|
Paragb
| |
| Thursday, May 25, 2006 - 5:54 am: |
| 
|
"Narmade Har Har ..." Lekhak .. Jagannath Kunte. Narmada Parikrametil anubhavanvar adharit he pustak aahe. Vachat astana apanch tya parikramet aaho ase vatate. Ekada nischit vachaniya !
|
Rar
| |
| Tuesday, June 06, 2006 - 9:12 pm: |
| 
|
'नर्मदे ss हर हर' लेखक- जगन्नाथ कुंटे पुण्यात कर्वे रोडवर EC TV च्या दुकानाच्या गल्लीत (आता तिथे EC TV चे दुकान नसेलही!) 'वासुदेव निवास' नावाचा एक मठ आहे. अनेकांना ही जागा 'गुळवणीमहाराजांचा मठ' या नावानेही माहित असेल. तिथे एक दाढी वाढलेले, शिवराळ भाषा असलेले, अतिशय मोठ्या आवाजात बोलणारे आणि हातात कायम सिगरेट असणारे एक गृहस्थ कायम 'पडीक' असतात. जगन्नाथ कुंटे त्यांचं नाव. दिसायला अतिशय सामान्य माणूस, पण तितकाच 'असामान्य'! इतक्या फ़ाटक्या दिसणार्या ह्या माणसाच्या 'असामान्य'पणाची एक झलक मला दिसली होती ती माझ्या आई-बाबांमुळे...पण अधिक जास्त समज आली, जाणीव झाली ती नुकत्याच वाचलेल्या जगन्नाथ कुंटे यांच्या 'नर्मदे ss हर हर' या पुस्तकामुळे! हे पुस्तक आहे जगन्नाथ कुंटे यांनी केलेल्या नर्मदा परिक्रमेबद्दल. या माणसानं आतापर्यंत ३ वेळा नर्मदा परिक्रमा केली आहे. नर्मदा परिक्रमेचा मार्ग अतिशय खडतर समजला जातो. शूलपाणीचं जंगल तर 'मामांकडून लुटणे जाण्यासाठी' प्रसिद्धच आहे. (" मामा म्हणजे? या शूलपाणीच्या जंन्गलात पहिल्याच दिवशी एक भिल्ल जमात तुम्हाला लुटते. त्यांना नर्मदापुराणात 'नर्मदेचे भाउ' म्हणले आहे. म्हणून त्यांना 'मामा' म्हणतात. ते लुटतात. आपण आनंदाने लुटुन घ्यायचे. जन्मभर हे माझे, हे माझे करून आपण आसक्तीने वस्तू जमा करतो. ती आसक्ती सुटावी हा लुटण्याचा मुख्य हेतू.") ही तर परिक्रमेची सुरुवात असते. अशी ही परिक्रमा चालत पूर्ण करण्यासाठी तीन वर्षे तीन महिने तेरा दिवस लागतात. (परवाच बोलता बोलता माझ्या आईकडून समजले की सध्या ते ४ थ्या वेळेस परिक्रमा करण्यासाठी गेले आहेत म्हणून) अशा या नर्मदा परिक्रमेमधे आलेली अनुभव (भौतिक आणि अध्यात्मिक या दोन्ही पातळीवरचे) त्यांनी या पुस्तकात सांगीतले आहेत. हे असे अनुभव, हे कुंडलिनी जागृत होणं, नर्मदा माईनं कोणत्याना कोणत्या रूपात दर्शन देणं, अश्वथाम्याचं दर्शन होणं, गुरुनं आदेश देणं... खरं सांगते या गोष्टी निदान माझ्यातरी समजाच्या बाहेरच्या आहेत. त्यामुळे पुस्तकातले ह्या संदर्भातले अनुभवाबद्दलही मी बोलणे योग्य नाही. पण एखादा माणूस ज्याअर्थी एक नाही, दोन नाही तर चार वेळा ह्या मार्गावर जातो, हेच माझ्यासाठी 'असामान्य' किंवा 'पोचलेल्या' माणसाचं लक्षण आहे. निदान ह्या feeling साठी तरीहे पुस्तक नक्कीच म्हणजे नक्कीच वाचण्यासारखं आहे. जगन्नाथ कुंटे हा माणूसच जरा 'वेगळा' आहे. वयाच्या दहाव्या वर्षी हिमालयात जाण्यासाठी घरातून पळून गेलेला माणूस वेगळाच असणार. साधनेत असताना, परिक्रमेत घराची, बायको-मुलांची आठवण नाही, ओढ नाही. जेव्हा साधनेची मस्ती उतरते तेव्हा एक सामान्य, अशिक्षित माणूस. सतत सिगरेट ओढतात, त्यामुळे अध्यात्मातला माणूस असेल असं सांगूनही खरं वाटणार नाही. ह्यांच्या इतकच कौतुक वाटत ते ह्यांच्या बायकोचं. सौ. जानकी कुंटे यांचं. नवरा घरातून उठुन ' निघालो' असं सांगतो, बायकोला नमस्कार करतो आणि हिमालयात जाउन, किंवा हे असं नर्मदा परिक्रमा करून ३-४ वर्षांनी घरी परत येतो. पण ह्याबद्दल कुठेही तक्रार नाही. ह्या बाईची संसारात राहून केलेली 'साधना' महान आहे. हे पुस्तक तरी त्यांनी का लिहीलं असेल? "हे सगळं सुरुवातीपासून मित्र श्रीराम रानडे ह्यांनी, माझी भयंकर बडबड सहन करीत ऐकत, वेळोवेळी वाचून सांगीतलं- अरे, बरंच चांगलं लिहीलं आहेस रे. चालू द्यात. त्याचे डोके खाऊनही त्या पती-पत्नींनी 'चालूद्यात' इशारा दिल्याने लिहून मोकळा झालो. आणि कविमित्र रमेश गोवंद वैद्य म्हणाला अरे, छान धुनी पेटली आहे. सगळे रंग जसे आले अंगावर तसे येताहेत चालू द्यात स्वामी. त्याचेही मी ऐकले. आज लिहीतोय. नावाचे संदर्भ यत नाहीत. मोठ्यागावांचे स्मरण आहे. लिहीणे आपले काम नाही. अभ्यास नाही. लिखकुपणाचा आव नाही. जे जाणवले, जे दिसले रंग ते मस्त धून लागली म्हणून लिहितोय. दैनंदिनीची सवय नाही. काल अनंत आहे. आपल्या अस्तित्वाचा काळाच्या पटावर फ़राटासुद्धा उठणार नाही, राहणार नाही. सगळे त्या त्या क्षणाचे, बाकी सारे मर्त्य! आतूनच आज्ञा झाली म्हणून सांगायचे...." एकूणच हे पुस्तक वाचणं एक विलक्षण अनुभव होता. मला समजतय की मला नीट लिहीताही आलेलं नाहीये ह्या पुस्तकाबद्दल, पण ही लिहीण्याची नाही तर अनुभवण्याचे गोष्ट आहे हे पुस्तक वाचलंत तर तुम्हालाही नक्की जाणवेल.
|
Bee
| |
| Wednesday, June 07, 2006 - 3:48 am: |
| 
|
रार, चांगले कळकळीने लिहिलेस पुस्तक परिक्षण. आवडले. अशी पुस्तके वाचूनच अधिक स्पष्ट होतात.
|
Paragb
| |
| Wednesday, June 07, 2006 - 2:35 pm: |
| 
|
खुप छान पुस्तक आहे हे
|
Mrinmayee
| |
| Wednesday, June 07, 2006 - 2:52 pm: |
| 
|
रार, तुझं परिक्षण वाचून नक्की वाचावसं वाटलं हे पुस्तक! म्हणतात ना To be without possessions or to reduce one's possessions to a minimum is easy. Difficult is, not to be attached to whatever you possess! खरंच छान असणार हे वाचायला. असंच एक खूप सुंदर पुस्तक फार वर्षांपूर्वी वाचल्याचं आठवतं, जी. के प्रधान या ICS व्यक्तिनं आपल्या आयुश्यातले स्पिरिच्युअल अनुभव सांगितले आहेत "साद देती हिमशिखरे" या पुस्तकात. (हा मराठीतला अनुवाद कुणी केलाय ते आठवत नही. पण मूळ पुस्तक आहे ईंग्रजीत, ' towards the glittering (or shining?) crests of himaalays' नावाचं
|
Santu
| |
| Thursday, June 08, 2006 - 8:42 am: |
| 
|
अरे रार अश्या लोकांच्या लिखाणा तच भानामति असते. स्वता अनुभवुन लिहतात ते खरेच महान लेखक. जसा हेमिन्ग्वे. अरे तुला माहित नाहि पण तु सुध्दा चागला लेखक होशिल. तुझ्या परिक्षणा वरुन तर असेच वाटते
|
Nakul
| |
| Tuesday, February 17, 2009 - 11:03 pm: |
| 
|
हे पुस्तक वाचायला घेतलं आणि खाली ठेवताच आलं नाही. एका बैठकीमध्येच वाचून संपवलं. पहिल्या तीन परिक्रमेच्या अनुभवांवर आधारित असे हे पुस्तक आहे. चौथ्या परिक्रमेवर आधारित साधनामस्त हे पुस्तक त्यांनी लिहीले आहे. दोन्ही पुस्तके वाचताना एखादी गोष्ट सहज सोपी करून सांगण्याची त्यांची हातोटी जाणवते. तसेच व्यावहारिक जगात सगळ्यांच्यात देव बघायची वॄत्तीदेखील. काही माहित असलेल्या शब्दांचे माहित नसलेले अर्थ देखील उलगडतात (नमन - न-मन) विचाराला चालना देणारे हे शब्द मला बयाचदा अंतर्मुख करून गेले. ह्या जगन्नथ कुंटेंची अजून दोन पुस्तके आलेली आहेत. कालिंदी आणि नित्य निरंजन. ती देखील सुरेखच आहेत.
|
|
|