Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
The Bread Winner ...

Hitguj » Language and Literature » इतर साहित्य » मी वाचलेले पुस्तक » अनुवादित » The Bread Winner « Previous Next »

Dakshina
Wednesday, January 16, 2008 - 9:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'द ब्रेड विनर' च्या मूळ लेखिका - डेबोरा एलिस.
मराठी अनुवाद - अपर्णा वेलणकर.

अफ़गाणिस्तानात रहाणार्‍या एका कुटूंबातील ११ वर्षाच्या मुलीची ही संघर्षकथा.

अफ़गाणिस्तानावर काबूलच्या सैन्याने हल्ला केल्यानंतर तिथलं जनजीवन नुसतं विस्कळितच नाही तर उध्वस्त झालं. कुटूंबच्या कुटूंब बेघर झाली.

परवाना, तिची आई, एक मोठी बहीण नुरिया, एक लहान बहिण आणि एक तान्हा भाऊ असेच या सर्व हल्ल्यांपासून जीव वाचवत, एका छोट्या खोलीत कसेबसे दिवस ढकलत असतात. उदरनिर्वाहासाठी, रशियाच्या पहिल्या हल्ल्यात एक पाय गमावलेले परवानाचे वडील घरातील एकेक वस्तू विकायला दररोज बाजारात जात असतात. शिवाय लोकांची पत्र वाचून दाखवणे / लिहून देणे असं छोटं मोठं काम करत असतात. नुरिया वयाने मोठी असल्याने, वडीलांना परवाना सोबत करत असते. तिला ही वडिलांइतकेच लिहीता वाचता येत असते. वडीलांना आणि परवानाला स्वतःला या गोष्टीचा खूप अभिमान असतो.

एके दिवशी... परवानाच्या घरावर काबूलचे सैन्य हल्ला करते, आणि परवानाच्या वडीलांना पकडून घेऊन जाते. परवानाच्या कुटूंबावर आभाळ कोसळते. एकमेव आधार पण ते गमावून बसतात. वडीलांना सोडवण्यासाठी परवाना आणि तिची आई तुरूंगात जातत पण त्यांना अपयश येते. तिथले शिपाई आईला खूप मारहाण करतात. दरम्यान परवानाला एक दिवस बाजारात वीरामौसी भेटते.

अफ़गाणात एकट्या स्रियांना घराबाहेर पडण्याची मुभा नसल्याने, घर चालवण्याची जबाबदारी परवानावर येते.

वीरामौसी आणि परवानाची आई परवानाला तिच्या मृत्यू पावलेल्या छोट्या भावाचे हुसेनचे कपडे घालायला लावून दररोज वडीलांच्या जागी काम करण्याचे वदवून घेतात. नाखुषीने परवाना तयार होते, मुलाचे रुप घेताना कापावे लागलेले मुलायम केस पाहून तिला भरून येतं पण कुटूंबाच्या जबाबदारीपुढे ती हतबल होते. आणि तिचे काम सुरू होते. परवानाला पोटापुरते पैसे मिळू लागतात. तिथेच तिला एक अनामिक मैत्रिण भेटते, जी तिला रोज सुंदर सुंदर वस्तू भेट देत असते. ते ही नकळत. एके दिवशी बाजारात चहावाला एक पोर्‍या परवानाला आप्ल्या ओळखिचावाटतो.... अणि 'तो' हा 'तो' नसून 'ती' आहे हे कळल्यावर आश्चर्यचकित होते. कारण ती परवानाची वर्गमैत्रिण शौझिया.

इकडे विरामौसी आणि परवानाची आई, नुरियाच्या मदतीने, अफ़गाणिस्तानातील स्त्रियांसाठी गुप्त शाळा उघडण्याचे ठरवतात.

परवाना आणि शौझिया मिळून काम करत असतात, आणि एके दिवशी शौझिया तिला मानवी हाडं विकण्याच्या व्यवसायात खूप पैसे असल्याचं सांगते. मग घरी न सांगता, दोघी मानवी हाडं गोळा करून पैसे मिळवतात.... त्यातून त्यांना एकच छोटंसं स्वप्नं साकारायचं असतं. ते म्हणजे एक छोटा ट्रे... ज्यात विविध वस्तू त्यांना फ़िरून विकता येतील. परवाना आईपासून काही लपवू शकत नाही.
एकदा वस्तू विकता विकता फ़ूटबॉलच्या मैदानावर अलेल्या परवाना आणि शौझिया एक भिषण दृश्य पहातात. ते हणजे काबूलचे शिपाई एका कैद्याचे हात कापतात. परवाना ते पाहून हादरते. आणि थोडे दिवस काहीच काम करत नाही. इतक्या सगळ्या भिषण परिस्थितीची शिकार झालेली शौझिया एकदा परवानाला आपल्या उरात बाळगलेलं स्वप्नं सांगते.. की तिला फ़्रान्स ला जायचंय. ते ही पळून, बोटीतून, आणि तिथल्या जांभळ्या फ़ुलांच्या शेतातून फ़िरायचय. त्यासाठी आपल्या घरच्या लोकांची पर्वा आपण करत नसल्याचं ही ती परवानाला सांगते. मग परवाना आप्ल्या अनमिक मैत्रिणिचे गुपित तिला सांगते.

काबूलची एकूण परिस्थिती पहाता वीरामौसी आणि आई नुरियाच्या लग्नाचा विचार करतात. परवानाला आपल्या वडिलांच्या अपरोक्ष घेतला जाणारा हा निर्णय फ़ारसा रुचत नाही. पण तिचा नाईलाज होतो. ती मूक संमती देते. आणि वीरामौसी, तिची नात आणि परवाना सोडून सगळे मझार - ए - शरीफ़ ला नुरियाच्या लग्नासाठी रवाना होतात.

आणि त्याचवेळी परवाना हुमाला भेटते, हूमा ही मझार - ए - शरीफ़ हून पळालेली तरूणी.. कारण तिथे काबूलचा हल्ला होतो. ते ऐकून परवाना हादरते.

एके दिवशी परवानाच्या अब्बूना कोणितरी घरी आणून सोडतं. परवानाचे बदललेले जबाबदार रूप पाहून ते हेलावून जातात. अम्मी आणि नुरियाच्या शोधार्थ आपण जाणार असल्याचं परवाना आबूना आणि वीरामौसीला सांगते. शौझिया पण आपण लवकरंच फ़्रान्स ला पळून जाणार असल्याचं सांगते. परवाना आणि शौझिया दोघीही साश्रू नयनांनी एकमेकींचा निरोप घेतात आणि बरोब्बर २० वर्षांनी पुनर्भेटीचे वचन एकमेकींना देतात... आणि परवाना मझार - ए - शरीफ़ ला रवाना होते....



Kshitij_s
Thursday, February 28, 2008 - 3:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद दक्शिणा. खरच खूप सुन्दर आहे हे पुस्तक. याचा दुसरा भाग आहे का ग?

Akhi
Friday, February 29, 2008 - 4:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्या पुस्तकाचे ३ भाग आहे. परवाना आणी शौजिया

Kshitij_s
Monday, March 03, 2008 - 4:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद अखि.

thanks akhi. (4 words)



Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators