|
Zakasrao
| |
| Wednesday, July 04, 2007 - 8:37 am: |
| 
|
पुनम जर संभाजी मिळाल विश्वास पाटलांच तर वाच. त्यानंतरच म्हणशील तर राजराम महाराज आणि मधले लोक ह्यांच आपण काहीच नाही शिकलो इतिहासात. त्यानंतर पेशवेशाहीच आली. ना. स. इनामदार यांची पुस्तके मिळाले तर पहा. आणि जर एकत्र कुठे काही सापडल तर मलाही कळव.
|
पुढे मराठेशाहीचं काय झालं? कोणी सांगू शकेल का की 'छावा' नंतर काय वाचावे? >>>>> अनुक्रमे राऊ, मंत्रावेगळा, पानिपत, स्वामी ह्या इतिहास कथा वाच. पण त्या झाल्या कथा. तुला खरच त्याकाळच्या ईतिहास, समाज व्यवस्था, अशावर वाचायचे असेल तर अ रा कुळकर्णी व खरे या दोघांनी मिळुन मराठ्यांचा ईतिहास ( खंड १ ते ३) लिहीले आहेत ते वाच अतिशय सुंदर विवेचन. तसेच गो स सरदेसाई यांनी महाराष्ट्राचा ईतिहास (खंड १ ते १२) लिहीले आहेत ते देखील वाच. (बरेच ईतिहासकार, कथाकार या खंडाना रेफरन्स मानुनच त्यांचे पुस्तक लिहीतात.) झकास, खर तर राजाराम च कार्य ( ताराबाई) मोठ आहे. त्या काळात राज्य हे एक दोन जिल्ह्यां ईतकच राहील. राजाराम ला जिंजीला पळुन जावे लागले पण तरिही हे राज्य मराठ्यांच्या मनात टिकल्यामुले परत एकदा प्रदेश जिंकायला वेळ लागला नाही. तु देखील अ रां चे खंड वाच तुला जास्त माहीती मिळेल. ( ते एकत्र असल्यामुळे लिंक तुटत नाही).
|
Farend
| |
| Wednesday, July 04, 2007 - 7:11 pm: |
| 
|
केदार ते १२ खंड वाले 'मराठा रियासत' का? वाचायला पाहिजे. श्रीमान योगी, स्वामी, छावा वगैरे कथा कादंबरी टाईप जास्त वाटतात. मला राजा शिवछत्रपती जास्त आवडले. svalekar जाधवांचा वाडा बद्दल जरा अजून लिही ना. कशाबद्दल आहे? इतिहासाबद्दल मराठीत (किंवा इतर भाषांत सुद्धा) असलेल्या पुस्तकांत माहीत असलेल्या पुराव्यांवरून रचलेल्या कथा आणि इतिहासातील एका व्यक्तीला कथानायक मानून बरेच गुण त्याला चिकटवून रचलेल्या कथा असे दोन्ही प्रकार दिसतात.
|
हो ती रियासतच. त्यामुळे गो.सं ना रियासतकार सरदेसाई हे नाव पडले. मला ही कांदबर्या वाचायला आवडत नाहीत कारण त्या, त्या व्यक्तीलाच केंद्रीत करुन लिहीलेल्या असतात. पण बर्याच जनांना रुक्ष ( म्हणजे सन वार ई) ईतिहास वाचायला आवडत नाही त्यांचा साठी गोडी निर्मान व्हायला कादंबर्या बर्या पडतात. शिवाजी वरचे सर्वात चांगले पुस्तक म्हणजे बाबासाहेब पुरंदरे लिखीत्त राजा शिवछत्रपती हे माझेही मत आहे. रियासत आता बहुतेक विकत मिळत नाही कारण आऊट ऑफ प्रिंट. पण माझ भाग्य म्हण्जे माझ्या मामा कडे सर्व खंड आहेत व ते ईथे येन्या आधीच वाचुन झालेत.
|
Psg
| |
| Thursday, July 05, 2007 - 4:45 am: |
| 
|
केदार, खूप खूप धन्यवाद. पुणे मराठी ग्रंथालयात मिळतील बहुदा ही पुस्तकं. नक्कीच वाचायचा प्रयत्न करीन. नाहीतर 'राऊ' वाचूनही बरेच दिवस झाले. पण जाता जाता एक quick update दे ना प्लीज.. संभाजीला कैद होऊन त्याला मारल्यानंतर मराठेशाहीचे काय झाले? औरंगला अधिपत्य असे मिळालेच नाही ना कधी मराठ्यांवर? संभाजीचा मुलगा 'शिवाजी'ला नंतर गादीवर बसवले का? का राजारामला छत्रपति केले? आणि संभाजीची दुसरी पत्नि- दुर्गा आणि तिचे दोन मुलगे जे कैदेत होते त्यांचे काय झाले पुढे?
|
Zakasrao
| |
| Thursday, July 05, 2007 - 6:41 am: |
| 
|
पुनम माझ्या माहितीप्रमाणे लिहितोय. औरंगला असे अधिपत्य नाही मिळाले. त्यानंतर संताजी धनाजी ह्या जोडगोळीने गनिमी कावा वापरुन त्याला सळो की पळो करुन सोडले. त्यातच तो म्हातारा होता आणी त्याच्या मागे त्याच्या मुलानी पुढचा सम्राट कोण ही भुणभूण. नंतर मला वाटते की राजाआम यानाच राज्याभिषेक केला होता. वरती केदारने लिहिल्याप्रमाणे राजराम याना जिंजीला पळुन जावे लगले. त्यावेळी औरंगने रायगड देखिल जिंकला अस मी वाचलय बहुतेक. नंतर राजाराम आणि संताजी धनाजी यानी बरीच कामगिरी केली. अर्थात त्यात राजाराम यांच्यापेक्षा साथीदार यांच कर्तूत्व जास्त. आणि त्याना साथ मिळाली ती राजाराम यांची पत्नी हंबीरराव मोहिते यांची मुलगी ताराराणी. राजाराम यांचा कालखंड कमी राहिला. त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा लहान असतानाच त्याना राज्याभिषेक केला. आणि ताराराणी राज्यकारभार बघत होत्या. औरंग ने संभाजी राजांच्या पत्नी आणि त्यांचा मुलगा शाहु याना पकडुन नेले होते त्याना महाराष्ट्रात फ़ुट पाडण्याच्या द्रुष्टिने औरंग च्या मुलानी सोडुन दिले. आणि इकडे दोन गाद्या सुरु झाल्या. एक कोल्हापुर मधे ताराराणी यानी केली आणि दुसरी सातार्यात संभाजींचा मुलगा शाहु यानी. याच शाहु यानी बाळाजी याना पुण्यात पेशवा म्हणुन नेमले आणि पेशवाइ सुरु झाली. कोल्हापुर मधे ST STAND ला जाताना एक घोड्यावर एका स्त्रीचा पुतळा आहे तो महाराणी ताराबाई यांचा. पुढे त्यांचे वंशज हे दत्तक वै. आलेले आहेत. जे शाहु महाराज खुप प्रसिद्ध आहेत ते ही दत्तकच आहेत. पण त्यानंअतर कोणी दत्तक नाही. सध्याचे वंशज हे मालोजीराजे हे आम्दार आहेत सध्या. त्यांचा कसबा बावडा येथे राजवाडा आहे. तिथेच म्युजियम आहे. जे सातार्याची गादी होती तिथे मात्र शिवाजी राजांच वंश आहे. तिथले ही सध्याचे वंशज म्हणजे उदयन राजे भोसले आणि एकजण आहेत ते ही राजकारणात आहेत. केदार तुझे बरोबर आहे. राजा शिवछत्रपती मी ही वाचलय. त्यात जरा जास्त डिटेल्स आहेत. सगळ्या मोहिमा पण व्यवस्थित आहेत. ही वरची माहिती मी माझ्या वाचनातुन मिळवलेली आहे. आणि ती अगदी अचुकच आहे असा दावा मी करत नाही. मी अजुन केदारने सांगितलेली पुस्तके नाहीत वाचली त्यात अजुन माहिती मिळेल.
