Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 04, 2007

Hitguj » Language and Literature » इतर साहित्य » मी वाचलेले पुस्तक » Archive through July 04, 2007 « Previous Next »

Bee
Friday, June 01, 2007 - 7:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रीनी, मी फ़ूल्स डाय आणले आहे पण खूप बोर होत आहे gambling च्या त्या भागामुळे. पण तरीही पुढे जमेल तितके वाचून बघीन.

Bee
Friday, June 01, 2007 - 7:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असामी, माहिती छान दिली. पण एकंदरीत हा लेखक, त्याची पुस्तके जरा जड आहे कळायला असे उदाहरणदाखल्यावरून वाटते. धन्यवाद! जरा हलकेफ़ुलके पण तरीही रसाळ पुस्तकं सुचवू शकशील का?

शोनू, मी तुला metamorphosis संबंधीत एक मेल लिहिली. तुला मिळाली का ती मेल?


Adm
Friday, June 08, 2007 - 4:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नुकतच नेमसेक वाचलं... आवडलं... may be movie आधी पाहिल्याने जास्त आवडलं... आशिमा बद्दल वाचताना तब्बू डोळ्यासमोर येते...
झुम्पा लाहिरी ची आणखिन काही पुस्तकं recomended आहेत का?


Bee
Monday, June 11, 2007 - 6:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अविनाश धर्माधिकारी ह्यांचे 'अस्वस्थ दशकाची डायरी' हे पुस्तक कुणी वाचले आहे का? कसे आहे? जीडींनी ह्या पुस्तकाचा ईंग्रजी भाषेत अनुवाद केला आहे..

Mai
Wednesday, June 13, 2007 - 3:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिच ऍल्बोम यान्चे "टूजडेज विथ मोर्इ" कुणी वाचले आहे का? कसे आहे?

Bee
Wednesday, June 13, 2007 - 8:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणी खलिदचे The Kite Runner वाचले आहे का?

Asami
Wednesday, June 13, 2007 - 10:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला ते वाचायचे आहे.

Badbadi
Wednesday, June 13, 2007 - 11:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे इथे येऊन हे वाचलय का ते वाचलय का अस नका रे विचारत बसू.... जे काहि वाचलं असेल ते काय नि कसं आहे हे या बीबी वर अपेक्षित आहे. कृपया काळजी घ्या...
mods, pls delete this post if it is inappropriate here.

Chandya
Wednesday, June 13, 2007 - 2:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

The kite runner चांगली कादंबरी आहे. ह्याच लेखकाचे आता आणखी एक पुस्तक आले आहे A thousand splendid suns .

the bookseller of kabul हे पुस्तक देखिल वाचनिय आहे. लेखिका asne seierstad


Shonoo
Thursday, June 14, 2007 - 1:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


बी
मेल मिळाली. परन्तु मी कुणाचं भाषांतर वाचलं होतं ते आठवत नाहीये आता. माझ्या घराजवळच्या लायब्ररीत ते पुस्तक नाहिये. एखाद्या दुकानात जाऊन बघावे म्हणून विचार करत होते. पण अजिबात वेळ मिळत नाहीये सध्या. रामदास स्वामी स्वत: सावधान म्हणताच पळाले होते त्यांना प्रसंगी अखंडित वाचीत जावे असा उपदेश करणं सोपं होतं!
एकविसाव्या शतकातल्या संसारी बायांना ते जमवणं कर्म कठिण!

ट्युसडेज विथ मॉरी आवर्जून वाचण्याजोगे आहे. त्याच पुस्तकावरच चित्रपट पण पाहण्यासारखा आहे.

मला काइट रनर वाचायचे आहे, बरेच दिवस विचार करतेय. आता लायब्ररीतूनच आणून वाचावे लागेल.



Malavika
Saturday, June 30, 2007 - 2:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

A Thousand Splendid Suns आजच वाचून संपवले. मी Kite Runner वाचलेले नाही. त्यामुळे ह्या लेखकाचे वाचलेले हे पहिलेच पुस्तक. खूपच आवडले. लेखकाची शैली आणि भाषा सोपी आणि सरळ आहे.
त्याची वर्णन करण्याची हातोटी मला फार आवडली. स्थळाचे वर्णन वाचताना एखादे चित्र पाहिल्या सारखे वाटते.
काळाचा खूप मोठा आवाका आहे. त्यातून अफ़गाणिस्तानचा १९७० पासूनचा इतिहास लक्षात येतो.
वाचताना पुस्तक हातातून खाली ठेववत नव्हते.


Bee
Monday, July 02, 2007 - 8:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

...

मराठी साहित्यात 'शकुंतला' ह्या नावाची कुणी लेखिका आहे का? असल्यास पुर्ण नाव, जर माहिती असतील तर त्यांच्या पुस्तकांची नावं मिळू शकतील का?

धन्यवाद..


