|
Pooh
| |
| Monday, April 16, 2007 - 11:48 am: |
| 
|
श्रिनि, त्या लेखकाच्या नावाचा उच्चार "ज्यूल " असा आहे. "ज्यूल्स" नाही.
|
Shrini
| |
| Tuesday, April 17, 2007 - 11:41 am: |
| 
|
ज्यूल(स) व्हर्न च्या अजून काही पुसत्कांची भा रां नी केलेली भाषांतरे : सूर्यावर स्वारी, मुक्कम शेंडेनक्षत्र, हिंमतवान जासूद, चिन्याचा चिन्याला जमालगोटा. सगळीच पुस्तके सही आहेत!
|
Pooh
| |
| Tuesday, April 17, 2007 - 1:15 pm: |
| 
|
श्रिनि, Jules Verne हा माझा एक आवडता लेखक आहे "चन्द्रावर स्वारी", "सूर्यावर स्वारी" आणि "मुक्काम शेंडेनक्षत्र" ही माझी पण आवडती पुस्तके आहेत. JW च्या ज्या पुस्तकावरून सूर्यावर स्वारी आणि "मुक्काम शेंडेनक्षत्र' घेतले आहे त्या पुस्तकाचे नाव काय आहे ते आठवते आहे का? mysteriuos island ?? भा. रा. भागवतांनी त्याचे दोन भाग केले. पहिला भाग "सूर्यावर स्वारी". दुसरा भाग "मुक्काम शेंडेनक्षत्र" "समुद्र सैतान" मी मराठीमधे वाचलेले नाही पण बहुतेक 20000 leagues under the sea चे भाषांतर असावे. बाकीची मी मराठीत वाचलेली नाहीत पण Journey to the Center of the earth आणि Around the world in 80 days इंग्रजी मधे वाचली आहेत. अजून एक balloon मधल्य सफ़री बद्दल पण एक पुस्तक आहे. नाव आत्ता आठवत नाही. बाकी तू लिहिलेली पुस्तके "हिम्मतवान जासूद" आणि "चिन्याच चिन्याला जमालगोटा" माहिती नव्हती त्यामुळे वाचलेली नाहीत. शोधायला हवीत. out of print असण्यची शक्यता जास्त आहे.
|
Shrini
| |
| Wednesday, April 18, 2007 - 6:16 am: |
| 
|
An excellent link: http://www.jules-verne.co.uk/ Elementary to map his works to the translations. 
|
Shrini
| |
| Friday, April 20, 2007 - 9:42 am: |
| 
|
'मारीयो पुझो' हा 'गॉडफादर' चा लेखक म्हणून पुष्कळ जणांना माहित आहे, पण त्याचे मला सर्वात आवडलेले पुस्तक म्हणजे 'फूल्स डाय'. त्याच्या इतर पुस्तकांपेक्षा याचा विषय अगदी वेगळा आहे. एक लेखक स्वतःची जीवनकहाणी सांगतो आहे या मूळ कल्पनेने पुस्तक सुरु होते आणि मग या कथानायकाला भेटलेल्या माणसांच्या आधारे, तो मानवाच्या मूलभूत सत्प्रवृत्ती आणि अपप्रवृत्तींबद्दल भाष्य, त्यांचा उगम शोधायचा, त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न, करत जातो. या माणसांमध्ये त्याचा भाऊ, त्याची स्वतःची बायको आणि प्रेयसी, लास वेगास मधल्या एका मोठ्या कॅसिनोचा मालक, एक 'जिनियस' लेखक असे बरेच नमुने येतात. या प्रत्येकाची व्यक्तिरेखा, त्यांचे वागणे, त्या मागची मीमांसा, हे सगळे मारीयो पुझोने अतिशय सुंदर मांडले आहे. पुस्तक बर्यापैकी वैचारीक आहे, आणि यात फारशी 'ऍक्शन' नाही. पण एक intelligent पुस्तक वाचल्याचा दुर्मिळ आनंद हे पुस्तक देते.
