Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 07, 2007

Hitguj » Language and Literature » इतर साहित्य » मी वाचलेले पुस्तक » Archive through September 07, 2007 « Previous Next »

Farend
Tuesday, August 28, 2007 - 8:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्यांचे अनुभव चांगले आहेत, लेखन काही फार विशेष वाटले नाही मला ( Wise and otherwise )

Badbadi
Tuesday, August 28, 2007 - 9:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

wise and other wise बद्दल मी farend शी पूर्ण सहमत आहे.

Bee
Tuesday, August 28, 2007 - 10:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मते त्यांचे अनुभव काही जगावेगळे वगैरे नाही आहेत. ज्या तर्‍हेने त्यांनी ते लेखनीतून उतरविले त्यामुळे ते वाचनीय ठरतात. सरळ साधी भाषा, चारचौघांच्या वाट्याला येऊ शकतील असे अनुभव, लिखाणातला प्रामाणिकपणा, वहावत जाणारी शैली ह्यामुळे हे पुस्तक जास्त आवडले.

आपल्यावर झालेले संस्कार योग्य की अयोग्य हे तपासून बघता येते अशी पुस्तके वाचलीत की. संस्कारक्षम वयातील मुलांकरीता आणि त्यांच्या पाल्यांकरीता देखील अशी पुस्तके उपयुक्त ठरतात.


Psg
Tuesday, August 28, 2007 - 10:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बीशी सहमत. इतक्या अकृत्रिम शैलीत लिहितात त्या.. अगदी साधे साधे अनुभवही वाचनीय होतात.
सुधा मूर्तींचं 'डॉलर बहू' ही सुरेख पुस्तक आहे


Tanyabedekar
Tuesday, August 28, 2007 - 9:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रॉबीन म्हणाल्याप्रमाणे कोसला ज्या काळात प्रकाशित झाली तिचा विचार वाचताना करायला पाहिजे. कोसलाच्या शेवटाबद्दल अनेक लोकांचे हेच मत आहे. मला एकदा माझे वडील म्हणाले होते की कोसलाच्या पहिल्या आवृत्ती मध्ये हा भाग नव्हता (तो गावी परत जातो तिथपासुन). पण नक्की माहिती नाही. कुणाला कल्पना आहे का की हा भाग आधीपासुन होता की नंतरच्या आवृत्त्यांमध्ये आला.

कुणि बाळकृष्ण प्रभुदेसाइंचा गंधर्व हा कथासंग्रह वाचला आहे का? यातल्या सर्वच कथा अगदी डोळ्यासमोर उभ्या राहतात. गंधर्व, अतिथी, पांगिरा.. फारच सुंदर कथा होत्या.. अतिशय सुंदर. माझ्या माहितीप्रमाणे हा लेखक फार लवकर वारला. त्याचे आणखी काही कथासंग्रह वा साहित्य आहे का?


Hkumar
Wednesday, August 29, 2007 - 8:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'कोसला' चा शब्दकोशातील अर्थ 'रेशमाचा किडा' आहे. नेमाडेना कोणता अभिप्रेत आहे, कोणी सांगेल का.

Dhumketu
Wednesday, August 29, 2007 - 8:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>संस्कारक्षम वयातील मुलांकरीता आणि त्यांच्या पाल्यांकरीता देखील अशी पुस्तके उपयुक्त ठरतात.
संस्कारक्षम वयातील मुलांचे पाल्य? चांगलेच संस्कार दिसत आहेत :-)
त्यांच्या पालकांकरीता असे म्हणायचे आहे का?


Tanyabedekar
Wednesday, August 29, 2007 - 1:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोसलाचा अर्थ रेशमाचा किडा नसुन रेशमाचा किडा जो कोष बनवतो तो कोष आहे. नेमाडेंना "कोष" हा अर्थ अभिप्रेत आहे. स्वतभोवती घट्ट विणत गेलेला कोष.

कोसला चे इंग्रजी भाषांतर ककून ह्या नावाने आहे.

त्यांच्या पुढच्या कादंबरीचे नाव होते बिढार. बिढार म्हणजे विंचवाच्या पाठीवरचे घर.


Bee
Thursday, August 30, 2007 - 2:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धुमकेतु, जर ते वाक्य माझ्या आजीने म्हंटले असा जर विचार केला तर बरोबर वाक्य होईल ते.

विंचवाचे बिर्‍हाड पाठिवर अशी म्हण आहे ना.. माझ्या मते बिढार वा बिर्‍हाड ह्याचा फ़क्त विंचवाशीच संबंध आहे असे काही नाही. ते कुणाही सजीव जीवाचे असू शकते.


Hkumar
Sunday, September 02, 2007 - 11:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'शिखरावरुन' हा एडमंड हिलरींच्या पुस्तकाचा अनुवाद वाचला. अनुवादाची परवानगी म्हणून हिलरींनी एकही पैसा न घेता फ़क्त 'पिठले भाकरी खाऊ घाला'' अशी प्रेमळ मागणी केली.
पुस्तकातले एव्हरेस्ट चढाई वर्णन छान आहे. इतर साहसवर्णने मात्र कंटाळवाणी
' आजही एव्हरेस्टवर कोणी जायचे ते पैसाच ठरवतो'' हे वाक्य वास्तव सांगते.
म्हातारपणातील हिलरींच्या तंदुरुस्तीला दाद द्यायलाच हवी


Kedarjoshi
Wednesday, September 05, 2007 - 6:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल परत एकदा काजळमाया (जी ऐ) वाचल. मला दुसर्यांदा जास्त आवडल.