Badbadi
Monday, July 02, 2007 - 11:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मागच्याच आठवड्यात प्रिया तेंडुलकरचे "पंचतारांकित" वाचले. पुस्तक वाचनीय आहे. प्रिया तेंडुलकरची भाषा सुंदर आहे. वाचताना आपण समोर बसून बोलत आहोत इतपत जिवंत वाटतं. पण अनेकदा तिने ती खूप साधी मुलगी होती असं आव आणून सांगितल्याप्रमाणे वाटतं. ती दिसायला चांगली होती....आणि हे तिलाहि पूर्णपणे माहित असावं... पण हे पुस्तकात तिने कधीच मान्य केलं नाही.
या पुस्तकातला आवडलेला भाग म्हणजे "गोष्ट तिची" आणि "रजनीचे दिवस"!!!
पुस्तक वाचण्याजोगं नक्किच आहे.



Bee
Monday, July 02, 2007 - 11:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिया तेंडूलकर विषयीचे पोष्ट वाचून विजय तेंडूलकरांच्या कथा आठवल्या. कुणी वाचून पाहिल्यात का? सर्वच कथा नाही वाचल्यात पण ज्या काही वाचल्यात त्या खूप काही खास नाही वाटल्यात. त्यापेक्षा प्रिया तेंडूलकरांच्या कथा जास्त आवडल्या. विजय तेंडूलकरांच्या चित्रपट कथा मात्र छान वाटल्यात.

Manya2804
Monday, July 02, 2007 - 11:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"Tuesdays with Morrie - An Old Man, a Young Man and Life's Greatest Lesson" हे एक अप्रतिम पुस्तक आहे.

आयुष्याचा शेवट क्षणाक्षणाने जवळ येत असताना सुध्दा एक तत्वज्ञानाचा प्राध्यापक आपल्या शिष्याला जीवनाच्या अनेक महत्वाच्या गोष्टींबद्दल आपले विचार सांगतो अशी साधारण रूपरेषा आहे.

यातले वृध्द माॅरी हे एका असाध्य रोगाने आजारी आहेत. आपल्या मृत्यूशय्येवरुन ते जीवनाच्या अनेक अंगांकडे ज्या दृष्टीकोनातून बघतात ते अतिशय प्रेरणादायक आहे.

हे पुस्तक एकदाच वाचून हातवेगळे न करता पुन्हा पुन्हा वाचावे. दर वेळेला काहीतरी नवीन सापडतं.

शोनू यात नक्कीच भर घालू शकेल....


Paarava
Tuesday, July 03, 2007 - 11:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यांना नमस्कार. काही दिवसांपुर्वी "कश्मिरनामा" पुस्तक वाचले. नंदनवनाची यूद्ध भूमी कशी झाली व त्यावर चाललेले राजकारण चांगले दिलेले आहे. प्रत्येकने जरुर वाचवे. लेखक "सदानंद शेवडे" कीवा ''शेगडे' आहेत. आडणावा बद्द्ल क्षमस्व. नंतर कळवतो.

व. पुं. चे "महोत्सव" तर उत्तमच.
आणि पु. लं. चे "आपुलकि" सुद्धा छानच.

कुणी "व. पुं." ची चांगली पुस्तके सूचवु शकाल का?


Psg
Wednesday, July 04, 2007 - 6:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'श्रीमानयोगी' वाचून झाल्यावर 'पुढे काय' चं उत्तर होतं 'छावा'. छावा नुकतच वाचून झालं.. पण त्यातही बरेच प्रश्न अनुत्तरित राहिलेत. पुढे मराठेशाहीचं काय झालं? कोणी सांगू शकेल का की 'छावा' नंतर काय वाचावे?

छावा अप्रतिम आहे. संभाजी महाराजांबद्दल अनेक अनेक गैरसमज होते ते दूर झाले! शिवाजी महाराज तर थोर होतेच, पण संभाजीही काही कमी नव्हते.. त्यांचं मनोविश्व फ़ार समर्थपणे मांडले आहे. अवश्य वाचा. श्रीमनयोगी वाचले असेल तर नक्कीच..


Gajanandesai
Wednesday, July 04, 2007 - 7:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रीमान योगी रणजीत देसाईंनी लिहिली आहे.

Psg
Wednesday, July 04, 2007 - 7:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सॉरी जीडी. चूकीबद्दल माफ़ी.. दुरुस्त केले आहे.

पुस्तक सांगा! :-)


Svalekar
Wednesday, July 04, 2007 - 8:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह BB ख़ुप थंड पडला आहे.
नुकतिच जाधवांचा वाडा कादंबरी वाचली.
लेखिका ईडा बारोट आहेत.
कुणि वाचली असेल तर त्यान्चि मत ऐकायला आवडेल.

लेखिकेने हि कथा सत्य असल्याचे सान्गितले आहे.

अजुन देवनागरित लीहिन्याचि सवय नाही.

सध्या Not without my daughter वाचत आहे.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators