|
Shonoo
| |
| Wednesday, July 19, 2006 - 12:57 pm: |
| 
|
पर्व मूळ कन्नड पुस्तक आहे. एस.एल. भैरप्पा. उमा कुलकर्णी यान्नी अनुवाद केला आहे. बर्याच वर्षांपूर्वी आईने कानडीतून वाचून दाखवलेले आम्ही ऐकले होते. अनुवाद गेल्या ४-६ वर्षातला असावा. पण पुस्तक आवर्जून वाचण्या सारखे आहे. जाडजूड आहे, पण वाचायला लागले की ठेववत नाही.
|
Svalekar
| |
| Thursday, July 20, 2006 - 7:21 am: |
| 
|
पर्व हे लेखकाच्या द्रुष्टिकोनातून लिहिलेले महाभारत आहे. महाभारत वेगळ्या नजरेतुन वाचावयास मीळ्ते. सुन्दर पुस्तक आहे जरुर वाचावे. काठ एक प्रेम कथा आहे. माण्ड्णी छान आहे. लेखकाचे भाषेवर प्रभुत्व जाणवते.
|
पर्व हे पुस्तक वाचून पुढिल मते तयार होतात. १. युधिष्ठिर शेळपट होता. २. भीम बिनडोक होता. ३. अर्जुन स्त्रीलम्पट होता. ४. कुंती स्वार्थी होती. अशीच आणि काही मते. महाभारताला असलेला जो डिव्हाईन टच आहे तो ह्या पुस्तकात काढून टाकला आहे. त्यामुळे होते काय की महाभारताची कथा सम्पूर्णपणे मानवी पातळीवर येते. आणि मग सगळेच संदर्भ बदलतात. पांडव हे सत चे व कौरव हे असत किम्वा वाईटाचे प्रतिक रहात नाहीत. किम्बहुना पांडवांची चीड यायला लागते. युधिष्ठिराची द्रौपदीविषयीची," आम्ही जिंकलेली वस्तू आम्ही कशीही वाटून घेऊ" वगैरे वाक्य संताप आणतात. आणखी एक म्हणजे लैंगिकतेचा नको इतका उल्लेख. कथा मानवी पातळीवर आणल्यामुळे पांडव व कौरवांचा जन्म व अशा अनेक कथा अक्षरशह अश्लील वाटू लागतात. महाभारतकालीन पात्रांना सेक्स शिवाय काही उद्योग नसावा असे वाटू लागते. अर्थातच ही माझी वैयक्तिक मते आहेत.
|
Svalekar
| |
| Friday, July 28, 2006 - 12:29 pm: |
| 
|
चन्द्र्कोर तुम्ही म्हणता ते एकदम बरोबर, की महाभारत मानवी पातळीवर येते ते, आणि माझे तरी असे मत आहे की तसे ते वाचावे एकदा, कारण ते सगळे मानव होते. ase majhe mat aahe. Khup goshtincha ulgada hoto. Jase ki kuntila surya pasun jhalela karn. aani pandav tasech UdhyaBhoomichi khari paristithi. Mala tari pahila mahit hote ki sanjay dhrutrashtrachya bajula basun live Yudhache varnan karto. Mala te ashakya vatat hote pan kadambari vachun ulgada zala.
|
|
|