|
Nalini
| |
| Monday, June 11, 2007 - 11:19 am: |
| 
|
एक आण्याचे तेल आणले, त्यात सासुबाईंचे न्हाणे झाले. मामाजींचे केस झाले. भावोजींची दाढी झाली. उरले तेल झाकून ठेवले. उडत्या गरुडाचा / घारीचा पाय लागला. तो ओघळ वेशीपर्यंत गेला, त्यात उंट पोहून गेला. असे काहीसे होते. चु. भु. द्या. घ्या.
|
Dineshvs
| |
| Monday, June 11, 2007 - 12:20 pm: |
| 
|
नलिनी, मी लांडोरीचा पाय लागला, असे वाचले होते.
|
श्लेष आठवतोय का कोणाला ? अर्थश्लेष आणि शब्दश्लेष ?
|
Zakasrao
| |
| Tuesday, June 12, 2007 - 4:37 am: |
| 
|
मी हि लांडोरीचा पाय लागला अस वाचल होत. असो नलिनी ठंकु. अजुन काहि उदाहरणे असतील तर येवुदेत. छत्रपती श्लेष अलंकार का. देवाला पुजले सुमनाने ह्यात सुमन ह्या शब्दावर श्लेष आहे. सुमन्= मुलीच नाव सुमन्= फ़ुल
|
Imtushar
| |
| Tuesday, June 12, 2007 - 8:25 am: |
| 
|
देवाला पुजले सुमनाने मध्ये सुमन जर मुली चे नाव असेल तर सुमनाने व्याकरणदृष्ट्या चुकीचे ठरते. सुमनाने चा दुसरा अर्थ इथे 'चांगल्या मनाने' असा होऊ शकतो. Anyways , श्लेष दोन प्रकारे होऊ शकतो, एक : शब्दांच्या मांडणीत फरक केला असता दोन वेगळे अर्थ निघतात (तो बहुधा शब्दश्लेष, उदा. 'औषध नलगे मजला'). आणि दुसरा जेव्हा एकाच शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ निघतात आणि त्यामुळे वाक्याचे दोन वेगळे अर्थ लागतात (हा बहुधा अर्थश्लेष). यालाच English मध्ये pun म्हणतात
|
श्रीकृष्ण नवरा मी नवरी शिशुपाल नवरा मी न वरी
|
मृण्मयी, जेव्हा एकाच वाक्याचे दोन अर्थ होतात, तेव्हा श्लेष होतो, की दोन वेगळ्या वाक्याच्या शेवटी अथवा मध्ये येणाऱ्या अक्षरांचा वेगवेगळा अर्थ लागल्यामुळेसुध्दा श्लेष होतो ? माझ्यामते वरचे ’नवरा मी नवरी’ आणि ’नवरा मी न वरी’ हे ’यमक’ या अलंकाराचे उदाहरण आहे ! (चूभूद्याघ्या) वरील दोन वाक्यांपैकी एखादे वाक्य नुसते एकदाच लिहिले, तर श्लेष होईल. किंवा श्लेष अलंकाराची ही दोन उदाहरणे आहेत असेही म्हणता येईल !!
|
Mvelanka
| |
| Thursday, August 16, 2007 - 2:44 pm: |
| 
|
टिचक्या मारत सोडवायचे मराठी शब्दकोडे टिचकीसरशी शब्दकोडे १ तेथल्या तेथे सोडवता आणि तपासता येते. आवड असेल तर वाढेल - नसेल तर जडेल!
|
Bee
| |
| Friday, August 17, 2007 - 2:14 am: |
| 
|
महेश, मी प्रयत्न करतो सोडवून बघण्याचा. माझी ती खूप जुनी आवड आहे. इथे मिळत नाहीत मराठी शब्दकोडे पेपरात. बाकी ही कोड्यांची कल्पना खूप आवडली.
|
Milindaa
| |
| Friday, August 17, 2007 - 2:53 pm: |
| 
|
मजा आली सोडवायला. धन्यवाद महेश!
|
महेश, खरेच खूप मजा आली सोडवायला. आणि ही ऑनलाईन शब्दकोड्याची कल्पना प्रत्यक्षात बघून खूप आनंद झाला. क्लूज् पण एकदम हटके वाटले नेहमीपेक्षा. धन्यवाद. तुमच्या या शब्दकोड्याला दाद द्यावी तेवढी थोडीच आहे!
|
Mvelanka
| |
| Wednesday, August 22, 2007 - 1:31 pm: |
| 
|
बी, गजानन देसाई, मिलिंदा आणि इतर अनेकांचे सहभागाबद्दल आभार. आता ह्या शब्दकोड्याची उत्तरे तेथेच पाहता येतील. कळावे.
|
Bee
| |
| Thursday, August 23, 2007 - 7:24 am: |
| 
|
इतकूसे कोडे पण महाकठिण होते बुवा मजा आली महेश.
|
Madhavm
| |
| Tuesday, August 28, 2007 - 9:52 am: |
| 
|
रामाच्या दू कानात ऊ तम चिवडा मिळतो
|
Deemdu
| |
| Tuesday, August 28, 2007 - 10:36 am: |
| 
|
रामाच्या दूकानात ऊतम चिवडा मिळतो
|
Upas
| |
| Tuesday, August 28, 2007 - 2:12 pm: |
| 
|
नकादुचेण्यापकासके आठवलं 
|
Slarti
| |
| Tuesday, August 28, 2007 - 4:16 pm: |
| 
|
तुम्ही टी. बी. आंबिले, टी. नारायण, डी. व्ही. कुलकर्णी, एस. नामा, लोबागंटि या लोकांबद्दल ऐकले आहे का ?
|
Madhura
| |
| Tuesday, August 28, 2007 - 4:56 pm: |
| 
|
slarti , :-)) यातले तुकाराम बोल्होबा आंबिले , ठोसर नारायण आणि ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी कळले हो , पण बाकिचे नाही लक्षात येत.
|
Madhura
| |
| Tuesday, August 28, 2007 - 4:58 pm: |
| 
|
hmm, अजुन एक कळले नामदेव शिंपी , बरोबर ना?
|
Asami
| |
| Tuesday, August 28, 2007 - 5:28 pm: |
| 
|
लोबागंटि >>लोकमान्या बाळ गंगाधर टिळक
|
|
|