Maitreyee
| |
| Wednesday, December 26, 2007 - 6:13 pm: |
| 
|
Harlan Coben हे नाव पूर्वी ऐकलं नव्हतं. काही महिन्यांपूर्वी मैत्रिणीने दिलं म्हनून त्याचं एक पुस्तक No second chance वाचलं. Coben ला बरीच अवार्ड वगैरे मिळालीयत, बरीच Best selling thrillers त्याच्या नावावर जमा आहेत. तर No second chance आवडलं. सुरुवातीपासून शेवटापर्यन्त उत्सुकता ताणून धरणारं पुस्तक. आता latest, " Tell no one" वाचलं, तेही आवडलं. मी thriller novels खूप वाचते, सवयीमुळे बर्याच वेळा रहस्याचा अन्दाज अर्ध्यातच येतो या दोन्ही पुस्तकात शेवटापर्यन्त मी अन्दाज च करत राहिले, आणि ते सगळे चुकत गेले मज्जा आली वाचायला. कोबेन ची स्टाईल वेगळी वाटली, वेगवान घटनांबरोबर emotional rollercoaster rides खूप होत्या दोन्ही पुस्तकात.आणि जे काही रहस्य, कथा घडते ती सामान्य वाटणार्या माणसाच्या अयुष्यात. इथे काहीही international secret, larger than life sequences etc नाही! No second chance.. story of a doctor, living with wife and 6 mnths old daughter.. one fine day he is fatally shot at his own house, wakes up in the hospital after 14 days only to know that his wife is dead and the baby is missing.. A ransom note follows , asking for 2 million dollars.. if he contacts the authorities they will vanish along with his daughter .. there will be no second chance .. Tell no one.. कथेचा नायक वय ७ पासून जिच्या प्रेमात असतो त्या नविन नविन बायको ला एका संध्याकाळी लेक वर घेऊन गेलेला असताना त्यांच्यावर हल्ला होतो, बायको मरते. हा वाचतो, या घटनेला ८ वर्षे झालीत, तो खुनी एक सायको सिरियल किलर,तेव्हापासून तुरुंगात. अन एक दिवस अचानक. त्याच्या आठव्या anniversary ला या नायका ला एक ईमेल येते, junk email वाटावी अशी. पण सब्जेक्ट मधे लिहिलेले २ च शब्द लक्ष वेधून घेनारे, जे फ़क्त त्याला अन त्याच्या बायकोलाच माहित असणारे! हे कसं शक्य आहे? हे प्रश्न चिन्ह अन मग इथून पुढे वेगवान घटनाक्रम अजून पण बरीच पुस्तके आहेत या लेखकाची. www.harlancoben.com इथे जास्त माहिती मिळेल. मी अजून पर्यन्त ही दोन वाचली, आवडली म्हणून इथे intro देतेय.
|