|
Bee
| |
| Thursday, November 02, 2006 - 4:44 am: |
| 
|
शशी थरूरची पुस्तके इथे कुणी वाचली आहेत का? मला एक कळले नाही त्यांची जी पुस्तके जर्मन, फ़्रेंच आणि इतर परकीय भाषेत आहेत ती हिंदी आणि ईंग्रजीमधे त्यांनी का नाही लिहिली? की लिहिली आहेत पण मला दिसली नाहीत. शशी थरूर हे एक लेखक आहेत हे माहिती होण्या अगोदर एकदा मी ट्रेनमधे प्रवास करताना एक जर्मन मुलगा एक पुस्तक वाचत होता ज्यावर एका भारतीय नवरीनीचे चित्र काढले होते. ते चित्र बघुन मी ते पुस्तक हातात घेतले तेंव्हा शशी थरूर हे नाव वाचून मी ते पुस्तक परत केले. नंतर शशी थरूर बद्दल माहिती मिळाली तेंव्हा ट्रेनमधील ही व्यक्ती आठवली. मला त्या व्यक्तीजवळ जे पुस्तक होते ते एकदा तरी वाचून बघायचे आहे आणि पण तशा मुखपृष्ठाचे English पुस्तक शशींच्या वेबसाईटवर दिसले नाही. ही त्यांची website aahe - http://www.shashitharoor.com/books.html पण इथे पुस्तकांचा synopsis दिलेला नाही. केदार, बारोमासचे लेखक आहेत सदानंद देशमुख.
|
Zakki
| |
| Thursday, November 02, 2006 - 12:28 pm: |
| 
|
शशी थरूर यांचे The Great Indian Novel नावाचे इंग्रजी पुस्तक १९९१ मधे अमेरिकेत प्रसिद्ध झाले, ते मी वाचले. त्यात गांधी, नेहेरु इ. ना महाभारतातल्या व्यक्तिंची नावे दिली आहेत. बाकी सर्व भारतीय स्वांतत्र्यपूर्व काळातील ते १९९० पर्यंतचा इतिहास दिला आहे.
|
Raina
| |
| Monday, November 06, 2006 - 2:18 am: |
| 
|
चक्रिवादळ- लेखक प्रभाकर पेंढारकर मौज प्रकाशन. ७७ मधल्या आंध्रप्रदेशातील deadly cyclone वरचे पुस्तक. नुस्ताच collage तयार झालाय- documentary film च्या संहितेसारखा. असं वाटलं की २००४च्या सुनामी नंतर घाईघाईने हे पुस्तक लिहीलं असावं as an afterthought . Relief efforts चं वर्णन पूर्वी अविनाश धर्माधिकारींच्या "अस्वस्थ दशकाची डायरी" ह्या पुस्तकात वाचलं होतं आणि सरकारी यंत्रणेचा प्रचंड आवाका, आणि स्वयंसेवकांनी उचललेला मोलाचा वाटा ह्याचं फार प्रभावी चित्रण त्यात होतं. त्यामानाने "चक्रीवादळ" मला तरी आवडले नाही-पण सगळ्यांची मतं ऐकायला आवडेल. मुद्रणदोषांचे तर विचारू नका- जानकीच्या ऐवजी मध्येच "जान्हवी" काय..
|
Ishu
| |
| Wednesday, November 08, 2006 - 4:17 pm: |
| 
|
रैना, अगदी पटलं तुझं म्हणणं. प्रभाकर पेंढारकरांचं 'रारंग ढांग' खूप आवडलं होतं म्हणुन मोठ्या उत्साहाने 'चक्रीवादळ' घेऊन आले पण somehow ते मनाची पकडच घेत नाही. खूप तुटक-तुटक वाटतं.