|
Ajjuka
| |
| Thursday, July 05, 2007 - 11:11 am: |
| 
|
पूनम, पुणे मराठी ग्रंथालयात संदर्भग्रंथात मिळतील. भारत इतिहास संशोधक मंडळात पण मिळतील. माझ्याकडे २ च आहेत. सगळे खंड नाहीयेत. राऊ काय किंवा छावा किंवा अगदी श्रीमान योगी... फ़ारेंद म्हणतो तशी ती इतिहासावर आधारीत आहेत. ऐतिहासिक दृष्ट्या संपूर्ण निर्दोष असतीलच असे नाही.
|
संभाजीला कैद होऊन त्याला मारल्यानंतर मराठेशाहीचे काय झाले?>>>>> झक्कस ने लिहीलेलेच आहे पण त्यात थोडी भर, संभाजी ला त्याचा कबील्या सोबत नेले. त्याला मारल्यावर देखील शाहु ला (मुलगा) कैद करुन ठेवले. त्याचा आधीचा मुलगा मदनसिंग व पत्नी दुरगा बाई (संभाजी च्या) हे देखील कैदेतच होते. शाहु सोबत यांना पण सोडन्यात आले. मदन्सींह ने तसे काहीही केले नाही त्यामुळे तो आहे हेच लक्षात राहात नाही. तो शाहु सोबत होता. ईकडे संभाजी गेल्यावर लगेच प्रधानमंडळाने राजाराम ला गादीवर बसवीले. नेमके त्याच काळात निजाम देखील जोर धरु लागला. राजाराम ने एक युक्ती लढवली. ती म्हणजे प्रत्येक सरदार (प्रधान्मंडळ) स्वत ची सेना ठेवु शकत होता व पाहीजे ते धन व रसद त्याचा कार्यक्षेत्रातुन गोळा करु शकत होता. (पुढे त्यामुळेच पेशवे छत्रपतींना भारी झाले). ही योजना जरी वेगळी वाटली तरी त्यामुळे झाले काय की प्रत्येक जनाला वाटले की " माझे राज्य " जाईल त्यामुळे ते मुस्लीम आक्रमना विरुध्द लढु लागले. राजाराम जिंजी ला गेला त्याचा मृतुनंतर ताराराणी की परत सातार्या ला आली व तिथे आजच्या काही जिल्ह्यांवर संताजी धनाजी च्या साह्याने राज्य करु लागली. ईतक्यात शाहु सुटला व वापस आला. तो राज्य परत वापस मागु लागला. (खरे तर आता ते त्याचे न्हवते कारण ते राखले होते ताराराणी ने) काही सरदार त्याचा विरोधात तर काही त्याचा पक्षात गेले. सातार्याच्या हद्दी वर एक मोठे युध्द होनार होते. यात पेशवे शाहु च्या बाजुने तर धनाजी हा ताराराणी च्या बाजुने लढनार होता. नेमके पेशव्यांनी धनाजी ला त्याचा ५००० सैन्यासहीत शाहुच्या बाजुने ओढुन घेतले व ते युध्द झालेच नाही. ताराराणी कोल्हापुरला पळुन गेली तर शाहु सातार्यात शिरला. (येथेच दोन गाद्या निर्मान झाल्या). बरेचद्या त्या दोन पक्षात अनेकदा छोट्या लढाया झाल्या कारन त्याकाळचे सेना प्रमुख दाभाडे ( तळेगाव दाभाळे वाले) व नागपुरकर भोसले हे ताराराणी कडुन होते. ते अनुक्र्मे माळवा (आजचा मध्य प्रदेश व विदर्म्भ येथे राज्य करत होते). पुढे पेशवे (बाजीराव) महा प्राक्र्मी निघाल्यामुळे सातार्याच्या गादीलाच मुख्य मानले जाउ लागले. (अतिशय शरमेचेई गोश्ट म्हणजे शाहु ने ओरंगजेबाअक्डुन पत्र आनले होते की तो वंशज आहे व त्याची गादी खरी आहे, हे खरच छत्रपतींच्याअ वशांला करायची गर्ज न्हवती). बाजीराव एकदा दिल्लीवर चालुन गेला तर शाहु ने तिथे अडवीले कारण त्याला मोगलांचा जिवनदानाच्या उपकारात राहाने पसंद होते. (जुने मोडु नये, नवे करु नये हे त्याचे ब्रिदवाक्य). नंतर पेशवेच भारी झाले व तेच छत्रप्तींना जुमनत न्ह्वते तरी मोठ्या घटनांसाठी जसे दुसरा पेशवा गादीवर बसने वैगरे ते तिकडे जात होते. नंतर छत्रपती शाहु ने ताराराणी ला सातार्याला अनले व तात्पुरती दिलजमाई झाली. ती तिथेच मेली. (साधारण ८० वर्श, एका पराक्र्मी स्त्री चा अंत झाला पण ती देखील विअर्य्र्ड होती कारण एकदा मध्येच तिने तोतया संभाजी (राजाराम चा मुलगा, नाव साम्य) उभा केला होत) या धामधुमीत रायगड वर निजामांनी कब्जा घेत्ला होता. पण सर सरदार हे सेल्स मध्ये लढत राहीले त्यांना बाजीरावाने एकत्र केले यात फार मोठा वाटा चिमाजी आपाचा होता (बाजीराव चा लहान भाउ). बाजीराव चा मुलगा नानासाहेब व चिमाजी चा मुलगा सदाशिवभाउ यांएई पानिपत ल्ढले. (पानिपत कांदबरी वाचच) सदाशिव गेल्यावर नानासाहेब पण गेले, माधवराव पेशवे झाले. आपल्या बापा व आजोबासारखे ते महा पराक्र्मी निपजले. (स्वामी). नंतर जे पेशवे झाले ते लढाया कमी व अय्याशी जास्त करत त्यामुले १८१७ ला मराठ्यांचे राज ऑफिईशियली संपले. (युनीयन झेंडा शनिवार वाड्यावर). थोरल्या शाहुंना वा ताराबाईला पुत्र न्हवता. जे आजचे वंशज आहेत ते दत्तक वंशज आहेत रक्ताचे नाहीत. यात अनेक डिटेल्स दिले नाहीत जसे माधवराव राघोबा चे युध्द, वैगरे, पण हा थोडक्यात ईतीहास. पेश्व्याचे सरदार नंतर त्यांना भारी झाले (होळकर, शिंदे) फालतु मोठेपणा घेन्याच्या सवई मुळे दिल्ली वर आपण राज्य करु शकत अस्ताना पण केले नाही, निजामाला ढुळीला दोनदा मीळवले होते पण परत त्याने तोंड वर केले, रक्ताच्या नात्यानींच गोंधळ घातला व राज्य नष्ट झाले. राजाराम ने जे सेल्स मध्ये राज्य करन्याअचे योजले होते त्यामुळे राज्य राहीले पण नंतर शाहु ने ते परत एकत्र करुन एकछत्री अंमल केला असता तर सरदार भारी झाले नसते. शाहु हा योध्दा कमी व कॉटुंबीक माणुस जास्त होता. शाहु ला विरुबाई नावाची एक राख होती तिच खरे राज्य चालवी. जर शाहु ने योग्य वेळी खरा कंट्रोल घेतला असता व तिर्थरुप छत्रपतींची (शिवाजी) आठवन राखली असती तर कदाचीत आपले राज्य दिल्ली वर राहीले असते, दोन वेळी दिल्ली मराठ्यांकडे होती, वरचा पंजाब राघोबाने जिंकला होता पण दुरदर्शी पणाचा अभाव, त्यामूळे ते झाले नाही. पेशव्यांचा निदान ४ ते ५ पिढ्या पराक्रमी निघाल्यामुळे निदान मराठे शाही १८१७ पर्यंत टिकली तरी नाहीतर १७०० मध्येच अंत झाला असता. रीयासत मिळाली नाही तरी तु अ रांचे खंड वाच त्यात ईतर गोष्टी जसे सामाजीक जिवन, राज्याचे उत्पन्न, हे सर्व डिटेल्स आहेत.
