Zakki
| |
| Wednesday, July 19, 2006 - 7:14 pm: |
| 
|
मला वाटते उकडणे च्या आधी जे करतात त्याला उबडणे म्हणत असावेत!
गोळेसाहेब, नमस्कार. तुम्ही बहुसंख्य लोकात आहात का?
|
Bee
| |
| Thursday, July 20, 2006 - 1:28 am: |
| 
|
झक्की, मी फ़क्त त्यातील 'चोरणे' करत नाही बाकी सर्व करतो. मराठी ही माझी मातृभाषा आहे मला ण कुठे आणि न कुठे हे नक्कीच माहिती असायला हवे. त्यात तुमच्या सारख्या संस्कृतप्रचुर मंडळीसोबत इथे वास करायचा असेल तर मला नक्कीच थोडे तरी प्रमाणबद्ध मराठी लिहायला हवे शोनू, जसे आपण आदळ - आपट करू नकोस म्हणतो तसेच सांड्-उबड करू नकोस असेही म्हणतात. म्हणजे किचनमध्ये कुणी भांडी आपटतो तेंव्हा आदळ - आपट होते. जेंव्हा कुणी चहासाखरेची बरणी खाली पाडतो, पिठ सांडतो तेंव्हा सांड - उबड होते. आले का लक्षात? जसे आदळ म्हणजे आपटणे सारखे होते तसे उबडणे म्हणजे सांडणे सारखे होते.
|
Nvgole
| |
| Thursday, July 20, 2006 - 2:19 am: |
| 
|
हो. झक्की गुरूजी, मी बहुसंख्यांपैकीच एक आहे. आम्ही 'णळातून पानी आनणार्यांणपैकी' आहोत.
|
Zakki
| |
| Thursday, July 20, 2006 - 2:36 pm: |
| 
|
मग आता तसेच बोलायला पाहिजे! आम्हाला जमले नाही तर सांभाळून घ्या. वाटल्यास न्यू जर्सीच्या मराठीची चेष्टा करा, जसे नागपूरकर पुणेकरांची नि vice versa करतात तशी!
|
Shonoo
| |
| Thursday, July 20, 2006 - 3:01 pm: |
| 
|
बी मी सांड लवंड असा शब्द प्रयोग ऐकला होता. शिवाय लवंडणे म्हणजे वामकुक्षी या अर्थाने वापरलेले पाहिले आहे. सांड उबड हा छान नवीन ( मला नवीन) शब्द सापडला आता.
|
Bee
| |
| Friday, July 21, 2006 - 1:31 am: |
| 
|
शोनू, लवंडणेचा अर्थ मला माहिती आहे. जेंव्हा बाळ रांगते त्यावेळी ते मध्येच तोल डगमगल्यामुळे खाली पडते त्याला लवंडणे म्हणतात. किंवा जर तांब्या लोटा गडवा काहीही घे तो जर slope area ठिकाणी ठेवला तर तो गलंडून खाली पडतो आणि घरंगळत कुठे तरी थांबतो. ह्याला लवंडणे म्हणतात. त्यामुळे मला सांडलवंड हे एकमेकांशी related नाही वाटले तरीपण नविन शब्दांची ज्ञानात भर झाली हे उत्तम.
|
Nvgole
| |
| Friday, July 21, 2006 - 5:40 am: |
| 
|
झक्की अहो रागावताय काय! शोनू, सांड-उबड हा जसा छान शब्द आहे, तसाच पांघरूणाला कांबरूण हाही एक छान शब्द विदर्भात प्रचलित आहे. म्हणायलाही फार छान वाटतो. बी, slope area ला 'उतरण' म्हणतात. उदाहरणार्थ: उतरणीवर ठेवलेला लोटा गलंडतो. चढणीवर ठेवला तरीही गलंडतोच.
|
Bee
| |
| Friday, July 21, 2006 - 6:27 am: |
| 
|
मी म्हणींच्या बीबीवर एक म्हण लिहिली आहे. ती जरा बघाल का मंडळी. गोळे इथे आम्ही क्रियापदांबद्दल आणि त्यातल्या त्यात क्रियापदांच्या शेवटी येणार्या 'णे' बद्दल लिहित आहोत. पांघरून कांबरून हे क्रियापद आहेत का.. ऊं.. अगदी काहीही काहीही आपले लिहायचे
|
Zakki
| |
| Friday, July 21, 2006 - 10:50 am: |
| 
|
झक्की नि रागावणे मायबोलीवर एकत्र राहूच शकत नाहीत. स्वत: न रागावता बाकीच्या बर्याच लोकांना राग येईल असे लिहायचे ही कला मला चांगली अवगत आहे. वादे वादे जायते तत्वबोध: म्हणून हे करायचे!

|
"झक्की" या शब्दाचा अर्थ काय? (साळसूद चेहरा) DDD
|
Shonoo
| |
| Friday, July 21, 2006 - 12:36 pm: |
| 
|
गलंडणे पण पहिल्यांदाच ऐकला. आमच्याकडे वस्तू कलंडत असत. आणि लवंडणे प्रमाणे वामकुक्षी या अर्थाने पण कलंडणे मी ऐकले आहे. बी असे अजून लिहीत रहा मला स्वत:ला पांघरूण पेक्षा काम्बरूण शब्द जास्त गोड वाटतो
|
Bee
| |
| Thursday, July 27, 2006 - 7:25 am: |
| 
|
ग्रंथी असणे हा शब्दप्रयोग कुठे करायचा असतो आणि त्याचा नेमका अर्थ काय? माझ्या मते ग्रंथी असणे म्हणजे something like an allergy . उदा. मला आजकाल नविन चित्रपटांबद्दल ग्रंथी निर्माण झाली आहे. हे फ़क्त उदाहरणादाखल.. मी नविन जुने दोन्ही चित्रपट आवडीने बघतो बर का
|
कठीण आहे बुवा, चार सुभाषिते कधीकाळी पाठ केली आहेत या भांडवलावर माणसाने किती व्याज वसूल करायचे याला काही मर्यादा? (एक खाऊ की गिळू असा चेहरा, वाचणार्याचा!)
|
Bee
| |
| Friday, July 28, 2006 - 3:23 am: |
| 
|
रॉबीन काय झालयं इतका आकाततांडव करायला. शब्दार्थाच्या बीबीवर शब्द नाही विचारायचे तर आणखी कुठे मग.. आता मीच नेहमी विचारतो बाकी नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मला शब्दार्थात रस आहे म्हणून मी विचारतो. तुम्हाला तर उत्तर येत असेल, देण्यात रस असेल तर द्या. बळजबरी कुणावरच नाही. तेंव्हा असले तिरकस उत्तर लिहू नका अशी नम्र विनंती. जसा मी तुमचा मान राखतो नेहमी तसा तुम्ही माझाही राखाल अशी एक अपेक्षा..
|
अरे बाबा बी, मी तुला उद्देशून नाही रे लिहिले! तू उगीच गैरसमज करून नको घेऊस! ते आहेत ना दुसरे एक प्रकांड पंडित.. आता कोण म्हणून काय विचारतोस? हितगुजवर नवा आहेस का?
|
Bee
| |
| Friday, July 28, 2006 - 5:27 am: |
| 
|
अच्छा ठिक आहे रॉबीनभाऊ.. मला वाटले माझ्याच साठी ते वाक्य लिहिले होते की काय
|
ग्रंथी असणे / निर्माण होणे हा शब्द प्रयोग मी ऐकला नाहिये कधी. पण अर्थ मला तरी एखाद्या विषयात रस वाटणे असा वाटत आहे( Taste develop होणे म्हणतात तशा अर्थाने) हा मी आपला असाच अन्दाज करत आहे.
|
ग्रन्थी असणे हा शब्द नव्यानेच ऐकतोय.... एक नाम म्हणून दशग्रन्थी ब्राम्हण अथवा गबाळग्रन्थी माणूस असे ऐकलेय बघावे लागेल...
|
Bee
| |
| Saturday, July 29, 2006 - 2:57 am: |
| 
|
नाही ऐकलाय का शब्द.. मी माहिती काढली मात्र. ग्रंथी असणे किंवा निर्माण होणे म्हणजे एखाद्या बद्दल मनात गाठ निर्माण होणे.. चुकीच्या पुर्वग्रहामुळे वगैरे.. असा त्याचा अर्थ होतो. बर.. व्रात्य म्हणजेच वात्रट का?
|
Bee
| |
| Saturday, July 29, 2006 - 3:00 am: |
| 
|
दशग्रंथी ब्राम्हण आणि गबाळग्रंथी हे शब्द मीही वाचले आहेत पाठ्यपुस्तकात. दोन्ही शब्द पुरेसे माहिती नाही.. गबाळ शब्दाचा अर्थ सगळ्यांना माहिती आहे, तसेच ब्राह्मण. पण त्यातल्या ग्रंथीचा अर्थ काय असेल ह्याचा विचार कधी केला नाही..
|