Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 12, 2007

Hitguj » Language and Literature » भाषा » शब्दार्थ » Archive through June 12, 2007 « Previous Next »

Bee
Friday, June 08, 2007 - 9:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे मला आठवत नव्हता त्याचा अनुवाद. झक्कासनी सांगितल्यावर मला तो आठवला आणि त्यानी दिलेला अनुवाद माझ्या अनुवादाशी जुळला. म्हणून मी 'बरोबर' आहे असे त्याला म्हंटले.

Imtushar
Friday, June 08, 2007 - 12:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

limelight संदर्भात BBC वर काही दिवसांपूर्वी बघितलेले आठवले:

oxy-hydrogen ज्योत calcium oxide (LIME) वर टाकल्यावर प्रखर प्रकाश पडतो. हा शोध एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला लागला. त्यावेळी हा प्रकार रंगभूमीवर प्रकाशझोत टाकण्यासाठी वापरत, आणि calcium oxide वरून त्याला limelight हे नाव मिळाले. आता जरी हे प्रकाशझोत टाकण्यासाठी lime चा वापर होत नसला, तरी त्यास limelight हेच नाव वापरले जाते.

बाकी भाषांतर तर झकासरावांनी दिलेले आहेच


Bee
Friday, June 08, 2007 - 2:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हळुहळु काळोख दाटत गेला. आकाश निळ्याचे जांभळे, जांभळ्याचे केशरी, केशरीचे पिस्ता रंगाचे झाले. तरूवेलींनी आपली पाने मिटली. मी एकटक लिंबोणीची पोपटी कोवळीकता न्याहळत बसलो. तिच्या 'लिंबोणी उजेडात' न्हात गेलो :-)

कसे वाटले म्या पामराचे भाषांतर :-)


Robeenhood
Saturday, June 09, 2007 - 1:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाषान्तर पण कशाचे?
मूळ तर्जुमा पाहिल्याशिवाय सांगता येणार नाही.
भाषान्तराबाबत एक विनोद प्रसिद्ध आहे..
भाषान्तर हे चवचाल तरुणीप्रमाणे असते. ते सुन्दर असेल तर प्रामाणिक नसते अन प्रामाणिक असेल तर सुन्दर नसते!!!





Bee
Sunday, June 10, 2007 - 9:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

lime-light हा शब्द सरळसरळ मराठीत अनुवादीत करून तो मला वाक्यात वापरायचा होता..

भाषांतर वगैरे कशाचेच नाही :-)

तुला कुणी सांगितले की भाषांतर हे चवचाल तरुणीप्रमाणे असते म्हणून?कुणी भेटली होती का :-)


Limbutimbu
Monday, June 11, 2007 - 4:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> lime लिंबु
>>>> light प्रकाश

>>>> लिंबु प्रकाश किंवा प्रकाशातील लिंबु :-)
हे नव्यानेच कळ्ळ मला!


Slarti
Monday, June 11, 2007 - 3:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण बी, तू जे 'भाषांतर' दिले आहेस त्यात ' limelight ' चा वापर कुठे आहे ?

Ameyadeshpande
Monday, June 11, 2007 - 6:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>लिंबोणीची पोपटी कोवळीकता

कोवळीकता असा शब्द मराठीत आहे का?

Slarti
Monday, June 11, 2007 - 6:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'कोवळीक' असे नाम आहे असे वाटते. 'कोवळीकता'बद्दल मलाही शंका आहे.

Bee
Tuesday, June 12, 2007 - 1:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्लार्टी, मी शब्दशः भाषांतर केले आहे वर. 'लिंबोणीच्या उजेडात' आहे ना वर..

Karadkar
Tuesday, June 12, 2007 - 4:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिम्बोणी != लिंबु

लिम्बोळी म्हणाजे कडुनिम्बाची फळे.


Sneha21
Tuesday, June 12, 2007 - 6:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गार्गी या शब्दाचा अर्थ कोनि सान्गेल का?

Bee
Tuesday, June 12, 2007 - 7:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मते गार्गी हे वेदपुराणोक्त काळातील एका विदुषीचे नाव आहे. तिचा उल्लेख करताना मैत्रेयीचा देखील बर्‍याचदा उल्लेख केला जातो. पण मला ह्या दोघींच्या नावांचे अर्थ माहिती नाही.

Zakasrao
Tuesday, June 12, 2007 - 9:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गार्गी आणि मैत्रेयी ह्या दोघी पुराण काळातील नावजलेल्या ज्ञानी स्त्रिया आहेत. त्यांच ज्ञान हे कोणत्याही त्याकालिन ऋषीच्या तोडीस तोड होत अस म्हणल जात.

Robeenhood
Tuesday, June 12, 2007 - 3:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या दोघी विदुषी वेद काळातील होत्या. पुराण काळाशी त्याची सांगड जोडू नका. वेद म्हणजे शुद्ध ज्ञान आहे. पुराणे म्हणजे मनोरंजक भाकड कथा आहेत.

Slarti
Tuesday, June 12, 2007 - 5:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कदाचित तिच्या वडिलांचे नाव गर्ग असेल. (गर्गसंहितावाले गर्ग ? )

Zakki
Tuesday, June 12, 2007 - 5:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वेद म्हणजे शुद्ध ज्ञान आहे. पुराणे म्हणजे मनोरंजक भाकड कथा आहेत.

लक्षात ठेवायला सोपे म्हणून समजा की मी लिहितो ते वेद नि रॉबिनहूड लिहितात ती पुराणे.




Zelam
Tuesday, June 12, 2007 - 5:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Excerpt from Wikipedia

Gargi Vachaknavi was an ancient Indian female philosopher, born in the family of Garga. She was daughter of sage Vachaknavi.

Gargi is mentioned in the Brihadaranyaka Upanishad. In Vedic literature, she is honored as one of the great natural philosophers. She was the daughter of sage Vachaknu.

Gargi composed several hymns that questioned the origin of all existence. At brahmayajna, a philosophic congress organized by King Janak of Videha, she challenged the sage Yajnavalkya with perturbing questions on the atman (soul).


Slarti
Tuesday, June 12, 2007 - 6:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग प्रश्न असा की गर्ग या शब्दाला काही अर्थ आहे का ?

Zelam
Tuesday, June 12, 2007 - 6:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोधला पण मिळाला नाही




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators