|
I wish to post some of my brother's (Shrikant Chandrikapure) poems, you all may find some similarities that of Grace. Please find the BB named after him in few a days.
|
उदाहरणादाखल काही ओळी देतो: नदीच्या दिशेने जरी वाट गेली तिलाही असे सागराची क्षुधा इथे प्राण माझे तळाशी निमाले तुझी आर्जवे कोण ऐकी अता
|
अरे! बर्याच दिवसपासून येथे कोणी आलेले दिसत नाहीय! कुठे गेलेत सर्व?
|
अरे! बर्याच दिवसपासून येथे कोणी आलेले दिसत नाहीय! कुठे गेलेत सर्व?
|
कुणी "भय इथले संपत नाही" ह्या कविते चा अभिप्रेत असलेला अर्थ लिहु शकाल का? खरे तर प्रत्येकाला हि कविता वेगवेगळ्या रुपाने भेटेल, पण तरी मला अर्थ हवाय. लता ने अप्रतिम गायले आहे, रिपीट मधे टाकून ऐकते आहे...
|
Mahesh
| |
| Wednesday, June 27, 2007 - 2:08 am: |
| 
|
होय, लताबाईंनी फारच सुंदर गायले आहे ते. मी पण खुप वेळा रिपीट मधे टाकून ऐकले आहे. खरे तर ग्रेसच्या बर्याच कवितांचा अर्थ लावणे कर्मकठिण आहे.
|
Bee
| |
| Wednesday, June 27, 2007 - 2:50 am: |
| 
|
... नाही पण ही कविता तितकी दुर्बोध किंवा गुढ नाही वाटली. अगदी साधी सरळ आठवणींवरची एक कविता आहे ही. प्रत्येक कडव्यांचा अर्थ अगदी सरळ सरळ लागतो. शेवटच्या कडव्यापासून वर वर वाचत नेली तर जास्त लवकर कळते. भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो तू शिकविली गीती अर्थ अगदी सरळ आहे की जेंव्हा एखादी आधार देणारी व्यक्ती जीवनातून निघून जाते तेंव्हा जी असुरक्षितता (भय) निर्माण होते ती कवी वरील दोन ओळीतून मांडतो. संध्याकाळच्या वेळी खूपदा गळ्यात आठवणी उतरातात. त्यामुळे दुसरी ओळ आली असेल. ते झरे चंद्रसजणांचे ती धरती भगवी माया झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवाया इथे कवी हे व्यक्त करतो की जी व्यक्ती त्याच्यापासून दूर गेली तिचे प्रेम कसे होते. हे त्यानी धरतीची भगवी माया, चंद्रसजणांचे झरे, झाडांशी निजलो आपण -- ह्या शब्दातून व्यक्त केले आहे. तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला सीतेच्या वनवासातील जणु अंगी राघव शेला वरील कडव्याचा अर्थही एकदम सरळ सरळ आहे. असे म्हणतात वनवासातात सीतेजवळ रामाचा शेला राहिला होता. तो शेला जवळ बाळगून तिला जवळ आपला रामच आहे असे वाटते होते. तो शेला तिला रामाचा स्पर्श देत होता. त्याचाच तिला आधार होता. हा संदर्भ घेऊन कवी म्हणतो तुझे ते मंद हळवे बोल माझ्या आयुष्याला इतके स्पर्शून गेले आहे की त्यानी संपूर्ण जीवनच व्यापून टाकले आहे. ते स्पर्श सतत कवीला सोबत करतात. स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे कवी म्हणतो आहे तुझ्या आठवणी संपता संपत नाही. तुझी पोकळी कशानीच भरत नाही. ही पोकळी तू नसल्यामुळे फ़क्त दुःखानेच भरलेली आहे. मी माझ्या परिने प्रयास केला. मला ही आठवणीवरची एक साधी कविता वाटली. इतरांनी (मनापासून) लावलेला अर्थ वाचायला आवडेल.
|
Shrini
| |
| Wednesday, June 27, 2007 - 5:17 am: |
| 
|
या कवितेचा अर्थ इतका साधा वाटत नाही. 'चंद्रसजणांचे झरे' म्हणजे काय ? 'भगवी माया' म्हणजे काय ? भगवा रंग विरक्तीचा मानला जातो. मग तो मायेसोबत का जोडला ? 'झाडांशी निजून झाडांमध्ये पुन्हा उगवणे' म्हणजे काय ? कवितेतील शेवटच्या दोन ओळींचे रसग्रहण शक्य आहे, पण ते खूप मोठे होईल.
|
Bee
| |
| Wednesday, June 27, 2007 - 5:41 am: |
| 
|
हो २र्या कडव्याचा अर्थ लावणे तितके सोपे नाही. तिथे खरे खास ग्रेसची दुर्बोधता जाणवतो. मला अर्थ लिहिताना त्या दोन ओळी पुर्ण कवितेशी एकरूपही वाटल्या नाहीत. बहुतेक अर्थ कळला नाही म्हणून तसे असावे. पण मी एक प्रयत्न केला. वेळ असेल तर शेवटच्या २ ओळींचा अर्थ लिही.. वाट बघतो..
|
नाही पण ही कविता तितकी दुर्बोध किंवा गुढ नाही वाटली. अगदी साधी सरळ आठवणींवरची एक कविता आहे ही. प्रत्येक कडव्यांचा अर्थ अगदी सरळ सरळ लागतो. शेवटच्या कडव्यापासून वर वर वाचत नेली तर जास्त लवकर कळते>>>>>>> तिथे खरे खास ग्रेसची दुर्बोधता जाणवतो. मला अर्थ लिहिताना त्या दोन ओळी पुर्ण कवितेशी एकरूपही वाटल्या नाहीत.>>>>>> बी तुझ्याच लिखानात विरोधाभास आहे. अरे ग्रेस, सुरेश भट वैगरे महान हस्तींच्या कवितांचे रसग्रहन आपण करु नये कारण त्याला वेगवेगळे अर्थ असतात. शिवाय वर त्या दोन ओळी तिथे फिट होत नाहीत असेही तु लिहीलेस. क्या बात है. राग नको मानु पण त्या ओळी तुला कळाल्या नाहीत म्हणून त्या तिथे फिट नाहीत का?
|
Bee
| |
| Thursday, June 28, 2007 - 1:50 am: |
| 
|
हो २र्या कडव्याचा अर्थ लावणे तितके सोपे नाही. तिथे खरे खास ग्रेसची दुर्बोधता जाणवतो. मला अर्थ लिहिताना त्या दोन ओळी पुर्ण कवितेशी एकरूपही वाटल्या नाहीत. बहुतेक अर्थ कळला नाही म्हणून तसे असावे. पण मी एक प्रयत्न केला. >> केदार आता परत वाच पाहू शेवटचे २ वाक्य. सुरेश भट दुर्बोध कवी वगैरे नाही. ग्रेसच्या कविता कळाव्यात. त्यांना दुर्बोधतेचा कलंक लागू नये ह्याच भावनेने मी इथे अर्थ लिहिण्याचा प्रयत्न केला. स्पष्टीकरणाबद्दल राग मानू नये.
|
Giriraj
| |
| Thursday, June 28, 2007 - 4:43 am: |
| 
|
बी,तू लिहित रहा रे.. केदारला काय कळते कवितांतले? तू म्हणतोस म्हणजे तसेच असणार.. तुझे ग्रेस च्या कोणत्यात कवितेत काय हवे आणि कश्यात काय नको याचे विवेचन आवडले.. इतरही कवितांमध्ये अश्याच प्रकारच्या 'ईस्लेहा' सुचवणारे इतर रसग्रहण वाचायला उत्सुक आहे. तुझा रसग्रहणाभिलाषी मित्र, गिरी! केदार,तुला तुझ्या घरात प्रशन विचारलाये बघ!
|
Bee
| |
| Thursday, June 28, 2007 - 5:36 am: |
| 
|
कृपया इथे रसग्रहणाबद्दल बोला, कवितेबद्दल बोला. इतर गोष्टींसाठी हा बीबी अडवू नका.
