|
Dakshina
| |
| Wednesday, July 06, 2005 - 8:00 am: |
| 
|
मी परवा रविंद्र गुर्जर यांनी अनुवाद केलेल 'कोमा' हे पुस्तक वाचलं. पुस्तक बरंच जुनं आहे, त्यामुळे कदाचित वाचनप्रेमींनी आधीच वाचलं असेल. साध्या आणि छोट्या आँपरेशनसाठी दिली जाणारी भूल ही कही लोकांसाठी जीवघेणी ठरू लागते, ते ही एका विशिष्ट ऑपरेशन थिएटरमधेच.. कारण काय तर भूल उतरत नाही, मेंदू मरतो... कारणास्तव पेशंट कोमात जातो. आणि मग म्रुत्यू. त्याच हॉस्पिटलमधे एन्ट्रन्सशिप करणारी विद्यार्थिनी याचा छडा लावायचा ठरवते.. त्यासाठी तिला बर्याच दिव्यातून जावे लागते.. आणि ती तो लावते.. शेवट लिहिला तर रहस्याचा उलगडा होईल... पुस्तक मला तरी खूप आवडले... म्हणजे एकदा वाचायला घेतले की खाली ठेऊ नये असे वाटते. मेडिकल ग्राऊन्डस वर आधारलेले असले तरिही भाषा आणि व्याख्या कुठेही किचकट नाहीत, समजतील अशा आणि सोप्याच आहेत.
|
Dakshina, "Coma", the original English book is by Robin Cook. Robin Cook's books were our major favourites during school. He kind of has an expertise in writing medical mysteries. You might like "Fever", "brain", "Mutation" and many more titles by Robin Cook. If you are comfortable reading English, you'll thoroughly enjoy all these. BTW, I like translations by Ravindra Gurjar. He has the knack to convey the original feel without getting artificial
|
Sayuri
| |
| Friday, April 27, 2007 - 11:31 pm: |
| 
|
१) मी जिम कॉर्बेटची फॅन आहे. त्यांच्या पुस्तकांपैकी मराठीत अनुवादित असलेले 'कुमाऊंचे नरभक्षक' (अनुवाद: सुभाष भेंडे) हे पुस्तक मी वाचले आहे. पण याव्यतिरिक्तही त्यांची इतर पुस्तके आहेत.(The Man-eating Leopard of Rudraprayag, My India, The Temple Tiger and more man-eaters of Kumaon etc) ती मराठीत अनुवादित आहेत का? असल्यास कोणी त्याविषयी सांगू शकेल का? २)जिम कॉर्बेट वगळता अन्य कोणत्या/कोणाच्या शिकारकथा वाचनीय आहेत? any recommendations?
|
|
|