी तरी फ़क्त महाराष्ट्रातच पाहिला आहे. इतर भारतीयांना ह्याबद्दल विचारल तर माहिती नसतं.

तुला fish pond ला मराठी शब्द हवा आहे की त्याचा अर्थ हवा आहे?

अर्थ असा आहे की शाळा कॉलेजमधील जे काही नमुने असतात त्यांन्च्यावर केलेली विनोदी वाक्यरचना. जसे आमच्या वर्गात एक मुलगा भरपूर तेल लावून यायचा. मग आम्ही त्याला fish pond दिला do u apply oil on head, or deep ur head inside oil?


Hkumar
Wednesday, March 12, 2008 - 5:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, fish p चा शब्दकोशातील अर्थ व अपल्याला अभिप्रेत अर्थ याचा नकी संबंध मला हवा आहे.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators