|
Dineshvs
| |
| Wednesday, June 21, 2006 - 5:33 pm: |
| 
|
नुकतेच मिलिंद बोकिल यांचे शाळा, वाचुन संपवले. याची ओळख दक्षिणाने करुन दिली आहे म्हणुन जास्त लिहित नाही. १९७९ दरम्यान, डोंबिवलीतील नववीत शिकत असलेल्या मुकुंद जोशीची हि कथा. या वयात आणि त्या काळात जे काहि घडु शकेल त्याची ऊत्कृष्ठ मांडणी. मीहि त्या दरम्यान नववी दहावीतच होतो. त्यामुळे तो काळ माझ्या चांगल्याच स्मरणात आहे. शिवाय त्या पुस्तकात आलेली बहुतेक पात्रे मला या ना त्या रुपात, माझ्याहि शाळेत भेटली होती. या पुस्तकाचे मुख्य आकर्षण आहे ते यातली शब्दकळा सुममधे, डाऊट खाणे, बाटली फुटणे, चिमण्या, लाईन देणे असे काहि खास शब्द तर मला त्या काळात घेऊन गेले. धतिंग, चमको, फ़द्या असे काहि शब्द आमच्यावेळी वापरात होते. त्यावेळी अश्लीलतेच्या व्याख्या जरा वेगळ्या होत्या. हे काय किंवा प्रकाश संतांच्या लंपनच्या तोंडचे शब्द काय, एरवी आपल्याला साहित्यात सापडले नसतेच. आता या दोन लेखकानी निदान मुलांच्या तोंडची भाषा तरी पुस्तकबद्ध केलीय. हि भाषा अगदी प्रवाहि असते आणि दर तीन चार वर्षानी एकदम वेगळेच रुप घेऊन येते. पण हि झाली फक्त मुलांची भाषा. शाळकरी मुलींची सुद्धा एक खास भाषा असते. शाळा मधे शिरोडकरच्या तोंडी, हल असा एक गोड शब्द आलाय. पण अशी खास मुलींची शब्दकळा असलेले एकादे पुस्तक आले तर किती छान होईल.
|
Vadini
| |
| Wednesday, June 21, 2006 - 7:50 pm: |
| 
|
Me jeva 6 mahinya-poorvi 'Shala' he pustak vachale hote-teva majhya-hi manat agadi he-ch vichar aale hote.aani tya vayatil Mulin-che-hi swatah-che ase ek khas vishva asate he tar khare-ch!aani tase ekhade pustak koni lihile tar.. ase kahise mjahya-hi manat dokavun gele!
|
Bee
| |
| Thursday, June 22, 2006 - 2:11 am: |
| 
|
दिनेश, विदर्भात हल शब्दाचा अर्थ 'सलज्जतेने नाही नाही.. असे मुळीच नाही..' अशा अर्थानी हा शब्द आहे. तुम्हाला हाच अर्थ अपेक्षित आहे का?
|
Dineshvs
| |
| Thursday, June 22, 2006 - 5:07 pm: |
| 
|
नाही, Bee या शाळा ची नायिका, मुलांच्या हट सारखा तो शब्द वापरते. हे पुस्तक वाचले कि नाही अजुन ?
|
हल हा शब्द आम्हीही लहानपणी हट,चल(इथून)अशा अर्थाने म्हणजे नीघ इथून अथव हाल इथून अशाच अर्थाने वापरायचो. आमच्या खेड्यात 'ढळ' असाही शब्द असे.......
|
Dineshvs
| |
| Friday, June 23, 2006 - 3:52 pm: |
| 
|
हे जे मिलिंद बोकिल आहेत ना, ते नुसते ललित लेखन न करता वैचारिक लेखनहि करत असतात. त्यानी काहि महिन्यांपुर्वी ईथे गोव्यात एक भाषण दिले होते. ते संपुर्ण भाषण गेल्या रविवारच्या साप्ताहिक सकाळमधे आलेले आहे. त्यानी मांडलेला मुद्दा खुप पटण्यासारखा आहे. जागतिकीकरणाला त्यानी सपाटीकरण असा शब्द वापरलाय, आणि ते रोखायचे असेल तर आपली भाषा जिवंत ठेवायला हवी असे आव्हान ते करतात. ( या लेखावर स्वतंत्रपणे लिहावे लागेल मला ) तर हि असे जे भाषेचे सौंदर्य आहे, ते टिकवले पाहिजे. मला खुपदा नवल वाटते, आपण सगळे ईतक्या वेगवेगळ्या पार्श्वभुमीचे, वयाचे आहोत. तरी आपण ईथे एकत्र येतो काय, भांडतो काय, जवळ काय घेतो, विचारपुस काय करतो, टोचुन काय बोलतो. जसे काहि प्रत्यक्षात समोरच आहोत. आणि आपल्या सगळ्याना एकत्र आणणारी हि एक भाषा आहे, हे कसे विसरता येईल ?
|
Rar
| |
| Friday, June 23, 2006 - 4:28 pm: |
| 
|
दिनेश, तुम्ही म्हणताय त्या प्रमाणे मुलींचीपण भाषा असते. शिवाय फ़क्त मुलींच्या शाळेत शिकलेल्या मुलींची आणि आमच्यासारख्या मुले-मुली एकत्र असलेल्या शाळेत शिकलेल्या मुलींची भाषा पण वेगवेगळी असते (कारण तशी 'वेगळी' भाषा असायच्या गरजा पण वेगळ्या असतात!) नुसते शब्द म्हणले तर खूप निघतील, rather माझ्याकडे त्यातले खूप लिहून ठेवलेले आहेत (मागे एकदा 'तरूण तुर्क' बसवले होते तेव्हा अशाच लिहून ठेवलेल्या शिव्या उपयोगी आल्या होत्या...) पण 'शाळा' चं वैशिष्ट्य म्हणजे ते सगळे शब्द एका गोष्टीमधे ओघाने येतात...तसं लिखाण पाहिजे, तशी कथा पाहिजे तर त्या शब्दांची 'खरी गंमत'!
|
Dineshvs
| |
| Saturday, June 24, 2006 - 3:30 pm: |
| 
|
Rar जर शब्द्संग्रह ठेवलाय तर कथा रचायला कितीसा वेळ लागेल ? मला वाटते मंगला गोडबोले पण असे काहितरी लिहु शकतील. बाबाना सुचवणार का ? या शाळा शब्दाची पण मजा आहे. कोल्हापुरात अजुनहि तो शब्द, नखरा म्हणुन वापरला जातो. बाकि बोलिभाषा थोड्याफार प्रमाणात टिकु शकतात, पण हि वयात येतानाची भाषा आणि तरुणाईची भाषा सतत बदलत असते. कोसला आणि वासुनाका च्या यशात, या भाषेचे योगदान फार मोठे होते. या पुस्तकात देखील, कुठेहि या शब्दांचा अर्थ येत नाही, पण वारंवार हे शब्द आल्याने आपोआप त्याचा अर्थ कळत जातो. तसे शाळेत पण नव्या मुलाला कुणी या शब्दांचा अर्थ सांगत नाही, त्याला तो आपणहुन समजुन घ्यावा लागतो. माझे सहावीपर्यंतचे शिक्षण ज्या शाळेत झाले, ती जनसंघ प्रणीत होती. त्याच भाषेचे संस्कार माझ्यावर अजुनहि आहेत. ऊदा. मटणाला माऊस म्हणणे वैगरे. मग सातवीनंतर, ज्या शाळेत आलो ती होती मिश्र वस्तीतील. तिथे जसे भिसे, मथुरे, देशपांडे नावाचे मित्र होते तसेच आग्रे, म्हात्रे आणि रावते देखील. त्यामुळे वेगळीच भाषा कानावर पडायची. ( त्यावेळी मित्राना आडनावाने हाक मारायची प्रथा होती. ) पण माझ्या जिभेवर मात्र ती भाषा चढली नाही. ( खुद्द शाळामधले अनेक शब्द, मी आजहि लिहु वा ऊच्चारु शकत नाही. ) शिवाय हि भाषा, शिक्षकांच्या कानावर पडु नये, याची खुप काळजी घेतली जात असे. मुलींची वेगळी भाषा असायचे एक कारण त्या काय बोलतात हे मुलाना कळु नये, हेहि असणार. त्या शब्दाना वेगळे उच्चारहि लाभले होते. माझ्या शाळेतल्या मुली " बावळट्टच्चे " याचा उच्चार फारच गोड करायच्या. आणि त्यावेळचा त्यांचा एक शब्द अजुनहि वापरात आहे, तो म्हणजे " दादाभाई नवरोजी " तर थोडक्यात मुलींची भाषा, आता ऊघड झालीच पाहिजे. गजानन ते पुस्तक शोधीन मी.
