Zakki
| |
| Thursday, July 12, 2007 - 6:33 pm: |
| 
|
सय्यद अहमदने जे काय केले त्याचा स्वातंत्र्ययुद्धाशी कसा काय संबंध येतो? मंगल पांडेने बंदुकीत गोळी भरताना काहीतरी अभक्ष्य गोष्ट तोंडात येते, म्हणून चिडून बंड केले नि युद्धाला सुरुवात झाली!
|
Deshi
| |
| Thursday, July 12, 2007 - 9:18 pm: |
| 
|
खरी गोष्ट म्हणजे त्या अफवा होत्या. ब्रिटीशांनी अजुन तश्या बंदुका आनल्या नव्हत्या. युध्द हे ठरलेल्या तारखेच्या काही दिवस आधीच सुरु झाले. त्यामुळे खरतर ते अर्धवट अवस्थेतच संपले. मंगल पांडे ने जे काही केले ते वैयक्तीक होते. स्वातंत्र्याची चाड असती तर कदाचीत तो ब्रीटीशांच्या सैन्यात नोकरी न करता दुसर्या मार्गाने अमर हौउ शकला असता. जर ते युध्द जिंकले असते तर कोणाचे राज्य आले असते. दुसर्या नानासाहेबाचे की तात्या टोपेचे की नामधारी बहादुरशाहाचे. बाहदुरशहा ला जेव्हा सिंहासनावर बसवत होते तेव्हा तो घाबरुन नको नको म्हणत होता. उठाव्कर्त्यांनी पैसे मागीतले तर नाही म्हणाला, त्याला धमकाविन्यात आले व त्याचा मुलाला विश्वासात घेउन बहादुरशाहा ला "समजाविन्यात" आले. वर लिहील्या प्रमाने पार्शीया चा राजा सैन्य घेउन का निघाला? भारतातील इग्रंजावर आक्रमन करुन भारताला स्वातंत्र द्यायला ला की परत भारताला गुलामगीरीत टाकायला. (आगीतुन फुफाट्यात)
|
अरे वा छान माहिती दिली केदार आम्हाला ईतीहासाच्या पुस्तकात जेव्हढे वाचले तेव्हढेच माहिती आहे. पण या उठावात मुस्लिमांचा सहभाग जास्त होता म्हणुन त्यानतर ब्रिटिशांनी त्यांच्यावर खुप कडक कारवाई केली. पुढे अलिगढ university तल्या principal बेक मुळे आणिहिंदु मध्ये हक्काची जाणीव होउ लागल्याने divide and rule सुरु केला आणि इंग्रज मुस्लिम धर्जिणे बनले.
|
The Inheritance of Loss: A Novel नॉव्हेल वा फिक्शन वाचने सोडुन खरतर बरेच वर्ष झालेत पण चाफा ने दिलेल्या रिव्ह्यु मुळे /cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=103385&post=937108#POST937108 मी देखील ईनहेरीटंन्स ऑफ लॉस वाचायला घेतल. (म्हणजे बर्याच नंबरानंतर). गेल्या शुक्रवारी ते मिळाल. काल परत वाचुन वापस देखील केल. एकदा का वाचायला घेतल की सोडवत नाही. बिजु चे वाचल्यावर मला दरवेळी indian hotel मधील मेक्सीकन व भारतीय नोकरांची आठवन झाली. ग्रिन कार्ड च ' स्ट्रगल ' वाचताना त्यात आपण ही कुठेतरी आहोत ह्याची देखील जान झाली. मला कुक चे (बिजु चे वडील) करक्टर देखील आवडले. प्रत्येक पात्राची एक वेगळी बाजु, त्याचा दृष्टीकोन व एक सर्वांना सामावुन घेनार मोठ चित्र आपोआप उलग़डत जात. बरेचदा आपनच त्या पात्रात गुंतलो आहेत वा त्याचा एक भाग झालो आहोत हे आपोआप लक्षात येत. चाफा ला चांगले पुस्तक सुचविल्या बद्ल धन्यवाद.
|
Farend
| |
| Monday, July 16, 2007 - 8:20 pm: |
| 
|
केदार त्याची overall theme काय आहे?
|
एका वाक्यात थिम सांगने अवघड जातय. पण परिस्तिथी नी गांजलेल्या दोन चार व्यक्तींची ही कथा. यात कथा नायक असे कोणी नाही. पुस्तक हे globalization, economic inequality, terrorist ह्या सर्व आजुबाजुच्या गोष्टींची मांडनी करते. काळ १९८०. घटना अनेक देशात जसे अमेरिका, भारत (ईंग्लंड व झांजीबार) या देशात घडतात. त्या घटनांचा म्हणल तर संबध आहे म्हणल तर नाही. मुख्य पात्र sai ही एक अनाथ मुलगी आहे, तीचे आजोबा हे एक ICS judge असतात, मध्येच त्यांची कथा. त्यांचा कुक असतो त्याची कथा व त्या कुक चा मुलगा बिजु जो अमेरिकेत अवैध रित्या राहतो त्याची कथा. मध्येच एक दोन बायका व सई ला आवडनरा ग्यान ह्यांची पण कथा. प्रत्येक पात्राचे जिवन मांडले आहे. ईथे बघ
|
Pancha
| |
| Monday, July 16, 2007 - 10:09 pm: |
| 
|
केदार , ह्या पुस्तकावरुन नेपाळी लोकानी वाद् घातला होता, त्याच्या बद्दल वाइट लिहिले म्हणुन
|
Swaroop
| |
| Thursday, July 19, 2007 - 3:21 pm: |
| 
|
"शाळा" वाचले.... मी आत्तापर्यंत वाचलेल्या best पुस्तकांपैकी एक... आपापल्या शाळेतले.... सुर्या,फावड्या,चित्र्या,जोश्या.... सगळे दोस्त डोळ्यापुढे उभे राहातात... अगदी शिरोदकर,केवडा सुद्धा. त्या दिवसांचा आठ्वणीने nostelgic व्हायला होते... पुस्तक मनात रेंगाळत रहाते... शोभा डे यांचे "स्पीडपोस्ट" वाचले... वेगवेगळ्या प्रसंगात त्यांनी त्यांच्या मुलांना लिहलेल्या पत्रांचे हे पुस्तक आहे... पुस्तक नक्कीच चांगले आहे.... पुस्तकातले प्रसंग आणि त्याचा अनुवाद दोह्नी जमले आहेत लेखिकेने तिच्या आणि तिच्या मुलांच्या बालपणाची,तारुण्याची केलेली तुलना मस्त वाटते.... generation gap चांगलीच डोकावत रहाते पत्रांतुन.... एकुण काय तर एकदा नक्कीच वाचण्याजोगे पुस्तक. चेतन भगतच्या " 5 point something " चा मराठी अनुवाद वाचला.... अनुवाद कसला नुसते भाषांतर होते.... त्यामुळे सारखा रसभंग होत होता. खरतर मी खुप अपेक्षेने हे पुस्तक वाचायला घेतले.... पण पुस्तकाने एकदाही पकड घेतली नाही.... काहीकाही प्रसंग चान्गले होते.... पण एकतर लेखकाला ते फुलवता आले नाहीत किंवा त्यांचा अनुवाद(भाषांतर) नीट जमले नाहिये.... कॉलेजजीवनावरच्या इतर चांगल्या चांगल्या पुस्तकांच्या जवळपासही जाणारा दर्जा नसताना हे पुस्तक बेस्ट सेलर कसे काय झाले कळत नाही... आता प्रकाश नारायण संत यांचे "पन्खा" वाचायला घेतलय.... लंपन पहिल्याच भेटीत आवडुन गेलाय...
|
Nanya
| |
| Thursday, July 19, 2007 - 5:45 pm: |
| 
|
>>.... कॉलेजजीवनावरच्या इतर चांगल्या चांगल्या पुस्तकांच्या जवळपासही जाणारा दर्जा नसताना हे पुस्तक बेस्ट सेलर कसे काय झाले कळत नाही... मराठी भाषांतरदेखील best seller आहे का? "5 point someone" मुळ खुप मस्त आहे. मराठी भाषांतराचे नाव काय आहे?
|
Vin
| |
| Friday, July 20, 2007 - 12:35 am: |
| 
|
"शांताराम" - डेव्हिड ग्रेगरी राॅबर्टस (सत्यकथा- आत्मचरित्र) ही ह्या लेखकाची (आस्ट्रेलियन गुन्हेगार-फ़्युजिटीव्ह ची) चित्तथरारक जिवन कथा आहे. १९८०-९० च्या काळात तो मुंबईत बरेच वर्षे राहिला. तिथे त्याने एका मराठी माणसाशी आणी त्याच्या कुटुंबियांशी (प्रकाश खेडकर कि असचं काहिसे नाव आहे) अतिशय जवळिक कशी जोडलि वै. याचं वर्णन चांगल आहे. मराठी संस्कृती आणी मराठी वगैरे शिकला..... बरेचसे वर्णन खुप खुप ग्राफिक आहे. शांताराम हे त्याच्या मित्राच्या आई वडिलानी दिलेले नाव आहे. डे. ग्रे. राॅबर्ट्स आता एफ़. बी. आय. ला वै. असे गुन्हेगार पकडण्या साठी मदत करतो. he was involved in all kinds of illegal activities but his insight and his real expenriences(for a foreinger) of that part of the world is just mind boggling. This book at times is zen like but crass and perverted look at life , too. Again, it is very graphic at times. मीरा नायर आता पिक्चर काढणार आहे. जाॅनी डेप शांतारामच्या भुमिकेत आहे.
|
Bee
| |
| Friday, July 20, 2007 - 4:13 am: |
| 
|
चेतन भगत हे नविन लेखक आहेत का? मी पुर्वी हे नाव कधी ऐकले नाही. विन, एक चांगले पुस्तक सुचविले. इथे मिळाले तर नक्की वाचून बघेन. धन्यवाद.
