Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 28, 2007

Hitguj » Language and Literature » इतर साहित्य » मी वाचलेले पुस्तक » Archive through August 28, 2007 « Previous Next »

Adm
Wednesday, August 01, 2007 - 6:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

somehow Inherritance of loss नाही आवडलं... rather मी वाचायला सुरूवात केली तेव्हा पकडच नाहि घेतली... नंतर परत एकदा वाचेन थोडे दिवसांनी...
Dan Brown च digital fortress वाचलं...ठिक ठिक होतं.. not as great as Da vinci.. or Angles and demons.. There is one thing about Dan brown's books... The books have looooot of "domain knowledge"..


Ami79
Thursday, August 02, 2007 - 6:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग फक्त शेवटचे पान वाचले तर चालेल का/
चालेल ना, पण काहीही कळणार नाही :-)

Tanyabedekar
Thursday, August 02, 2007 - 4:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रभाकर पेंढारकरांचे आणखी एक सुंदर पुस्तक म्हणजे रारंगढांग. बी आर ओ च्या हिमालयामधील रस्ताबांधकामाची कहाणी आहे. फार छान आहे ते पुस्तक.

P_sahasrabudhe
Tuesday, August 07, 2007 - 4:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल कोसला वाचून संपवलं..... सुरूवातिचं hostel life खूप सूंदर रंगवलं आहे... पण शेवटी गावातल्या गोष्टी फार ताणल्या आहेत... आणि त्या फारच insignificant वाटतात...
शेवटची सुमारे ५० पाने उगीच आहेत असं वाटलं...
एकूण जेव्हडा hype आहे आणि जितकं ऐकलं होतं तितकं great नाही वाटलं... may be मला साहित्यातलं फार काही कळत नसावं... :-)



Kedarjoshi
Thursday, August 23, 2007 - 6:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अलकेमीस्ट मला ही आवडले. त्यानंतर त्यांचे मी Eleven Minutes वाचायला घेतले.
ही कथा आहे एका ब्राझीलीयन वेश्येची. (नाही नाही तिला झालेल्या त्रासाची नाही.) एकुनच पुरुष व स्त्री यांचे संबध, दरवेळी तिला उमगलेले पुरुष व नंतर तिला तिच्यातील स्त्री उमजवुन सांगनारा तिचा क्लायंट. सगळेच मस्त. मला आवडले. पण मध्ये साधारन शेवटाला येताना २० ते ३० पाने कमी केले असते तरी चालले असते असे वाटले.

पुर्ण पुस्तक वाचताना तिच्या बद्दल कधीही दया वा चिड येत नाही, निर्मान होतो तो आदरच. Paulo Coelho ने फारच सुरेख मांडनी केली आहे. त्यातील काही वाक्य खरच पंच आहेत जसे I am not a body with soul, I'm a soul that has a visible part called the body .

ही एका खर्या वेश्ये वर आधारीत कहानी आहे. बाकीही बरेच वाक्य टाकु शकलो असतो पण ते पुस्तक वाचताना त्याला जो अर्थ येतो तो असेच वाचुन येनार नाही.

अगदीच मस्ट नाही पण जर मिळाले तर वाचायला हरकत नाही.


Giriraj
Friday, August 24, 2007 - 10:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अलकेमिस्टचे इंग्रजी अनुवाद मला खूप आवडला.. त्या मानाने मराठी अनुवाद नाही आवडला.. प्रत्येक पानागणिक आअण त्या वातावरणाचे भाग होत जातो.. खूप भारावल्यासारखे झाले होते मला तरी.. बहुदा कथानायक पशुपालक असल्याने खूपदा कृष्णाची आठवण होत होती...

Robeenhood
Friday, August 24, 2007 - 2:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सहस्त्रबुद्धे, तुमचं म्हणणं खरं आहे.आता हाईपचं म्हणाल तर कोसला जेव्हा आली तेव्हा मराठी कादम्बरी एका लिमिटेड विश्वात अडकलेली होती.प्रेमाचे त्रिकोण, खांडेकरी आदर्शवाद वगैरे. काही विषय कादम्बरीचे असूही शकतात हेही त्या वेळी मान्य झाले नसते. अशा वेळी एक ट्रेन्डसेटर म्हणून ती गाजली. नन्तर त्याच धाटणीच्या नेमाडपंथी कादम्बर्‍याचे पीकच आले. त्यामुळे त्याचे नावीन्य गेले. त्या त्या काळाच्या चौकटीत विचार केला पाहीजे. अन्यथा न्यूटनचे सिद्धान्त आज पाचवीची मुले शिकतात किम्बहुना न्यूटनच्या यामांडणीत काय विशेष आहे असाही प्रश्न पडतो पण त्यावेळी केवळ विचार करून अशी थियरी मांडणे ही अलौकीक बुद्धीची झेपच होती. सत्या गाजला पण कम्पनी वास्तव वगैरेना लोक म्हणू लागले चांगला आहे पण तेच तेच आहे तसेच...
कोसलाचा शेवट फारच पसरट आहे...

गोतावळा ही आनन्द यादवांची कादम्बरी बनगरवाडीच्याच तोडीची आहे...


Hkumar
Saturday, August 25, 2007 - 8:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विजय तेन्दुल्करन्च्या कथा मला आवदल्या नाहीत्त. बी शी अगदी सहमत.एक वर्शापूर्वी मी त्यन्च्या निवडक कथ्हान्चे पुस्तक घेता घेता थेवुन दिले होते. यन्दा ते विकत घेतले व वाचत आहे आणि निराश ज़ालो अह्हे

Bee
Saturday, August 25, 2007 - 2:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुमार साहेब, तुमचे प्रोफ़ाईल पाहिले. काय काय खरडले अद्याप जरा कळेल का :-)

Hkumar
Sunday, August 26, 2007 - 5:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, तुमच्या प्रश्नाचे उत्तर
* युवा सकाळ मधे '' आपण असे का वागतो'' ही लेख्माला प्रसिद्ध्ह.
* सकाळ, म.टाइम्स, लोकसत्ता, लोकमत मध्ये लेख व पत्रलेखन
* अन्तर्नाद, गतिमान सन्तुलन या मासिकातुन अनुक्रमे ललित व पर्यावरण विशयक लेखन
* महाराश्त्र राज्य पत्रकार सन्घाकदुन 'पत्रश्री' पुरस्कार प्राप्त.



Bee
Monday, August 27, 2007 - 1:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुमार, उत्तम!
मायबोलिच्या गुलमोहोरमधे देखील लिहा अशी विनंती.


Hkumar
Monday, August 27, 2007 - 4:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तेन्डुलकरान्चे ललित लेखन खूपच सुन्दर आहे. 'कोवळी उन्हे' जरुर वाचण्यासारखे. त्यातील काही लेख मी पुन्हा पुन्हा वाचत असतो. सुमारे ४५ वर्‍षापुर्वी त्यानी हे सदर म.टा. मधे लिहीले होते.या पुस्तकाची माहीती मला अशोक जैन यान्च्या 'अशोकवन' मधे मिळाली. एका चान्गल्या पुस्तकातुन दुसर्या चान्ग्ल्याचा शोध हा एक सुन्दर योग

Bee
Monday, August 27, 2007 - 5:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बनगरवाडी, एकदम सकस साहित्यकृती आहे.

Bee
Monday, August 27, 2007 - 6:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विश्रब्ध शारदाचे भाग १ आणि भाग २ आहेत. जे अत्यंत जुने पुस्तक आहे. कुणी वाचले आहे का इथे? कसे आहे?

Hkumar
Monday, August 27, 2007 - 11:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बनगरवाडी मस्तच आहे. त्याच्या १४व्या आव्रुत्तीत लेखक लिहीतात,''ज्या हातानी ५० वर्‍षापूर्वी शब्ध लिहीले त्याच हातानी आता चित्रे काढली.''
मित्रानो, ती रेखाटने जरुर बघा
व्य. माडगुळकरान्चे '' पान्ढर्यावर काळे'' सध्या वाचत आहे. छान


Arch
Monday, August 27, 2007 - 8:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गेल्या तीन आठवड्यात ही तीन पुस्तकं वाचली आणि आवडली

Mango Seaon by अमूल्य मल्लाडी
The Hindi Bindi Club by मोनिका प्रधान
If Today be Sweet by थ्रिटी उमरीगर

सध्या इथल्या library त मिळणारी Indian Authors ची पुस्तकं वाचायच ठरवल आहे.


Bee
Tuesday, August 28, 2007 - 1:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुमार, ती चित्रे मी पाहिलीत. पण मला ती खूप आवडली नाही. पु. भावेंनी त्यांना तशी विनंती केली होती की मराठी पुस्तकांमधे चित्रमय पुस्तके कमी आहेत तेन्व्हा तुम्ही अवश्य चित्र काढा. पण बनगरवाडी हे पुस्तक इतके सकस आहे की त्या चित्रांची खरच काही गरज नाही. पण तुला का आवडली ती चित्रे हे जर सांगितले तर कदाचित माझे मत बदलू शकेल.

पुलंचे 'मराठी साहित्याचा गाळिव इतिहास' एक चांगले विनोदी पुस्तक आहे पण पुस्तक भरावे म्हणून खूप चित्र काढली आहेत त्यात.


Hkumar
Tuesday, August 28, 2007 - 4:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, ती चित्रे ग्रामीण जीवनाचे अस्सल दर्शन घडवतात असे मला वाटते. त्यामुळे शहरी मन्डळीना वास्तवाचा अन्दाज येईल.
माझी चित्रकला अतिशय खराब असल्याने मला कुठल्याही चित्रकाराबद्दल नितान्त आदर आहे


Ram3
Tuesday, August 28, 2007 - 6:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुधा मुर्ती चे WISE AND OTHER WISE वाचले फ़ार चान्गले आहे.

Bee
Tuesday, August 28, 2007 - 7:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राम, खरे तर ह्या पुस्तकाचा अनुवाद खूप सुंदर झालेला आहे. त्यासाठी सोहोनी बाईंचे कौतूक करायला हवे. आशा कर्दळे, लीना सोहोनी, विणा गोवरीकर, माधुरी शानबाग ह्या सर्व जणी उत्तम अनुवादीका आहे.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators