|
Dakshina
| |
| Friday, March 24, 2006 - 11:43 am: |
| 
|
" पार्टनर " - बिन्दुमाधव खिरे. बर्याच दिवसांपासून मला या पुस्तकाबद्दल इथे लिहायचं होतं. पुस्तकाचा विषय थोडा वादग्रस्त असल्याने धास्ती वाटत होती. पार्टनर हे पुस्तक म्हणजे एका ' रोहित ' नावाच्या दहावी इयत्तेत शिकणार्या मुलाची Diary आहे. मुळात रोहित हा होमोसेक्शुअल आहे. शाळेत तो फ़ारसा कोणातही Mix होऊ शकत नाही. त्याला त्याच्याच वर्गातला जतिन नावाचा देखणा मुलगा खूप आवडत असतो. जतिन मुळात Stereotype ( विरुद्धलिंगी आकर्षण असणारा ) ज्याला Normal असं ही म्हणू. ( कारण होमोसेक्शुअल असणं हे आपल्या सोसायटीमधे Abnormal किंवा Unnatural मानलं जातं ) जतिनचं देखणेपण हे मुख्य आकर्षण. त्याचं इतर मुलिंशी बोलणं, किंवा मुलिंनी त्याच्याशी केलेली लगट पण त्याला आवडत नाही. कारण रोहितचं जतिनवर So called प्रेम असतं. मुलिंची चेष्टा, बायकांची घाणेरडी चित्र पहाणं, चोरून सिगरेटी ओढणं हे सगळे उद्योग जतिन करत असतो कारण त्याच्या वयाला ते स्वाभाविक आहे, पण रोहितला ते आवडत नाही, कारण मुळात त्याला स्वतःला मुलं आवडतात. आपण जतिनवर पराकोटीचं प्रेम करतोय आणि आपण त्याच्यासाठी काहीही करू शकतो असं रोहितला वाटतं. दहावीचं वर्षं संपल्यावर देखील रोहितला थोडी धाकधूक वाटते की आता वेगवेगळ्या College मधे गेलो तर जतिन भेटणार नाही. पण सुदैवाने ते एकाच college मध्ये Admission घेतात. दरम्यानच्या काळात बरंच काही घडतं, रोहितला उलगडा होतो की आपण होमोसेक्शुअल आहोत, आपल्याला मुली नाही पण मुलं आवडतात. त्याच्या वैयक्तिक भावविश्वात पण भरपूर उलाढाली होतात. अनिकेत नावाचा एक मुलगा पण त्याच्या आयुष्यात येतो, पण तो निव्वळ रोहितचा उपयोग करून घेतो. त्याच्याकडून वेळोवेळी पैसे घेतो. हे पैसे रोहितने वारंवार घरून चोरलेले असतात. इथे परत त्याला आपण अनिकेतसाठी पण काहीही करू शकतो असं वाटतं म्हणूनच त्याच्या हातून ही चोरी घडते. एके दिवशी जेव्हा रोहित पैसे देण्याचं नाकारतो तेव्हा अनिकेत त्याला थोबाडीत देऊन त्याच्या घरच्यांना त्याच्या Homosexuality बद्दल सांगेन अशी धमकी देतो. ते संबंध अनिकेत कडून फ़क्त शारिरीक पातळीवरचे असल्याने तो रोहितच्या आयुष्यातून निघून जातो.जाता जाता रोहितला प्रचंड शिव्या पण देतो. आणि त्याच्या लैंगिकतेची चेष्टा करतो रोहित मात्रं उध्वस्त होतो. मनात आत्महत्येचे विचारही येतात पण धाडस होत नाही, मग एका मठात बाबांची सेवा करण्यासठी जातो. तिथेही त्याला जाणिव होते की तिथले लोक स्वतःच्या शरिराला मारून जगतात. प्रत्यक्षात शरीरसुख ही माणसाची मुलभूत गरज आहे हे त्याला जाणवतं. रोहितच्या पालकांना रोहितच्या लैंगिकतेविषयी काहीही माहीती नसते. पण त्याच्या मनोविश्वात होणार्या उलाढालींमुळे अभ्यासावर परिणाम हा होतोच. मग परिक्षेत मार्क्स कमी मिळणं ओघानच आलं. तो एका छोट्या Garage मध्ये नोकरी करायला लागतो, तिथे ही त्याल राजू नावाचा एक मुलगा आवडायला लागतो. पण तो त्याला कधीच ते सांगत नाही. दरम्यान रोहितच्या खोलीत त्याच्या आईला Homo Love नावाचं मासिक मिळतं, त्याच्याबदाल विचारणा केली असता रोहीत मान्य करतो की तो Homosexual आहे. त्यावरून घरात वादळं होतात. आई वडील रोहीतचा विचार करण्या ऐवजी एकमेकांना दोष देत बसतात. आई त्याची पत्रिका एका ज्योतिषाला दाखवते तो म्हणतो की त्याचं लग्न नक्की होणार, आणि एकदा लग्न झालं की सगळं काही ठिक होईल. रोहीतची आई त्याला Psycheatrist कडे पण घेऊन जाते पण तो स्वतःच इतका Insensitive आणि सनातनी असतो की हा एक आजार आहे आणि त्यातून रोहीत बरा झाला पाहिजे असं त्याचं धोरण असतं. समलैंगिक माणसाची लैंगिकता कोणत्याही औषधोपचारांनी बदलता येत नाही Garage मधल्या मुलांच्या संगतीने,हातात पैसे येऊ लगल्याने शिवाय स्वताःत एकटेपणा वाढल्याने आणि आईवडीलांकडून पण Support न मिळाल्याने रोहित दारू प्यायला शिकतो. एकदा असाच दारूच्या नशेत तो अनिकेतने दाखवलेल्या अड्ड्यावर जातो तिथे एक माणूस त्याला ठाण्यात चलण्यासाठी धमकी देतो आणि त्याच्याकडचे सर्वं पैसे, सोन्याची चेन इत्यादी लूटून घेतो. स्वतःच्या लैंगिकतेविषयी इतकी असुरक्षित भावना रोहितच्या मनात असते की तो माणूस खरंच पोलीस होता का याची खातरजमा ही तो करत नाही इतका वाईट अनुभव येऊनही, आपल्याला कोणीतरी साथीदार असावा, ज्याच्याशी आपली मानसिक जवळीक असेल, शारीरीक जवळीक असेल या भावनेने रोहीत अस्वस्थं असतो. त्यातच पुन्हा त्याचं अड्ड्यावर जाणं होतं आणि कोणत्यातरी माणसाशी जवळीक होते. पुन्हा एकदा जेव्हा जातो तेव्हा त्याला तिथे नरेन भेटतो. नरेन एका NGO साठी काम करत असतो. त्या संस्थेचा एक Gay Support Group पण असतो. नरेन कडून रोहीतला त्याची सर्वं माहीती मिळते. नरेन पण Gay असतो तो रोहीतला ट्रस्ट मध्ये येण्याचं आमंत्रण देतो, पण भीती आणि असुरक्षिततेच्या भावनेमुळे तो तिथे जात नाही. नरेनची आणि रोहीतची अधूनमधून भेट होत असतेच. याच काळात अड्ड्यावर आलेल्या संबंधामुळे रोहीतला गुप्तरोग होतो, आणि त्यावेळी त्याला नरेनची खूप मदत होते. रोहीतला नरेनबद्दल विश्वास वाटतो. आणि तो एकेदिवशी ट्रस्ट मध्ये जातो. तिथे सगळेच Homosexual असतात. पण त्यांच्यात कुठेही असुरक्षिततेची भावना, भीती रोहीतला आढळत नाही. ओळख करून दिल्यावर रोहीत मी BiSexual आहे असं सांगतो. ट्रस्ट्चं काम करून, तिथल्या लोकांना भेटून रोहीतमधे एक वेगेळा विश्वास निर्माण होतो, तिथे त्याला ईरफ़ान भेटतो. जो त्याच्या जिवाभावाचा साथीदार बनतो. ईरूला घरून लग्नासाठी जबरदस्त Pressure असतं दोघं एकत्र वेळ घालवतात,रहातात. रोहीतचा आत्मविश्वास दुणावतो. स्वताःकडे आणि समलैंगिक लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदळतो. ईरू Software Engineer असल्याने त्याला Project साठी U.S.A. ला जाण्याची संधी येते आणि तो जातो तिथे हे पुस्तक संपतं. पण रोहीतच्या मनातला ईरू अजुनही जिवंत आहे. ------------------------------------------------------------------------------------ पुस्तकाविषयी आपण आपल्या सभोवती नेहमी समलैंगिकतेविषयी द्वेष्टेपणाच पाहीला आहे. समलैंगिकतेविषयी लोक उघडपणे चर्चा करत नाहीत. तो एक आजार, एक अनैसर्गिक