|
Dineshvs
| |
| Wednesday, October 11, 2006 - 4:29 pm: |
| 
|
" तुर्कनामा " लेखिका मीना प्रभु, मौज प्रकाशन, पृष्ठे २७८, किंमत दोनशेपन्नास रुपये. मीना प्रभुंच्या अलिकडे झालेल्या स्लाईड शो मधे त्यानीच ग्रीकांजली आणि रोमराज्य अश्या दोन पुस्तकांची घोषणा केली होती. आणि अचानक एकदम दोन पुस्तके बाजारात आली आहेत. त्यापैकी एक ग्रीकांजली असले तरी दुसरे तुर्कनामा आहे. हे काहिसे अनपेक्षित होते, कारण आधी त्याची घोषणा झाली होती, आणि हे कसे घडले त्याची कबुली त्यानी पहिल्याच पानावर देऊन टाकलीय. " पोक्त्या पुरवत्या बाईला अनपेक्षित जुळं होण्यासारखं हे. " या शब्दात. प्राचीन संस्कृतिंचा धांडोळा घेत बाई फ़िरत असतात. ग्रीस आणि तुर्कस्तान हे ईतिहासातच नाहि तर भुगोलातहि एकेमेकात गुंतलेले देश. ते जोडीनेच बघायला हवेत. बाईंचे ग्रीकांजली वाचुन मग हे पुस्तक वाचावे अशी अपेक्षा आहे, पण मी हा क्रम पाळला नाही. ग्रीस आनि तुर्कस्तान हे दोन्ही आता अगदी उपेक्षित देश आहेत. त्यातुन तुर्कस्तान तर ग्रीसपेक्षाहि खालच्या पायरीवर मानतात सध्या. पण बाईनी घडवलेली सफ़र अनोखी आहे. जेमतेम एक महिना बाईना मिळाला, त्यात बाईनी ईतके भरपुर पाहिले आणि त्याहुन भरभरुन लिहिलेय, कि बाईंच्या स्टॅमिनाचा हेवा वाटावा. बाईंचा प्रवास सुखाचा कधीच होत नाही, अनेक अडचणींचा सामना त्या करत असतात. आणि ईथे तर भाषेचाहि प्रश्ण. जिथे तुर्की लोकानाच, जुनी भाषा नीट समजत नाही, तिथे बाकिच्यांचे हाल काय वर्णावे ? पण तरिही बाई अनेक अडचणींवर मात करत, भटकतातच. बाई गेली अनेक वर्षे लंडनमधे स्थायिक झाल्या असल्या तरी त्यांचे मन आणि जडणघडण भारतीय आहे. तिथल्या सगळ्या वास्तु बाई याच नजरेतुन बघतात. आणि यातुन होणारे निवेदन आपल्याला अगदी आपलेसे वाटते. जागतिक वारश्यांची अनेक स्थाने ईथे आहेत. ती जशी भौगोलिक आहेत तशी ऐतिहासिक देखील आहेत. तशी यातली अनेक स्थाने आपण कुठे ना कुठे चित्रपटात म्हणा वा चित्रातुन म्हणा, बघितलेली आहेत. पण बाईंचे वर्णन त्याहुन बारकाईचे आहे. याचसोबत बाईनी तुर्कस्तानाचा सगळा ईतिहासच आपल्यासमोर मांडलाय. ट्रॉय च्या लढाईतल्या न पटणार्या बाजु मांडल्या आहेतच पण त्याशिवाय गॅलिपोलीची अत्यंत कडवी आणि तरिही अत्यंत सभ्य अशी लढाई, साक्षात डोळ्यासमोर उभी केलीय. या लढाईनंतर अतातुर्क केमाल पाशाने उद्गार काढले होते, 1d जॉनी आणि महंमद हे दोघेहि आता आम्हाला सारखे आहेत. साता समुद्रापलीकडून आपल्या लेकराना ईथं