|
Dineshvs
| |
| Wednesday, May 03, 2006 - 12:05 pm: |
| 
|
बारोमास, लेखक प्रा. सदानंद देशमुख २००४ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेले हे पुस्तक परत एकदा वाचुन काढले. हि आहे एका शेतकर्याच्या जीवनावरची कादंबरी. या तनपुरे कुटुंबात, एकनाथ, त्याची बायको अलका, लहान भाऊ, आई व वडील असे सदस्य आहेत. एक गडी आहे, पण याचबरोबर घरातील गुरे, मांजर, कुत्रे हेहि तितकेच महत्वाचे घटक आहेत. हे कथानक घडते एका वर्षाच्या आत. म्हणजे बारोमास या कालावधीत. त्या अवधीत या कुटुंबात अनेक घटना घडतात. ईथे कुणीच खलनायक नाही तसे कुणी संतहि नाही. सगळी व्यक्तीमत्व अस्सल शेतकर्याच्या कुटुंबातील. खर्या अर्थाने हि सद्यकालिन कादंबरी आहे. यातले सर्व संदर्भ आताचे आहेत. अशी कादंबरी क्वचितच वाचायला मिळते. नायक एकनाथ हा एम. ए. बी. एड झालेला आहे, तरी लाच देऊ न शकल्याने त्याला नोकरी नाही. धाकटा मधु पण शिक्षणात खुप हुषार आहे, पण त्याचीहि अवस्था तिच आहे. एकनथ नाईलाजाने शेतातील कामाला जुंपला आहे. मधु मात्र रात्रभर गुप्त धन शोधायचा मागे आहे. एकनाथच्या शिक्षणाकडे बघुन लग्न केलेली अलका, शहर भागातील असल्याने, तिला शेतकर्याच्या घरातील कामाची सवय नाही कि आर्थिक परिस्थितीची कल्पना नाही. या दोघांची थोरली बहिण मंगलाक्का लग्न होवुन आपल्या घरी आहे. त्यांची आई शेवंतामाय अस्सल शेतकरीण आहे तर सुभानराव हाडामासाचे शेतकरी. एका वर्षातील काळात या सगळ्यांच्या आयुष्यात बरेच काहि घडते. यात लहरी निसर्ग, सावकार, बॅंका, भ्र्ष्ट राजकारणी, रोजंदारीवरील गडी असे सगळेच घटक आपापली भुमिका चोख बजावतात. कधीकधी वाटते हे ईतके सगळे फक्त बारा महिन्यात घडु शकेल का ? पण हा तसा निरर्थक सवाल आहे, कारण यात कुठेच काहि कृत्रिम वाटत नाही. सर्व कादंबरीभर एक ऊदासवाणे पण तरिहि अपरिहार्य सावट आहे. वाचताना मनावर खुपच ताण येतो. कधी हे संपणार असे वाटत राहते. पण लेखकाने ती सुखांतिका करायचा अजिबात प्रयत्न केलेला नाही. यातली सर्वच वर्णन ईतकी प्र्त्ययकारी आहेत कि आपण त्या घरातलाच घटक होवुन जातो. तरिही अलिकडे वाचलेल्या दलित आत्मकथनाप्रमाणे यात क्वचितच बीभत्स वर्णने आहेत. मुळात हे कुटुंब मराठा आहे, दलित नाही, आणि हेहि त्यांच्या दुख्खाचे कारण आहेच. यातली भाषा हे एक वेगळेच वैशिष्ठ आहे. दर पानावर अनोखे शब्द भेटत राहतात. संदर्भाने त्याचा अर्थहि लगेच लक्षात येतो. ( पण अश्या शब्दार्थासाठी तळटिपा वा सुची नाही ) निवेदन नेहमीच्या भाषेत व संवाद बोलीभाषेत अशी ढोबळ विभागणी आहे, पण तरिही सरमिसळ आहेच. मुखपृष्ठ तर विषयाची सुसंगत आहेच शिवाय मुद्रणदोष अजिबात नाहीत. १७५ रुपये किम्मत आहे, पाने ३४९. प्रकाशक कॉंटिनेन्टल प्रकाशन, विजयानगर, पुणे ३०. तुम्हाला शेतकर्याच्या सद्यपरिस्थितीचा अंदाज असो वा नसो, हे पुस्तक तुम्हाला अस्वस्थ करते एवढे मात्र खरे.
|
दिनेश, पारितोशिक विजेते म्हणुन मी मागच्या वर्षी घेतले... great दुसरे शब्दच नाहित.... हेच बघायला मिळते आज ग्रामिण भागात आणि म्हणुनच चटका लाउन जाते... शेवटचे पान वाचले जात नही... ही शेतकयाची शेतकर्याने मांडलेली कथा आहे... एकनाथ त्याच्या जागि बरोबर आहे... अलका तीच्या जागी बरोबार... आहे प्रत्येकाची आशा, निराशा जिवननिष्ठा...... मोह... माया... सोप्या साध्या शब्दात दिले आहे... बारोमास.... वर्षानुवर्षे शेतकर्याच्या आयुष्यात हेच होत आले आहे...
|
Gs1
| |
| Wednesday, May 10, 2006 - 9:04 am: |
| 
|
बारोमास, खरच विषण्ण करणारे पुस्तक आहे.