|
Bee
| |
| Thursday, June 28, 2007 - 6:17 am: |
| 
|
संपूर्ण कविता आज मला मिळाली. लताबाईंनी फ़क्त ४च कडवी घेतली त्यातून. पुर्ण कविता अशी आहे.. भय इथले संपत नाही...मज तुझी आठवण येते... मी संध्याकाळी गातो...तू मला शिकविली गीते... हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया त्या वेळी नाजूक भोळ्या, वारयाला हसवून पळती क्षितीजांचे तोरण घेऊन, दारावर आली भरती तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला सीतेच्या वनवासातील जणू राघव शेला देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब थरथरत्या बुबूळापाशी, मी उरला सुरला थेंब संध्येतील कमल फ़ुलासम, मी नटलो श्रृंगाराने देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने स्त्रोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख्ख कुणाचे हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे ते धुके अवेळी होते, की परतायची घाई मेंदुतून ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई
|
Shrini
| |
| Thursday, June 28, 2007 - 10:40 am: |
| 
|
'स्त्रोत्रात ... स्मरणाचे' चा मला समजलेला अर्थ पुढीलप्रमाणे : स्त्रोत्र म्हणजे लयबद्ध रचलेली ईशस्तुती. या रचनेला स्वतःचा एक नाद असतो, आणि त्यामुळे एखादे स्त्रोत्र त्याच्या लयीत म्हणताना आपल्यालाही आनंद होतो. बरीच ईशवरभक्त माणसे एखाद्या कामात असताना स्वतःशीच एखादे स्त्रोत्र हळू आवाजात 'गुणगुणत' असतात. त्यामुळे काम करतानाही देवाचा विसर पडत नाही. background ला त्याची आठवण कायम राहते. कवितेच्या संदर्भात मात्र, ग्रेसचे केवळ मुखच नव्हे, तर सर्व ईंद्रीये कुठले तरी दुःख पुनरावृत्त करत आहेत, पण ते हळूच, आणि स्वतःशीच! पूर्ण शरीर आणि मन असे कोणतेतरी दुःख सतत, पण लयीत आणि हळुवारपणे अनुभवत आहे हा अनुभव किती वेगळा, आणि ते सांगायला लिहीलेली ही ओळ किती समर्पक आहे! पण हे दुःख माझेच आहे की दुसर्याच कुणाचे असून मी त्याचा फक्त 'साक्षी' आहे, की ते कोणा दुसर्या व्यक्तीमुळे निर्माण झाले आहे, हे देखील ग्रेस स्पष्ट करत नाही, कारण त्याची पुढची ओळ... 'चांदणे' सौम्य असते. ते जरूरीपुरता प्रकाश देते, पण तीव्र होत नाही, अंगाला भाजत नाही. इतकेच नाही, तर अनेक कलाकारांना ते स्फूर्तीही देते. चंद्र मनाचा कारक मानला जातो आणि आल्हाददायक, सौंदर्यपूर्ण भावनांशी चंद्र / चांदण्याचे जवळचे नाते आहे. म्हणूनच, जेव्हा एखाद्या व्यक्तीचे स्मरण, चांदण्याने निर्माण कराव्या अशा सुखद भावना ग्रेसच्या मनात सतत निर्माण करत राहते, तेव्हा मग वर उल्लेख केलेले दुःख कोणाचे / कशामुळे आहे असा त्याला प्रश्न पडतो..
|
स्त्रोत्र नाही स्तोस्त्र आहे तो शब्द.
|
Giriraj
| |
| Thursday, June 28, 2007 - 12:42 pm: |
| 
|
श्रीन्या,मला समजलेले अंतिम सत्य: आगून मागून पोस्ट केले अर्थ नाही पण शब्द चुकले
|
स्त्रोत्र नाही स्तोस्त्र आहे तो शब्द. >>> स्तोस्त्रही नाही तो शब्द. तो आहे स्तोत्र इतका सोपा....
|
Nakul
| |
| Thursday, June 28, 2007 - 9:38 pm: |
| 
|
हूडाचे बरोबर आहे - स्तोत्रात असा तो शब्द आहे
|
आईशप्पत माझी पण स्पेलिंग मिष्टेक झाली की दहा वेळा म्हणून टायपला तरी. बरोबर आहे हूड. हे म्हन्जे लोका सांगे ब्रह्म.. असंच झालं.
|
|
|