पाठवणार्या मातांनो, तुम्ही आपले अश्रु आवरा. तुमच्या पोटचे गोळे आता आमच्या हृदयात घरं करुन बसले आहेत. या मातीत देह ठेवल्यानं ती या मातीची लेकरं झालेली आहेत. 1d मलातरी हि लढाई ट्रॉय पेक्षा रोमांचकारी वाटली. केमाल पाशाबद्दल बाईनी फार भाराऊन जाऊन लिहिले आहे. त्या योग्यतेचा मानुस होताच तो. पण त्यानंतर त्याचा वारसा केवळ लष्कराच्या बळावर टिकलाय. बाईनी तिथल्या माणसांचे, सहप्रवाश्यांचे आणि परिस्थितीचेहि फार प्रत्ययकारी वर्णन केलेय. याबाबतीत बाई कसलाहि मुलाहिजा न ठेवता, कुठेहि जातात, कुणातहि मिसळतात. मर्यादित अर्थाने त्या फार धाडसी आहेत. तिथल्या वास्तुंचे, म्युझियममधल्या कलाकुसरींचे वर्णन तर मुळातुनच वाचण्यासारखे आहे. सदोदीत लढाईच्या छायेत वावरलेल्या देशात, अत्यंत प्रतिकुल हवामानात जर ईतक्या कलाकृति निर्माण झाल्या आणि त्या अजुनहि टिकुन राहिल्यात हे बघुन, आपल्याकडच्या परिस्थीतीची दयाच येते. या पुस्तकात पानोपानी नवलाच्या गोश्टी दडल्या आहेत. आपल्याकडे दृष्ट काढतात तशीच तिथेहि काढतात आणि त्याला चक्क, नझर म्हणतात. आपला पैलवान या शब्दाचे मुळ तुर्की भाषेत आहे. स्थळवर्णने तर खासच आहेत, पामुक्कले, युर्गुप, गोरेमे ईथली वर्णने तर खासच आहेत. मुखपृष्ठ ईजिप्तायनसारखे देखणे नाही. आतमधे अनेक फोटो आहेत आणि ते सुंदरहि आहेत, पण बाईंच्या वर्णनाईतके सुंदर खासच नाहीत, शिवाय ते आकाराने लहान आहेत. बाईंकडे फोटोंचा खजिना असतो, पण ते सगळे पुस्तकात समाविष्ट केले तर किंमत आवाक्याबाहेर जाईल, असे वाटते. एकंदर एक अवश्य वाचण्याजोगे सुंदर पुस्तक.
|
व्वा. हे पुस्तक वाचायलाच पाहीजे मग. दिनेश, ह्या पुस्तकात कोणता कालावधी घेतला आहे की एक जनरल तुर्कांबद्दल माहीती आहे. केमाल पाशा ची माझी ओळख सावरकरांमुळे झाली. ग्रेट माणुस होता.
|
Dineshvs
| |
| Thursday, October 12, 2006 - 1:47 am: |
| 
|
केदार, बाईनी पर्यटनाच्या निमित्ताने तुर्कस्थानाचा पुर्ण ईतिहास थोडक्यात सांगितला आहे. अगदी प्राचीन काळापासुनचे संदर्भ आहेत. केमाल पाशा बद्दल माधव ज्युलियनच्या ओळी अश्या आहेत विभूति मित्र वंद्य तु प्रकाशमान ईश्वरा प्रकाश पाड मानसी प्रकाशवीत अंबरा
|
तुर्कनामा खूप माहितीपूर्ण आहे हे खरच पण पुस्तकाचा साहित्यिक दर्जा , एकुणच यातली मीना प्रभुंची लेखनशैली अगदीच सुमार वाटली . बाकी त्यांच्या या पुस्तकात इस्तंबुल विषयी लिहिलेले काही matter फ़ारसे पटले नाही , लिहिन सविस्तर वेळ झाला कि .
|
|
|