|
Maudee
| |
| Monday, June 19, 2006 - 12:20 pm: |
| 
|
नुकतेच मी रविन्द्र भटांचे "भेदिले सुर्यमंडळा "वाचले. अप्रतीम पुस्तक आहे. तसे मी हे पुर्वी सुध्हा एकदा वाचलेले.तेव्हा सुध्हा अशीच भारावून गेले होते. आणि आता सुध्हा. पण तेव्हा बर्यापैकी लहान असल्यामुळे बर्याचश्या गोष्टी डोक्यावरून गेल्या होत्या. हे पुस्तक समर्थ रामदास स्वामींवर आहे. त्यान्च्या आयुष्यातला शिव राज्याभिषेका पर्यंतचा सर्व घटनाक्रम दिला आहे. पण सर्व पुस्तकात शिवाजी महाराजांच्या किंवा स्वतः रामदास स्वामींच्या आयुष्यातील नाट्य टाळलं आहे. पण प्रत्येक घटनेतली समर्थांची मानसिकता स्पष्ट केली आहे. आणि तो ख़रच एक सुंदर अनुभव आहे. त्यांच्या आयुष्यातला घटना क्रम ढोबळ मानाने सांगायचा तर्_ १. सावधान हा शब्द ऐकल्यावर लग्नातून पळून जाणे. २. पंचवटीला रामाचं सगुणरुपातलं दर्शन. तस त्याना अगदी लहानपणीही रामाचं सगुण दर्शन झालं होतं. ३. टाकळीला १२ वर्षे पुरश्चरण. त्याच वेळी आजुबाजुच्या गावातील तरुणाना बलोपासनेची दिक्षा. ४. १२ वर्षे भारतभर भ्रमण आणि मठस्थापना. याच मठांचा शिवाजी महाराज आग्र्यात असताना पलायनाच्या वेळी उपयोग झालेला. ५. चाफ़ळला राम मंदिराची स्थापना. ६. ११ मारुतींची स्थापना. ७. दासबोध आणि मनाचे श्लोक यांच लिख़ाण. या पुस्तकात समर्थांचा स्वतःशी केलेला संवाद छान लिहिला आहे. स्वधर्म, हिंदू धर्माचा व्यापक अर्थ दिलेला आहे. पण हा काल सापेक्ष आहे. म्हणजे त्या वेळी ज्या विचारांची गरज होती ते त्यानी दिले. माझ्या मते आज सुध्हा धर्माचा हाच अर्थ लक्षात ठेवणे जरूरिचे आहे.(पुढे जो स्वामी विवेकानंदानी हिंदू धर्माचा अर्थ सांगितला तो या पेक्षा व्यापक आहे.) माझ्यासाठी तरी हे आत्म ज्ञानाच्या प्रवासाकडे एक आत्म विश्वासक पुढचे पाऊल ठरले आहे. ज्याना अश्या विषयाची आवड आहे आणि इच्छा आहे त्यानी हे पुस्तक जरूर वाचावे. पुस्तक - भेदिले सुर्यमन्डळा लेख़क - रविन्द्र भट.
|
Deemdu
| |
| Tuesday, June 20, 2006 - 6:11 am: |
| 
|
भेदीले सुर्यमंडळा खरोखरच मस्त पुस्तक आहे, वाचताना सर्व प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभे करण्याच भटांच कौशल्य तर वादातीत आहे. समर्थांची महाराजांशी भेट ही अतिशय सुंदर रंगवली आहे. मध्यंतरी कुठलस एक पुस्तक वाचनात आलं होतं, त्याच नाव अजिबात आठवत नाहिये पण त्या मध्ये रामाला शिवधनुष्य उचलता आलं कारण त्याने गळ्यामधे लोहचुंबक घातल होत आणि शिवधनुष्य लोखंडाच होत किंवा सीता ही रावणाची मुलगी होती आणि त्यानेच तीला पेटीत घालुन जमिनीत ठेवली होती किंवा मारुती उडत होता म्हणजे आजच्या पतंगासारख्या पतंग तो पाठीवर बांधून उडायचा वगैरे अस काहीस लिहील आहे, लेखीकाही लक्षात नाही कदाचित पुस्तकाच नाव दक्षिणायन अस असाव
|
|
|