|
shala he pustak vachatana ti sarva patra maza samor vavarat asalyacha bhas mala hot gela ,sagale kahi maza samorach ghadlya sarkhe vatat rahile ..ani mhaun mi tyana mazya concept art madhun baher kadhu lagalo ..hya story var kahi tari chitrit (film) karanyache mi agadi pakke kele aahe ... kahi concept arts... मी माZया website वर काही concept arts upload केल्या आहेत जमल्यास तुमच्या commends तीथे post क्रा. my website http://www.rupeshtalaskar.blogspot.com/

|
some more ... http://www.rupeshtalaskar.blogspot.com/

|
Zakasrao
| |
| Thursday, March 08, 2007 - 11:44 am: |
| 
|
वा मस्तच आहेत चित्र. शाळा मी परिक्षण वाचुन विकत घेतल होत. मनात थोडि धाकधुक होती. पण वाचल आणि वाटल फ़ुल टू धमाल. एकदम आवडल पुस्तक.
|
Dineshvs
| |
| Thursday, March 08, 2007 - 5:06 pm: |
| 
|
रुपेश, सुंदरच आहेत चित्रे. शाळा मधे आलेले स्थळ, हे डोंबिवली जवळचे वाटत राहते. त्याकाळात डोंबिवली तसेच होते.
|
ti jenvha mandirat tyala bhetayala jate..
|
Tulip
| |
| Wednesday, September 15, 2004 - 9:14 pm: |
| 
|
imailaMd baÜikla cao XaaLa pustk. Ap`itma. %yacyaa Jaona gaaD-na poxaahI ho jaast Cana vaaTlao. [ya<aa navavaI cyaa eka vagaa-tIla maulaamaulaIMcaoÊ %yaaMcyaa huDpNaacaoÊ pÝgaMDavasqaotIla prspr
AakYa-NaacaoÊ hLUhLU naahIXaa hÜt jaaNaaáyaa manaatlyaa kÜvaiLikcao AaiNa Apirhaya-pNao yaoNaaáyaa samaMjasapNaacaoÊ
%yaatIla iXaxakaMcao Ê Aajaubaajau cyaa saamaaijak GaTkaMcao AitXaya sauMdr Xabdica~ (at Aaho. nostalgic feel ek p`karcaa ho pustk vaacatanaa kuNaacyaahI manaat AalyaavaacaUna rhaNaar naahI. kqaanaayak eka izkaNaI mhNatÜ.. %yaa idvaXaI malaa kLla kI XaaLocaI majaa kXaat Aaho to. vaga- AahotÊ
baak AhotÊ pÜrpÜrI AahotÊ sar AahotÊ gaiNat AahoÊ BaugaÜla AahoÊ pNa AapNa %yaat kXaatca nasatÜ. Aaplyaa
manaat ek vaogaLIca XaaLa BarlaolaI Asato. Kasa ekT\yaacaIca. %yaa XaaLolaa vaga- naahItÊ iBaMtI naahItÊ
ÔLa naahIÊ iXaxak naahIt pNa %yaatla iXakNaM Ôar sauMdr Aho. dudO-vaanao dhavaIca vaYa- sau$ Jaala kI sagaL\yaaMcyaaca AayauYyaatlaI hI sauMdr XaaLa saMpUna jaato..
jasa (a pustkacyaa XaovaTI mhMTla Aaho.. XaaLa saMplaI hÜtI. Aata Ô> hÜtM dhavaI naavaaca BayaaNa vaYa-. p`%yaokanao jaÉr vaacaavao Asao ho pustk.
|
Dakshina
| |
| Monday, January 23, 2006 - 11:31 am: |
| 
|
शाळा नुकतंच मिलिंद बोकिल यांचं शाळा वाचलं. पुस्तकाची भाषा अतिशय सोपी आणि सुटसुटीत आहे. लहानच काय पण मोठ्यांना पण हे पुस्तक आवडेल असंच आहे. य पुस्तकातली पत्रं म्हणजे मुकुंद खुद्द लेखक्) सुर्या, चित्र्या, सुकडी, केवडा, सुंद्री,चिमण्या, भावमारू एत्यादी. (म्हणजे ही लेखक आणि त्यांच्या टारगट मित्रांनी इतरांसकट शिक्षकांना दिलेली नावं) आपण पण वाचताना या सर्वांना त्यांच्या या टोपण नावानेच ओळखायला लागतो. मग पुढे सुकडी चे खरे नाव ही वाचायला मिळते पण ते तितकेसे Appealing वाटत नाही. थोरली बहीण म्हणजे तर अंबाबाईच.. तिचं नाव शेवटपर्यंत कळत नाही. नावांमध्ये किती मजा असते ते मला हे पुस्तक वाचल्यावर फ़ार जाणवलं ही गोष्टं एक नववी इयतेच्या वर्गाची आहे, ती पण फ़क्त एका वर्षाची. या संपुर्ण वर्षात काय काय घडतं, शाळेकडे, शिक्षिकांकडे, वर्गातल्या इतर मुलामुलींकडे लेखक आणि त्याचे मित्रं कोणत्या दृष्टीने पहातात याचं वर्णन अतिशय सुंदर आहे. ही सगळी मुलं किशोर वयातली असल्याने थोड्या फ़ार शिव्या, मुलिंकडे पाहणं हे सुद्धा मुलांच्या शब्दात जसंच्या तसं लिहिलं असलं तरिही अश्लील वाटत नाही. इचिभना हा शब्दं पुस्तकात सहजगत्या एका पानावर साधारणपणे २ वेळा असा वाचायला मिळतो. काही मुलं ही ळ ऐवजी ल म्हणतात. उदा. ही काय शाला हाए? हिला कोनी पलवून का नाई नेत? काही गमतीशीर घटनांमुळे हे पुस्तक अगदी खर्या अनुभवांवरून लिहिलं असावं असं वाटतं. म्हणजे वर्गात शिक्षकांची पाठ असताना मागे उभं राहून त्यांना नमस्कार करून पटकन जागेवर जऊन बसणे. Sleevless घातलेल्या बाईंच्या तासाला मुदाम तासाचा नंबर चुकिचा तो ही फळ्याचा अगदी वरच्या टोकाला लिहिणे, जेणेकरून बाईंना हात उंच करून ते पुसून नवीन माहीती लिहावी लागावी. आपल्यापैकी काहीजणांनी हे उद्योग केले असतील शाळेत असताना, त्यामुळे वाचताना अजुनच मजा वाटते. काही मोजके शिक्षक सोडले तर Principal सकट सगळ्यांना टोपण नावं दिलेली आहेत. पहिल्यांदा तर आपल्याला आप्पा म्हणजे कोण हे कळतंच नाही, नंतर Ref लागतो की ते शाळेचे मुख्याध्यापक आहेत. आवडते शिक्षक, गरीब शिक्षक.. एकाला तर प्रेम चोप्रा म्हणूनच बोलावत असतात हे. किशोर वयातल्या मुलांना सामोर्या जाव्या लागणार्या काही नाजुक गोष्टी पण पुस्तकात आढळतात. आणि त्यासाठी वापरलेल्या त्यांच्या त्यांच्या संज्ञा. मुलिंकडे पाहणे, त्यांच्या मागं जाऊन त्यांना विचारणं. मुलिंसाठी मार खाणं आणि देणं पण. लेखकाच्या य वर्षातले २ सोबती म्हणजे शेताडीतली वाट आणि ती शाळेजवळची बांधकाम सुरू असलेली Building जिथे बसून लेखक आणि त्याचे मित्र शाळेत येणार्या मुलांना मुलिंना चिडवतात. तिथेच अभ्यास पण करतात, सुख दुःख वाटतात. नरूमामा हे पुस्तकातलं एक मुख्य पात्रं. लेखकावर त्याचा विषेश प्रभाव जाणवतो. हा मामा एकदा गमतीत सांगतो की मी ख्रिश्चन मुलीशी लग्नं करणार आहे म्हणून, पण प्रत्यक्षात जेव्हा तसं होत नाही तेव्हा साहेबांचा लेखकाचा) मूड off होतो. एकाच वर्षात मुलं शाळेतल्या आणि घरातल्या वेगवेगळ्या अनुभवांनी कशी बदलतात, शहाणी होता, निर्भय होतात हे ही या पुस्तकात दाखवलं आहे. शिरोडकर ही लेखकाची आवडती मैत्रिण असते, शिक्षक जेव्हा तिला क्षुल्लक कारणावरून मारतात तेव्हा लेखक शिक्षकांच्या विरुद्धं जातो आणि तिच्यासाठी मार खातो. थोडक्यात तसं करणं म्हणजे त्याला आपण काहीतरी Heroic Did केलय असं वाटतं मग तिच्याच्साठी सिनेमाच्या भेंड्या येत असूनही हारणं वगैरे. पुस्तक वाचताना बरेच भवूक क्षणही अनुभवतो आपण. एकदा सुर्या लेखकाच्या मदतीने केवड्याला लाईन देतेस का म्हणून विचारतो, आणि ती Principal कडे तक्रार करते, मग ते सुर्या आणि लेखकाच्या पालकांना बोलवतात. वडील तयर होतात पण त्याआधी ते लेखकाला नीट विचारतात की खरं खरं काय घडलं ते सांग म्हणून, शिवाय Office मधे गेल्यावर सुर्याच्या वडलांना पण समजावून सांगतात की किशोर वयातली मुलं थोडी वाह्यातपणे वागतात त्यांना समजून घेतलं पाहीजे. दुसरा प्रसंग म्हणजे जेव्हा लेखकाला कळतं की सतत आपल्या सर्वं गोष्टीत लूडबूड करणारी आपली थोरली बहीण अंबाबाई विजय वर प्रेम करतेय तेव्हा त्याला असूरी आनंद होतो, पण विजयला पोलिसांनी पकडून नेल्यानंतरची तीची अवस्था पहून तो कळवळतो आणि ठरवतो की आपण हिला मदत करायची. पुस्तक वाचताना असं वाटलं की शेवटी लेखक कोणितरी मोठा Engineer होऊन वगैरे ह्या सगळ्या आठवणि सांगतोय, आणि आपापले मित्रं पण बरेच मोठे झालेत असं सांगतोय. पण प्रत्यक्षात पुस्तक १० वी इयत्तेचं वर्ष सुरू होता होताच संपतं. शेवट थोडा Touchee आहे. नववीच्या वर्षाचा ठसा हा जसा लेखकाच्या मनावर जाणवतो, तसाच आपल्या पण जाणवतो. पुस्तक मिळालं तर एकदा जरूर वाचा.
|
शाळा खरच अप्रतिम पुस्तक आहे विशेषत्: सामाजिक बन्धनांची राजकिय बंधनांशी जी सांगड घातली आहे आणी-बाणीच्या पार्श्वभूमीवर, ते या पुस्तकाच वैशिष्ट्य म्हणाव लागेल
|
Saee
| |
| Monday, February 06, 2006 - 10:03 am: |
| 
|
शाळा आवडलं मला. कोणालाही आवडेल असं आहे. गांभीर्य आणि विनोद यांचा सहज समतोल आहे. काही पात्रे खुपच प्रगल्भ घेतली आहेत. अडनिड्या वयातल्या मुलांचं भावविश्व अचुक रेखाटलंय. चित्र्या, जोशाचे बाबा, मांजरेकरसर, सुकडी ही काही मला आवडलेली पात्रे. आदित्य म्हणतो तसा राजकीय पार्श्वभूमीचा संदर्भ खुप परिणामकारकरित्या येत रहातो. दूरचित्रवाणीचं आक्रमण आणि त्यात विस्कटुन गेलेली सामाजीक घडी अस्वस्थ करते. आपण सगळे त्यातुन गेलोय, पण तरीही ते वाचताना पुन्हा जाणवल्यावाचुन राहात नाही.
