Ultima
| |
| Wednesday, April 11, 2007 - 7:00 am: |
| 
|
"रुपे तिर्थरुपांची " अस एक पुस्तक आहे... कोणी वाचलय का?
|
Bee
| |
| Wednesday, April 11, 2007 - 7:57 am: |
| 
|
तान्याबेडेकर, तू जो लेखक म्हणतो आहेस तो Franz Kafka का?
|
Paragb
| |
| Wednesday, April 11, 2007 - 8:38 am: |
| 
|
काल युगान्त वाचण्यास सुरु केले. पुस्तका बद्दल माहीती होतीच आणि काही भाग बराच आधी वाचला होता.. पण पुन्हा सुरु केले. जबरदस्त ताकदीने ईरावती बाईने पुस्तक लिहले आहे. ईथे मला आजकालच्या लेखिका जे लिह्तात त्यावर पण असो... महाभारतातील पात्रा वार बाई भाष्य करतात. सर्वात प्रथम भीष्म, अतिशय वास्तवपुर्ण असा लेख आहे. भीष्मा चे वागणे कुरुकुलातील ३ ते ४ पिढ्या सोबत त्याची अवस्था.. द्रुष्टीकोण बदलण्यास पुरे आहे..
|
वाचण्यासारखा एकच काफ्का आहे जगात बी
|
Shonoo
| |
| Wednesday, April 11, 2007 - 7:23 pm: |
| 
|
रॉबीन हूड एकदम माझ्या मनातलं बोललात. मेटामोर्फोसिस कुणाचं म्हणून प्रश्न विचारला असता तर समजू शकते. ओव्हिड आणि काफ़्का दोघांचेही अगदी must read आहेत. पण काफ़्का एकच.
|
शोनू, ओव्हिड कोण? मी कधी ऐकले नाही या लेखकाबद्दल.. जर सविस्तर सांगशिल का?
|
Shonoo
| |
| Thursday, April 12, 2007 - 12:27 pm: |
| 
|
शंतनु Ovid ख्रिस्तपूर्व काळातला म्हणजे फार जुना रोमन कवी. त्याच्या मेटामोर्फोसिस चा उल्लेख मी satanic verses मधे वाचला होता. त्यावरून शोधून लायब्ररीतून त्याचं भाषांतर वाचलं होतं. मूळ लॅटिन वाचण्याइतकी माझी पात्रता नाही. व्हर्जिलचा समकालीन असावा आणि रोमन साहित्यात त्याचा व्हर्जिलच्या बरोबरीने उल्लेख होतो. गूगल्/ विकि वर भरपूर माहिती सापडेल त्याच्या बद्दल.
|
Inheritance of Loss वाचले. चाफ्याने लिहीली आहेच म्हणा प्रतिक्रिया. अतिशय ओघवते. गोष्टही आत्ताच्या काळाच्या जवळ जाणारी असल्यामुळे आपला interest टिकून रहातो. पात्रे पूर्ण depth ने रंगवली आहेत. मुख्य पात्रे पाच असली तरी इतर छोटी मोठी पात्रेही अगदी ठळक. त्यांच्यातले नातेसंबंधही अतिशय स्पष्ट मांडलेत. शिवाय GNLF ची दुर्लक्षित पार्श्वभूमीही नीट समजते या सगळ्यात. अगदी थोड्या वर्णनातही सईद सईद, हरीष - हॅरी, निमी, बोस, ग्यानची आजी आणि सईच्या छोट्याश्या विश्वातले आणि तिच्या वयाचेही नसलेले मित्र या पात्रांबरोबर आपण तिथे तिथे जाऊन पोचतोच. कधीही न पाहिलेले कॅलिंपॉंग अगदी त्यातले रस्ते, दुकानं, श्रीमंतांच्या इस्टेट्स आणि गरीब नेपाळ्यांच्या वस्त्यांसकट डोळ्यापुढे उभे रहाते.
|
Asami
| |
| Thursday, April 12, 2007 - 7:20 pm: |
| 
|
काफ़्काचे The Trial मला जास्ती effective नि matter of fact वाटले. Most striking thing about these tales is that they will be relevant in any era. You can just transpose them to any situation and enjoy deriving your interpretations. मला असे सांगण्यात आले आहे कि german मधे वाचताना जास्ती प्रभावी वाटतात.
|
Shrini
| |
| Friday, April 13, 2007 - 6:01 am: |
| 
|
'मालगुडी डेज' बद्दल सांगायचे तर R. K. न्ची सगळी वैशिष्ट्ये : अतिशय साधी सोपी, ओघवती भाषा, आपल्या रोजच्या आयुष्यातले सर्वसाधारण प्रसंगही सांगताना खिळवून ठेवायची शक्ती, अतिशय नर्म, गुदगुल्या करणारा विनोद, आणि लिखाणातला एक सच्चेपणा, या पुस्तकात आहेत. पण माझे personal favourite म्हणजे त्यांचे 'बॅचलर ऑफ आर्ट्स'. इतके सहज सुंदर पुस्तक इंग्लिश मध्येही दुर्मिळ आहे.
|
श्रिनि, बचलर ऑफ आर्ट्स खरच फार ओघवते आहे. माझेही पर्सनल फेवरिट तेच आहे. काफ्का जर्मन भाषेत जास्ती प्रभावी वाटण्याचे कारण जर्मन भाषेमध्ये क्रियापद वाक्याच्या शेवटी लावून वाक्ये खूप लांबवता येतात (मला जर्मन येत नाही.. हे सर्व ऐकीव).. आणि काफ्का याचा फायदा उठवून पान्-पानभर मोठी वाक्ये लिहायचा आणि अगदी शेवटी धक्का द्यायचा.. इंग्रजी भाषेमध्ये हे शक्यच नसल्याने भाषांतरकाराला त्या प्रभावीपणे रचना करता येत नाही. काश!! हमे भी जर्मन आता!!
|
Bee
| |
| Friday, April 13, 2007 - 7:08 am: |
| 
|
शशी देशपांडे ह्या लेखिका आहेत लेखक नाहीत हे मला आत्ता माहिती पडले. नावावरून असे वाटत होते की ही व्यक्ती एक पुरुष लेखक असावी. हीच गत दया पवारांबद्दल झाली होती. ते एक कवी एक लेखक निघालेत असो.. english पुस्तकांचा विषय निघालाच म्हणून विचारतो कुणी शशी देशपांडेंची वाचनीय पुस्तके सुचवा ना इथे. कुठल्या तरी मौजच्या दिवाळी अंकात जीडींनी 'हरपलेले निर्झर' अशी एक त्यांची एक कथा अनुवादीत केली होती जी मला खूप आवडली. परत उर्दू कवी फ़ैज अहेमद फ़ैजच्या काही कवितांचा अनुवाद शशी देशपांडे बाईंनी केला आहे तोही मला आवडला. म्हणून त्यांच्या साहित्याबद्दल एक ओढ लागली आहे. सर्वांकडून छान माहिती मिळते आहे.
|
Milindaa
| |
| Friday, April 13, 2007 - 12:52 pm: |
| 
|
इथे पुस्तकाचं परिक्षण (याचा अर्थ फक्त 'छान आहे पुस्तक' असं लिहीणं नव्हे हे पण लक्षात घ्या ) लिहीणार्या सर्वांनी जर त्या पुस्तकासाठी एक नवीन बीबी उघडून लिहीलं तर वाचणार्यांना आणि शोधणार्यांना सोपं पडेल असं मला वाटतं. वर मॉडरेटर्स नी आधीच वर्गवारी केली आहे ती बघा. आणि बी, नवीन बीबी तेव्हाच उघड जेव्हा त्या पुस्तकासाठी आधीच एक बीबी नाहीये
|
Asami
| |
| Friday, April 13, 2007 - 2:46 pm: |
| 
|
interesting tanya. english अनुवाद नक्कीच कमी पडतात ह्या बाबतीत मग. नक्कीच मजा आली असती german मधे वाचताना. एकदम तटस्थपणे लिहीलेली मोठी पानभर वाक्ये आधी वाचा नि मग त्यात संदर्भ शोधत बसा very interesting exercise
|
मिलिंदा, पण बीब्यांची संख्या किती होईल.
|
Milindaa
| |
| Friday, April 13, 2007 - 4:01 pm: |
| 
|
गजानन, म्हणून तर लिहीलं मी की 'परिक्षण' असेल तरच नवीन बीबी उघडा. आणि तसंही आताच्या प्रकारात कितीजण आधी काय लिहीलं आहे ते वाचतात? त्यमुळे हा नवीन प्रकार सोयीचा पडेल असे मला वाटते
|
Mukund
| |
| Saturday, April 14, 2007 - 5:30 am: |
| 
|
कोणाला जर वैद्यकिय क्षेत्रात रेसिडेन्सी च्या सात वर्षात अमेरिकेत शिकाउ डॉक्टरांना येणारे अनुभव समजवुन घ्यायची इच्छा असेल तर डॉ. अतुल गवांदे यांनी लिहीलेले Complications: Surgeon's notes on an imperfect science हे पुस्तक जरुर वाचा. पुस्तक अतिशय ओघवत्या भाषेतले व वास्तववादी आहे. तुम्ही वैद्यकिय क्षेत्रातले नसाल तरी आवडण्यासारखे आहे. एका मराठी माणसाने लिहीले आहे हे विशेष... त्यांची लेखनशैली अशी आहे की तुम्ही सगळे अनुभव वाचताना अक्षरश्: तिथे उभे राहुन ते सर्व अनुभव बघत आहात असा भास होतो.
|
Chioo
| |
| Monday, April 16, 2007 - 9:26 am: |
| 
|
कोणत्या लेखकाने मानव प्रत्यक्ष चंद्रावर जाण्यापूर्वी तिथले वर्णन केले होते? त्यामधे तोफ़ेच्या गोळ्यात बसून चंद्रापर्यंत प्रवास केलेला आहे. तसेच एका पाणबुडीच्या प्रवासाचीपण गोष्ट आहे. त्यात नायक मोठ्ठ्या octopus शी लढई करतो आणि नंतर तशा octopus च्या अस्तित्त्वाचे पुरावे मिळाले. please मला या लेखकाचे नाव सांगा. धन्यवाद.
|
Shrini
| |
| Monday, April 16, 2007 - 9:36 am: |
| 
|
चिऊ, त्या लेखकाचे नाव आहे, 'ज्यूल्स व्हर्न'. त्याच्या पुस्तकांची भा. रा. भागवतांनी भाषांतरे केली आहेत. तू म्हणतेस त्या पुस्तकांच्या मराठी अनुवादांची नावे अनुक्रमे 'चंद्रावर स्वारी' आणि 'समुद्र सैतान' अशी आहेत.
|
Chioo
| |
| Monday, April 16, 2007 - 9:55 am: |
| 
|
हा. धन्यवाद shrini . अगदी लक्षात नाव होतं पण आठवतच नव्हतं.
|