Savyasachi
Thursday, September 06, 2007 - 12:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार, दर वेळेस ते जास्त जास्त आवडत. रमलखुणा पण वाच असच परत परत.

Hkumar
Thursday, September 06, 2007 - 2:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

GA.nchyaa bahuteka pustakaa.nchee naawe pa.nchaaxaree aaheta! ma.nDaLee, baghaa ujaLaNee karoon.
<G A> mhaNaje gooDha + atarkya .

Savyasachi
Thursday, September 06, 2007 - 9:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो.
काजळमाया, रमलखुणा, निळासावळा, पिंगळावेळ, हिरवे रावे, डोहकाळिमा, रक्तचंदन, अमृतफ़ळे...
इतर आठवत नाहीत.


Peacelily2025
Friday, September 07, 2007 - 1:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी हितगुजवर नविन आलेय. जि. ए. ची पुस्तकं भारतात कुठे मिळतील? तसेच धारप, मतकरी असे बरेच लेखक आहेत ज्यांची पुस्तके हवी आहेत. पत्ता कळला तर सगळीच पुस्तके खरेदी करायची आहेत. मी सध्या फ़्लोरीडामध्ये आहे.

Bee
Friday, September 07, 2007 - 2:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमि, दादरला IDEAL मधे तुला ही पुस्तक सहज मिळतील. पुण्यात, अप्पा बळवंत मधे चौकशी करून करून एखाद्या दुकानात मिळून जातील. जर net वरून खरेदी करायची असतील तर मायबोलि देखील पुस्तक विकत देते आता. पहिल्या पानावर गेलीस तर तुला लपझप करणारी चित्र दिसतीलच पुस्तकांची. खेरीज
www.rasik.com वर देखील पुस्तकांचा उत्तम साठा आहे. पण केवढी महाग विकतात रसिकवाले. तरी देखील बिचारे दुरदेशीचे वाचक विकत घेतातच. म्हणून आपण राहतो तिथे एखादे मराठी ग्रंथालय नेटाने उघडावे असे मी सुचवीन तुला. आम्ही केले बुवा सिंगापोरमधे एक २५०० पुस्तकांचे ग्रंथालय सुरू आणि छान प्रतिसाद मिळतो आहे. पुणेरी भाषेत सांगायचे म्हणजे सिंगापोरमधील मराठी ग्रंथालयाची दिवसेंदिवस उन्नती होते आहे..

Peacelily2025
Friday, September 07, 2007 - 3:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, खुप आभार मानते मी तुमचा इतक्या पटकन उत्तर दिल्याबद्दल! मायबोलीवरुन कशी काय मिळवावीत पुस्तके? अगदीच नविन असल्यामुळे प्रश्नच प्रश्न आहेत!

Peacelily2025
Friday, September 07, 2007 - 3:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, तुमची पोस्ट एकदा पुन्हा वाचली अन उत्तर सापडले. माझ्याकडे जवळ जवळ ३५० पुस्तके आहेत अन आणखी जमवतेय मनात विचार मात्र लायब्रेरीचाच आहे. दिवाळी अंकांसाठी मी रसिक कडेच जाते. महाग असले तरी वाचायला तरी मिळवून देतात म्हणुन! आइडिअल पुस्तक भांडार मधे कोणाची पर्सनल ओळख आहे का? पुस्तके मागवण्यासाठी कोणाशी बोलायला हवे?

Bee
Friday, September 07, 2007 - 5:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

IDEAL चा कारभार अजून तरी online नाही झाला, अमि. तुझ्याकडे बरीच पुस्तके आहे तर खरच एखादं ग्रंथालय सुरू कर. थोडं कष्टाच अन् हिमतीच काम आहे पण अवश्य विचार कर. IDEAL मधून जर पुस्तके विकत घ्यायची असतील तर ओळख लागत नाही. सरळ दुकानात जाऊन आत मधे शिरून पुस्तके निवडून पैसे देऊन घेऊन घ्यायची. पण त्यासाठी देशात जायला हवे. हे काम मी वर्षातून एकदाच करतो. फ़ार अडगळीत आहे ते दुकान. एकमेकांचे कोपर लागतात इतके छोटे आहे. कोण कधी stool वरून खाली डोक्यावर पडेल नेम नाही. मागे चक्क एक गलेलठ्ठ पुस्तक माझ्या मेंदूवर आपटले :-) दुर्गाबाईन्चे होते म्हणून हसून सहन केला तो मार :-)

Bee
Friday, September 07, 2007 - 5:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमि, दिवाळी अंक मायबोलिवर खर तर स्वस्त दरात मिळतात आणि त्याची पोच देखील बर्‍यापैकी लवकर होते. तू अमरूंच्या देशात असल्यामुळे तुला तर आणखीनच लवकर मिळतील. गेल्या वेळी आम्ही बरेच सल्ले दिले होते असे करा तसे करा. यंदा ते सल्ले implement होतील अशी आशा आहे म्हणजे मग आणखीनच flexibility येईल अंकांची निवड करायला.

एक सांगू का? मायबोलिचाही दिवाळी अंक निघतो. लेखक आपणच व्हायचे असते. तेंव्हा तू अवश्य काहीतरी लिहून त्यावेळेसच्या संपादकांना ते साहित्य पाठवून दे. वेळोवेळी तुला इथे सुचना आढळतीलच. तेंव्हा दररोज मायबोलिचे भल्या पहाटे एकदा तरी मुख बघून काम करत जा. दिवस छान जातो असा कित्येकांचा अनुभव आहे इथे :-)





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators