|
Maudee
| |
| Thursday, May 25, 2006 - 11:57 am: |
| 
|
मध्ये मी शोभा डे चे " selective memory " वाचले.....कोणी वाचले आहे का इथे... i hope मी repeat नाही करत आहे मी हे पुस्तक वाचयला ह्घेतले.... १.कारण ती पुर्वाश्रमीची मराठी आहे. २.ति बराच सन्घर्ष करून वर आली असे मी बर्याच मासिकात, interviews मध्ये वगैरे वाचले. पुस्तकाची पहिली काही प्रकरणे ख़ूप छान आहेत....वाचताना ख़रच छान वाटते. यात तिचे बालपण कसे गेले..... तिच घरात काय स्थान होते..... ती अभ्यासात कशी होती..... यावर भाष्य आहे. पुस्तका प्रमाणे ती अभ्यासात एवढी चान्गली नव्हती....पण ति विविध ख़ेळ ख़ेळायची...जस की basket ball , she was good in athletics even मी तिच्या अभ्यसाबद्दल इथे मुद्दाम लिहिले कारण परम्परगत द्रुष्टीने महाराष्ट्रात इतर ख़ेळ वगैरे पेज़ा अभ्यासाला जास्त महत्व देण्यात येते. यानन्तर ती modeeling मध्ये आली.५ वर्षे modelling केल्यानन्तर ती वैतागली...आणि अचानक एके दिवशी तिला एका magazine च्या office मध्ये छोटेसे काम मिळाले. पुस्तकाचा दुसरा भाग मात्र काहीसा निराश करतो.म्हणजे magazine चे काम सुरु केल्यानन्तर तिच्या boss ने stardust हे magazine चालू केले. त्यात तिचा सहभाग मह्त्वाचा होता. यातला निराश करणारा भाग असा होता की filmi magazine मध्ये असल्यामुळे तिला या लोकान्च्या बर्याच आतल्या गोष्टी माहीत होत्या.....पण तिने बहुतेकान्ची बुराई केली आहे.एकूणच लोकांची वाईट बाजूच तिने मांडली असे वाटते. तिच्या लिख़ाणात चान्गले फ़ार कमी जणांबद्दल लिहिले गेले आहे. पुढे पुढे तर ती बुराई इतकी वाढली की मी शेवटची काही प्रकरणे वाचली नाहीत. even तिने एका ठिकाणी असेही मांडले की आशा भोसले वगैरे छान गातात.... पण जेव्हा त्या live concert करत असतात तेव्हा त्या जे दोन गाण्यान्च्या मध्ये बोलतात ते काही उत्स्फ़ुर्त नसते....ते सगळच planned असते. म्हणजे मध्येच एख़ादे मजेच किन्वा भावपुर्ण वाक्य टाकणे सगळेच.....मी हे जितक्या सरळ इथे मांडले आहे तितक्या सरळ त्यानी लिहिलेले नाही...म्हणजे थोडसा आसा सूर होता की बघा कशी नाटकं करते. पण याची दुसरी बाजू त्यानी मांडली नाहीये की असे program properly plan केल्याशिवाय successful होऊच शकत नाहीत. afterall हा अशाताईन्च्या profession चा भाग आहे.... मला माहीत नाही की या पुस्तकाने मला निराश केलेले असताना य पुस्तकाबद्दल मी इथे लिहावे की नाही...माझ्या या लिख़ाणावरचे अभिप्राय घ्यायला मला नक्की आवडेल.... चांगले आणि वाईट दोन्हीही
|
Soha
| |
| Friday, June 02, 2006 - 5:05 am: |
| 
|
मी पण शोभा डे च Selective Memory वाचले. मलाही ते बरेचसे आवडले. तिने तिच्या आयुष्यात खूप वेगवेगळे अनुभव घेतले आहेत. आणि त्याबद्दल मोकळेपणाने लिहिले आहे. उदा. तिचे modeling मधले अनुभव. ती जे आयुष्य जगली ते कदाचित आपल्याला बेगडी किन्वा उथळ वाटू शकते पण तसेही जगणारी अनेक माणसे या जगात असतात. आणि त्यान्चे अनुभव जाणून घेण्यासाठी तरी हे पुस्तक वाचावे.
|
शोभा डे चे selective memory वाचले तेव्हा तीच्या बद्दल फ़ारशी माहिति नव्हती...,पन तीने हिम्मतीने निर्णय घेतले ते आवडले...!!! अशोक राजा आनि बुध्द धर्म याबद्दल मला माहिति नाही फ़ारशीम्हणुन ह्या पुस्तकाचा परीचय आवडला...!!! वाचावेच्लागेल असे हे पुस्तक दिसतएय
|
Maudee
| |
| Monday, June 05, 2006 - 7:10 am: |
| 
|
धन्यवाद लोपा. सोहा, मी वर लिहिल्यापरमाणे शोभा डेचं तिच्या modelling मधल्या आयुष्याबद्दल किंवा तिच्या वैयक्तीक आयुष्याबद्दल जे लिहिलं आहे त्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाहीये. no doubt तिने ते ख़ूप सुंदर लिहिलं आहे. पण तिने जे बाकीच्या लोकंबद्दल किंवा त्यान्च्या ख़ाजगि आयुष्याबद्दल लिहिलं आहे ते मला ख़टकलं असं मी लिहिलय. अर्थात हे माझं मत झालं
|
|
|