गोष्टं आहे असं मानतात. पण समलैंगिकता ही पुर्णंपणे नैसर्गिक आहे. कित्येक प्राणी, पक्षी आहेत ज्यांच्यात समलैंगिकता आढळते. उदा. शार्क, पोपट, बगळे, हत्ती, हनुमान लंगूर इत्यादी. ती कोणत्याही औषधोपचारांनी कधीही बदलू शकत नाही. कोणाला हे आकर्षण कधी जाणवायला लागेल हे सांगता येत नाही. शिवाय हे आकर्षण का वाटतं हे ही सांगणं तितकंच कठिण आहे. हे पुस्तक सर्वांसाठी आहे. समलिंगी, आणि भिन्नलिंगी लोकांसाठी सुद्धा. कारण भिन्नलिंगी लोकांना समलिंगी संबंध हे निव्वळ शारीरीक आकर्षण वाटते. त्यात कुठेतरी भावनिक गुंतवणूक, नातं असतं हे माहीतीच नसतं. आपल्या समाजात लैंगिकता या विषयाचाच इतका बाऊ केला जातो की समलिंगी लोक हे Out होण्या ऐवजी न्यूनगंडाने जास्त पछाडतात, आपण वाईट आहोत अशी भावना त्यांच्यात निर्माण होते. आपल्या इथे शाळेतले शिक्षक सुद्धा जीवशास्त्रात जननसंस्थेविषयीचे Topics सफ़ाईने टाळतात. तर लैंगिकतेविषयी उघडपणे कोण बोलेल? Stereotype म्हणजे Normal मुलगा आणि Non - Stereotype म्हणजे बायकी मुलगा.. Psychiatry मध्ये पुर्वी Homosexuality ला Disorder मानत असत. पण A.P.A. - American Psychiatry Association ने हे मान्य केलं की हा आजार नाही. आणि Disorder च्या यादीतून Homosexuality चं नाव वगळलं. मी काही वाक्यं निळ्या रंगात लिहिली आहेत. अर्थात प्रत्येकाचा संदर्भ वेगळा आहे. समलिंगी लोक हे सुद्धा Normal माणसासारखंच प्रेम करतात. त्यांना त्यांची भावनिक भूक भागवणारं कोणितरी हवं असतं आपण मात्र त्यांची गरज ही शारीरीक मानतो. अनिकेतची धमकी, रोहीतला थोबडीत देणं किंवा Blackmail करण्याचा प्रयत्न हा केवळ सामाजातली असुरक्षितता Reflect करतो. अनिकेतच काय, पण तो लुबाडणारा माणूस पण याच Category मध्ये मोडतो. समलैंगिकता हा रोग आहे आणि तो जावा म्हणून मठात, ज्योतिषाकडे जाणं किंवा समलैंगिक माणसाचं लग्न भिन्नलिंगी माणसाबरोबर लावून देणं हे अघोरी आहे. त्याने त्याच्या कोणत्याच गरजा भागणार नाहीत. आपल्याकडचे बहुतेक समुपदेशक स्वताः सनातनी विचारांचे असल्याने समलैंगिक लोकांना " Normal " करण्याचा त्यांचा हट्ट असतो, जो अत्यंत चुकिचा आहे. माणसाची लैंगिकता ही औषधोपचारांनी बदलता येत नाही. आपल्या सोसायटीमध्ये Safe Gay Space ची कमतरता आहे. तीच कथा Lesbien आणि Trans Gender लोकांची. त्यांना ही समाजात स्थान नाही, माणूस म्हणून वागणूक दिली जात नाही. समाजात जर समलिंगी जोडपी तयार झाली तर विवाहसंस्थेला हादरा बसेल अशी सनातनी लोकांना भीती वाटते. इथे जर समाजाचा दृष्टिकोन बदलला तरच त्यांना कळेल की या नात्यात समानता हा सर्वात मोठ्ठा Positive Point आहे. पण प्रश्नं वंशाच्या दिव्याचा पण आहे ना? समलिंगी जोडप्यांकडून तो कसा काय मिळणार? समलिंगी संबंधांना आज समाजात कायद्याने मान्यता नाही. त्यामुळे समलिंगीद्वेष्टे आणि पोलीसांकडून अशा लोकांना खूप त्रास होतो. जोपर्यंत कायद्याने मान्यता मिळत नाही तोपर्यंत हे होत राहाणार. " समपथिक " , " समभावना " किंवा " सेहेर " अशा काही संस्था स्त्री आणि पुरुष यांच्या लैंगिक आरोग्यावर काम करतात. खरंतर या पुस्तकात बरंच काही शिकण्यासारखं आणि समजून घेण्यासारखं आणि Share करण्याजोगं आहे. पण वेळेअभावी मी पुर्णं लिहू शकत नाहीये. जेव्हा मी हे पुस्तक वाचलं नव्हतं तेव्हा मलाही अशा लोकांबद्दल फ़ार Sensitivity नव्हती. मी पण या गोष्टीकडे 'विकृती' म्हणूनच पहात होते. आणि हे पुस्तक करमणूक म्हणूनच वाचायला घेतलं होतं. पण वाचून खाली ठेवताना इतकी जाणीव तरी नक्कीच झाली की यात खरंच काही गैर, वाईट किंवा घाण नाही. --------------------------------------------------------------------------------- लेखकाची माहीती कोणाला जर या पुस्तकाविषयी, किंवा लैंगिकतेविषयी काही माहीती हवी असल्यास लेखक बिन्दुमाधव यांना जरूर संपर्क करा, किंवा लिहा.. बिन्दुमाधव खिरे E - १८ / १२, सरिता नगरी, Phase II , सिंहगड रोड, पुणे - ४११ ०३० फोन २४२५०६०६ Email khirebindu@yahoo.com -------------------------------------------------------------------------------- आभार Admin नी मला या पुस्तकाबद्दल इथे लिहीण्याची परवानगी दिल्याबद्दल मी त्यांची विशेष आभारी आहे. --------------------------------------------------------------------------------
|
Mbhure
| |
| Friday, March 24, 2006 - 7:34 pm: |
| 
|
दक्षिणा, थोडक्यात आणि छान रसग्रहण आहे. फार पुर्वी ' अक्षर' च्या दिवाळी अंकात ह्याच विषयावर सुमेध वडावाला यांची कादंबरी का दिर्घ कथा होती. थोडी दुसर्या बाजुने होती. म्हणजे सर्व मित्रांचा ग्रुप एकाचा वाढदिवस साजरा करायला जमतो. ते सर्व समलिंगी असतात. अगदी तरुणापासुन ५० - ५५ वर्षापर्यंत. त्यात त्यांचे मानसिक द्वंद्व लिहीले होते. म्हणजे असे की, काहिंना ' ज्याच्यामुळे लहान असताना किंवा काही इतर कारणामुळे आपण असे झालो', त्याबद्दल तिरस्कार वाटतो; त्याचवेळी दुसर्या आपल्या मित्राबद्दल आकर्षण वाटत असते. मग ते एकमेकांची समजुत घालत एकमेकांना मानसिक आधार देतात. अशी काहीशी कथा होती. नक्की आठवत नाही. पण तु म्हणतेस तसे समजुन घेण्यासारखे खुप होते पण फारच थोड्यांना ती Refer करता आली. कारण बहुतेकांना ते पचनी पडले नसते.
|
Dakshina
| |
| Monday, March 27, 2006 - 4:40 am: |
| 
|
MBhure तुम्ही हे पुस्तक वाचले आहे का? Actually या पुस्तकात अजुन बरंच काही आहे, पुस्तकाची भाषा पण वेगळी आहे. आणि त्यात बरीच जी माहीती दिली आहे ती शास्त्रीय आहे. अन्यथा खरंतर कोणीच या विषयावर Sensitively लिहीत नाही, उलट Sensational लिहीतात. Girl Friend हा एक असाच चित्रपट. विषयाचं निव्वळ Commercialisation तो एका अर्थाने समलिंगी लोकांच्या भावनांचा अपमानच होता असं म्हणायला काही हरकत नाही. कारण समलिंगी लोक हे काही फ़क्त शारीरीक सुखासाठी नातं निर्माण करत नाहीत.त्यांच्या भाव - भावना पण एका Normal माणसासारख्याच असतात. अर्थात हे पुस्तक हा या विषयाबद्दल समाजात जागरुकता निर्माण करण्याचा लेखकाचा पहिला प्रयत्नं आहे. त्यामुळे वाचल्यावर सर्वांनाच आवडेल असं नाही. पण निदान इतकं कळलं तरी खूप झालं की हे वाईट नाही, विकृत नाही.
|
|
|