|
त्यावेळी भारत हा भारत होता का आणि महाराष्ट्र हे महाराष्ट्र होते का? महत्वाचा प्रश्न. त्याकाळी भारत न्हवता पण हिंदुस्थान होते. भारत हे नाव देशाला नंतर निधर्मी लोकांनी दिले त्यांना हिंदुस्थान म्हणुन घेने लाजीरवाने वाटायचे. जरी भारत हे नाव हिंदुस्थान ला होते तरी ते कागदो पत्री वा वापरात कधीच न्हवते. कदाचीत ते २००० वर्षापुर्वी भरत वर्ष म्हनुन भारताला ओळखले जायचे म्हणुन निधर्मी लोकांनी भारत हे नाव रुजु केले. हिदुंस्थाना ला देखीले राज्ये होतेच, पण ती आजच्या ऐवढी न्हवती. त्यांचे नाव महाराष्ट्रा वा गुजरात नसुन माळवा, दक्खन, बांगाला असे होते. त्या काळी ६ सुभे होते. (म्हणजे सहा मोठी राज्ये, त्यावर सुभेदार असत). म्हणुन जरी भारत भारत नसेल तरी राज्य व्यवस्था होतीच. दिल्ली पती ला सार्वभोम बादशाहा मानायचे तो जे बोलेल ती पुर्व. म्हणजे बाकी राजे न्हवते असी नाही पण ते बहुतांशी मांडलीकच होते. लोकांचा असा समज आहे की ब्रिटीशांनी भारताला जोडले. असे माननार्यांना भारताचा खरा ईतिहास माहीत नाही असेच म्हणावे लागेल. (त्यांनी फक्त रेल्वे आणली. पोस्ट सरकार दरबारी होतेच, ग्रांट ट्रंक रोड ला त्यांनी निट केले तर लोक म्हणतात भारताला जोडले. हं) तर भारताचे विवीध राज्य नसतील तरी तो आर्थीक रित्या व सांस्कृतीक रित्या जोडलेला हिंदुस्थान होता हे ह्या प्रश्नाचे उत्तर.
|
Lalu
| |
| Friday, July 06, 2007 - 3:15 am: |
| 
|
झकासराव, केदार, झक्की छान लिहिले आहे. पूर्वी ऐकलेल्या गोष्टी आठवल्या. दुसर्या कोणाऐवजी त्या राजकन्या पद्माराजेच्या मुलाला दत्तक घ्यावे म्हणून झालेल्या वादाबद्दल बरंच ऐकल होतं. हे सगळं 'इतिहास' बीबी वर टाकायला पाहिजे.
|
Psg
| |
| Friday, July 06, 2007 - 4:35 am: |
| 
|
वा. खूपच माहिती मिळाली. खूप खूप धन्यवाद झकास, केदार आणि झक्की. तुमची माहिती आणि मला आठवत असलेले थोडेफ़ार यातून बर्यापैकी लिंक लागत आहे आता मराठेशाहीची. केदार, तुला इतकं सगळं आठवतं याचं कौतुक वाटतं!
|
Zakasrao
| |
| Friday, July 06, 2007 - 6:46 am: |
| 
|
कारण तिथे प्रधान हिंदु होते. (मादन्ना व आक्कन्ना)>>> ह्या दोघांवर भर बाजारात मारेकर्यानी हल्ला करुन ठार केले्यामागे हात औरंग आणि हैदराबादच्या निजामाच्या जनानखान्याचा. केदार खुप छान लिहिलस. नंतर स्वताची तुंबडी भरौन घेणे आनी स्वत्:च महत्व अबाधित राखणे ह्यातच सगळा वांदा झाला. प्रत्येकाला सत्ता हवी होती. जी दृष्टी शिवाजी राजे यांच्याकडे होती ती नंतर अभावानेच दिसली. प्रत्यक्ष संभाजी राजाना देखिल बरीच अंतर्गत बंडाळी सहन करावी लागली होती. आणि नंतर फ़ंद फ़ितुरी आणि आपले म्हणावे असे सख्खे उलटले. संभाजी राजानी देखिल प्रचंड मेहनत घेवुन राज्य वाढवणे,सेना वाढवणे,पोर्तुगीज,इंग्रज ह्याना धडा शिकवणे ह्यात बरीच आघाडी घेतली होती पण नेहमी काहितरी खुसपट निघुन हातातोंडाशी आलेला घास लांब जायचा. जंजिरा च्या वेळी पण असेच झाले होते.त्याना पकडले होते संगमेश्वर येथे म्हणजे स्वराज्यातच आणि तिथुन औरंगच्या छावणीत नेइपर्यंत म्हणजे अहमदनगर येथे नेइपर्यंत त्यांचा सख्खा मेव्हणा गणोजी शिर्के हा आघाडीवर होता. पुढे पेशवेशाहीमध्ये काही सुरवातीचे अपवाद वगळता बाकी सगळे अय्याशीतच. हे तर मराठ्यांच झाल. पण एवढ मोठ मुघल साम्राज्य होत ते औरंग नंतर त्याच काय झाल हे कधी वाचायला नाही मिळाल. आपल्याला मधे पानिपत आणि त्यानंतर १८५७च स्वातंत्र्यसमर येथे थोडे संदर्भ मिळतात. पण औरंग नंतर काय ह्याचे डिटेल्स कोठे मिळतील? काही माहिती? किंवा येथेच लिहिल तरी चालेल.
|
केदार, झक्की, झकास धन्यवाद... केदार.. वर विचारलेले माझे पश्न आहेत.. विधानं नव्हेत.. झक्कींच्या ' शाहू किंवा इतर सरदारांच्या हे लक्षातच आले नाही की मुसलमान हे 'परकीय' आहेत. ' सारखाच विचार मी ही करत होतो.. आपण आपल्या सध्याच्या काळाप्रमाणे इतिहासातील घटनांचा अर्थ लावतोय.. पण त्याकाळी परिस्थीती वेगळीच असेल तर? आज मुस्लीमांबद्दल जी भावना आहे ती त्याकाळी तशी नसेल तर? शिवाजी राजांचा विरोध मुस्लीम राजवटीला होता की 'जुलमी' राजवटीला? सारेच मुस्लीम राज्यकर्ते जुलमी होते का? अकबर कसा होता? त्याकाळी अफगाण 'हिंदुस्थान' मध्ये होता का? मुस्लीम राज्यकर्तेही हिंदुस्थान शब्दप्रयोग करायचे का
|
पण त्याकाळी परिस्थीती वेगळीच असेल तर? आज मुस्लीमांबद्दल जी भावना आहे ती त्याकाळी तशी नसेल तर? >>> ती भावनाच मुळी दबुन गेली होती. अनेक शतके त्यांनी आपल्यावर राज्य केल्यामुळे ते राज्यकर्ते व आपण त्यांचे पाईक ही भावना निर्मान झाली. गुलाम लोकांना भावना नसते असते ती गुलामगीरी. ही वृत्ती फक्त दोघांनी झिडकारुन दिली. शिवाजी महाराज व राजा छत्रसाल. आज्च्या मध्यप्रदेशात त्याने शिवाजी सारखे राज्य स्थापण केले होते व शिवांजी चा तो समकालीन होता. शिवाजी छत्रसाल भेट ह्यावर एक बखर आहे. शिवाजींनी त्याला बरीच मदत केली व युध्दा साठी प्रवृत्त केले. पुढे जेव्हा पेशवे आले ( २५ वर्षांनतंर) तेव्हा छत्रसालावर मोगलांनी आक्रमन केले ते परतवुन लावले गेले बाजीरावाच्या