AnauraQaa pÜtdar
|
Dr Ashutosh, tumhi jar lekhak/lekhikeche sahitya tithe lihinaar nasal tar nuste BB open karu naka hi vinanti. Asha BB war GTP hoto ani mug te archive hotaat.
|
Dear Moderator , Thanx for the suggestion . Actually , I am not at all used to computer etc. Why I opened up BB bcoz I personally feel ki ya sahitikanchya sahityaci charcha ithe hou shakate . Anyways , Will try to write few things about her . About general TP :EG Mi attaparyant open kelele BB ase ahet -- Gauri deshpande - yawar GTP hot nahi . Gauritainchya likhanachiich charcha chalu ahe Same case is with Aruna dhere BB .
|
Dr Ashutosh, Me fakt tumhi suru kelelya BBnwar GTP hoto asa suchavalele nahiye. Sarvasadharantah jenva ekhadi vyakti nust aBB tayar karte pun tyabaddal tyat kahich lihit nahi tenva lokanche kutuhal jagrut houn te tithe yeun ha BB kasla ? ka ughadala ase prashna vichartaat ani taytun pudhe tithe GTP hoto. Ha aamcha anubhav aahe. Mhanun varil post kele hote.
|
Thanx moderator , Got messege . I will post the poems of Anuradha potdar on this BB in just 2 or 3 days . Sadhya jara busy ahe . chalel na ? Ashu
|
AnauraQaabaa[ncaI hI ek caangalaI kivata kivatocaI QaUna Aatvar ekU yaot Aaho tÜvar ho p`aNa sacaotna rhavaot ganQakÜXaat dDlaolyaa sauganQaasaarKo GarT\yaacyaa ]baot ivasaavalaolyaa paKrasaarKo ho p`aNa Ê yaa dohacyaa inavaaryaalaa sauK$p rhavaot jaÜvar kivatocaI QaUna Aatvar ekU yaot Aaho....
|
AjaUna ek Gar kÜpryavarcyaa vaLNaava$na jara puZo gaolaoÊ kI Aalaoca Gar. itsaro ka cavaqaoÊ [tko javaL. [tko saÜpo  prvaaprvaapya-nt tr Asao vaaTo ... Aaja kÜpyaa-varcao ho vaLNaca iktI dUrÊ iktI prko vaaTto Aaho... AaiNa Gar tr %yaahUna dUr. Aaja vaaTto Aaho kdaicat Gar malaa kiQaca saapDNaar naahI kdaicat toqavar maI kiQaca pÜcaNaar naahI.
|
anuradhabaiinchya kavitetalya kahi ooli vilakshanach asatat - vichar karayala lawatat Ex: duKalaahI Aaplaosao kravao laagato kaLjaacyaa kuipt zovaavao laagato jagaacyaa AirYTapasaUna dUr zovaavao laagato ho tuJyaaca kivatonao malaa iXakvalao naa . iknvaa AjaUna yaa AÜiL baGaa AayauYya tsao kiQaca kuNaasaazI qaambat naahI to puZoca jaato Aaplyaa gaitnao gaitlaa pariK hÜtat Aapilaca pavala.
|
Iravati
| |
| Thursday, October 05, 2006 - 9:41 am: |
| 
|
आज मीच झाले आहे पूर्वेचं ताणलेलं तटतटलं धनुष्य: आसन्नप्रसवेच्या महाकळेसारखं दिवसाचा तीर कधी सुटतोय त्यातून म्हणून वाट पाहणारी मी आज मीच झाले आहे एक ताणलेले धनुष्य आणि पूर्वा आहे संथ, निवांत जपून पावलं टाकणार्क्ष्या लेकुरवाळ्या गर्भवतीसारखी
|
Iravati
| |
| Thursday, October 05, 2006 - 9:43 am: |
| 
|
घरच उरत नाही घर असणं आणि नसणं ते कोसळणं आणि उभं असणं यांतलं जमीन-अस्मानाचं अंतर तसं कुणालाच कळत नाही घराच्या मोडक्या दारातून आपल्याच प्राक्तनाला एकटं.... अगदी एकटं सामोरं जाणा-यालाच ते समजतं आपले सारे पूल आपण आपल्या हातांनी जाळून टाकले असं म्हणतात, तेव्हाही ते लक्षणेनंच घ्यावं लागतं पूल आपलयाच हातांनी जाळले जातात तेव्हा पाऊलभर जागाही मागं परतायला उरत नाही. पुढंच जावं लागतं न दिसण-या अंधा-या वाटेनं आपल्याच संचिताचं भूत माथ्यावर घेऊन धडपडत, चाचपडत का होईना, कोणतीच वाट उंब-यापर्यंत पोचत नाही. कातरवेळेची दिवेलागण आणि उंब-यावरचं वेडंवाकडं स्वस्तिक ---- कशालाच मग अर्थ उरत नाही कारण मग घरच उरत नाही.