|
Bee
| |
| Friday, April 20, 2007 - 11:03 am: |
| 
|
श्रिनि, तू खूपच व्यासंगी आहेस.. तू इथे असेच पुस्तके recommend करत जा.. धन्यवाद..
|
Shrini
| |
| Friday, April 27, 2007 - 5:41 am: |
| 
|
रीचर्ड बाखच्या ' Illusions ' बद्दल मागे एकदा मी लिहीले होते, पण ते या bb वर आहे का माहित नाही, म्हणून पुन्हा एकदा... बाखचे 'जोनाथन लिविंग्स्ट्न सीगल' गाजलेले आहेच. मला व्यक्तीशः 'ईल्यूजन्स' हा त्याचा पुढचा भाग वाटतो, कारण बाखची समज या पुस्तकात अजून विस्तारलेली दिसते. पुस्तकाची कल्पना 'अद्भुत' प्रकारात मोडणारी आहे. या गोष्टीत स्वतः लेखकाला एक 'अंतिम ज्ञान प्राप्त झालेला पुरुष' भेटतो. हा 'मसिहागिरी' ला कंटाळून त्याचा गावाहून पळून आलेला असतो. मग बाख आणि या डोनाल्ड शिमोडाच्या interaction मधून बाखला अनेक 'सत्ये' स्पष्ट होत जातात... या पुस्तकातल्या काही काही कल्पना तर भन्नाटच आहेत. उदा., या शिमोडा कडे ' messiah's handbook ' असे एक पुस्तक असते. काही अडले तर या पुस्तकात पहायचे, आणि तुम्ही उघ्डाल त्या पानावरचे वाक्य तुम्हाला काहीतरी मूलभूत उपदेश करून तुमचा गोंधळ दूर करते. किंवा एखादी भौतिक गोष्ट हवी असेल तर केवळ तिची कल्पना करून ती कशी मिळवायची याबद्दल्ची 'आयडिया'... आणि पुस्तकाचा शेवट नुसताच हृदयद्रावक नाही, तर बाखच्या उत्तुंग जाणीवेची साक्ष देणारा आहे. ज्यांना phiosophical reading आवडते त्यांनी हे पुस्तक जरूर वाचावे!
|
Mbhure
| |
| Friday, April 27, 2007 - 4:57 pm: |
| 
|
Illusions सहीच आहे. ONE ही बरे वाटले पण मी दोन्ही पुस्तके एकामागुन एक वाचल्यामुळे असेल कदाचित पण ONE तेव्हढे appeal झाले नाही. अजुन एका फिलॉसॉफिकल लेखिकेची पुस्तके मला आवडता; ती म्हणजे ANN RAND . तिने लिहीलेली Fountainhead, Atlas Shrugged, Virtue of Selfishness.... वाचनिय आहेत. फक्त एक गोष्ट ह्या लेखिकेच्याबाबतीत होऊ शकते, ती अशी की Either you Hate her book the most, in first 50 pages and decide not to touch any of her book again or like me, just LOVE her books.
|
Shonoo
| |
| Friday, April 27, 2007 - 7:32 pm: |
| 
|
Illusions पुस्तक फक्त एकदा वाचून सम्पत नाही. ते अधनं मधनं परत वाचावं लागतं आणि दरवेळी काहीतरी नवं सापडतं त्यात. खलील जिब्रान चं प्रॉफ़ेट पण त्याच कॅटॅगरी मधे मोडतं. त्यात मधनं मधनं messiah's handbook मधली वाक्यं उद्धृत केली आहेत ती मला फार आवडतात. Ayn Rand ची पुस्तकं विशीच्या उम्बरठ्यावर जाम आवडली होती. आता परत वाचताना अति आदर्शवादी वाटतात. आतून स्फुरून लिहिलेली वाटण्याऐवजी crafted वाटतात. अर्थात हे माझं मत!
|
Asami
| |
| Friday, April 27, 2007 - 8:33 pm: |
| 
|
prophet बद्दल तुला पूर्ण अनुमोदन. काहिसे त्या Handbook Of A Messiah सारखे कि पुस्ताकाला page no ची गरज नाही. कुठूनही वाचात बसावे. पण Richard Bach ची पुस्तके काही मला झेपत नाहित. एका मैत्रिणीने " असा कसा दगड रे तू ?" म्हनून छान बौद्धिक पण घेतलेले ह्यावर. पण आमचे पालथ्या घड्यावर पाणीच राहिले. आता परत एकदा try करून पाहिले पाहिजे. पण श्रीनी तुझे खास आभार मानायला हवेत खरे. पल्याड टाकलेली पुस्तके आठवून देतोयस. काही राहून गेलेल्या गोष्टींना परत हात घालायला हवा.
|
Malavika
| |
| Friday, April 27, 2007 - 9:13 pm: |
| 
|
शोनू तुझ Ayn Rand बद्दलच मत वाचून पुन्हा एकदा तिची पुस्तक वाचाविशी वाटली. मला सुद्धा ती जाम आवडली होती. पण बरेचदा असे होते की काही गोष्टी त्या त्या वयात खूप आवडतात आणी मग एवढ्या अपील होत नाहीत. कोणीतरी जाणकारांनी Steinbeck वर लिहा ना. मला त्याचे Grapes of Wrath खूप आवडते (आणी East of Eden पण).
|
Aschig
| |
| Friday, April 27, 2007 - 11:23 pm: |
| 
|
If you like Steinbeck, and you are in CA (or visiting) be sure to visit his house in Salinas. Close to his house is also a museum with all kinds of things Steinbeck. The town itself is rundown, so do not try to be too adventurous. It was here that he spent most of his writing days, often sitting by the river for hours.
|
मला Ayn Rand ची पुस्तके सुरूवातीला खूप आवडली होती. आता मात्र त्यातील काही भागच आवडतात. काही काही वेळा खूप फ़ोल वाटतात त्यातले विचार.
|
Asami
| |
| Thursday, May 03, 2007 - 8:53 pm: |
| 
|
इथे लिहिलेल्या दिग्गजांमधे Matthew Reilly बद्दल लिहिताना मी २-३ महिने तरी विचार केला आहे. character developement , बांधणी, कथा सूत्र, चटकदार संवाद ह्यांना काडिचेही महत्व न देता एकापाठोपाठ घडणार्या अशक्यप्राय वेगवान घटना , चित्तथरारक पाठलाग आणी शेवटाच्या कलाटण्या ( खर तर हा शब्द अपूरा आहे शेवटांचे वर्णन करायला ) ह्या भांडलावर ह्या माणसाने ७-८ (excluding hoover series) कादंबर्या लिहिल्यात ( लिहिल्या हा शब्द कितपत बरोबर आहे ते देवच जाणे ) अचाट characters एकामागोमाग एक समोर येतात आणी अविश्वासार्ह्य अशा घटनांमधून बचावत पुढे सरकतात. wikipedia वर hollywood style novels असे जे लिहिलय त्याच्यासारखे understatement लिहिता येणार नाही. अगदी अचूक description मला त्याच्याच एका पुस्तकाच्या पाठी सापडले होते "Indiana Jones meet Rambo" Reilly ची कल्पना शक्ती अचाट आहे. त्याच्यापुढे मनमोहन देसाईंचे चित्रपट म्हणजे science theorem वाटावे. वानगीदाखल , त्याच्या latest पुस्तकाची theme (Seven Ancient Wonders a.k.a. Seven Deadly Wonders) Five millennia previously, a nine-foot golden capstone sat upon the Great Pyramid. Ra's Destroyer, a monstrous sunspot that occurs every 4,500 years, released an enormous amount of energy which was absorbed by crystal in the capstone. In 2006, seven days before the arrival of Ra's Destroyer, the pieces of the capstone are spread across the earth. Each of the Seven Ancient Wonders of the World contains a piece of the capstone from the Great Pyramid in Egypt that was divided in the time of Alexander the Great. Each of the three forces tries to find the fragments of the capstone in order to complete one of two rituals, one for worldwide peace or one that ensures a single nation's worldwide domination for a millennia. Either ritual also protects the earth from cataclysmic destruction. In the case of the 11 Nation Alliance, the team races to protect the world from the other two groups and perform the ritual of peace. Reilly म्हणतो कि त्याची पुस्तके epic म्हणून गणली जाणार नाहित. त्याचा एकमेव उद्देश निःखळ करमणूक. action movies सारखा. फ़क्त इथे त्याच्या कल्पना शक्तीला इथे कुठलेही लगाम नाहित , action movies सारखे couldn't agree any more Word of Caution : त्याचे पुस्तक एका बैठकीमधे सलग वाचावेच लागते. मधे gap घेतलीत कि ते प्रत्येक क्षण छळत राहते. आणी हा प्रकार एका पुस्तकावर थांबत नाही तर सर्व पुस्तकांचा फ़डशा पाडेतो चालू राहतो. आणी तीही वाचून संपली की तुम्हि barnes and nobles, Borders, Amazon अशा ठिकाणी "Customers who bought this item also bought" अशा links शोधत फ़िरता.
|
Badbadi
| |
| Monday, May 28, 2007 - 4:35 pm: |
| 
|
मी नुकतेच 'अवघड अफगाणिस्तान' हे निळू दामलेंचं पुस्तक वाचलं. अतिशय अभ्यास्पूर्वक आणि जे अनुभवलं ते सरळ शब्दात मांडलं आहे. पुस्तक अगदी मोजकं १५० पानी आहे....पण प्रत्येक पान वाचताना धक्का बसतो. हे असं कसं? लोक का सहन करत गेले... असे प्रश्न पडतात. मुल्ला उमर रातोरात अफगाणिस्तानचा सर्वेसर्वा कसा झाला.... पठाण लोकांना किती नियोजनपूर्वक धर्मांध केलं गेलं!!! जरूर वाचा.... नाही मिळालं कुठे, तर मी देईन....पण वाचा.
|
मी वाचलेय अवघड अफगाणिस्तान. उत्तमच आहे. त्याच बरोबर प्रतिभा रानडे यांचं अफगाण डायरी वाचणंही मस्ट आहे. दामलेंचं जेरुसलेम, इस्तम्बूल ते कैरो ही पुस्तकेही अफगाणिस्तान इतकीच वाचनीय आहेत....
|
Bee
| |
| Tuesday, May 29, 2007 - 3:38 am: |
| 
|
मी प्रथमच ह्या लेखकाचे नाव ऐकतो आहे. निळू दामले. बडे, आपण एकाच शहरात नाहीहोत.. अन्यथा मी तुझ्याचकडून हे पुस्तक मिळवल असतं वाचायला.. पण माहिती मिळाली हेही नसे थोडके. धन्यवाद!
|
Badbadi
| |
| Tuesday, May 29, 2007 - 5:34 am: |
| 
|
RH,पुढचं टार्गेट जेरूसलेम च आहे बी...मिळेल तुला ते पुस्तक तिकडेहि कदाचित...बघ.
|
निळू दामले तसे रूढ अर्थानं लेखक नाहीयेत. ते आहेत पत्रकार. मुसलमानांची मानसिकतेच्या अभ्यास करण्यासाठी त्या त्या देशात भटकन्ती करून सामान्य माणसात मिसळून ते अभ्यास करतात. त्यामुळे त्यांची शैली फार रंजक नाही पण मजकुरातच सामर्थ्य असल्याने पुस्तके वाचनीय आहेत. तसा साहसीच प्रवास असतो त्यांचा....
|
Mi_anu
| |
| Thursday, May 31, 2007 - 5:55 am: |
| 
|
थॉमस शार्प चे विल्ट वाचले आहे का कुणी? मला आवडले.
|
|
|