Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 23, 2006

Hitguj » Language and Literature » पद्य » कुसुमाग्रज » Archive through October 23, 2006 « Previous Next »

Me_anand
Tuesday, November 29, 2005 - 2:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Amit, मिळालि तर बघ

Sakheepriya
Tuesday, November 29, 2005 - 7:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

You will find it here:

म्यानातून उसळे..

Amitpen
Tuesday, November 29, 2005 - 7:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सखीप्रिया, हि इतकी जुनी लिंक तू कशी काय शोधुन काढलीस??...थॅंक्स!

Sharmila_72
Tuesday, November 29, 2005 - 9:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उष:काल

झाला उष:काल राणी !

हिमबिंदू बिलगुनी फुलांना पानांना बसती
हलती हळु वार्‍यावरती
जोजवती जणु नवथर बाला ही बाळे चिमणी
झाला उष:काल राणी !

निळवंतीच्या फुलू लागल्या कळ्या कुंपणावरी
येऊनी रात्रीच्या प्रहरी
परत जायचे विसरूनि गेल्या वनदेवी कोणी
झाला उष:काल राणी !

माणिकमोत्यांची पायाशी घालुनि बरसात
बसे संन्यस्त पारिजात
वाहु लागला सुगंध वारा तो वातावरणी
झाला उष:काल राणी !

वनराईतुन उठू लागली करीत किलबिल ती
पाखरे, अन गगनी जाती
सोन्याच्या दर्यात गलबते जणु गोजिरवाणी
झाला उष:काल राणी !

इंद्रनील ओटीत घेउनी शिंपीत भवताली
आली निर्झरणी, आली
खळाळते खडकावर हंसापरी शुभ्र पाणी
झाला उष:काल राणी !

किनारती कनकाच्या धारा उदयगिरीवरती
जगावर अभिनव ये क्रांती
समूर्त झाली महाकवींची काय दिव्य वाणी
झाला उष:काल राणी !

स्वप्नांचा खजिना घेउनी लगबगिने रात्र
गेली, चुकोनिया मात्र
उषास्वप्न हे उरले मागे तुजसाठी रमणी
झाला उष:काल राणी !


Me_anand
Tuesday, November 29, 2005 - 6:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थॅंक्स प्रिया, ग्रेट आहेस.... मी बरेच दिवस ही कविता शोधत होतो...

Swapnapurti31
Tuesday, December 20, 2005 - 10:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वप्ननगरच्या सुन्दर माझ्या राजस राज्कुमारा



स्वप्ननगरच्या सुन्दर माझ्या राजस राज्कुमारा
अपार माझ्या काळोखाला,दिलास जीवनतारा//
सुन्दर आता झाली धरती
सुन्दर नभ ही वरती,
वैराणावर उधळीत आला श्रावण सुन्दर मोती
मनात माझ्या मोरपिसान्चा फुलला रंगपिसारा
रात्र एक मी अथान्ग होते,
नव्हता दीप उशाला,
जागहि नव्हती,नीजही नव्हती,नव्ह्ता अर्थ कशाला
हारपलेल्या या नौकेला, गवसे आज किनारा


Iravati
Saturday, January 21, 2006 - 11:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



Iravati
Saturday, January 21, 2006 - 11:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message




Supriyaj (Supriyaj)
Wednesday, October 17, 2001 - 1:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Sarnar kadhi ran Prabho tari
he kuthvar sahu ghav shiri!

Pawankhindit paul rovun
Sharir pinje to kele Ran
Sharnagaticha Akher ye khshan
Sharnagaticha Akher ye khshan!
Bolvashil ka ata tari!

Disu lagle Abhra sabhoti
Vidirna zali jari hi chati
Ajun jalate aantarjoyi
Ajun jalate aantarjoyi
Kasa savru deh pari!!

hoy tanuchi keval chalan
Pran udaya baghti tyatun
Mitnya zale Adhir lochan
Mitnya zale Adhir lochan
khadga galale bhumivari!!

geetkar: kusumagraj
music: Hridaynath Mangeshkar
gayika: Lata Mangeshkar


Ajaykulk
Tuesday, March 07, 2006 - 10:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

घनधार म्रुगाचा प्राशुनिया पर्जन्य
त्या त्रुशार्त भू वर आले नव चैतन्य
उन्माद चढे तो दर्प दरवळे भवती
थरथरा कापली वर दर्भान्ची पाती
ते सुस्त धुलिकण गाउ लागले गीत
कोलाहल घुमला चहूकडे रानात

अभिमानी मानव आम्हाला अवमानि
बेहोश पावले पडति आमुच्या वरूनी
त्या मत्तपदान्ना नच जाणिव अजुनी
कि मार्ग शेवटी सर्व मातिला मिळति
मातीवर चढणे एक नवा थर अन्ति


Poojas
Saturday, May 20, 2006 - 5:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'' बंडखोर...''

बंडखोर हे असेच येती तृणापरी वेदीवर जळती
त्या ज्वलनाने जीर्ण भवाला नव्या युगाचा प्रकाश देती.

बंडखोर हे असेच जगती मरण ललाटावरती घेउन
ना दिसते ना असते त्यास्तव समिधेपरि हे अर्पित जीवन.

पृथ्वीवर येण्यापूर्वी हे सोमसुरेचा पितात पेला
दिव्य कैफ तो उरतो आत्मा अर्थ न राहे शरीरतेला.

निजकाळाच्या कुशीमधे हे सलती खुपती शुलाप्रमाणे
नगर शिवेवर निवास यांना सीमाशासित खलाप्रमाणे.

हे अनयाचे आक्रमणाचे दास्याचे जुलुमाचे वैरी
लौकिक धन वा विश्रांती ना उभी राहती त्यांच्या द्वारी.

बंडखोर हे असे कलंदर जनात राहुनि हे वनवासी
ईश्वर जेथे भुलतो चुकतो सावरती हे तिथे तयासी..


( ''स्वागत'' )


Ajjuka
Monday, August 14, 2006 - 5:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजयकुल्क, हि पुर्ण कविता वरच्या कुठल्यातरी archives मधे आहे. पण हे खालचे कडवे नाहीये त्यात. मलाही पूर्ण आठवत नाहीये. कोणीतरी पूर्ण करा.

कित्येक सिकंदर जग जिंकुनिया गेले
कित्येक मनू अन् मुनी धुळीने गिळले
----
----
मातीवर चढणे एक नवा थर अंती.

असो..

मी वेगळ्याच कारणासाठी इथे आले.
कुसुमाग्रजांची 'झाड' आणि अजून एक कविता जिची सुरुवात 'माझ्या गीताचे धृवपद'.. तत्सम आहे त्या २ कविता शोधतेय.
'झाड' ची सुरुवात
'मध्यरात्रीच्या भयाण शांततेत... '
अशी आहे तर शेवट
'आयुष्यात पहिल्यांदाच
दिलासा वाटला मला
की मी पक्षी नाही.'
अशी आहे.

जर कुणी हे शोधून देउ शकाल तर बरे होईल.


Manishalimaye
Monday, August 14, 2006 - 7:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नीरजा - " मातीची दर्पोक्ती " या कवितेतील ते कडवे पुढील प्रमाणे---[ते व्याकरणाच्या दृष्टीने योग्य आहे. सिकंदर हा शब्द शिकंदर असा आहे. मनू अन मुनी[येथे 'अन' चा पाय मोडावा- मला तसे लिहीता येत नाह्वी.]]

"
कित्येक शिकंदर जग जिंकुनिया गेले
कित्येक वाल्मिकी अखेर इकडे आले
कित्येक मनू अन मुनी धुळीने गिळले
स्मृतितीलहि त्यांच्या ओळी अंधुक होती
मातीवर चढणे एक नवा थर अंती! "

संपुर्ण कवीता नऊ कडव्यांची आहे ती "विशाखा" मधे आहे

मनिषा


Ajjuka
Monday, August 14, 2006 - 6:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिकंदर हे व्याकरणाच्या दृष्टीने योग्य कसे काय ते कळले नाही. पण मी प्रयोगात हे कडवे म्हणायचे आणि तेव्हा तरी दुबेजी आम्हाला सिकंदरच म्हणायला लावायचे. असो.. धन्यवाद!

Manishalimaye
Tuesday, August 15, 2006 - 3:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नीरजा, विशाखा या काव्यसंग्रहात तो शब्द 'शिकंदर' असाच आहे. म्हणून मी तसे म्हटले. तू दुबेजींची विद्यार्थिनी आहेस का? मीही त्यांचीच विद्यार्थिनी आहे.तुझे नाव काय?

Bee
Tuesday, August 15, 2006 - 4:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'झाड' मला अजून मिळाली नाही. कविता खूप सुंदर वाटते आहे. मी इथल्या चार दोन कविताप्रेमींना मेलवरून ही कविता हवी आहे असा एक प्रयास केला आहे. बघू या..

Bee
Monday, August 21, 2006 - 6:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, माझ्या एका वडीलधार्‍या मित्रानी तुला हवी असलेली 'झाड' कविता पाठवली आहे. ही घे..

झाड

एकदा
मध्यरात्रीच्या नीरवेतून
मी ऐकला होता एक भयानक चीत्कार
पलिकडच्या परसात असलेल्या
एका वृक्षाच्या काळ्याशार पानघुटमटातून
उफ़ाळलेला.