|
Chandya
| |
| Wednesday, November 08, 2006 - 4:32 pm: |
| 
|
पॅपिलॉन मी अनुवादित वाचली आहे. चांगली लिहिली आहे. हल्लीच gregory david roberts चे 'शांताराम' वाचले. मला वाटले बहुदा व्हि. शांताराम यांच्याविषयी असेल पण हि एक कादंबरी आहे. सुरुवातीला कथानक खुप पकड घेते पण नंतरचा काही भाग वाचताना कंटाळवाणा आणि बराचसा पानेभरु वाटला. पुस्तक खुप जाडजुड आहे (तब्बल ९००+ पाने). एका परकिय माणसाने मुंबईच्या एका वेगळ्या जगाचे घडवलेले दर्शन थक्क करणारे वाटले. एका ठिकाणी वाचले कि लेखक आता कायम स्वरुपी मुंबईतच राहतो. विक्रम सेठची 'a suitable boy', 'from heaven lake', 'two lives' ही पुस्तके देखिल चांगली आहेत. 'from heaven lake' हे प्रवासवर्णन (travelogue) आहे. आजपर्यंत वाचलेले माझे सर्वात आवडते प्रवासवर्णनाचे हे पुस्तक आहे. the golden gate हे देखिल एक अफलातुन पुस्तक आहे. काव्यात्मक(कि काव्यमय?) कादंबरी. बरेच महिने 'मेक्सिकोपर्व' पुर्ण करण्याचा प्रयत्न करतोय पण वाचनप्रवास काहिसा रडतखडत चाललाय. 'ईजिप्तायन' प्रमाणे हे पुस्तक पकड घेत नाहीये.
|
Ajjuka
| |
| Wednesday, November 08, 2006 - 4:43 pm: |
| 
|
मी पण पॅपिलॉन चा अनुवाद वाचलाय.. मस्त आहे. पण खूप दिवस झाले वाचून. चित्रपट मात्र नाही पाह्यला. नुकतेच 'दुष्काळ आवडे सर्वांना' हे अनुवादीत लेखमालेचे पुस्तक वाचले. खूप त्रास झाला. नोकरशाही ही फक्त घासलेट ओतून काडी ओढावी इतक्याच लायकीची आहे हे परत एकदा पटले. पुस्तकाची details मुंबईला office वर पोचले की टाकते.
|
तुम्ही कुणी श्री. ज. जोशीन्ची पुस्तके वाचली आहेत का मला अतीच आवडली आहेत त्यान्ची पुस्तके. रघुनाथाची बखर मिळाले तर अगदी नक्की वाचा It's toooo good.. आणी मला अभिप्राय सान्गाल..
|
Aditi
| |
| Thursday, November 09, 2006 - 8:28 am: |
| 
|
अनघा, रघुनाथाची बखर काय आहे पुस्तक श्री. ज. जोशींच्या अजून पुस्तकांची नावे सांग ना...
|
र.धो.कर्वे यान्च्यावर आहे हे पुस्तक. धोन्डो केशव कर्व्यान्चे चिरन्जीव. त्यान्नी इतक्या जुन्या काळात family Planning या विषयावर लिहिले आहे. इतकी दूरद्रुश्टी असलेला माणुस पाहुन आश्चर्य वाटते.. I बयो म्हणुन एक पुस्तक आहे श्री ज जोश्यान्चे. ३०-४० च्या दशका मधली मुम्बई दिसते त्यान्च्या बर्याच कादम्बर्यातून
|
Shonoo
| |
| Thursday, November 09, 2006 - 12:45 pm: |
| 
|
Golden Gate ही पूर्ण कादम्बरी Iambic Pentameter या नावाच्या, माझ्या मते अति कठीण, अशा वृत्तात लिहिलेली आहे. म्हणून काव्यमय म्हटले असावे. भाषा अतिशय लिरिकल आहे. अणि इतक्या कठीण वृत्ताचा वापर असूनही वाक्य रचना दुर्बोध वाटत नाही- जसे गणपत वाणी बिडी बापडा वाचताना होते तसे वाटत नाही. विक्रम सेठ यांच्या कवितांचे एक छोटेखानी पुस्तक हल्लीच वाचले. त्यांनी काही चिनी कवितांचा अनुवाद केला आहे. तेही पुस्तक वाचनीय आहे.