|
Zakki
| |
| Thursday, July 05, 2007 - 2:39 pm: |
| 
|
मी आणखी एक वाचले. खरे खोटे माहित नाही. माझ्याजवळच्या एका पुस्तकात लिहीले आहे. त्या लेखकाचे नाव उद्या लिहीन. त्यात त्याने असे म्हंटले आहे की, पेशवेपदासाठी, भोसले व बाळाजी हे दोघे तोडीस तोड उमेदवार होते, पण बाळाजीला शाहूने निवडले म्हणून भोसले विदर्भात निघून गेले. पुढे स्वत:चे राज्य वाढवण्यासाठी भोसल्यांनी मुगलांच्या ताब्यात असलेल्या बंगालवर हल्ला केला. त्यावेळी मुगलाने शाहूला आठवण करून दिली की सुटका होण्याची अट म्हणून त्याने कबूल केले होते की तो मुगलांचा अंकित राहील, व मुगलांना मदत करेल, त्यांच्या बाजूने लढेल. म्हणून पेशव्यांनी भोसल्यांवर हल्ला करून त्यांना परतवले. दोन्ही सैन्यांनी बंगालमधे लूटमार केली. आजहि बरेच बंगाली या बाबतीत सर्वच मराठ्यांच्यांबद्दल जरा आकस बाळगून आहेत! धन्य तो शाहू नि पेशवे! एका हिंदूने, परकीय, मुसलमान असलेल्या लोकांसाठी, दुसर्या हिंदूशी लढावे! बरे मग बंगाल वर, पुढे पंजाबवर स्वत:ची सत्ता, control ठेवावे म्हणजे अब्दाली सारख्या लोकांना अटकेत वाटेतच रोखता आले असते. पुढे इंग्रजांना बंगाल गिळंकृत करण्यास सोपे पडले नसते! उलट असले धंदे केले की ब्राम्हण नि हिंदू धर्म यांच्याबद्दल लोकांच्या मनात एकदम द्वेष निर्माण व्हावा! अश्या गोष्टी वाचल्या की मन अगदी उद्विग्न होते!
|
झकास राव छान लिहिले आहे. तु कोल्हापुर सार्ख्या ऐतिहासिक ठिकाणी राहिलाय ही केव्हढी अभिमानाची गोष्ट आहे. झक्कि तुम्ही लिहिले तस बंगाली लोका बद्दल मी देखिल कुठेतरी वाचलय.
|
बरोबर आहे झक्की. त्यामुळेच मी खास नागपुरकर भोसल्यांचा उल्लेख केला. त्याने बंगाल जिकंला तर पेशव्याने फोजा नेऊन त्याला बुडविले (कारण परत शाहु महाराज़), तसेच पेशव्यांनी दाभाड्यांचा माळव्यावर पण हल्ला चढवुन गुजरात भागात राज्य विस्तार केला. ह्या दोन्ही मोठ्या लढाया होत्या. व दोन्ही एकाच राजाच्या दोन सरदारांनी लढल्या होत्या. ( शिवाजी महाराजांनी नक्कीच हे स्वप्न पाहीले नसेल.) एव्ढे होऊनही लोक शाहुला पुण्यश्लोक शाहु का म्हनतात याचा मला नेहमी प्रश्न पडतो. राघोबाने पजांब कब्जात घेतला तर त्याला फर्मान गेले की ईकडे यावे (पुण्यात) त्यांचा एक सरदार होळकर तर अजुनच भारी होता. राघोबाने नजिबाला मारायचे ठरविले तर होळकरांनी नजिब आपला मानसपुत्र आअहे म्हणुन जिवदान द्या ही गळ घातली. पुढे याच नजिबाने आपल्या मानस बापा च्या दिलेल्या वचनाला विसरुन अहमदशहाला दिल्ली वर स्वारी करन्यास आमंत्रन दिले व पाणिपत झाले. (होळकर पाणिपतावर पळुन गेले हे सांगनेच नको, बापाला दिलेले वचन पुत्राने (नजिब्या) असी निभावले. जर एकदिलाने काम केले असते तर पाहा मराठेशाही कशी राहीली असती. महाराष्ट्र उत्तर भारत पंजाब, अटक - पेशवे बंगाल, विदर्भ - नागपुरकर भोसले. माळवा, गुजरात - दाभाडे कर्नाटक (तंजावर, जिंजी व ईतर काही भाग) - खुद्द छत्रपती. येऊन जाउन दोन चार राज्ये राहीली असती, (राजस्थान वैगरे) म्हणजे सर्पुण भारतावर मराठ्यांची सत्ता (हिंदुपत्पात्शाही) राहीली असती. ते होने न्ह्वते. पण एकत्र होईल तो मराठी माणुस कसा? जर तर ला ईतिहासात काही स्थान नाही.