कोणत्या तरी पक्षाची प्राणान्तिक किंकाळी
जी फ़ोडीत गेली दहा दिशांच्या
तटस्थ तावदानी काचा,
भ्रमिष्टपणाने धावली सैरावैरा अंतराळात
आणि कोसळली पुन्हा
चेंदामेंदा होऊन
त्याच वृक्षाच्या फ़ांद्यांतून साचलेल्या
काळोखाच्या तळ्यामध्ये.

नंतर त्या किंकाळीला फ़ुटत होते धुमारे
चिणलेल्या पण तीव्र स्वरांचे,
रात्रीच्या केसाळ काजळी त्वचेमध्ये
घुसत होते अनकुचीदार झटके
फ़ांद्यांतून फ़ुटणार्‍या अपस्मारांचे.

सार्‍या जगाबरोबर झोपी गेलेले ते झाड
अकस्मात झाले होते जागे
कोठल्या तरी दानवी अत्याचाराने,
आणि झाले होते स्वतःच
एक अगतिक वेदनेचे वारूळ
पृथ्वीच्या छातीतून उमाळलेले
आणि शृतिहीन आकाशाला
हाक मारणारे.
देव जाणे काय घडले असेल
त्या पानांच्या दुनियेमध्ये.
आले असेल एखादे जहर काळे रानमांजर
अमावास्येच्या योनीतून बाहेर सरपटलेले
क्रूर चमकत्या नजरेतून ठिणग्यांचे बुंद डाळणारे
एका फ़ांदीवरुन दुसर्‍या फ़ांदीवर
ललसत्या नखाळ पंजांनी चडणारे.

त्याने अचानक अखेरच्या तळावरुन
घेतली असेल उशी टाकली असेल झेप
उषःकालाचे राजवर्खी स्वप्न पाहणार्‍या
एखाद्या निद्रिस्त
गोजिरवाण्या पाखरावर.

मृत्यूच्या करवती दातांत जागृत झालेल्या
त्या पाखराने
फ़ोडली असेल पहिली भीषण किंकाळी
आणि तुकड्यातुकड्याने शरीर फ़ुटत असताना
घातल्या असतील त्या व्याकूळ विझणार्‍या हाका
भोवतालच्या विश्वाला.

नसेल रानमांजर असेल कदाचित घुबडही
असेल कदाचित एखादा अजगरी सर्प
कृतान्ताचे विळखे घालीत बुंध्यावरुन सरकणारा,
असेल काहीही;

पक्षा-ऐवजी कुरतडली गेली असतील
कदाचित त्याची पिलेही,
पण एक खरे की त्या दहा मिनिटांच्या काळात
परिसरातील एकाही वृक्षाचे
एकही पान हालले नाही,
काहीही शहारले नाही, काहीही उसासले नाही
क्षणार्धात झाले पुन्हा सारीकडे
शांत्--शांत!

दूर झालो मी खिडकीपासून
पुन्हा मोठा केला रेडियोचा मंदावलेला गाज
आणि शिलगावला मेजावरचा दिवा.
कोठल्या तरी केंद्रातील विलायती संगीताच्या
इंद्रमहिरापी उभ्या राहिल्या
माझ्या खोलीतील विषण्ण हवेवर,
आणि प्रकाशाच्या सोनेरी रेषांनी
त्यांना मिठी मारली
माहेरवासी अधीरतेने;
सावल्यात साखळेल्या भिंती मुक्त झाल्या
त्यांनी धारण केले प्रचंड आकार पहाडासारखे
आणि उभे केले क्षाणार्धात माझ्या सभोवार
एक स्नेहमय
शक्तिशाली आश्वासन.

...आयुष्यात पहिल्यांदाच
दिलासा वाटला मला
की मी पक्षी नाही.

कवितासंग्रह्: रसयात्रा
पान क्रमांक १९२ ते १९४

मुक्तायन संग्रहातही 'झाड' नावाची कविता आहे. तू इथे काही ओळी दिल्यात म्हणून बरे झाले.


Ajjuka
Tuesday, August 22, 2006 - 5:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

dhanyavaad re Bee.. ata print karun ghete ani Dubejinna dete..

Ajaykulk
Sunday, September 17, 2006 - 9:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी शब्दान्च्या घालून बसतो अमाप राशी,
जखमी होता धावत जातो शब्दान्पाशी,
शब्दच आत मालक झाले सर्व जिण्याचे,
जनावराने काबिज केला हा दरवेशी...........
=================================
ऊगवति चे उन्ह आत मावळतीला पोचले आहे,
मार्गक्रमण मार्गापेक्शा स्मरणात अधिक साचले आहे,
तक्रार नाहि खन्त नाही पूर्तिसाठीच प्रवास असतो,
केन्व्हातरि मिटण्या साठीच काळजामधला श्वास असतो


Sarangi
Monday, October 23, 2006 - 7:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

can anyone send me "aawadto maj afat sagar"




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators