|
Dakshina
| |
| Friday, July 07, 2006 - 7:41 am: |
| 
|
नुकतंच मी 'तसलिमा नासरीन' लिखित 'फ़रासि प्रेमिक' हे पुस्तक वाचलं. अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला आहे. ही कथा एका नीला नावाच्या बंगाली तरूणीची आहे. प्रेमभंग झाल्यानंतर, घरच्यांच्या मर्जीने ती Paris मध्ये स्थायिक झालेल्या माणसाशी लग्न करते आणि Paris ला जायला निघते, तिथे पुस्तकाचा प्रारंभ होतो. थोड्या फ़ार प्रमाणात लेखकाचे काही सुप्त गुण म्हणा किंवा ईच्छा या त्यांच्या पात्रात नकळतपणे उतरतात असं माझं वैयक्तिक मत आहे, त्यामुळे नीला हे पात्रं पण थोडं बंडखोर आहे लेखिकेप्रमाणे. किशन (नीलाचा नवरा) हा एक सुखवस्तू प्राणी आहे ज्याला फ़क्त पैसा आणी बायकोचं शरीर इतकंच जग माहीती आहे. बायकोने नोकरी करू नये, घरी रहावं आणि आपली सेवा करावी यासाठीच त्याने 'साधी' समजून नीलाशी लग्नं केलेलं असतं. नीला शिकलेली असते त्यामुळे आपण नोकरी करावी असं तीला सतत वाटत असतं. नवर्याच्या नकळत ती त्याच्याच Restaurant मधल्या मुलाच्या मदतीने नोकरी मिळवते आणि जायला पण सुरू करते. एके दिवशी त्याला कळतं आणि तो तिची कानऊघाडणी करतो. त्याच्या या संकुचित मनोवृत्तीला कंटाळून ती घर सोडून सुनिलकडे निघून जाते. (सुनिल हा लेखिकेच्या भावाचा निखिलचा मित्र, तो ही Paris मध्येच स्थायिक असतो. आणी नीलाच्या लग्नात मध्यस्थ पण.) नीलाच्या या तडकाफ़डकी निर्णायामुळे जर आपण तीला आश्रय दिला तर आपले आणि किशनचे संबंध बिघडतील म्हणून सुनिल आणि त्याची बायको चैताली तिला दुसरीकडे घर शोधायला सांगतात. नीलाच्या Office मध्ये Daniel नावाची एक तरूणी असते जी नीलाला आपल्याकडे ठेऊन घेते, पण कालांतराने नीला तीची शिकार होते कारण Daniel समलिंगी असते. दरम्यान नीलची आई कोलकत्यात खूप आजारी असते, म्हणून नीला भारतात, कोलकत्याला येते. आई जाते. तिची सेवा शुष्रुषा नीट न झाल्याची सल तिला खूप बोचते काराण वडील आणि भाऊ अत्यंत बेफ़िकिर असतात. नीलाच्या आईने मोलिनाने नीलाच्या नावावर घरच्यांच्या नकळतपणे वीस लाख रुपये ठेवलेले असतात. मरताना ती ते तिच्या हवाली करून मरते. नीला परत Paris ला जाण्याचा निर्णय घेते (का ते कळत नाही.) खरंतर तिथे तिचं स्वतःचं असं काहीच नसतं तरिही. Paris ला परतताना नीलाला विमानात एक फ़्रेंच तरूण भेटतो Benoyar तो पंचवीशीतला विवाहीत तरूण असतो. प्रवासादरम्यान झालेल्या ओळखीमुळे Benoyar नीलाला paris मध्ये उतरल्यावर Coffee पिण्यासाठी आमंत्रण देतो. नीलाला खरंतर चहा खूप प्रिय असतो. पहिल्याच भेटीत बेनॉयर आणि तिच्यात शारीरीक संबंध होतात. नीला त्याला प्रेम समजते. नीलाला कुठेतरी आधार मिळाल्यासारखा वाटतो, पण बेनॉयरला नीला फ़क्त शरीराने हवी असते. Paris ला परतल्यावर Daniel च्या घरी रहायचं असं ठरवून आलेली नीला तिथे दुसर्याच एका तरूणीला बघून हबकते. Daniel पण नीलाला निघून जाण्यास सांगते. अशावेळी बेनॉयरने तीला मदत करणं अपेक्षित असतं पण तो त्यासाठी तयार नसतो. कारण त्याची बायको पास्कल आणि मुलगी Jackline यांच्याशी तो मनाने बांधलेला असतो. नीलाला सुनिलकडे जाण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. पण सुनिलही तिचा गैरफ़ायदा घेतो. भारतातून आणलेले पैसे अजुन तिच्या Account वर Transfer झालेले नसतात त्यामुळे ती सुनिलकडूनच थोडे पैसे घेऊन एक घर भाड्याने घेते. इतक्यामध्ये बेनॉयर पण नीलाच्या प्रेमात पडतो आणि स्वतःचे सगळे भावबंध तोडून तिच्याकडे यायला तयार होतो, पण बेनॉयर मात्र मनाने आपल्या पत्नीचा आणि मुलिचाच जास्त विचार करत असतो. नीलाला ते रुचत नाही आणि ती ते नातं तिथेच संपवण्याचा जाहीर करते. बेनॉयर तीची अर्वाच्य भाषेत कानऊघाडणी करतो. क्षणात तीला बेनॉयरच बदललेलं रूप पहायला मिळतं. पुस्तक इथे संपतं. तसलीमा नासरीन यांचं हेच पहीलं पुस्तक मी वाचलं त्यामुळे, हे त्यांच्या नेहमीच्या पठडीतलं आहे की वेगळं हे मला सांगता यायचं नाही. पण एकूण पुस्तकाची लेखनशैली, भाषा खूप प्रभावी आहे. शिवाय सुप्रिया वकील यांनी पण शब्द न शब्द वाचकांकडे तसाच्या तसा पोचवला आहे. प्रत्येक माणूस पुस्तक वाचून विचारात पडतोच, मी ही पडले, १. नीला किशनला खूप क्षुल्लक कारणांवरून सोडते असं आपल्याला वाटतं कारण एकूणच भारतीय स्त्री ही सोशिक म्हणून प्रसिद्ध आहे. २. पुस्तकाचं नाव फ़रासि प्रेमिक म्हणजे फ़्रेंच प्रेमिक. पण बेनॉयरचा प्रवेश हा साधारणपणे १०० पानांनंतर होतो. त्यामुळे पुस्तकाला हे नाव देण्याचं लेखिकेचं प्रयोजन कळत नाही. ३. किशनला सोडल्यावर भारतात परतण्या ऐवजी नीला Paris मध्येच का रहाते? ४. आईच्या मृत्यूनंतर पण ती paris ला का परत जाते? कारण तिथे तिचं म्हणावं असं काहीही नसतं. बेनॉयर ने ज्याप्रमाणे पास्कलला आपल्यासाठी सोडलं तसंच तो दुसर्याकुणासाठीतरी आपल्याला सोडेल या विचाराने ती बेनॉयर बरोबरचं नातं तोडून टाकते... नीलाला ते वीस लाख रुपये Paris मधे रहाण्यासाठी २ वर्षं पुरणार असतात. पुढे ती काय करते? आपल्या आयुष्यात पुढे ती कोणता मर्ग चोखाळते याची उत्सुकता आणि हुरहूर दोन्ही रहातेच आपल्या मनात शेवटी...
|
Milindaa
| |
| Friday, July 07, 2006 - 8:57 am: |
| 
|
मी याची इंग्लिश आवृत्ती वाचली आहे. वरचे प्रश्न कदाचित् ही आवृत्ती वाचून पडत नाहीत, असं वाटतं. त्यामुळे मी थोडक्यात त्यांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो. १. नीलाला किशन कायमच घरात डांबून ठेवतो, तिला तिच्या इच्छेप्रमाणे काहीही करुन देत नाही, त्याला बायको की केवळ एक दिखाव्याची आणि भोगवस्तू म्हणूनच हवी असते. त्यामुळे नीलाचा कोंडमारा होतो. त्यातच ती वृत्तीने Romatic असते त्यामुळे तिला हा जाच असह्य वाटला असावा. आणि त्यातून ती जर भारतात रहात असती तर तिने त्याला सोडलेही नसते पण ते पॅरिस आहे हा विचार करुन हे खुप सयुक्तिक वाटते. २. मला इंग्लिश आवृत्तीचं नाव आठवत नाही पण ते वेगळं होतं हे नक्की. ३. किशन ला सोडलं असताना खरं तर नीलाचं पॅरिस मध्ये कोणीही नसतं, पण आता जर आपण परत गेलो तर आईला खूप वाईट वाटेल हा एक विचार आणि त्याहीपेक्षा तिने ज्या कारणासाठी घर सोडलेलं असतं ते स्वातंत्र्य तिला मिळालेलं असतं तेव्हा माझ्यामते तिला स्वतःला ते जगायचं आहे, अनुभवायचं आहे, म्हणून ती परत जात नाही. ४. आईच्या मृत्युनंतर ती जेव्हा भारतात जाते तेव्हा तिला लक्षात येतं की आईनंतर तिचं म्हणावं असं कोणीही नाहीये तेथे. भाऊ, वडील हे तिने आधी नवर्याला सोडल्याने तिच्यावर नाखुश असतात आणि तिला त्यांच्या आश्रयाने जगणे मंजूर नसावे म्हणून ती परत येते. हातात पैसे असतात, त्या पैशांतून आपण आपलं विश्व उभारु असा तिला विश्वास असतो, असं मला वाटतं मला तो शेवटचा 'नंतर ती काय करेल' हा प्रश्नही नाही पडला... कारण एकदा नीला एकटी जगायचं स्वीकारते आणि तिने आधी नोकरीही केलेली असते यामुळे ती तिचं आयुष्य घडवायला समर्थ आहे असाच विचार मी केला... हे वरच्या पोस्ट चं प्रत्युत्तर नाही पण कदाचित वेगळ्या नजरेतून नीलाची बाजू मांडली आहे
|
|
|