साह्याने. त्या बदल्यात छत्रसाला ने त्याच्या राज्याचा एक तृतींयाश भाग पेशव्याला देऊ केला व मुलगा मानले. ती भावना निर्मान व्हायला ४०० वर्श जावी लागली. कारन सर्वांना गुलामीतच आनंद वाटत होता. ( हे म्हनजे आपल्या विध्द्वान लोकांनी जेव्हा ईंग्रजांनी मोगलांना हारवले तेव्हा असे जाहीर केले की ईग्रंज देव आहेत त्यांचा राज्यवर सुर्य मावळत नाही तेच खरे राजे, असे आपले लोक). शिवाजी राजांचा विरोध मुस्लीम राजवटीला होता की 'जुलमी' राजवटीला? सारेच मुस्लीम राज्यकर्ते जुलमी होते का? अकबर कसा होता>>>> शिवाजी महाराजांचे स्व्पन होते हिंदुपतपातशाही. दक्षीनेपासुन उत्तरे पर्यंत एकछत्री हिंदु अमंल हे त्यांनी स्पन पाहीले. पण त्यांचा राज्यात मुसलमानांवर दुय्यम नागरीकत्वा लादले गेले नाही वा त्यांनी मशीदी तोडल्या नाहीत. सारेच मुस्लीम राज्य कर्त्य जुलमी होते का? ९५ टक्के होते. ५ एक टक्क्यांनी मात्र जुलुम केला नाही. (भागानगर चे उदा. दिलेच आहे. पण नंतर मादन्ना चा खुन झाल्यावर हिंदु ची (राज्यकर्य्ता म्हणजे कुलकर्णी देशपांडे, पाटील ई) एकतर कत्तल केली गेली वा त्यांना जबरदस्त कर भरावा लागला. अकबर कसा होता? अकबर चांगला राजा होता म्हणे. चांगला का तर त्याने काही कर हिंदु धर्मीयांना माफ केले. ( बघा कर माफी माफ केली तरी आपन त्यांचे गुनगाण गानार.) अकबर जोधाबाई असे पिक्चर निर्मान करनार. मुळात जोधाबाई ही एक हिंदु राजकन्या होती. तिला तिच्या बापाने बळजबरी अकबराला दिले कारण अकबर त्याचे हिंदु राज्य खालसा करायला निघाला होता. यावरुन काय ते समजेल तो कसा होता. नंतर जोधाबाई ने स्वताची ईमेज बनविली पण तिला शेवटी कोणी विचारले नाही. मुस्लीम राज्यकर्तेही हिंदुस्थान शब्दप्रयोग करायचे का>>>> मागे लिहील्या प्रमाने भारताला भारत वर्ष म्हनायचे व प्रत्येकाचे वेगळे राज्य असायचे. (जसे वैशाली, अयोध्या, ई) नंतर मुसलमान आक्रमक जसे चेंगीझखान (हा मंगोल वंशीय होता), शेरखान लोदी, तुघलक, ई. नी आक्रमन केले. त्यांचा दृष्टीने भारत एकच कल्चर असनारा व संपत्ती असानारा, हिंदु धर्मीयांचा प्रान्त होता म्हनून ते हिंदुस्थान म्हणायचे, भारत नाही. हिंदुस्थान हा श्ब्द कदाचीत त्यांनी रुढ केला. सर्व कागदो पत्रात हाच शब्द दिसुन येईल. (भारत कधीही दिसनार नाही). एवढच काय पण १८५७ मध्ये हिंदुस्थानाचा नामधारी कवि राजाने लिहीले होते गाझीयोंमे बु रहेगी जब तलक ईमान की, तब तो लंदन तक चलेगी तेग हिंदुस्थान की. तेग म्हणजे तलवार. यावरुन हिंदुस्थान ह्या शब्दाला किती महत्व होते ते दिसेल. त्याकाळी अफगाण 'हिंदुस्थान' मध्ये होता का? >>> जेव्हा तुघलकाने आक्रमन केले तेव्हा होते त्याचा नंतर मात्र नाही. अफगान चा हिंदु राजा होता आनंतपाळ. तो गांधार वर राज्य करायचा. तुघलकाने त्याला हिंदुस्थानात जायला रस्ता मागीतला. तो त्याने दिला नाही. खुप मोठी लढाई झाली ज्यात आनंतपाळ हारला व तेव्हा पासुन अफगान आपल्या कडुन गेले.