|
इव्हन पानिपतावर जाण्यापूर्वी उत्तरेत जे मराठी सरदार गेलेले होते त्यानी मोहीमात स्थानिक लोकाना खूप लुटले. त्रास दिला. म्हनजे लोकाना मराठे काय अन मोगल काय फरकच नव्हता. त्याचा परिणाम म्हणून पानपतात पराभव झालेल्या व सैरावैरा पळणार्या मराठी सैन्याला स्थानिक हिन्दूंनी आश्रय देण्याऐवजी यथेच्छ बडवूनच काढले...
|
रॉबीनहुड, त्याला दोन मोठी कारण आहेत. १. दिल्ली दरबारने चोथाई चा हिस्सा मराठ्यांना दिल्लीच्या सरक्षनासाठी देन्याचे कबुल केल पण तो कबुल केलेला हिस्सा त्यांनी बर्या बोलाने कधीही दिला नाही. शिवाय पेशव्यांनी असा हुकुम काढला की रसद मुलुखगिरी तुन पैदा करावी पण ती मिळत नसल्यामुळे (मोगल देत नसल्यामुळे) लुटमार करने त्यांना प्राप्त झाले. शिवाय नानासाहेबाच्या कार्यकिर्दीत (पानपताच्या आधी) दोलतीवर खुप कर्ज होते त्यामुले ते पैसे देऊ शकत न्हवते. लुटमारी ला पर्याय न्हवता. २. पेशव्यांनी उत्तरेच्या राजकारनात धर सोड करावयास सुरु केली. राजस्थान मध्ये जे भाउ बंदकीचे भांडन आधी मोगल सोडवायचे ते पेशव्यांनी सोडवायला सुरु केले. एका वेळेस सासर्या जावयात लागलेल्या युध्दात एकदा शिंद्यानी सासर्या ची बाजु घेतली (पैसे घेऊन) होळकरास ते सहन न झाल्यामुळे त्यांनी जावयाची बाजु घेतली. (परत पैसे घेऊनच). म्हनजे असे वाटु लागले की पैशा साठी मराठा लोक काही ही करतील. सारखी लुटमार व धरसोडी मुळे उत्तरेचे राजकारण बिघडले. नाहीतर पानपताच्या बेळी सुजोद्दोल्ला मराठ्यांची बाजु घेता घेता अहमदशहाला मिळाला. तो जर आपल्याला मिळाला असता तर भारी पडले असते. आपले सैन्य उपाशी पोटी लढले व होळकरांनी आधीच बाजु सोडल्यामुळे आपण हारनार ही अफवा उठली. शिवाय सदाशिव भाउ ने हुजुरातीला लोकर युध्दात लोटले. दुपार पर्यंत आपण युध्द जिंकत होतो पण अचानक अहमदशाने राखीव फोज आनल्यामुले आपली दानादान उडाली.
|
त्याकाळचे पेशवे, भोसले, दाभाडे, बाजीराव, ताराबाई, शाहू म्हणजे आजचे ठाकरे, पवार, मुंढे, भुजबळ प्रतीभाताई, शिवाजीराव, सुशीलकुमार, विलासराव, माधवराव, वसुंधराराजे इत्यादी समजावे का??? जर त्याकाळी मराठ्यांनी दिल्ली राखली असती आणि इंग्रजांना भारतावर राज्य करु दिले नसते तर आजचा भारत कसा असता?? त्यात महाराष्ट्र हे राज्य असते का? त्यावेळी भारत हा भारत होता का आणि महाराष्ट्र हे महाराष्ट्र होते का? राजवट पेशव्यांची असो की निजामाची.. सामान्यजनांवर त्याचा काय फरक पडायचा? आणि ' पण एकत्र होईल तो मराठी माणुस कसा? ' हे विधान मला वाटते सर्वच राज्यकर्त्यांना लागु होते.. जेव्हा राज्य करण्याचा प्रश्न येतो तेव्हा मुलगा बापालाही कैदेत टाकण्यास / मारण्यास मागेपुढे पहात नाही..
