|
Maudee
| |
| Thursday, May 25, 2006 - 1:07 pm: |
| 
|
मला हा bb नव्यानेच सापडला असल्या कारणाने दुसर्या पुस्तकाबद्दल लगेच लिहिते आहे. मी वाचलेले दुसरे पुस्तक म्हणजे "देवानाम प्रियः"....सम्राट अशोकाच्या जीवनावर आहे. सम्राट अशोक म्हनजे आता पर्यन्त माझ्या मनात फ़क्त कलिंगचे युध्ह आणि त्याच्या मुलाने घेतलेली प्रवज्या एवढ्या दोनच गोष्टी येत होत्या.... या पुस्तकातून इतरही बर्याच गोष्टि समजतात... जसे की १. तो इतका क्रुर का बनला २. त्यावळचि परिश्थिती आणि एकूणच अशी मानसिकता होती लोकान्ची की तो जस वागला तस वागल नसता तर भ्याड समजला गेला असता. ३. तिसरा मह्त्वाचा भाग म्हणजे बुध्ह धर्म.... बुध्ह धर्माबद्दल बर्याच नविन गोष्टी समजतात.... आता या धर्माचे जे रूप आपल्याला दिसते ते काही राजकारणी व्यक्तींमुळे तसे दिसते...ख़रा बुध्ह धरम हा लोपला गेलेला आहे(मला याबद्दल ख़ूप वाईट वाटते की आपल्या देशातल्या एका महान माणसाने ह धरम स्थपन केला आणि त्यचे रुपंतर आत फ़क्त मतपेटीत झाले आहे) हे पुस्तक थोडेसे म्रुत्युन्जय सारखे लिहिले आहे म्हणजे....एक एक पात्र येऊन आपले मनोगत सांगते आणि त्यातून अशोकाचा जीवनपट उलगडला जतो. मला इथे हे नक्की नमुद करावेसे वाटेल की शाहरुख़ ख़ान्च्या असोका मध्ये सगळेच काही काल्पनिक नाही... त्याचे picture आल्यानन्तर मी तरी असे ऐकले होते की कोउरवाकी वगैरे सगळे ख़ोते आहे...मसाला म्हणुन टाकले आहे....पण ते सगळेच काही ख़ोटे नाही... आशोकाची आई ही ब्रह्मणाची मुलगी असते.... यामुळे ती नावडति राणी असते आणि पर्यायाने अशोखी नावडता राजकुमार..... मला हे वाचल्यावर ख़र तर धका बसला होता.....पण पुस्तकातच याची कारणे नन्तर स्पष्ट केली आहेत....तिची आई ब्रह्मीन म्हणजे एका आचर्यान्ची मुलगी होती....त्यामुळे त्य्नच्याकडून राजाला युध्हात सैन्य किन्वा तत्सम गोष्टींची काहीच मदत होणार नव्हती....मर्गदर्शक म्हणुन काम करायचे तर ते त्यान्चा आश्रम सोडून येणार नव्हते.....त्या अर्थी या राणीचे माहेर आणि पर्यानी राणी नावडती. या सग्ळ्यामुळे राणीचे आणि अशोकाचा नेहमीच पाणौतारा... पण कुशल नेत्रुत्व, युध्ह करण्याची धमक, मह्त्वाकन्क्षा, आणि थोदस राजकारण....या सर्वामुळे तो राजा झाला.... आता त्यच्या पत्नींबद्दल थोडसे... रजाला एकूण ५ पत्नी होत्या....४ ज्ञात एक अज्ञात.... त्याची सर्वात पहिलि पत्नि जी इतराना माहीत नव्हती...म्हणजे प्रजेला...... ती तक्षशिलेतील एका क्रन्तिकारकाची मुलगी असते....तिला जेव्हा समज्ते की तिचा नवरा अशोक आहे तेव्हा मगधान्वरील रागामुळे ती त्याला सोडून जाते आणि त्यामुळे अज्ञात रहाते. दुसरी पत्नी ही बुध्ह धरम मानणारी असते.....तिला दोन मुले असतात....महेन्द्र आणि सन्घमित्रा मला वाटते अशोकाच्या फ़क्त या दोन मुलान्बद्दलच फ़क्त भारताला माहीत आहे....्ई राणी जन्माने वैश्य असते त्यामुळे तिला महाराणी करायचे की नाही याबद्दल सम्भ्रम असतो....पण बुध्ह धर्म मानणारी असल्यामुळे तिच या प्रस्तावाला मान्यता देत नाही. त्यामुळे राजा तिसरे लग्न करतो....तिचे नाव असन्घमित्रा...्ई त्याची राणी ख़ूप छंगली असते...तिला स्वतःला मुल होत नाही पण महेन्द्र आणि सन्घमित्रेचा ती चांगला साम्भाळ करत असते....महेन्द्रचा ओढा बुध्ह धर्माकडे असतो त्यामुळे त्याला युवराज म्हणून घोषित करायला त्याची आई नकार देते....यामुळे फ़क्त युवराजासाठी राजाचे चोउथे लग्न होते. बाकी उद्या लिहिन
|
Maudee
| |
| Friday, May 26, 2006 - 6:54 am: |
| 
|
वाचताना नक्कीच असा प्रश्न पडेल की मी राजाच्या पत्नींबद्दल सर्वप्रथम का लिहिले आहे..... पुस्तक वाचताना मला असे जाणवले की राजाच्या अयुष्यातल्या बर्याच मोठ्या घडामोडी राणींमुळे घडल्या आहेत. जसे १. पहील्या राणीमुळे त्याला त्याच्या सावत्र भावाच्या कारभाराशी जवळून ओलख़ व्हायला मदत झाली..्इच ती अज्ञात राणी. २.दुसर्या म्हणजे महेन्द्रच्या आईमुळे राजाची बुध्ह धर्माशी जवळून ओळख़ झाली. जो त्याच्या आणि सम्पूर्ण भारताच्याही द्रुष्टीने ख़ूप मह्त्वपूर्ण गोष्ट होती. ३. तिसर्या राणीने राजाला त्याच्या प्रत्येक चांगल्या आणि वाईट गोष्टिंना समर्थ साथ दिली. ४. या राणीचा म्रुत्यु लवकर झाला....तशी पण तिच्याशी फ़क्त युवराजासाठीच केले होते. ५. राजाच्या तिसर्या आणि चोउथ्या राणीच्या म्रुत्युनंतर फ़क्त रज्याला राणी हवी म्हणून राजाने हे लग्न केले....याबद्दल काही कथा दिलेल्या आहेत.. अमात्य परिषद सम्राट अशोकाची rather मोउर्य घराण्याची अमात्य परिषद ही राज्यकारभाराचा एक उत्तम नमुना मानला जातो. या मध्ये राजाने त्याच्या प्रत्येक प्रान्तामध्ये एक एक असा अमात्य नेमला होता जो त्या विभागाची पूर्ण काळजी घेणे,विविध प्रश्न सोडवणे ही कामे करायचा. जेव्हा अत्यन्त क्लिष्ट अथवा महत्वाची गोष्ट असे तेव्हाच तिचे निराकरण सम्राटाच्या देकरेख़ीख़ाली होत असे. अर्थात प्रत्येक विभागात घडणार्या घटना राजासमोर सांगणे अपेक्षित असे. प्रवज्या या शब्दाचा मी वर उल्लेख़ केलेला आहे. प्रवज्या म्हणजे बुध्ह धर्माचा स्वीकार करून त्या धर्मासठी वाहून घेणे. थोडक्यात प्रवज्या घेतल्यावर माणूस भिक्कू म्हणुन गणला जातो. महेन्द्र आणि सन्घमित्रा, राजाच्या या दोन मुलानी प्रवज्या घेतली आणि बुध्ह धर्माच्या प्रचार आणि प्रसाराकरता त्यानी आमरण कार्य केले. त्यानी भूतान. चिन, थायलन्ड या देशांमध्ये बुध्ह धर्माचा प्रसार केला. कलिंगचे युध्ह पारमपारिक रित्या असे मानले जाते की अशोकाने कलिंग वर युधा लादले. या पुस्तकामध्ये असे दिले आहे की कलिंगचा राजा अशोकाच्या कुरापती काढत असे त्यामुळे अशोकाने चिडून त्याच्याविरुध्ह युध्हा पुकारले. पण ख़र सांगायचे तर अशोकाने दिलेल्या कुठल्याही explanation मध्ये असे जाणवत नाही की त्याची चूक नव्हती.ख़र ख़ोट देव जाणे. पन या युध्हानंतर झालेल्या प्रचण्ड हानी नंतर त्याचे डोळे उघडले आणि त्यानी बुध्ह धर्माचे अनुसरण करायला सुरुवात केली.त्याने प्रवज्या घेतली नाही पण दान धर्म, अहिंसा या गोष्टींचे पालन करण्यास सुरुवात केली. personaaly हे पुस्तक मला आवडले. पुस्तक देवानाम प्रियः लेख़क सन्जिवनी ख़ेर
|
|
|