|
Bee
| |
| Thursday, May 11, 2006 - 1:30 am: |
| 
|
दिनेश, उत्तम!!!! बारोमास सारख्या पुस्तकाची निर्मिती मराठी साहित्यात होणे ही एक मोलाची गोष्ट आहे. शेतकरी जिवनाचे जिवंत चित्रण ह्या कादंबरीमधे केलेले आहे. कमालीचे केविलवाणे, असहाय, हताश, निष्पाप, प्रामाणिक स्वर वाक्यागणिक वाचायला मिळतात. Hats off to writer of this book!
|
दिनेश, GS1 , पुस्तकांची छान ओळख करुन दिली आहे. वाचायला आवडतील!
|
Upas
| |
| Tuesday, August 01, 2006 - 7:07 pm: |
| 
|
बारोमास वाचलं सदानंद देशमुखांच.. अगदी पोटतिकडीने लिहिलय.. शेतकरी आत्महत्या तरी का करतायत ह्या प्रश्नाचं गांभिर्य आणि वस्तुस्थिती व्यवस्थित सांगितलेय, शिक्षण, सरकारी सोयी सवलती असूनही शेतकरी कसा नाडला जातोय ते स्पष्ट मांडलय.. खूप वाईट वाटलं पुस्तक संपताना.. पण एक ज्वलंत सामजिक प्रश्न समजून घेण्याची वाट मिळाली म्हणून समधानही वाटतं..
|
Bee
| |
| Wednesday, August 02, 2006 - 1:56 am: |
| 
|
ह्यालाच म्हणतात कसदार साहित्य आणि सामाजिक संवेदीनशीलता..
|
Raina
| |
| Wednesday, August 02, 2006 - 2:38 am: |
| 
|
मला कोणीतरी सांगीतले की बारोमासशी आपण नाही identify करु शकत, आणि मग शब्दाशब्दावर अडखळल्यामुळे हळुहळू वाचण्यातला रस कमी होतो.वाचताना तुम्हाला जाणवले का असे ? archives मध्ये दिनेशांनी हि लिहिलेला अभिप्राय वाचला. मी वाचले नाहिये "बारोमास", पुढ्च्या वेळेस आणायचा विचार आहे.
|
Bee
| |
| Wednesday, August 02, 2006 - 2:55 am: |
| 
|
रैना, जे ऐकले आहे ते चुकीचे आहे. बारोमास ही पूर्ण वर्हाडी भाषेत लिहिलेली कथा आहे. तुला जर बहिनाबाईन्च्या, विठ्ठल वाघांच्या कविता समजत असतील तर तुला बारोमासमधील भाषाही समजेल. भाषेचा खरे तर कुठेच अडसर निर्माण होत नाही, कथेला एक गुंतवून ठेवणारा प्रवाह आहे. कथा ही खरी आहे आणि परिस्थितीचे अगदी जिवंत चित्रण केलेले आहे. एकदा जरूर वाच...
|
Upas
| |
| Thursday, August 03, 2006 - 2:39 am: |
| 
|
बरोबर.. माझा सुरुवातील वाचनाचा वेग मंदावला होता.. पटापट पुढे सरकता येईना ग्रामीण भाषेशी जवळीक नसल्याने.. पण मग पकड घेतली कथेने.. ग्रामीण प्रश्न त्याच भाषेत मांडले तर ते भिडतात आणि वातवरणाशी एकरूपही करतात.. तहान म्हणून सदानंद देशमुखांची गाजलेली अजून एक कादंबरी आहे, कोणी वाचलेय का? आणि हो जमलं तर मी एक उतारा माझ्या bb वर टाकेन बारोमासच्या प्रस्तावनेतला..
|
Bee
| |
| Thursday, August 03, 2006 - 4:53 am: |
| 
|
बारोमास नंतरच तर सदानंद देशमुख इतक चांगल लिहितात हे कळलं. मग त्यांनी ह्यापुर्वी काही लिहिल का हे माहिती करुन घेतल त्यावेळी तहानबद्दल कळल. जमत असल्यास तुझ्या बीबीवर एखादा उतारा नक्की लिहि.
|
'बारोमास' वाचले. खरंच अस्वस्थ करणारे पुस्तक आहे. आजच 'सकाळ' ला बातमी आहे, विदर्भात आणखी पाच शेतकर्यांची आत्महत्या.
|
Bee
| |
| Wednesday, October 25, 2006 - 2:31 am: |
| 
|
कलंदर, तुला वर्हाडी भाषा वाचताना किंवा समजून घेताना काही त्रास झाला का? अरे हे शेतकर्यांच्या आत्महत्या आजकाल रोजची बातमी झाली आहे. खरच ही बातमी वाचून वाचून माझी संवेदना बोथड झाली आहे. मैत्रेयी, novels ची पाने इतकी खातेस.. बारोमास का नाही वाचले. आणि हाच प्रश्न केदारला :-) केदार, मी सावरकर थोडे थोडेच वाचले आहे.
|
nauktoca sadanaMd doXamauKaMcao baarÜmaasa ho pustk vaacalao. AitXaya sauroK maaMDNaI AaiNa kqaasaU~. kuzMhI AakaMDtaMDva na krta ivadBaa-tlyaa XaotkáyaacaI AaiNa itqalyaa iXaklaolyaa t$Na ipZIcaI dud-Xaa sarL saaQyaa BaaYaot maaMDlaI Aaho. dÜL\yaatUna paNaI yaoNaar naahI pNa KUp KÜlavar kuzMtrI duKt rahIla hI kadMbarI vaacalyaavar.
|
|
|