|
Badbadi
| |
| Monday, September 04, 2006 - 9:25 am: |
| 
|
नुकतंच अनिल अवचटांचं 'कार्यरत' हे पुस्तक वाचलं. नावावरून च कल्पना येते कि झोकून देऊन काम करणार्यांवर हे पुस्तक आहे. व्यसनमुक्तीच्या कामानिमित्त अवचट अनेक संस्था आणि लोक यांच्याशी जोडले गेले. त्यातले च काही लोक जे वेगळ्या वाटेने जाउन उल्लेखनीय काम करत आहेत त्यांच्या बद्दल हे पुस्तक आहे. यातले सगळे लेख ९२-९४ च्या काळात म.टा. मध्ये येऊन गेले आहेत. पण ते असे एकत्रित वाचताना वेगळाच अनुभव येतो. सर्पदंशावर औषध शोधून कढणारे डॉ. बावस्कर, बिर्ला पेपर मिल्ल्स विरुद्ध चळवळ करणारे हिरेमठ, संशोधक वृत्तीचे आणि सोलापूर जवळच्या रुक्ष जमिनीवर शेतीचे नंदनवन फुलवणारे अरूण देशपांडे आनि सर्वश्रुत राणी व अभय बंग..सगळेच महान आहेत. या लोकांबद्दल वाचून आपल्या अति सीमित क्षेत्राची आणि त्याहून आळशी, विलासी वृत्तेची लाज वाटते.
|
Parop
| |
| Monday, September 04, 2006 - 12:22 pm: |
| 
|
खरं बोललीस तू बडबडी... मी ही कार्यरत वाचून भारावलो...काहीतरी करुया असं ठरवलं पुढं येरे माझ्या मागल्या
|
|
|