|
Kedarrp
| |
| Wednesday, June 30, 2004 - 3:33 am: |
| 
|
kaalach shri milind bokil yanche 'shaLa' eka baiThakit vaachoon kaDhale. tya pustakachya pahilyach panaavar 'shaLet gelelya pratyekasaThi...' ase saraL tumachya baalpaNichya tya kadhi hi parat na yeNrya 'shaLe' talya divasanchi aaaThavaN karoon deNare vaakya aahe. aaplyapaiki baryach jaNanna yatil javaL javaL sagalech anubhav he aaplech anubhav aahet ase nakkich vaaTel. miLel tevha jaroor vaachaa...
|
Anahut
| |
| Wednesday, August 08, 2007 - 12:21 pm: |
| 
|
शाळा हे खरच अप्रतिम पुस्तक आहे............... शिरोडकर जोश्या चित्र्या सुर्या फावड्या.......... सगळीच पात्र खूप सुन्दर रन्गवलेली आहेत...... त्यावर आलेले "ग म भ न.." हे नाटकही मस्त आहे... आणि मी आत्ताच एका पेपरात वाचल की शाळा वर हिन्दि पिक्चर येतोय म्हणुन.....
|
Shonoo
| |
| Sunday, February 24, 2008 - 2:56 am: |
| 
|
आजच शाळा पुस्तक वाचून संपवलं. एका बैठकीत नाही तरी एका दिवसात पुस्तक संपवायचे योग सहजा सहजी येत नाहीत. Harry Potter ची पुस्तकं न थांबता वाचण्यासाठी Advanced Parole काढावा लागत असे. शेवटचं Harry Potter संपवल्यानंतर एका दिवसात वाचलेलं हे दुसरं पुस्तक. ( माणसं अरभाट आणि चिल्लर हे रात्रभर जागून वाचलं होतं). त्यातल्या protagonist सारखी नव्या अभ्यासक्रमाची माझी तिसरी बॅच. आम्हालाही आणीबाणीचा अर्थ, त्याचे परिणाम नीट कळले नाहीत तरी वीस कलमी कार्यक्रम, पोस्टात, बँकेत पडलेला फरक थोडा थोडा जाणवत असे. पण आम्हाला शाळेत निदान वीस कलमी कार्यक्रमांची झळ पोचली नाही. घराघरातून टिव्ही येण्या अगोदरचे दिवस, एखाद्या घरी पहिल्यांदा टी व्ही आला की होणारी गर्दी अगदी नेमक्या शब्दात मांडलंय. नववीच्या वर्षात मुलं मुलींबद्दल अन शिक्षिकांबद्दल असे विचार करत असतील हे मात्र मला नवल वाटलं. अर्थात आमच्याही शाळेत मुलं मुली एकमेकांशी बोलत नसत. त्यामुळे मुला मुलांच्यात काय चालत असे देव जाणे! त्या काळच्या मध्यमवर्गीय मराठी शाळेते शिकणार्या मुलांचं, त्यांच्या घरच्यांचं अगदी चपखल वर्णन केलंय. झेन गार्डन अन उदकाचिया आर्ती आधीच वाचून झालंय. आता बाकीची पुस्तकं मिळवावी लागणार.
|
Bee
| |
| Sunday, February 24, 2008 - 8:30 am: |
| 
|
शोनू, तुझ्या यादीत बरीच पुस्तके अजून नाहीत जी की मी वाचली आहे :-)) चल आपण आपापल्या लायब्रर्या एकत्र करू :-))
|
|
|