|
शोनू मला विक्रम सेठ यांच्या.. कवितांच्या पुस्तकाचे.. नाव देतेस काग़.. मी त्यांची a suitable boy वाचलिये.. ती फ़ारशी आता लक्षात नाहिये पण जेव्हा वाचली तेव्हाच्या प्रसंगामुळे.. लक्षात राहिलिये.
|
Shonoo
| |
| Thursday, November 09, 2006 - 3:23 pm: |
| 
|
विक्रम सेठ यांच्या कवितांची पुस्तके All you who sleep tonight, Chinese Poets
|
Manya2804
| |
| Wednesday, November 22, 2006 - 10:34 am: |
| 
|
I Can Jump Puddles - Allan Marshall यात एका अपंग मुलाची कहाणी आहे. केवळ जिद्दीच्या जोरावर तो आपल्यातल्या वैगुण्यावर कशी मात करतो ते सांगितले आहे. Suffering beacause of being crippled is not for you in your childhood, it is reserved for those men and women who look at you ही त्याची catch-line आहे. A must read!
|
Asmaani
| |
| Wednesday, November 22, 2006 - 4:31 pm: |
| 
|
फार वर्षांपूर्वी, ५ वी त वगैरे असेन मी तेव्हा, हेलन केलर विषयी वाचलं होतं. बहुतेक किशोर मासिकात. अंध, मूक, बधिर, अशा तिहेरी अपंगत्त्वावर जिद्दीने मात करणारी ही असामान्य स्त्री तेव्हापासून मनात पक्क घर करुन आहे. black हा रानी मुखर्जीचा चित्रपट ह्याच हेलन केलर च्या जीवनावर बेतलेला आहे. तिच्यावर आणखी काही लिहिलेले कुणाच्या वाचनात आहे का? किंवा हेलन केलरने स्वत्: लिहिलेली पुस्तके कुणाला माहित आहे का?
|
Bee
| |
| Tuesday, December 05, 2006 - 10:24 am: |
| 
|
GS1- तुला माओवर लिहिलेले मराठी पुस्तक हवे होते ना.. एक मिळाले. साभार अंतर्नाद! पुस्तकाचे नाव - मावोचे लष्करी आव्हान, लेखक - दि. वि. गोखले, प्रकाशक - जयंत साळगावकर, शब्दरंजन स्पर्धा, मुंबई १९६३ 'महाराष्ट्र टाईम्समधे अनेक वर्ष लक्षणीय सेवा बजावणारे पत्रकार दि. वि. गोखले यांनी १९६२ मधे भारत - चीन युद्धाच्या वेळी एक लेखमाला लिहिलेली होती. तिचेच हे पुस्तकरूप. या युद्धात आपला दारुण पराभव झाला, पण हा पराभवामुळे अवघा देश खडबडून जागा झाला. या सगळ्या घटनाक्रमाचे अत्यंत प्रत्ययकारी आणि निर्भीड वर्णन या पुस्तकात आले आहे. विशेष म्हणजे पु. ल. देशपांडे यांची अतिशय जळजळीत प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे.' वरील माहिती अंतर्नाद मधुन घेतलेली आहे.
|
कालच शिरीष कणेकरंनी लिहिलेलं "खटला आणि खटलं" हे पुस्तक वाचलं. या पुस्तकातील पहिली कथा आधी लोकसत्ता मधे बहुधा येऊन गेली आहे. पण त्यानंतरच्या कथा कणेकरांनी कोणे एके काळी लिहिलेल्या रहस्यकथा आहेत. आतापर्यंत कणेकर म्हणजे क्रीकेट आणि चित्रपट या दोन विषयांवर लिहित आले आहेत. पण त्यांनी रहस्यकथाही छान लिहिल्या आहेत. काही कथा फारच लहान आहेत, पण interesting आहेत. हे पुस्तक वाचल्यावर कणेकरांनी रहस्यकथालेखन पुढे चालु ठेवायला हव होत अस नक्की वाटेल. एकदा वाचावं अस पुस्तक!
|
Princess
| |
| Wednesday, January 03, 2007 - 7:27 am: |
| 
|
कोणी one night @ the call center वाचलय का? वाचले असल्यास कृपया थोडा सारांश लिहा.