|
Zakki
| |
| Thursday, July 05, 2007 - 7:06 pm: |
| 
|
दीपस्तंभ यांचे प्रश्न छान आहेत. श्री. जयंतराव नारळीकरांनी यक्षाचे देणे का असे काहीतरी पुस्तक लिहीले आहे. त्यात त्यांनी Catastrophy theory सांगताना एक गोष्ट लिहीली आहे. त्यात त्यांनी कल्पना केली आहे की पेशवे पानिपतात जिंकले. मग पुढे काय काय झाले असावे ते त्यांनी कल्पनेने लिहीले आहे.
|
Zakki
| |
| Thursday, July 05, 2007 - 7:48 pm: |
| 
|
पानिपत नावाचे इतिहासावर आधारित प्रसिद्ध पुस्तक आहे. त्यातल्या गोष्टी ऐतिहासिक दृष्ट्या खर्या आहेत का माहित नाही, पण अतिशय मनोरंजक आहेत. त्या वाचून आधी खूप हसू नि नंतर रडू आले! त्यातल्या होळकरांसंबंधीच्या काही गोष्टी. शिंद्यांनी विचारले 'तुम्ही नजीबखान रोहिल्याला अभय का देता? त्याला मारून टाकायला श्रीमंतांनी सांगीतले आहे ना?' होळकर उद्गारले, 'शिंदे लहान आहात, राजकारण कळत नाही तुम्हाला. नजीबखान आहे म्हणून श्रीमंतांना आपली गरज आहे. त्याला मारला तर ही बामणं, आपल्याला मुळामुठेवर धोतर बडवायला ठेवतील.' २. होळकरांच्या पदरी गंगोबा नावाचा कारभारी होता. नजीबखानापेक्षा वाईट! त्याने जाटांना सांगीतले की आपण पेशव्यांच्या पुढे जाऊन दिल्ली काबिज करू, दिल्लीचे तख्त मी पेशव्यांकडून तुम्हाला मिळवून देईन. (मला तुम्ही करोडो रुपये द्या!) सूरजमल जाट फसला. पण सदाशिवभाऊंनी तो बेत उधळून लावला. मग सूरजमल चिडला नि म्हणाला मी पेशव्यांच्या विरुद्ध काही करणार नाही, पण लढायला मदतपण करणार नाही! ३. शेवटी होळकर पानिपतावरून 'पळून' आले नाहीत. परिस्थिती बिघडत चालल्याचे बघून ते पेशव्यांच्या नि सरदारांच्या बायकांना सुखरूपपणे दूर नेण्यासाठी स्वत:च्या संरक्षणाखाली घेऊन अब्दालीच्या तावडीतून सोडवून घेऊन गेले. कारण बाजारबुणगे काय लढणार डोंबल?
|
हा साराच इतिहास एकता कपुरच्या सिरियल्सपेक्षा रोचक आहे.. यावर मालिका काढता येईल.. मध्ये पृथ्वीराज चौहानची मालिका सुरु होती (अजुन चालु आहे का?). पण ते मला अरेबियन नाईट्स सारखे वाटले.. तथ्य कमी वाटत होते... झक्कींनी सांगीतलेले नारळीकरांचे पुस्तकही असेच रोचक असावे..
|
Zakki
| |
| Thursday, July 05, 2007 - 11:09 pm: |
| 
|
श. गो. कोलारकर हे त्या 'मराठ्यांचा इतिहास' नावाच्या पुस्तकाचे लेखक. मंगेश प्रकाशन, नागपूर येथून चतुर्थ आवृत्ति १९९५ मधे प्रकाशित केली. नारळीकरांच्या पुस्तकाचे नाव 'यक्षांची देणगी'. मौज प्रकाशन. ह्या पुस्तकात इतिहासासंबंधी फक्त एकच लेख आहे, पण बाकीचे सर्व लेख अतिशय वाचनीय आहेत.
|
Zakki
| |
| Thursday, July 05, 2007 - 11:27 pm: |
| 
|
माझ्या मते शाहू किंवा इतर सरदारांच्या हे लक्षातच आले नाही की मुसलमान हे 'परकीय' आहेत. त्यांचा येथील भूमीवर काऽहीहि हक्क नाही. एकूण हिंदू धर्म फारच सहिष्णू, जैन, बौद्धांना त्याने राहू दिले. पण मुसलमान धर्म म्हणजे काही औरच आहे हे त्यांच्या लक्षातच आले नाही. शाहू सुद्धा विसरला की त्याच्या वडिलांनी नि आजोबांनी हे ओळखले होते! त्यामुळे मुसलमान हे परके नसून भारतातलेच एक, एकेकाळी फार बलवान असलेले राज्यकर्ते आहेत अशी त्यांची भावना! नि हे राज्य त्यांचेच आहे, असे त्यांना वाटत होते. अगदी शिवाजीच्या आधी शहाजी सुद्धा अदिलशाहीत नोकरीच करत होता! त्यामुळेच औरंगजेबानंतर खिळखिळ्या झालेल्या मुगलांना उडवून देण्या ऐवजी मराठे त्यांच्या चाकरीतच राहिले! राष्ट्र, स्वधर्माचे रक्षण या ऐवजी ज्या पंढरीनाथाने शहाला हाकलून द्यायचे त्या ऐवजी त्याच्या तिजोरीत भरणा केला याचेच मराठी माणसाला कौतुक! त्यांनी जे केले त्यामुळेच आजकालचे लोक मुसलमानधार्जिणे आहेत! अगदी उघड उघड भारतविरोधी कारवाया करत असले, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले, तरी, त्यांना फाशी देऊ नये म्हणतात! पुरावाच खोटा म्हणतात! असेल एखादा भाग संशयास्पद, पण बहुतेक पुरावा त्याच्या विरुद्धच होता ना?
|
राजवट पेशव्यांची असो की निजामाची.. सामान्यजनांवर त्याचा काय फरक पडायचा?>>>. are you serious. बहुतांश मुस्लीम राजांनी हिंदु जनते वर कर लावले होते कारण ते हिंदु होते. जिझीया हे त्याचे प्रसिध्द उदाहरन. या बाबतीत राजे लिहीतात जर एखाद्या वर्षी दुष्काळ असेल तर तर त्या वर्षी चा सारा कुनब्याने पुढील वर्षी जमा करावा पण त्या साठी गावच्या कुलकर्ण्याने त्याची हत्यार, बैल व शेतीचे सामान हे जप्त करु नये. ज्या कोणाक्डे बैल नाही त्याने सरकार दरबारातुन बैल घ्यावा व त्या बदली काही रक्कम मोलाने द्यावी. ह्याच गोश्टींमुळे रामदासांनी त्यांना जानता राजा म्हणले. मोगलांचा काळात कुलकर्ण्यांना सारा advance मध्ये भरायला लागत असे त्यामुळे ते मग जुलुम करुन (दुष्काळ असला तरी) तो सारा वसुल करीत हा सर्वात मोठा फरक. शिवाय कुराणा प्रमाने मांडलिक राजा जर काफिर म्हणजे नॉन मुस्लीम असेल तर त्याने त्या पोटी दर वर्षी मोठी रक्कम अदा करायची. (जिंवत राहायचे असेल तर) सर्व सो कॉल्ड तिर्थस्थाने ही एकतर तोडल्या वा लुटल्या गेली होती. शिवाजी काळ ही त्याला अपवाद नाही. जेथे त्यांचे राज्य न्ह्वते तेथे अशाच ग़्हटना व्ह्यायचा. अपवाद मात्र भागानगर चा. (कुतुबशहा) कारण तिथे प्रधान हिंदु होते. (मादन्ना व आक्कन्ना) त्यामुळे तो प्रांत थोडा वेगळा होता. कर मुक्त राहायचे तर एकच उपाय बाटने. संभाजी राजांना बाटुन जिंवत राहाता आले असते पण त्यांनी ते केल नाही यातच काय ते समजा. त्यांनी एक चांगले उदा. घालुन दिले व परत एकदा मराठा राज्याची ज्योत विझता विझता तेवत राहीली.
|
|
|