त्या लढाईत ईतके हिंदु मारल्या गेले की तेथील पर्वांताचे नाव हिंदुकुश असे पडले. अरबी मध्ये कुश म्हण्जे हत्या. तर हिंदुची हत्या म्हणजे हिंदुकुश. पण औरंग नंतर काय ह्याचे डिटेल्स कोठे मिळतील? काही माहिती? किंवा येथेच लिहिल तरी चालेल. >>>>>>. ओरंग नत्तर त्याचा शहजाद्यात बादशहा व्हायची शर्यत लागली. मुअज्ज्म दक्षिनेत होता तो उत्तरेत गेला. त्याने आपल्या भावांना कापुन काढले. तो राजा झाला पण अल्पकाळ. त्याचा वजीराने राज्य काबीज केले व तोच राजा झाला. दिल्लीत दोन पक्ष निर्मान झाले ईराणी व तुरानी. ( हे त्यांचा देशांमुळे निर्मान झाले कारण ते भारतीय न्हवतेच). दोन्ही पक्ष आपापास लढायचे व त्यांचे राजे निर्मान करायचे. (त्या काळात बरेच बादशाह होऊन गेले). नंतर बाजीरावाने हया भांडनाचा फायदा घेतला व उत्तरेवर स्वारी केली. त्यांना हारविले. अहमदीया करार झाला त्या प्रमाने मराठ्यांनी दिल्लीचे रक्षन (ईरानी बादशाह वा ईतर मुस्लीम राज्ये या पासुन) करायचे ठरविले व त्या बदल्यात मराठ्यांना मोगलांनी चोथाई चा हिस्सा दिला. त्या रक्षानामुळेच पानीपत झाले. सुजा तेव्हा दिल्ली चा पंत प्रधान होता पण नजीबाला स्वत बादशाह बनन्याचे वेघ लागले. त्याने अहमदशहाला बादशाहीचे लालुच दाखवुन काफीर कसे वरचढ झालेत असे अनेक पत्र पाठविले. काही पत्र आता भांडारकर वा इतिहास संशोधन मंडलात पाहायला भेटतील. नंतर चा ईतिहास वर आलाच आहे. धन्यवाद लालु,झक्कास नी पुनम व दिप, मला ईतीहासाचे वेड आहे असे म्हणले तरी चालेल. या विशयांवर शेकडो पुस्तक वाचली आहेत त्यामुळे सहज लक्षात राहात. दिप प्रश्न विचारल्यामुले खरतर तुलाच धन्यवाद, निदान ती माहीती कोणालातरी सांगता आली. प्रश्न असतील तर प्लीज विचारा मी सांगायचा प्रयत्न करेन.
|
Zelam
| |
| Friday, July 06, 2007 - 3:32 pm: |
| 
|
केदार, झकास, झक्की छान लिहिलंत. केदार खूपच अभ्यास आहे तुमचा.
|
Bsk
| |
| Saturday, July 07, 2007 - 4:54 pm: |
| 
|
बापरे केदार, अशक्क्य लक्षात आहे तुमच्या.. मस्त वाटलं वाचायला..
|
धन्यवाद झेलम व भाग्यश्री . ..
|
Dineshvs
| |
| Sunday, July 08, 2007 - 12:26 pm: |
| 
|
केदार, छान उत्तरे दिलीस. एखाद्या विषयाची गोडी असणे, त्यासंबंधात वाचन करणे, हा कौतुक करण्याजोगा गुण आहे तुझ्यात.
|
केदार, फ़ार छान माहिति दिलित तुम्हि. फ़क्त शाहु राजेंच्या संदर्भात एक गोष्ट सुचवाविशि वाटते. वयाच्या २.५ वर्षांपासुन ते मुघलांच्या कैदेत वाढलेत. मुघल धर्जिणा मराठि राजा निर्माण करायचा याच एकमेव उद्देशाने औरंगजेबाने त्याना जिवंत ठेवले होते आणि या हेतुचि पुर्ति होइल अश्याच पध्धतिने त्यांचे पालन्-पोषण करण्यात आले होते ( almost like brainwashing in todays terms ). राजा होण्याच्या दृष्टिने त्यांच grooming झालच नव्हत. त्यांना स्वत:ला या गोष्टिचि जाणिव होति बहुदा म्हणुनच राज्यकारभार त्यानि पंतप्रधान पेशव्यांच्या हाति सोपवला. त्यांना पुण्यश्लोक अशासाठि म्हणतात कारण स्वभावाने ते अतिशय सज्जन आणि दानशुर होते (कदाचित आईकडुन मिळालेल्या संस्कारांचा परिणाम) पण चैनी आणि भित्रे हि होते.
|
धन्यवाद दिनेश, हो मराठमोळी, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. त्यांच ग्रुमींग तस झाल न्हवत पण हाता तोंडाशी आलेली हिंदुपतपातशाही दुरदर्शीपणाच्या अभावामुळे शाहुंनी घालवली. ते ह्या राज्याचे CEO होते. त्यामुळे मी त्यांचावर खार खाऊन आहे बाकी काही नाही. ते चैनी होते हे मात्र खरे, सर्व मोगल शोक त्यांना होते. बाजीरावा नंतर (ते वारल्यावर) नानासाहेबांना पेशवे केले जानार होते. पण तितक्यात सावकार बारामतकर जोशी (हे बाजीरावा च्या बहीनेचे पतीराज) त्यांना अप्रोच झाले व त्यांनी उंची वस्त्रे, स्त्रीया (बहुतेक १६) व भरमसाठ कर्ज मुक्ती देऊन ( कारण ते सावकार होते) पेशवाई ची वस्त्रे घेतली. ते ३ महीने पेशवे होते. नंतर बराच घोळ होऊन परत पेशवाई पेशव्यांना (नानांना) मिळाली. ह्या एकाच उदावरुन ते किती चैनी आहेत हे दिसुन येते. खास शाहुंवर नंतर एक दोन कथा लिहील्या गेल्या आहेत. त्या मी अजुन वाचल्या नाहीत. आपला ईतिहास मोठा विचीत्र आहे. एकाच वेळी अभिमान व लज्जा शरम ह्या दोन्ही भावना ईतिहास वाचताना येतात.
|
१८५७ चा जिहाद, लेखक शेषराव मोरे. मे मध्ये हे पुस्तक आले. घेतल्यावर लगेच वाचुन काढले. टायटल मध्येच पुस्तक वाचन्याची ईच्छा जास्त जाग़ृत झाली. जरा वेगळ्या angal ने बघीतले तर खरच तो स्वातंत्र सग्राम होता का परत एकदा ईस्लामी सत्ता स्थापण करन्यासाठी केलेला उठाव होता ह्या द्वंद निर्मान होते. मोरे हे सावरकरांचे अभ्यासक. त्यांचे शिष्य म्हणा हवतर. १८५७ च्या शिपायांचा बंडाला सावरकरांनीच स्वातंत्र लढा हे नाव दिले. (त्या आधी बंड म्हणुन ओळखले जायचे). त्यांचा शिष्याने त्यांचाच थेअरी ला छेद दिल्यामुळे पुस्तक वाचावे वाटले. ह्या विषयांवर अनेक मुस्लीम ईतिहास कारांनी पुस्तके लिहीली आहेत. ( तो जिहाद होता म्हणुन) पण एका ईतिहासकार नसलेल्या व्यक्तीचे हे पहीलेच पुस्तक. इतिहास आवडत असेल तर वाचुन बघाच.
|
या पुस्तकावर आनन्द हर्डीकरानी रविवार सकाळ मध्ये लेखमाला लिहून त्याचा जोरदार प्रतिवाद केलाय....
|
हो बराच गोंधळ निर्मान झाला होता. मी देखील त्यांचा मुलाखतीला गेलो होतो. तिथेही चर्चेचे रुपांतर भांडन्यात होत होते. ते मुद्दे खरे आहेत की नाही यावर वाद होऊ शकतो. कारण आधी लिहील्याप्रमाने ते ईतिहासकार नाहीत पण त्यांनी बर्याच पुस्तकांचा अभ्यास केला आहे असे नंतरच्या तळटिपांवरुन दिसते. अशाच त्यांचा दुसर्या एका पुस्तकाने गोंधळ घातला होता (नाव नक्की आठवत नाहीय) एकुनच वादग्रस्त पुस्तक लिहीनारी व्यक्ती आहेत ते असे वाटतेय.
|
बरोबर आहे तुमच केदार, आपला इतिहास वाचताना एकाच वेळि शरम आणि अभिमान दोन्हिचा अनुभव येतो.
|
Farend
| |
| Wednesday, July 11, 2007 - 8:01 pm: |
| 
|
त्या १८५७ च्या युद्धाबद्दल नुकतेच Time मधे हे वाचल्यावर आश्चर्य वाटले होते, कारण मी पहिल्यांदा या दृष्टीकोनातून त्यावर लिहिलेले वाचले. या सगळ्याचा उगम कोणत्यातरी १-२ इतिहासकारांच्या लेखांत असावा असे वाटते. RH ते सकाळमधील लेख साधारण केव्हाचे आहेत?
|
Zakki
| |
| Thursday, July 12, 2007 - 3:02 pm: |
| 
|
सर्वप्रथम मी हे नमूद करतो की १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामाला इस्लाम जिहाद म्हणणे हा त्या युद्धात लढलेल्या सर्वांचा घोर अपमान आहे. जिहाद नि ते युद्ध यांच्या हेतूं मधे जमीन अस्माना इतके अंतर आहे. आजकाल मुसलमानांवर सर्व अ - मुस्लिम लोकांचा रोष असल्याने, 'हे मुस्लिम असलेच, १८५७ मधेहि त्यांनी तेच केले' असे म्हणतील. उद्या पहिल्या नि दुसर्या महायुद्धात जे मुसलमान लढले तेसुद्धा जिहादच करत होते म्हणायला हे लोक कमी करणार नाहीत. खर्या खोट्याची चाड एकूणच कमी असते अशा लोकांना, मग देतात दडपून!
|
तो मुस्लिमांचा जिहाद वैगैरे नव्हता तेव्हा तो शब्दही नसावा त्या संग्रामाला अनेक कारने आहेत तेव्हा मात्र हिंदु मुस्लिम सैनिक इग्रजांविरुध्द एक झाले होते
|
जीहाद हा श्ब्द निर्मान होऊन १६०० वर्षे झाली आहेत. झक्की बरोबर आहे आजकाल कशालाही जिहाद म्हनतील. लेखकाने ते टायटल जानीवर्पुर्व दीले असनार याद वादच नाही. ह्या वर डॉ. आंबेडकर काय म्हणतात ते पाहु या. १८५७ चा उठाव हा वस्तुत मुस्लीमांनी ब्रिटीशां विरुध्द केलेला जिहाद होय. हा उठाव काही दशकांपुर्वी सय्यद अहमद यांनी ब्र्टीश अमंलामुळे भारत हा दार्-उल्-हरब झाल्याचा प्रचार करुन जे आंदोलन सुरु केले त्याचे पुनरुथान होते. हा उठाव म्हणजे भारताला दार उल ईस्लाम करन्यासाठी मुस्लीमांनी केलेला प्रयत्न होता. (डॉ आंबेडकर पाकीस्थान व्हॉल ८, पृ.२९५) बाबासाहेबांनी फार जानीवपुर्वक जेहाद हा शब्द लिहील आहे. ते हिंदुत्ववादी नसल्यामुळे निदान त्यांचा लिखानावर ईतर लोक तो शिक्का मारनार नाहीत. ह्या सय्याद अहमद चा साथीदाराने पार्शीया च्या राजाला भारतावर आक्रमन करन्यासाठी बोलावले. तो तेथुन निघाला पण अफगानातच आडकळ्यामुळे त्याला वेळेवर दिल्ली ला येता आले नाही ही वस्तुस्तिथी आहे. ब्रिटीशांना पाहीजे तेवढा वेळ मिळाला व त्यांनी परत सर्व काबीज केले. त्या राजाचा जाहीरानामा कोणत्याही ग्रथालयात वाचता येईल. त्यात काय लिहीलेले काय ह्यावरुन भारत परत एकदा ईस्लामी सत्तेला तोंड देनार होता याद वादच नाही. अर्थात ह्या वरुन त्या लढ्याच्या मला वाटनार्या आपुलकीच्या भावना कमी होतील असे नाही. ना ही मी पुर्ण पणे त्याला जिहाद मानतो. ह्यावर आता जास्त शोध घेतला पाहीजे, त्या साठी ईतर ईतीहास कारांचे पुस्तक देखील वाचावे लागतील (खास करुन १८५७ ह्या विषयावर).
|
|
|