|
Iravati
| |
| Thursday, October 05, 2006 - 9:46 am: |
| 
|
प्रेमी मन प्रेमी मन किती हतबल असतं हुडहुडणारं मूल ओल्याचिंब अंगाची जुडी करून आईसमोर उBअं राहतं तसं ते आपल्याच प्रेमापुढं उभं असतं स्वत:ला घायाळ करणारी सारी आयुधं त्यानं स्वत:च दुस-या कुणाला देऊन टाकलेली असतात. शमीव्रुक्षानं राखलेल्या पांडवांच्या आयुधांसारखी ही आयुधंही स्वत:पाशी सांभाळायची असतात, चालवायची नसतात. कधीकधी ते कळतही नाही कळतं तेव्हा फार उशीर होतो.
|
Iravati
| |
| Thursday, October 05, 2006 - 9:47 am: |
| 
|
मी असते मी असते, हसते, घटकाभर असणारही आहे. पथारी मात्र गुंडाळली आहे. निघण्यासाठी. निरवानिरव नाही. फक्त हा अस्ताव्यस्त पसारा थोडा आवरायला हवा. ( भाड्याचं घर सोडताना ते साफ करावं लागतं ना ? ) ---- हा पसारा अवघ्या आयुष्याचा तो आवरण्यातच हे अखेरचेच क्षणही निसटणार आहेत का?
|
Iravati
| |
| Thursday, October 05, 2006 - 9:48 am: |
| 
|
आज डोळे आत वळले आहेत माझ्यात लपलेल्या तुला शोधत. आणि प्राण कानांत खिळले आहेत तुझ्या पावलांची चाहूल घेत भरसभेत खेचून आणलेल्या मुक्तकेशा द्रौपदीसारखी आज तुला या काळजातून उपसता आली तर, तुझी नग्न कांती झाकणारं एकेक उपरं वस्त्र या काटेरी हातांनी ओरबाडता आलं तर, तरच माझ्यातली ही शापित, वंचित द्रौपदी आता शांत होणार आहे.
|
Iravati
| |
| Thursday, October 05, 2006 - 9:51 am: |
| 
|
मी विचारलं " दमले भागले तर तुला हाक घालीन, येशील ना?" मी विचारलं. तू मान हलवलीस, " मी इथंच आहे. जा, खुशाल जा. " अथांग पाण्याच्या कुशीत शिरता शिरता मागं वळून पाहिलं तुझे डोळे माझ्यावर ख़िळले होते. त्या डोळ्यांची केवढी सोबत वाटली. त्या सोबतीने आभाळातल्या पाखरासारखे बाहू पसरले. लडिवाळ पाण्यातली एक सोनेरी मासोळी झाले. ---- न संपणारं पाणी श्रमलेल्या बाहूंनी कापता कापता एकाएकी हात लुळेखुळे झाले, पांगळले, गळून पडले. फेसाळतं पाणी कानाशी मरणघडीची कुजबुज करू लागले जीवाच्या आकांताने घातलेली हाक कंठातच गुदमरून गेली श्वासाचा लटपटता धागा हातातून सुटता सुटताच किना-याकडे पाहिलं तू जागचा हलला नव्हतास. फक्त तुझे डोळे मिटलेले होते.
