Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 11, 2006

Hitguj » Language and Literature » भाषा » शब्दार्थ » Archive through September 11, 2006 « Previous Next »

Devdattag
Wednesday, September 06, 2006 - 12:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मते.. विसर्ग ह्याचा अर्थ सोडून देणे.. (क. वि. धा. वि. रूप विसर्जित) आणि उत्सर्ग याचा अर्थ बाहेर सोडणे (क. वि. धा. वि. रूप उत्सर्जित..)


Kedarjoshi
Wednesday, September 06, 2006 - 4:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाहत्या पाण्यात विसर्जन करणे इथे allowed नसते किंवा इथल्या मंडळाला ती मुर्ती जपूण ठेवायची असते. अशावेळी मग प्राणप्रतिष्ठेचे उल्लंघन होते असे आहे का?

वाहत्या पाण्यातच विसर्जन करावे असे नाही.

तुझा प्रश्न बरोबर आहे पण. अरे पुण्यात पण सर्वच माणाचे गणपती विसर्जीत होत नाहीत. त्याची मिरवणुक काढली जाते अ ते परत आनले जातात. प्राणप्रतिष्टा ही अगदी छोट्या मुर्तीची केली जाते व ति मुर्ती विसर्जीत केली जाते.

मुळात विधी ने प्राण काढुन घेतले की परत ति मुर्ती निर्जिव होते व ती ऐक जस्ट मुर्ती राहाते नंतर. तु अगदी त्या मुर्तीचे काहीही करु शकतोस. पण आपण भारतीय मुळात थोडे हळवे असतो म्हणुन आपल्या डोळ्यसमोर त्या मुर्तीचे पंचमहातत्वात विलीनीकरण व्ह्यवे म्हनुन विसर्जन करतो.

आता राहीला प्रश्न दगडुशेट सारखे गणपती जे विसर्जीत होत नाहीत त्यांची मग प्राणप्रतीष्टा की प्रतीष्टापणा.
उत्तर दोन्ही. गणपती आले की असलेल्या मुर्तीची विधीवत पुजा करुन तिला हलवले जाते म्हणतेच प्रतीष्टापणा मोडने असे म्हणुयात आपण. नंतर ती मुर्ती मंडपात नेली जाते व तिथे प्राणप्रतिष्टा केली जाते. दहा दिवसांनतर परत विधी करुन प्राण काढुन घेतले जातात, मिरवनुकीतुन वापस आनुन परत एकदा प्रतिष्टापणा केली जाते.

मुळात हे दोन्ही विधी बर्याच प्रमानात सारखे आहेत.


Parop
Thursday, September 07, 2006 - 3:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मते प्राणप्रतिष्ठा ही (वर उल्लेख आल्याप्रमाणे) निर्जीव मुर्तीत 'प्राण' ची स्थापना करण्यासाठीचा विधी आहे. प्राणप्रतिष्ठा हा विधी संबंधीत मुर्तीसाठी एकदाच होतो, भक्ताच्या मर्जीनुसार नाही! प्राणप्रतिष्ठा झाल्यावर मुर्ती हलवु नये असा दंडक आहे.

प्रतिस्थापना हा शब्द 'स्थापना' ला प्रति चा प्रत्यय लावुन आला आहे. अनंत चतुर्थीला आपण करतो ती प्रतिस्थापना. गणपतीला सोहळ्यासाठी स्थानापन्न करतो ती प्रतिस्थापना. प्रतिष्ठापना हा अपभ्रंश आहे.


Bee
Thursday, September 07, 2006 - 6:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परोप,

१) इथे 'प्रति' म्हणजे गणपती असा संबंध लावायचा का? 'प्रति' चा प्रत्यय नीट कळले नाही. जरा सुलभ करुन सांगाल का?

२) जर प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर मुर्ती हलवू नये असा जर दंडक असेल तर देवळात मंदीरात आपण जेंव्हा मुर्ती बसवितो त्याला प्राणप्रतिष्ठा म्हणता येईल. बरोबर?

तुम्हा दोघांचेही परोपकाराबद्दल धन्यवाद :-)


Parop
Thursday, September 07, 2006 - 6:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी,
१) नाही. प्रती हे prefix सारखे काम करते आणि शब्दाला विशिष्ट अर्थच्छटा देते उदा. प्रतिदिन, प्रतिछाया, प्रतिपालक इ.
'प्रति' काही वेळा विरुद्ध दिशाअर्थ दर्शवते जसे: प्रतिकार, प्रतिक्रिया, प्रतिद्वंद्वी.

२) अगदी बरोबर!


Bee
Thursday, September 07, 2006 - 6:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परोप छान.. ह्या बीबीवर तुमचे मनापासून स्वागत करतो :-)

Bee
Thursday, September 07, 2006 - 6:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तेव्हा त्यांनी तिची प्राणप्रतिष्ठा करुन तिथे आधी छोटे मंदिर >>

मूडी, माझी ह्यावरची प्रतिक्रिया मागे घेतो. तुच पुर्वी लकीली बरोबर होतीस :-)

Parop
Monday, September 11, 2006 - 10:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे काय? पितृपक्ष सुरु झाला म्हणून सगळी चर्चा ठंडावली कि काय?

Bee
Monday, September 11, 2006 - 11:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कितीतरीदा मी पितृपक्ष ऐकले असेल पण नेमकी माहिती नाही..फ़क्त एक अंदाज आहे की आपल्या पुर्वजांना आपण पितृपक्षात त्यांच्या आत्म्याच्या रुपाने जेवायला बोलावतो. मला पुर्वजांशी निगडीत फ़क्त अक्षय तृतीया हा एकच विधी माहिती आहे. विधी रित नक्की काय म्हणावे माहिती नाही..

Parop
Monday, September 11, 2006 - 11:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझा अंदाज बरोबर आहे, बी!
पितृ पंधरवड्यात पूर्वज्य आत्म्याच्या रुपाने पृथ्वीतलावर येतात असा समज आहे. त्यांच्या तुष्टीसाठी आणि त्यांना जन्म मरणाच्या फेर्‍यातून सोडवण्यासाठी पिंडदान करण्याची पद्धत आहे.


Parop
Monday, September 11, 2006 - 11:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परंतु अक्षय्य तृतीयेचा पितरांशी काही संबंध नाही.

Maudee
Monday, September 11, 2006 - 12:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असच काही नाही परोप.
माझ्या सासरी अक्षय तृतियेला पितराना जेवण दिल जाते rather श्राध केले जाते याचा significance मात्र मला माहीत नाही. माझ्या सासुबाईही सांगू शकल्या नाहीत.

माझ्या आईकडे मात्र पितृपक्षातच श्राध केले जाते सर्वपित्रिला..... माहेरी अक्षय तृतियेला श्राध म्हणजे "सणाच्या दिवशी काहीतरी काय विपरीत" असा सूर असतो.


Parop
Monday, September 11, 2006 - 12:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अक्षय्य तृतीयेला श्राद्ध- हे मी पहिल्यांदाच ऐकतोय! याबद्दल अजून माहिती मिळवायला हवी.

Deemdu
Monday, September 11, 2006 - 12:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अक्षय तृतीया म्हणजे जिला क्षय नाही असा दिवस ना? तो तर साडे तीन शुभ मुहुर्तापैकी एक आहे. मग त्या दिवशी श्राध्द??? किंवा माऊडे तुमच्या घरतल्यांच कोणाच तरी श्राध्द त्या दिवशी येत असेल ग अस मुद्दम्हुन त्या दिवशी पितृपक्षा सारखं श्राध्द मी तरी पहिल्यांदाच ऐकती आहे

Shyamli
Monday, September 11, 2006 - 12:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो हो
अक्षय तृतीयेला श्राध्द घालतात
खानदेशात आहे ही पध्दत...

माझ्या माहीती प्रमाणे
ब्राम्हणेतर समाजात आहे ही पध्दत बहुतेक कारण मी तिकडे असताना बघितले आहे हे....
( just my observation.........no v&c plz )


Maudee
Monday, September 11, 2006 - 12:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही गं दीम्डु मलाही प्रथम असच वाटलं होतं. कारण लग्नानंतर प्रथमच ही concept ऐकत होते.... तर सासुबाई म्हणाल्या की नाही ही आपली जुनी पद्धत आहे..... even समाजाच्या सर्व लोकांकडे श्राद्ध असत त्या दिवशी.

Maudee
Monday, September 11, 2006 - 12:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझं ख़र असेल श्यामली. माझे सासर मुळच भुसावळच आहे. आता भुसावळ नक्की कुठल्या प्रांतातले ते सांगण्या एवढे माझा भूगोल चांगला नाहीये.पण बहुतेक तिकडचेच कुठले आहे.

आणि माहेर पुणेरी.


Moodi
Monday, September 11, 2006 - 12:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भुसावळ खानदेशातच आहे. प्रत्येक ठिकाणच्या चालीरीती वेगळ्या असु शकतात.


Robeenhood
Monday, September 11, 2006 - 3:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बहुधा ज्यांचे श्राद्ध घालायचे या ना त्या कारणाने पितृपक्षात राहून गेले आहे त्या सर्वानी अक्षय तृतियेस घालून टाकावे अशी काहीतरी योजना आहे असे वाटते....

Dineshvs
Monday, September 11, 2006 - 4:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अक्षय्य तृतीया म्हणजे साडेतीन मुहुर्तांपैकी एक. ज्याला क्षय नाही ते अक्षय असा सरळ अर्थ आहे.
यादिवशी आपच्याकडे दुध तापवुन मुद्दाम ऊतु घालवतात. खीर करतात.
BTW तांदळाला कुठलाच किडा आरपार भोक पाडु शकत नाही, म्हणुन ती अक्षता.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators