Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
समिधा

Hitguj » Language and Literature » इतर साहित्य » मी वाचलेले पुस्तक » य - ज्ञ » समिधा « Previous Next »

Gs1
Wednesday, May 10, 2006 - 9:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समिधा - साधना आमटे

बाबा आमटेंबरोबरच्या त्याग आणि सेवामय सहजीवनाची कहाणी अत्यंत साध्या शब्दात मांडणारे साधना आमटेंचे आत्मचरित्र म्हणजे समिधा. शब्दांकन जरी त्यांच्याच एका सहकाऱ्याने केले असले तरी साधनाताईंची कथनाची निगर्वी आणि सहज शैली तशीच कायम ठेवल्याचे जाणवते.

कुष्ठनिवारण आणि पुनर्वसनाचे काम करणारे आनंदवन, पंजाब पेटला होता तेंव्हाचे भारत जोडो आणि काही वर्षापूर्वी नर्मदा बचाव आंदोलनाला पाठिंबा यामुळे बाबा आमटेंचे कार्य व चरित्र वृत्तपत्रे व पुस्तकांद्वारे बऱ्यापैकी लोकांसमोर आले आहे, पण तरीही साधनाताईंच्या स्वानुभवाच्या बोलातून अनेक नवे तपशील, पैलू हाती लागतात.

एका सुखवस्तू परिवारातील इंदू घुलेचा, मुरली आमटे या ध्येयवेड्या तरूणाशी त्या काळात होणारा प्रेमविवाह, आणि त्यानंतर लगेच सुरू होणारे समाजसेवेचे कधी थोडे यशस्वी झालेले तर कधी फसलेले श्रमाश्रम सारखे प्रयोग, एका भेसूर कुष्ठरोग्याला बाबा घाबरले तो त्यांच्या जीवनात क्रांती घडवणारा क्षण, कुष्ठ्धाम उभारण्याची धडपड, अविरत परिश्रम, हालअपेष्टा, आर्थिक टंचाई, आजारपण यावर मात करून उभारलेला प्रकल्प हा सर्व प्रवास त्या इतक्या विलक्षण समरसतेने विशद करतात की आपणच त्याचे सहप्रवासी असल्याचा अनुभव घेतो.

प्रकाश, विकास आणि रेणूकेचे बालपण, संस्कार, प्रगती आणि शेवटी याच कार्याला जीवन वाहून घेण्याचा त्यांचा संकल्प हेही असेच उलगडत जाते.

गावातील श्रीमंत मारवाडी वर्षातून एकदा गरीबांना भोजन देतात. त्याला भिकारजेवण असे म्हणत असत. बाबांच्या कार्याबददल सहानुभूती असल्याने ते एका वर्षी सर्व कुष्ठरोग्यांनाही पाठवा असा निरोप देतात. इकडे परिस्थिती हलाखीचीच असते, पण कुष्ठरोग्यांना आत्मनिर्भर बनवण्याच्या प्रयत्नाचा हा अपमान वाटून बाबा संतापतात आणि आमच्याकडे आम्हीच भिकारी आहोत असे म्हणून साधनाताईंसह स्वतःच त्या भिकारजेवणाला जाउन बसतात तो प्रसंग या विषयातले त्यांचे conviction दाखवून देणारा आहे. त्यामूळेच खरे खरे पुनर्वसन शक्य झाले, माणसे, कुटुंबे स्वतःच्या पायावर उभी राहिली.

मदर तेरेसेंच्या कार्याचा बराच गवगवा केला जातो. त्यात मिशनरी प्रचारतंत्राचा भाग आहेच. त्यांचीही सेवा आहेच पण त्यांनी कायमचे परावलंबित्व आणि त्यातून धर्मांतर अशी जी पध्दत उभी केली त्यामुळे असे रचनात्मक काम उभे राहिले नाही.

पण तुलनेने फार उत्कृष्ट दर्जाचे काम असूनही बाबा आमटेंच्या कामाची नोंद घेतली गेली, तरी त्याला एवढे मोठे ग्लॅमर वा आर्थिक पाठबळ मात्र प्राप्त झाले नाही. आता विकास आमटेंनी मोठ्या प्रमाणावर विस्तार हाती घेतला आहे असेही शेवटच्या प्रकरणातून लक्षात येते.

प्रकाश आमटेंच्या हेमलकसा येथील वनवासी विकास प्रकल्प, प्राण्यांचे अनाथालय याबद्दलही थोडी माहिती येते, पण त्याबद्दलचे नेगल हे विलास मनोहरांचे पुस्तकही छान माहिती देते.

एकंदर बाबांचा स्वयंस्वीकृतं कंटकाकिर्णमार्गं , त्याला साधनाताईंनी पावला पावलाला दिलेली तोलामोलाची साथ, त्याची बाबांनी ठेवलेली जाणीव आणि कधीतरी त्यांच्यासाठी स्वतःच्या वैयक्तिक तत्वालाही घातलेली मुरड ( उदा. देवळात जाण्याचा प्रसंग) असा सर्व सेवामय सहजीवनाचा आलेख एक सुखद प्रेरणा देउन जातो.

पुस्तकात तथाकथित साहित्यिक शैलीचा अभाव आहे, मांडणी विस्कळीत आहे, पण जगलेले जीवनच एवढे प्रभावी आहे की अशा गोष्टींकडे लक्षही जात नाही. वाचावेच असे पुस्तक.



Kashi
Thursday, September 21, 2006 - 10:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आत्तच साधना आमटेंच 'समिधा' वचल..खुप छान आहे. :-)

Arch
Monday, January 26, 2004 - 3:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

saimaQaa - saaQanaataš AamaToMca Aa%makqana
XabdaMkna : saItakaMt p`BaU

baabaa AamaToMcyaa ivalaxaNa jaIvanaalaa saaqa dotanaacaI %yaaMcaa p%naIMcaI vaaTcaala vaacaayalaa imaLto.

kuzohI Aa%map`ÝZI naahI. kuzohI Kod va KMt naahI. %yaaMcaa puna`janmaavar ivaXvaasa naahI. pNa imaLalaaca tr baabaaca jaIvanasaaqa imaLÜ hI šcCa. Asa ho Aa%makqana savaa-naIca vaacaava Asa vaaTt.

gaolyaa vaYaI- p`kaXa AaiNa maMdataš AamaToMcaI maulaaKt eokayacaa BMM Convention maQyao chance imaLalaa %yaa smaRtI janmaBar rhatIlaca. %yaa ]BayataMnaa BaoTayacaI saMQaI imaLalyaaca samaaQaana ApUva- hÜt. AaiNa %yaa naMtr ho pustk. Ôar sauroK Xabdat ilaihlaolao AnauBava puYakLda DÜL\yaat paNaI AaNatat. AaiNa %yaaMcyaa kayaa-laa AaiNa (a sava- dovadUtaMnaa manaÜmana hat jaÜDlao jaatat.

tIna ipZ\yaa kXaa samaajaasaazI Aapla AayauYyaa vaocaU Xaktat (aca AaXcaya- tr vaaTtca pNa dovadUtaMvar ivaXvaasa basatÜ ho maa~ Kr.

samaajaaca ?Na ÔoDNyaacaI Aaplyaa jabaabadarIcaI Aaplyaalaaca na saaMgata jaaNaIva hÜto.





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators