Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
स्मिता, स्मितं आणि मी ...

Hitguj » Language and Literature » इतर साहित्य » मी वाचलेले पुस्तक » य - ज्ञ » स्मिता, स्मितं आणि मी « Previous Next »

Dakshina
Friday, March 31, 2006 - 5:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नुकतंच ललिता ताम्हाणे लिखित " स्मिता, स्मितं आणि मी " हे पुस्तक वाचलं सगळं पुस्तक स्मिता पाटील च्या आयुष्यावर आधारीत आहे.

संपुर्णं पुस्तकाच्या आशयातून असं तीव्रतेनं जाणवतं की स्मिता तिच्या खाजगी आयुष्यात खूप काही समाधानी म्हणा किंवा खूष नव्हती. तिने आयुष्य थोडक्यात रेटलं. पण तिचा अभिनय ही तिची जमेची बाजू म्हणावी लागेल. नाहीतरी देवाने सगळं जरी हिरावून घेतलं तरी काहीतरी पाठबळ तो देतोच.

थोडी अंतर्मुख, हट्टी, स्पष्टं बोलणारी आणि वेळ पडली तर भावूक अशी होती स्मिता. तिचे खाजगी आयुष्यातले बरेच निर्णय चुकले होते आणि तिने त्याची किंमत पुरेपूर मोजली, खरंतर त्याच्यासठी जीवंच गमावला.

तिच्या सहकलाकारांबरोबरच्या Relationship बद्दल फ़ार उल्लेख या पुस्तकात नाही, पण ठळक म्हणजे तिची दीप्ती नवल बरोबरची Relatioship ही चांगली होती. रेखाशी पण स्मिताला मनापासून मैत्री करायची होती पण रेखा Somehow तिच्या बाजूने नेहमी स्मिताशी वागताना Reserve राहीली. शबाना आज़मी आणि स्मिता मात्रं काही खास मैत्रीणी नव्हत्या, कारण दोघीही हाडाच्या अभिनेत्री शिवाय स्पर्धक. आज स्मिता हयात असती तर तिने बर्‍याच अभिनेत्र्यांना मागे सारून स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले असते हे नक्की.

राज बब्बर या माणसाविषयी या पुस्तकात फ़ार काही विशेष लिहिलेलं आढळलं नाही, ( मला तसं अपेक्षित होतं, कारण तो तिचा सर्वात जवळचा माणूस होता. राज बब्बर आणि नादीरा यांचा घटस्फोट न झाल्यामुळे स्मिताला बर्‍याच मनःस्तापाला सामोरं जावं लागलं होतं. राज बब्बर विषयी मला स्वतःला फ़ार काही Respect नव्हता पण त्या पुस्तकात स्मिताने त्याच्याबद्दल ' एक जबाबदार माणूस ' असे उद्गार काढले आहेत त्यामुळे मला तो थोडा बरा वाटायला लागला, अजुन एक धक्का देणारी गोष्टं म्हणजे राज बब्बर आणि जावेद अख्तर हे मित्रं आहेत. हे तर मला खरंच Expected नव्हतं.

एकूण हे पुस्तक पुर्णं वाचूनही आपुर्णं वाटतं, हळहळ वाटते, स्मिताबद्दल एक अनामिक आपलेपणा आणि काळजी वाटते की एका इतक्या चांगल्या अभिनेत्रीचा असा करूण अंत व्हायला नको होता.

पुस्तकात तिचे बरेच Photographs आहेत, सगळे बोलके. तिच्या प्रत्येक Photo मधून तिचे Expressions बाहेर पडताना दिसतात. तिच्या बर्‍याच चित्रपटांची नावं जी मला नाहीती नव्हती ती पण माहीती झाली. तिच्यावर ललिता ने केलेल्या कविता तर हूरहूरच लावून जातात.
सगळ्यात वाईट वाटतं ते छोट्या प्रतिकचं त्याचेही Photographs आहेत त्यात तो खूप गोड आणि निष्पाप दिसतो.

काही प्रश्नं पडतात ते म्हणजे स्मिताने राज बब्बर बरोबर ( त्याचा घटस्फोट झाला नसूनही ) लग्न कसं काय केलं? राज बब्बर स्मिताबद्दल तितकाच हळवा होता का?तिचा मृत्यु नक्की कशामुळे झाला? कारण प्रतिकला जन्मं दिल्यावर ८ दिवसात तिला ताप आला.. हे इतकं छोटं कारण तिच्या मृत्युस कारणीभूत होऊ शकतं का? तेव्हा राज कुठे होता हा ही प्रश्नं मला पडलाच.

स्मिताच्या आई वडीलांनी तिला नंतर खूप आधार दिला. बाकी कुटुंबातील भाऊ बहीणी यांविषयी फ़ार उल्लेख नाही.

ललिता आणि स्मिताची मैत्री खूप छान होती असं एकूण वाटतं पण
काहीतरी अर्धवट वाटतं स्मितबादल अजुन बरंच जाणून घ्यावसं वाटतं


Bee
Tuesday, March 20, 2007 - 6:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा, स्मिता पाटील ह्या delivery complications निर्माण झाल्यामुळे गेल्यात.

मलाही स्मिता पाटील बद्दल खूप हळहळ वाटते..


Ajjuka
Wednesday, March 21, 2007 - 3:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>काही प्रश्नं पडतात ते म्हणजे स्मिताने राज बब्बर बरोबर ( त्याचा घटस्फोट झाला नसूनही ) लग्न कसं काय केलं?<<
मुस्लिमांना चार लग्ने करता येतात. हे तर दुसरंच.
>>तिचा मृत्यु नक्की कशामुळे झाला? कारण प्रतिकला जन्मं दिल्यावर ८ दिवसात तिला ताप आला.. हे इतकं छोटं कारण तिच्या मृत्युस कारणीभूत होऊ शकतं का?<<
अगं त्या तापात तिला ब्रेन हॆमरेज झालं त्यात गेली ती.

बाकी तिला प्रत्यक्ष ओळखणारे सगळेच जण तिचा विषय निघाला की चुकीचा जोडीदार निवडल्याने तिच्या आयुष्याची वाट लागली असेच म्हणतात. कोणालाही त्याच्याबद्दल चांगलं बोलताना ऐकलं नाही.

Zakki
Wednesday, March 21, 2007 - 3:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तिच्या निधनानंतर इथल्या एका तिला ओळखणार्‍या महिला डॉक्टरने म्हंटले होते, की बाळंतपणात infection झाल्याने तसे झाले. अमेरिकेत असती तर guarrantied, malpractice फिर्याद झाली असती नि जिंकली पण असती. पण सोन्यासारखा जीव गेल्यावर इतर गोष्टींचा काय उपयोग? ती डॉक्टर नि अमेरिकेत असल्याने असे बोलली एव्हढेच.



Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators