|
Iyn Rand या लेखिके चि दोन finctioanl पुस्तके आहेत. atlas shrugged आणि fountainhead . classiscs आहेत दोन्हि पुस्तके. चाकोरि पेक्शा वेगळ वाचल्याचा आनंन्द मिळतो. गोष्टि च्या अनुशन्गाने objectivism, creativity, universal principals य बद्दल खुप सुन्दर विचार मान्डले आहे. जरुर वाचा. पहिलि १०-१५ पाने जरा कन्टाळवाणि वाटण्याचि शक्यता आहे. पण नन्तर पुस्तक सोडवत नाहि.
|
Kashi
| |
| Thursday, March 22, 2007 - 5:53 am: |
| 
|
Bee, libraryt ye jara...asha bagencha bhumi sapdel...pan khup noumbers lagle ahet te vachayla..
|
Aaspaas
| |
| Thursday, March 22, 2007 - 5:03 pm: |
| 
|
इथे फक्त माहितीसाठी सांगतो आहे की, मध्यंतरी संदेश भंडारेंचे [संवेदनशील प्रसिद्ध छायाचित्रकार] तमाशा या लोककलेवर आधारीत फोटोबायोग्राफी प्रसिद्ध झाली. पुस्तके भराभर वाचणार्यांचे पटकन वाचून होईल, पण छायाचित्रे पहिल्यास त्यातील विषय समजून घ्यायला लागल्यास तमाशा म्हणजे काय ते कळेल. या प्रतिभावान छायाचित्रकाराला तर दाद द्यालच व एक न चुकवावे असे पुस्तक पाहायला व वाचायला मिळाले म्हणून मलाही धन्यवाद द्याल. पुस्तकाचे नाव: तमाशा, किंमत: ५०० रु.
|
Saee
| |
| Friday, March 23, 2007 - 12:33 pm: |
| 
|
नुकतीच संदेश भंडारेंची मुंबई विद्यापीठावरची फोटोबायोग्राफीही प्रकाशित झाली आहे, तीही उत्तम आहे. तिचा सविस्तर वृत्तांतही 'लोकमुद्रा'त आला होता. स्नेहल, मी आधी 'गांधीहत्या आणि मी' वाचलं आणि मग लगेच 'सत्याचे प्रयोग'. हा क्रम काही वेगळीच अनुभूती देतो. कित्येक गोष्टींचा आपल्याला ताळमेळ घालता येतो आणि तरीही सरतेशेवटी गोडसे मनावर जास्त परिणाम करुन जातात. 'दुर्दम्य' आणि 'महानायक'मधले गांधीही चक्रावुन आणि भंडावुन सोडतात. परकियांशी लढा देताना या लोकनायकांना एकीकडे गांधींच्या तत्वांपायीही केवढी ऊर्जा खर्ची घालावी लागली.. डोक्याचा खुराक होतो. सत्याचे प्रयोग मात्र असामान्य माणसाचे आहेत.
|
Dineshvs
| |
| Friday, March 23, 2007 - 5:01 pm: |
| 
|
मराठीत हल्ली अशी प्रकाशचित्रांची पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत, हे छान झालेय. बहर, आसमंत, फ़ुलवा, सर्प ही आणखी काही उदाहरणे. प्रकाशचित्रे उत्तम असली तरी छपाई मात्र तितकिशी दर्जेदार नाही. तमाशात वेगळे कोन आहेत. सहसा न बघायला मिळणारी दृष्ये आहेत. पण ते सगळे बघुन मन विषण्ण होते.
|
Rajshri
| |
| Saturday, March 24, 2007 - 1:05 am: |
| 
|
kuni Michael Crichton che 'Next' vachel ahe kaa?
|
Asami
| |
| Saturday, March 24, 2007 - 1:25 pm: |
| 
|
हो वाचलेय. मला तरी ठीक वाटले. Nothing new than what he typicaly writes. Adequate mixture of tech and story telling
|
Bee
| |
| Saturday, March 24, 2007 - 3:01 pm: |
| 
|
विश्राम बेडेकरांनी 'रणांगण' व्यतिरिक्त आणखी कुठली पुस्तके लिहिली आहेत का? रणांगणचा आकृतीबंध सुंदर आहे..
|
विश्राम बेडेकरांचे एक झाड दोन पक्षी हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. अर्थात ढोंगबाजीने भरलेले...
|
अनिल अवचटान्चे धार्मिक हे पुस्तक वाचले आहे का? नक्की वाचा
|
Parop
| |
| Thursday, March 29, 2007 - 11:45 am: |
| 
|
'धार्मिक'ची काही वैशिष्टे सांगशील का?
|
सगळ्या धर्मातल्या बुवाबाजी वर त्यान्नी लिहीले आहे. त्यातले काही तर अपराधी पण निघाले. निर्मलादेवी, पुण्यात दरवर्षी असणारा एक उरुस, गाणगापुर आणि गुरूचरित्र या सगळ्यावर लेख आहेत. अनिल अवचटान्चि सगळिच पुस्तके मला आवडतात..
|
Parop
| |
| Monday, April 09, 2007 - 11:59 am: |
| 
|
धन्यवाद! मलाहि अवचटांची पुस्तके आवडतात. बुवाबाजीवर श्याम मानवांनी पण खूप छान पुस्तक बुवाबाजी- लिहिले आहे.
|
Chafa
| |
| Monday, April 09, 2007 - 5:58 pm: |
| 
|
Inheritance of Loss भारतीय वंशाच्या पारितोषिकविजेत्या व जगभर गौरवल्या गेलेल्या लेखक लेखिकांमधे सलमान रश्दी, विक्रम सेठ, अरुंधती रॉय, झुंपा लाहीरी, यासारख्या नावांबरोबरच समोर आलेले नवीन नाव म्हणजे किरण देसाई. त्यांच्या Inheritance of Loss या पुस्तकाला २००६ चं Man Booker prize मिळाल्यापासून हे पुस्तक चर्चेच्या आणि प्रसिद्धीच्या लाटेवर आहे. New York Times पासून Canada Penguin Publishing पर्यंत देशविदेशातून सगळ्या समीक्षकांना, reviewers ना, वाचकांना आवडलेलं हे पुस्तक माझ्या लोकल लायब्ररीने विकत घेण्याअगोदरच ५ - ६ लोकांनी त्यासाठी नंबर लावून ठेवला होता! त्यात अर्थात वरचा नंबर माझा होता. पुस्तक चांगलं आहे. मी मागे God of small things, Life of Pi, The Namesake वगैरे पुस्तकांबद्दल लिहिलं होतं. त्या सर्वांपैकी हे पुस्तक भारतीय जीवनाच्या आणि वृतीच्याही सर्वाधिक जवळ जाणारं आहे की काय असं वाटून गेलं. पण त्याबरोबरच मनुष्यानेच आखून दिलेल्या सीमारेषांवर आणि सरहद्दींवर मानवी जीवन कसे निरर्थकपणे खर्च होत रहाते याचे प्रत्यंतर म्हणजे हे पुस्तक असे मला वाटले. गोष्ट आहे हिमालयाच्या सान्निध्यात वसलेल्या Kalimpong इथे स्थायिक झालेल्या एक सेवानिवृत्त न्यायाधीश जे. पी. पटेल यांची, त्यांची नात सई, त्यांचा आचारी "cook" आणि आचार्याचा मुलगा बिजू यांची. भारतीयांवर कित्येक वर्ष राज्य करुन इंग्रजांनी शेवटी देशाची फाळणी केली. पण ती करुनही भारतात (आणि जगात इतरत्र) सीमारेषांची चढाओढ थांबली नाही. वेगळे खलिस्तान, वेगळे काश्मीर, वेगळे तमिळी प्रांत अश्या बर्याच संघर्षांबद्दल आपल्याला माहीत असते. पण नेपाळी मुक्ती मोर्च्याबद्दल, त्यापायी होणार्या हिंसेबद्दल, अंदाधुंदीबद्दल सहसा कुणाला माहित नव्हते; ते या पुस्तकातून समोर येते. २० - २५ वर्षांपूर्वीच्या या अस्थिर पार्श्वभूमीमधे Kalimpong मधे नवीनच रहायला आलेली सई, तिचे व तिच्या नेपाळी tutor ग्यान चे (जुळलेले व नंतर विस्कटलेले) प्रेम, cook चे बिजूला येनेकेनप्रकारेण अमेरिकेला पाठवण्यासाठीचे प्रयत्न, अमेरिकेत पोचल्यावर होणारे बिजूचे हाल, एक "इमिग्रंट" म्हणून सोसावे लागणारे अपमान व कष्ट आणि नंतर तिथल्या निराशेने खचून नव्या आशेने परतीचा प्रवास करण्याचा घेतलेला अवघड निर्णय आणि त्याचे नंतर काय होते यांचे नाट्यमय चित्रण म्हणजे हे पुस्तक. देसाईंची शब्दकळा सुरेख आहेच, पण वास्तवादी शब्द, विचार आणि प्रसंगांमुळे पुस्तक भिडते. पुस्तकात कित्येक शब्द, वाक्ये हिंदीमधे आहेत. अनेक प्रसंगांमधे कुठलाही आडपडदा न ठेवता एक माणूस दुसर्या माणसाला त्याचा रंग, जात, भाषा, आर्थिक स्थिती, मूळ राष्ट्रीयता वगैरेंवरुन कसा कमीजास्त लेखतो त्याचे उल्लेख आहेत, त्यावर चर्चा आहे. आपण रोज पहात असलेल्या, अनुभवत असलेल्या लोकांच्या प्रतिमा पुस्तकातल्या पात्रांमधे आहेत. त्यात अमेरिकेत राहून भारतीयांबद्दल तिटकारा असणारी आहेत, भारतात राहून अमेरिकेतल्या प्रत्येक गोष्टीचे फॅड असणारी आहेत, मुसलमानांबद्दल द्वेष असणारी आहेत, अमेरिकनांविरुद्ध biased असणारी आहेत, अन्यायाविरुद्ध दाद मागणारी आहेत, तसेच अन्याय करणारीसुद्धा आहेत. पुस्तकाची स्तुती तर अनेकांनी केली आहे. Oprah च्या O magazine ने देसाईंच्या शैलीला uncannily beautiful म्हणून ही गोष्ट of love, longing, futility, and loss असल्याचे म्हटले आहे. पण मला सगळ्यात आवडलेली आणि पटलेली प्रतिक्रिया Gary Shteyngart यांची; ती अशी - "If god is in the details, Ms. Desai has written a holy book. Page after page, from Harlem to the Himalayas, she captures the terror and exhilaration of being alive in the world." आता देसाईंचे पहिले पुस्तक Hullabaloo in the Guava Orchard वाचायची उत्सुकता आहे. कोणी सांगावे, झुंपा लाहिरींप्रमाणे देसाईंचेही पहिले पुस्तक याहून अधिक आवडेल?! Inheritance of Loss बद्दल अधिक माहिती आणि excerpts इथे वाचायला मिळतील.
|
Lalu
| |
| Monday, April 09, 2007 - 6:35 pm: |
| 
|
>>त्यात अर्थात वरचा नंबर माझा होता माझा अजून लागला नाही. Post च्या review मध्येही चांगलं म्हटलं होतं. पण अती डिटेल्स मुळे काही वेळा कंटाळवाणे झालेय असे ऐकले. तरी वाचायला आवडेल.
|
Bee
| |
| Tuesday, April 10, 2007 - 2:10 am: |
| 
|
छान माहिती मिळाली.. नक्कीच वाचीन मी..
|
तुम्ही कुणी अल्केमीस्ट वाचले आहे का? मी मराठी अनुवाद वाचला आहे.. मला फ़ारसे नीट कळले नाही म्हणजे वाचायल चान्गले वाटले पण नेमका त्यातुन काय अर्थ घ्यायचा आहे हे कळाले नाही..कुणि सान्गु शकेल का की लेखकाला कय म्हणायचे आहे..
|
Inheritance of loss मी सुद्धा वाचले. वर्णनशैली खूप मस्त आहे, फ़क्त कधी कधी लेखिकेला नक्की काय म्हणायचय कळत नाही.. काही कही charecters खूप छान आली आहेत. एकदातरी वाचावे असेच हे पुस्तक आहे.
|
Bee
| |
| Wednesday, April 11, 2007 - 2:24 am: |
| 
|
God of small things कुणी वाचल आहे का? मला हे पुस्तक आणि त्याचा अपर्णा वेलणकरणांनी केलेला अनुवाद दोन्ही पुस्तके अत्यंत बोजड वाटलीत. काहीच लक्षात येत नाही की नेमक काय चाललं आहे. मग मी पुढच्या कथा वाचायचे कष्ट न घेता विकत घेतलेले पुस्तक मराठी ग्रंथालयाला देणगी म्हणून दिले आणि जे इथल्या National Library मधून borrow केले होते ते fine सकट परत केले. कुणी आहे का ह्या पुस्तकावर आपला review लिहू शकणारा इथे. जेणेकरून परत एकदा वाचायचे कष्ट मी घेऊ शकेल.. चाफ़्यानी लिहिलेला review मला गवसला नाही.. प्लीज कुणीतरी Malagudi Days बद्दल पण लिना ना इथे..
|
काफ्काचे मेटामॉर्फॉसिस वाचले.. भन्नाट माणुस होता साला.. त्याच कथासंग्रहामधल्या आणखी २ कथा तर फारच जबरी आहेत.. आउटसाइड द लाॅ आणि गिव्ह इट अप.. कधी मिळाला तर सोडु नका हा कथासंग्रह..
|
|
|