|
Iravati
| |
| Saturday, October 07, 2006 - 1:38 pm: |
| 
|
हळदमाखल्या अंगासारखा हळदमाखल्या अंगासारखा कोवळा पिवळा संधीप्रकाश हळदुल्या अंगावर सांडलेल्या धारांसारखा हळवेला पाऊस नितळ प्रकाशात न्हालेला. आभाळाच्या सहस्त्र डोळ्यांतून सांडणारी ही वत्सलता कडुनिंबाच्या पानांनी बाळमुठीत गच्च धरलेली हलकेच ओघळलेली. केतकी लावण्याची ही आभा डोळे भरून पाहता पाहता कलंडतं आभाळाचं भरलं पात्र आणि कोवळ्या कांतीवर उतरतं अंधाराचं सावळं पिशाच्च तेव्हा पश्चिमेकडे सुर्याचा दिवा विझता विझता भडकतो क्षणभर.
|
Iravati
| |
| Saturday, October 07, 2006 - 1:41 pm: |
| 
|
पहाटेचं चांदणं पहाटेचं चांदणं पहिलं की नकळता डोळ्यांत पाणी येतं. रात्रीच्या उत्फुल्ल चांदण्यासारखं ते नसतं उन्मादाने रसरसलेलं; त्याच्या अदमु-या प्रकाशात आसवांचं ओलेपण मिसळलेलं. पहाटेचं चांदणंही गहिवरलेलं; सरत्या घडीची मिठी सोडवताना तेही आत-आत व्याकुळलेलं. ---- पहाटेचं चांदणं पाहिलं की नकळता डोळ्यांत पाणी येतं. निरोपाच्या क्षणी जे आत्-आत साकळलेलं असतं.
|
Iravati
| |
| Saturday, October 07, 2006 - 1:43 pm: |
| 
|
पोट उकलून बोलावं असं किती दिवसांत कुणी भेटलंच नाही. रात्री, अपरात्री, हात लांबवून स्पर्श करावा इतका जवळ तू होतास्; पण किती दिवस उलटले, किती रात्री ओसरल्या.... जीवाचं मैत्र कसं अनाथ झालं.... सांगायचं होतं ते हेच आणि तुलाच पण पोट उकलून सांगायला तूही कसा तो भेटलाच नाहीस.
|
Iravati
| |
| Saturday, October 07, 2006 - 1:45 pm: |
| 
|
सुख बोलत नाही सुख बोलत नाही; ते कणाकणातून फक्त झिरपत राहतं कडेकपारीतून ठिबकणा-या सहस्त्रधारेसारखं फेसाळत्या दुधासारखं ते जिवणीच्या कडेकडेनं सांडत असतं. तीराला बिलगणा-या फेसासारखं ते नाच-या डोळ्यांतून खेळत असतं. सुख बोलत नाही; बोलू शकतही नाही. आभाळाला ओढून घेणा-या सरोवरासारखं ते जीवाला स्वत:त ओढून घेतं, लपेटून घेतं. ---- निरोपाच्या थरथरत्या क्षणी बोलू पाहतं ते सुखच असतं तेव्हाही त्याची भाषा असते हुंकाराची, खुणेची, डोळ्यांत साकळलेल्या आसवांची सुख बोलत नाही; बोलू शकतही नाही. ते असतं.... फक्त असतं.
|
Kshipra
| |
| Saturday, October 07, 2006 - 3:59 pm: |
| 
|
इरा, सुख बोलत नाही too good.
|
Iravati
| |
| Sunday, October 08, 2006 - 1:34 pm: |
| 
|
पहाटवा-याची नाचरी पावले असतात दुडदुडत्या बाळासारखी शेवग्याच्या पानांतून ती लुडबुडू लागतात. तेव्हा त्या केल्यासवरल्या काळजालाही मायेचं उधाण येतं. शैशवाची कोवळी पावलं लगतात थरथरू त्याच्याही पिकल्या पानांतून आणि हिरव्या नक्षीला येते सय आईच्या पदराची. पहाटवा-याला जोजवताना शेवग्याच्या काप-या हातांच्या होतात चिमण्या बाळमुठी या मोदकमुठीत असतो स्वप्नांचा चिमणचारा. पहाटवारा जातो पळून तेव्हा शेवग्याची पानं संथपणे गळत असतात.
|