|
स्वरूप अगदी बरोबर बोललास बोअर वाटले मलाही फ़ाईव्ह पाॅईंट बी अरे नाही अलीकडच्या आय.टी. आणि काॅलसेंटरच्या जमान्यातला एक अगदी फ़ेमस लेखक आहे हा याचे "वन नाईट दि काॅल सेन्टर" मस्त आहे.. वाच मिळाल्यास.
|
Bee
| |
| Friday, July 20, 2007 - 6:24 am: |
| 
|
ठिक आहे देशात मिळाले तर नक्की विकत घेईन.
|
मला One night at call centre आवडले. खूप व्यवस्थित त्या ने सध्याची जनरेशन मांडली आहे. कुठेही तो "अरेरे तुम्ही वाट चुकलेले तरूण" किंवा "हे पहा सुपर कूल तरूण" हा अभिनिवेष बाळगत नाही. जे आहे ते फ़क्त किहत जातो. माझ्या वडलांना यातले बरेचसे संदर्भ खटकले. मला मात्र एक नीट चित्रण वाटलं. लिहिण्याची शैली तर पार वेगळी आहे. 5 Point पण मस्त आहे. पण ते इतक्से भावले नाही.
|
Asami
| |
| Friday, July 20, 2007 - 3:15 pm: |
| 
|
माझ्या मते One night at call centre सारखे गंडलेले पुस्तक नाही. It had a novel concept/theme, current background and promising author, but it fails miserably at the end. जवळजवळ ७०-७५ % पुस्तक उत्कंठा वाढवून ठेवते. It builds temp towards supposedly geared up climax, only to fall flat on face. So much for the fantastic build-up. अगदि typical शेवट.
|
Ami79
| |
| Tuesday, July 24, 2007 - 12:00 pm: |
| 
|
आताच माझ्या वाचनात एक पुस्तक आले, जे मला पुर्ण वाचणे अशक्य झाले इतके ते सवंग आणि अश्लिल भाषेत लिहिले आहे. पुस्तकाचे नाव आहे'जंगल'. लेखक 'पंकज कुरुलकर'. या महाशयांना काही पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत हे त्या पुस्तकाच्या मलपृष्ठवरून कळले. आश्चर्य वाटले. त्या पुस्तकाबद्दल हे माझेच नव्हे तर त्या वेळी वाचनालयात उपस्थित असलेल्या आणि पुस्तक चाळलेल्या प्रत्येकाचे मत होते. सध्या दुसरे एक पुस्तक वाचनात आले.'फिरस्ता' लेखक 'नारायण धारप'. गुढ कथांचा संग्रह आहे. ठिक आहे. सोंगड्या आणि जुइली सुद्धा काही दिवसांपुर्वी वाचलीत. दोन्ही पुस्तके छानच आहेत. वाचावीच अशी
|
Psg
| |
| Wednesday, August 01, 2007 - 4:51 am: |
| 
|
Paulo Coelho चे 'द अलकेमिस्ट' वाचले, म्हणजे मराठी अनुवाद वाचला- नितिन कोतापल्ले यांनी केला आहे. जबरदस्त पुस्तक आहे! या लेखकाचं सर्वात लोकप्रिय पुस्तक आहे आणि तब्बल ५६ भाषांमधे अनुवाद झाले आहेत त्याचे. सुरुवातीला पुस्तक पकड घेत नाही, सगळच abstract वाटतं, पण नंतर खाली ठेववत नाही! स्वत:वर, स्वत:च्या हृदयावर विश्वास ठेवा, स्वप्न बघा आणि ती सत्यात उतरवण्यासाठी पडतील ते कष्ट घ्या, असा पुस्तकाचा संदेश आहे. Follow your dreams, your instinct and your heart! एक वेगळं आणि मस्त पुस्तक. जरूर वाचा
|
Ami79
| |
| Wednesday, August 01, 2007 - 12:08 pm: |
| 
|
मला सुद्धा अल्केमिस्ट खुप आवडले. त्याचे सर्व सार त्याच्या शेवटच्या पानातच सामावले आहे
|
Ami79
| |
| Wednesday, August 01, 2007 - 12:16 pm: |
| 
|
चक्री वादळ नावाचे पुस्तक वाचनात आले. लेखकाचे नाव कदाचित प्रभाकर पेंढारकर आहे-- आंध्र प्रदेशात १९७७ साली आलेल्या चक्रीवादळाची कथा आहे ही. सुरुवातीला ते पकड घेते पण नंतर फारच पसरट होऊन जाते. कदाचीत अनेक पातळ्यावर सुरू असलेल्या अनेक गोष्टी संक्षिप्त पणे मांडण्याचा प्रयत्न कथेला मारक ठरतो.
|
त्याचे सर्व सार त्याच्या शेवटच्या पानातच सामावले आहे >>>> मग फक्त शेवटचे पान वाचले तर चालेल का/
|