|
Sonchafa
| |
| Wednesday, January 03, 2007 - 8:03 am: |
| 
|
हो मी वाचले आहे चेतन भगत चे हे पुस्तक. कॉल सेंटर मधली फ़क्त एक रात्रीचे वर्णन आहे.. अर्थातच तिथे काम करणार्या एक टीमचे वर्णन आहे.. पुस्तक खूप चांगले जरी म्हणता आलं नाही (Five points someone च्या मानाने ) तरी एकदा वाचायला हरकत नाही. कॉल सेंटर मध्ये काम करणार्याचे आयुष्य थोडेफार कसे असते हे ह्या जगाशी अनोळखी व्यक्तीला कळावे अस थोडा प्रयत्न लेखकाचा आहे.. fiction चा भाग दुर्लक्षित करून वाचता आल्यास चेतनची लिहिण्याची स्टाईल आवडत असल्यास नक्की वाचावे. काही वाक्य हेलावून सोडतात!
|
Dineshvs
| |
| Sunday, February 04, 2007 - 5:37 pm: |
| 
|
आकाशगंगेत कित्येक सुर्याभोवती पृथ्वीसदृष्य ग्रह भ्रमण करत असतील. परंतु पृथ्वी आणि चंद्र अशी दुक्कल असणे अतिशय दुर्मिळ आहे. वस्तुतः पृथ्वी आणि चंद्र हा एक द्वैती ग्रह आहे. सुर्यमालेतील इतर ग्रह आणि त्यांचे उपग्रह यांच्या तुलनेत पृथ्वी आणि चंद्र ही दुक्कल अगदी निराळी आहे. वस्तुमानाच्या दृष्टीने पृथ्वी चंद्रापेक्षा सुमारे ८० पट मोठी आहे, तर त्रिज्येच्या दृष्टीने जवळ जवळ ४ पट मोठी आहे. याचा अर्थ चंद्र काही अगदीच लहान उपग्रह नाही. वस्तुतः चंद्र पृथ्वीच्या जवळ आलाच कुठुन, हा एक लाखमोलाचा प्रश्न आहे. त्यासाठी अनेक सिद्धांत प्रचलित आहेत. महत्वाची गोष्ट अशी कि, पृथ्वीभोवती चंद्रासारखा मोठा उपग्रह भ्रमण करत नसता, तर पृथ्वीवर जीवसृष्टी उत्क्रांत होणे जवळ जवळ अशक्य होते. फ़ार फ़ार पुरातन काळी चंद्र पृथ्वीच्या आज आहे त्यापेक्षा बराच जवळ होता. त्या काळात सागरावर भरतीच्या वेळी अती उंच लाटा उचंबळत असत. भरतीचे पाणीही किनार्याच्या आत दूर अंतरापर्यंत पसरत असे. ओहोटीच्या वेळी विस्तृत समुद्र किनारा कोरडा पडुन जाई. सागराच्या पाण्यातील ही प्रचंड खळबळ सागरात उत्पन्न झालेल्या जीवसृष्टीच्या विकासाला कारणीभूत झाली असावी. ओहोटीच्या वेळी हे प्राणी जमिनीवर येऊ शकत होते. अशा प्रकारे प्रारंभी केवळ जलचर असणारे काही प्राणी प्रथम उभयचर आणि सरतेशेवटी केवळ भूचर झाले असावेत. भरती ओहोटीमुळे सागरांमधे प्रचंड ऊर्जा निर्माण होते. हि गोष्टहि महत्वाची आहे. निर्जीव वस्तूंमधून सजीव सूक्ष्मजंतू व नंतर प्राणी निर्माण होण्यात या ऊर्जेचा हातभार लागणे शक्य आहे. चंद्राला पृथ्वीने आपल्या गुरुत्वाकर्षणाच्या बलाने पकडले असो कि चंद्र पृथ्वीबरोबरच तिच्याजवळ जन्माला आलेला असो, चंद्राचा पृथ्वीवर जबरदस्त प्रभाव आहे, यात शंकाच नाही. चंद्राच्या अस्तित्वामुळे सागराच्या पाण्याला ज्याप्रमाणे भरती ओहोटी येते, त्याप्रमाणे भूपृष्ठालाहि भरती ओहोटी येते, चंद्राच्या पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग दररोज सुमारे २० सेंटीमीटर अंतरामधुन वर खाली होतो. अति प्राचीन काळी चंद्र पृथ्वीच्या नजीक असताना या भूपृष्ठाच्या भरती ओहोटीमुळे पृथ्वीवर ज्वालामुखीचे थैमान माजले असावे. किंबहुना पृथ्वीच्या तप्तगाभ्यातून लाव्हा आणि इतर वायू ज्वालामुखीच्या माध्यमातून भूपृष्ठावर येण्याला त्यामुळे मदत झाली असावी. पृथ्वीवरील पर्वतांच्या मोठमोठ्या रांगा आणि तडे गेलेले पृथ्वीचे कवच हा त्याचाच परिणाम आहे. पृथ्वीच्या कवचाचे तडे आज निरनिराळी भूखंडे म्हणून वावरत आहेत. पुर्वी ही भूखंडे एकत्र होती, पण पुढे ती परस्परांपासून दूर सरकत गेली. त्यांच्याबरोबर या भूखंडावर निर्माण झालेली जीवसृष्टीही अलग झाली. आणि तिच्या उत्क्रांतीला गति प्राप्त झाली. %&%&%&&% वरचा उतारा आहे " विश्वात आपण एकटेच आहोत काय ? " या मोहन आपटे लिखित ग्रंथातला. ( पृष्ठ क्रमांक २९ ) राजहंस प्रकाशनाचे हे पुस्तक केवळ १३१ पृष्ठांचे आहे आणि मूल्य आहे ८० रुपये. गेल्या आठवड्यात शिवाजी मंदीरच्या वातानुकूलीत ग्रंथदालनात हे पुस्तक सहज नजरेस पडले, आणि विकतहि घेतले. अक्षरशः एका बैठकीत, गाडीची वाट बघता बघता वाचुन काढले. वर उधृत केलेल्या माहितीप्रमाणे, या क्षेत्रातील किंवा वा प्रश्नावरील रसाळ आणि अनोख्या माहितीने या पुस्तकाचे प्रत्येक पान सजलेले आहे. या क्षेत्रात झालेले प्रयोग, मांडले गेलेले सिद्धांत, आजवर झालेली प्रगति, याचा उहापोह छान केलाय. गहन विषय असुनदेखील, रसायनशास्त्र व जीवशास्त्र यांचे प्राथमिक ज्ञान असणार्या ( माझ्यासारख्या ) कुणालाहि, हे विवेचन, अगदी सहज समजते. पथ्वीवरील जीवन, हा काहि अपघात नाही. असे घटक, आणि अशी परिस्थिती असल्यास, जीवसृष्टी निर्माण होणे क्रमप्राप्त आहे. पण अशी परिस्थिती किती नेमकी आहे, याचे विवेचनदेखील तितकेच वाचनीय आहे. पृथ्वीचे सुर्यापासुन अंतर, सुर्याचे वय, त्याची गति, पृथ्वीची गति, तिचा आस यासारख्या घटकात, निव्वळ काहि टक्क्यांची तफावत असती, तर आपण ईथे नसतोच. आपण समजतो किंवा आपल्या भोवती आहे, त्यापेक्षा वेगळ्या प्रकारचे जीवन असु शकते का ? तसे असण्याची शक्यता किती ? त्यांच्याकडुन संदेश यायची शक्यता किती ? ते आपल्यात वावरत आहेत का ? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात पुर्णपणे तर्काच्या आधारावर दिलेली आहेत. पण तरिही प्रयोगशाळेत तात्कालिन सर्व घटक निर्माण करुनही, अजुनहि जीवन निर्माण करता आलेले नाही. निर्माण झाली ती केवळ काहि रसायने. पण त्या रसायनाना विशिष्ठ प्रकारच्या रेणूंच्या साखळ्यात गुंफुन, स्वतःच्या प्रतिकृती निर्माण करण्यासाठी नेमक्या कुठल्या शक्तीने चालना दिली हे अजुनहि समजलेले नाही. आणि अश्या रितीने विज्ञानाधिष्ठीत परमेश्वर या संकल्पनेची ओळख करुन दिलेली आहे. मी मागे पृथ्वीवर माणुस उपराच, या डॉ सुरेशचंद्र नाडकर्णी यांच्या पुस्तकाबद्दल लिहिले होते. त्यातील बाबींचा प्रतिवाद, या पुस्तकात आहे. ( पण तो पुरेसा नाही, असे माझे वैयक्तीक मत आहे. ) ईथल्या जागेच्या मर्यादेत, एखाद्या पुस्तकाबद्दल किती लिहीता येईल, याला मर्यादा आहेत. पण तरिही या विषयासंबंधातील सर्वकश माहिती, या छोटेखानी पुस्तकात आहे, हे मात्र नक्की. अधिक माहितीसाठी संदर्भग्रंथाची सूची आहे, तसेच पारिभाषिक शब्दहि दिलेले आहेत. ( पण लेखकाचा परिचय मात्र नाही. ) स्वतः वाचण्यासारखे तर आहेच, पण कुणाहि लहान मुलाला भेट देण्यासारखे हे पुस्तक आहे.
|
Dineshvs
| |
| Tuesday, February 06, 2007 - 5:00 pm: |
| 
|
नक्षत्रवृक्ष नावाचे डॉ शरदिनी डहाणुकर, यांचे एक पुस्तक, ग्रंथाली प्रकाशनने प्रसिद्ध केले आहे. ( पृष्ठे ६८, मूल्य २०० रुपये ) त्यांच्या काहि लेखांचे हे संकलन आहे. आपल्या पंचांगाप्रमाणे, आपल्या जन्मवेळी चंद्र ज्या नक्षत्रात असतो ते आपले नक्षत्र आणि त्या नक्षत्राचा चरण ज्या राशीत येतो ती आपली चंद्ररास ठरते. पंचांगातच प्रत्येक वृक्षाचा एक आराध्यवृक्ष दिलेला असतो. डॉ डहाणुकरानी, या सगळ्याचा एका वेगळ्या दृष्टिकोनातुन अभ्यास केला. त्या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तीना होणारे आजार आणि त्यावर औषध देणारे वृक्ष अशी हि सांगड आहे. आणि त्यांच्या नेहमीच्या मिश्कील शैलीत, त्या अमोल माहिती देत जातात. खरे तर हे लेख फार छोटेखानी आहेत. त्याना आणखी आयुष्य लाभते, तर त्या यापेक्षा खुप जास्त लिहु शकल्या असत्या. नंतर त्याना लेखनाचा कंटाळाहि आला होता. या पुस्तकातली माहिती मी त्रोटक रुपात सोबतच्या तक्त्यात देतोय. हि फ़ाईल एक्सेलमधे आहे, आणि माहिती शिवाजी फ़ॉन्ट्स मधे आहे. आपल्या पत्रिकेत आपले नक्षत्र दिलेले असते, ते नसले तरी आपली रास अनेकजणाना माहित असतेच. तर आपल्या आराध्यवृक्ष लक्षात ठेवुन, एका तरी वृक्षाची लागवड करायला काय हरकत आहे. लेखिकेचाहि हेतू तोच आहे. शिवाय हे वृक्ष काहि दुर्मिळ वैगरे नाहीत. या पुस्तकातली महत्वाची त्रुटी म्हणजे यातल्या फोटोंची क्वालिटी. यापेक्षा नेमके आणि नीटस फोटो नक्कीच मिळवता आणि छापता आले असते. वेत या वृक्षाचा तर फोटोहि मिळालेला नाही, पळसाचाहि फोटो नीट नाही. आंबा, फ़णस यांचे फोटोहि स्पष्ट नाहीत. अर्थात या त्रुटी, सहज दूर करता येण्यासारख्या आहेत.
|
|
|