Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
सेकंड लेडी

Hitguj » Language and Literature » इतर साहित्य » मी वाचलेले पुस्तक » अनुवादित » सेकंड लेडी « Previous Next »

Dakshina
Monday, December 31, 2007 - 9:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूळ लेखक - आयर्विंग वॉलेस.
अनुवाद - रविंद्र गुर्जर

रशिया आणि अमेरिका यांच्यातल्या, संभाव्य लढाईची माहीती आतल्या गोटातून मिळावी यासाठी रशियन गुप्तहेर संघटनेने रचलेली ही कथा एकूणच खूप रहस्यमय आणि रोमांचकारी आहे. पूस्तक पहील्यांदा संथ वाटतं पण नंतर वेगाने पकड घेतं.

रशियातली कोण एक स्टेज शो करणारी नटी ही हुबेहूब अमेरीकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या पत्नी सारखी दिसते याचा फ़ायदा घेऊन, रशियन गुप्तहेर संघटना केजीबी ही राष्ट्राध्यक्षांच्या खर्‍या पत्नीची आणि या नटीची आदलाबदल करतात. त्यासाठी तिला खास प्रशिक्षण दिलं जातं, रशियामध्ये व्हाईट हाऊस ची एक प्रतिकृती केली जाते. रशियन नटीवर काही मामूली शस्त्रक्रिया केल्या जातात. आणि त्यांची ठरलेल्या वेळी आदलाबदली केली जाते.

खर्‍या पत्नीला जेव्हा आपलं अपहरण झाल्याचं कळतं तेव्हा ती, गुप्तहेर संघटनेला काही काळ साथ देत नाही, चुकीची माहीती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करते.

खर्‍या पत्नीला आत्मचरित्र (लिहायला मदत करणारा) लेखक ही आदलाबदल झाल्यावर पहील्यांदा साशंक होतो.
मग राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीच्या पर्सनल सेक्रेटरीची मदत घेण्याचं ठरवून तो बर्‍याच गोष्टींच्या मूळाशी पोहोचतो. इकडे खर्‍या पत्नीला विश्वास असतो की, यांचा हा डाव राष्ट्राध्यक्षांच्या बेडरूममध्ये नक्कीच संपुष्टात येइल, कारण, रशियन गुप्तहेर संघटनेने, तिची सर्व च्या सर्व माहीती खडानखडा टिपलेली असते, फ़क्त एक सोडून ती म्हणजे त्या दोघांचं वैवाहीक (शारिरीक) आयूष्य. गुप्तहेर संघटना त्यासाठी सुद्धा खेळ खेळते आणि ती माहीती तिच्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न करते पण ती तोंड उघडत नाही, मग गुप्तहेर संघटना वेगळा खेळ खेळते. रशियन नटीचा प्रशिक्षक, या खर्‍या पत्नीला आपण तिच्या प्रेमात पडल्याची खोटी कबूली देतो आणि तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित करतो, पण या डावाची तिला कल्पना असते, त्यामूळे ती नेहमीपेक्षा बरोब्बर विरूद्ध acting करते आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न करते. पण तिचा तो प्रयत्न असफ़ल ठरतो.

बर्‍याच घटना, घडामोडींनंतर कळतं की गुप्तहेर संघटना ही आता खर्‍या पत्नीला कधीच व्हाईट हाऊस
मधे पाठवणार नाहीत. दरम्यान खरी पत्नी आणि तो प्रशिक्षक खरोखरी एकमेकांच्या खूप जवळ येतात, आणि तो प्रशिक्षक आपल्या रशियन नटीवरच्या अनिभिषिक्त प्रेमापोटी खर्‍या पत्नीला सोडवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो.

दुसरीकडे आत्मचरित्रकार हा वेगवेगळ्या गोष्टींच्या मूळाशी पोचून हे शोधून काढतो की गुप्तहेर संघटना ही आपले काम झाले की, या बहुरूपी पत्नीला मारून टाकणार आहे. ही गोष्ट ते तोतया रा. आ. पत्नीला पोचवण्याची व्यवस्था करतात. ती पण आपल्या सुटकेची धडपड करू लागते. शेवटी दोघींचेही चाललेले सुटकेचे प्रयत्न सफ़ल होतात आणि दोघी ही सुखरूप विमानतळावर उतरणार तोच, केजीबी ही रशियन गुप्तहेर संघटना विमानतळावर बॉंबस्फ़ोट घडवून आणते. त्यात एक वाचते आणि एक मरते. ती खरी असते की खोटी हे फ़क्त तिला आणि तिलाच माहीती.




Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators